"तेलुगु शिकण्यासाठी" WhatsApp समूह

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
1 Apr 2017 - 12:01 pm
गाभा: 

तेलगू शिकण्याची-शिकवण्याची आवड, गरज, इच्छा असलेल्यांसाठी तेलुगु शिकण्यासाठी हा WhatsApp समूह सुरु करीत आहोत.

समुहात सामील व्हायला इच्छूक असलेल्यांनी मला व्यनि करुन आपला WhatsApp क्रमांक कळवावा.

इतर मार्गदर्शक सूचनांचे स्वागत आहेच!

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Apr 2017 - 12:23 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

उत्तम प्रयोग. हिंदी व मातृभाषेव्यतिरिक्त १-२ भारतिय भाषा अवगत असल्या पाहिजेत.

विनटूविन's picture

2 Apr 2017 - 9:00 pm | विनटूविन

माझा मुलगा चेन्नईत असल्यामुळे मला हे फारच जाणवत आहे. असाच तामिळ भाषेसाठी धागा काढा.

वामन देशमुख's picture

3 Apr 2017 - 10:05 am | वामन देशमुख

तमिझ्(तमिळ)शिकण्यासाठी हा तामिळ भाषेसाठी धागा आहे आणि संबंधित WhatsApp समूह आहे. In fact, त्या धाग्यावरूनच मला तेलगू शिकण्यासाठी हा WhatsApp समूह सुरु करण्याची प्रेरणा मिळाली.

सिरुसेरि's picture

1 Apr 2017 - 1:46 pm | सिरुसेरि

शुभेच्छा . इप्पुर चुडो.

वामन देशमुख's picture

1 Apr 2017 - 2:47 pm | वामन देशमुख

धन्यवादामुलु.

>>इप्पुर चुडो.

अंटे एंटी?

सतिश गावडे's picture

1 Apr 2017 - 2:55 pm | सतिश गावडे

चाल्ला बावंदा.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Apr 2017 - 3:40 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मिपावर गुणवत्ता आहे असे हे म्हणतात ते खोटे नाही.

प्रसाद गोडबोले's picture

1 Apr 2017 - 4:39 pm | प्रसाद गोडबोले

भारी कल्पना !!

रेवती's picture

2 Apr 2017 - 11:08 pm | रेवती

तेलुगु रा ले दू.

बंगाली भाषा शिकण्याकरीता असा एखादा ग्रूप आहे का? बंगाली शिकण्याची सुरूवात नक्की कोठून करावी?

'उद्धरेदात्मनात्मानम' या गीतावचनाप्रमाणे स्वतःहूनच जरा खटपट केली तर 'बंगाली भाषा प्रवेश'भाग १ ते ४ या पुस्तकांचा शोध लागला. :))
अर्थात या शोधाचे श्रेय बॅटमॅन यांनी तामीळ शिकण्यासाठी या धाग्यात जी लिंक दिली आहे त्याला जाते. सध्या या अप्रतीम पुस्तकमालिकेतील पहिले पुस्तक {बंगाली भाषा प्रवेश(१ ते ४)} वाचत आहे. इंटरेस्ट येत आहे.
जिज्ञासूंनी उतरवून घ्यावे.

'उद्धरेदात्मनात्मानम...' या गीतावचनाप्रमाणे स्वतःहूनच जरा खटपट केली तर 'बंगाली भाषा प्रवेश'भाग १ ते ४ या पुस्तकांचा शोध लागला. :))
अर्थात या शोधाचे श्रेय बॅटमॅन यांनी तामीळ शिकण्यासाठी या धाग्यात जी लिंक दिली आहे त्याला जाते. सध्या या अप्रतीम पुस्तकमालिकेतील पहिले पुस्तक {बंगाली भाषा प्रवेश(१ ते ४)} वाचत आहे. इंटरेस्ट येत आहे.
जिज्ञासूंनी उतरवून घ्यावे.

गुजराती शिकायची आहे. एखादा समूह असल्यास कृपया सुचवावे

वामन देशमुख's picture

7 Apr 2017 - 9:15 am | वामन देशमुख

तेलुगु शिकण्यासाठी या WhatsApp समूहाला भरघोस प्रतिसाद देत असल्याबद्धल मिपाकरांचे धन्यवाद.

प्रत्यक्ष जीवनात परिचित नसलेल्या लोकांना जोडून एक WhatsApp समूह बनवणे आणि तो चालवणे याचा मला काहीच पूर्वानुभव नव्हता, पण आता हळूहळू शिकतोय.

समूहात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना विनंती, मला आपल्या फोन नंबरसोबतच आपले पूर्ण नाव पाठवावे म्हणजे मला आपला नंबर सेव करणे सोपे जाईल. काहीजणांचा मिपावरील आइडी हा कॉन्टॅक्ट यादीत व समूहावरील प्रतिसादांमध्ये दिसणे थोडे विचित्र वाटते.

मिपावरून सुरु झालेल्या इतर समूहांचे Admins, अपरिचित लोकांचे नंबर कोणत्या नावाने सेव करतात?

वपाडाव's picture

7 Apr 2017 - 10:48 am | वपाडाव

नेन कुडा..!

उपयोजक's picture

1 May 2017 - 6:27 pm | उपयोजक

असंच आवाहन मी तमिळ शिकण्यासाठी इथं केलं होतं.त्यावेळी डांगे साहेब लै भडकले. हे नैतिकतेला धरुन नाही वगैरे!
मिपावर काय लिहिलंय यापेक्षा कोणी लिहिलंय याला महत्व आहे असं म्हणतात ते खोटं नाही.

असो. वामन साहेब तुमच्या उपक्रमास खुप सार्‍या शुभेच्छा!

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2017 - 4:14 pm | धर्मराजमुटके

काय प्रगती तेलुगु शिकणार्‍यांची ? मधून मधून अपडेट टाकत रहा म्हणजे ग्रुप बनविल्याचा फायदा झाला की नाही ते कळेल.