विहार…भाग ३

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
24 Mar 2017 - 3:50 pm

पहिल्या दोन भागांची लिंक,
http://www.misalpav.com/node/39239
http://www.misalpav.com/node/39266

अहमद आता उठून बसला होता. आपल्यासमोर नियतीने काय वाढून ठेवले आहे ह्याची त्याला आता पूर्ण कल्पना आली होती !!

रात्रभर अहमदला झोप लागली नाहीच. सकाळी उठल्यावर तो इरफानला भेटायला गेला. इरफानला रात्री थोडा त्रास झाला होता. तिथल्या डॉक्टरने पेनकिलर देऊन त्याला झोपविले. डॉक्टरने अहमदला काही औषधं लिहून दिली. हॉस्पिटलच्या आवारात संस्थेचेच एक औषधांचे दुकान होते जे चोवीस तास सुरु असायचे. ते दुकान शोधता शोधता अहमदने पूर्ण दवाखाना फिरून घेतला. त्याच्या कल्पनेपेक्षा फारच मोठे हॉस्पिटल होते ते. अर्थात तिथे येणाऱ्या रुग्णांची संख्याही तेवढीच मोठी होती. हे सगळं बघितल्यावर इरफानला आपण योग्य ठिकाणी आणल्याचं अहमदच्या लक्षात आलं. पण एक मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता......इरफानच्या इलाजाचा खर्च!!! त्यासाठीच आज अहमदला कोणत्याही परिस्थितीत मोठ्या डॉक्टरांना भेटायचे होते.

थोडी चौकशी केल्यावर हॉस्पिटलच्या मागच्या कॉलनीमध्ये राहायला खोली मिळते असे अहमदला कळले. अहमद तिथे गेला. जवळजवळ प्रत्येकच घरातली एखाद-दुसरी खोली हे पेशंट्सच्या नातेवाईकांना भाड्याने देण्यासाठी उपलब्ध होती.काही पेशंट्सचे नातेवाईक तर दोन-तीन महिन्यांपासून तिथेच राहत होते. हा प्रकार अहमदला जरा विचित्र वाटला. एवढे दिवस राहण्याची गरज का पडत असावी हे त्याला कळत नव्हतं. अर्थात दिवसाचे दोनशे रुपये देऊन खोली घेणं अह्मदला पटलं नाही. आता बायकोच्या भावाला (सलीम) संपर्क करण्याशिवाय पर्याय नव्हता. भाऊसुद्धा जवळच राहायचा. तो लगेच अहमदला भेटायला आला. शक्यतो हॉस्पिटलच्या रिसेप्शनमध्येच झोपायचे पण अगदीच गरज पडल्यास सलीमकडे जायचे असे अहमदने ठरवले. अहमदचा रोजचा डबा सलीमच्या घरून येणार होता. इरफानला हॉस्पिटलमध्ये मिळणारे जेवण सोडून अन्य काही खाण्यास मनाई होती.

दोन-तीन दिवस अशेच गेलेत. अहमदची मुख्य डॉक्टरांशी भेट होत नव्हती. वॉर्डातले डॉक्टर काही सांगत नव्हते. एक दिवस अहमद इरफानजवळ बसला असताना त्याला मुख्य डॉक्टरांचा भेटण्यासाठी निरोप आला. अहमद लगबगीने तिकडे गेला.
"आओ अहमद भाई. सलाम वालैकूम!"
"वालैकूम अस्सलाम डॉक्टरसाहब!"
"कैसे हो?"
"ठीक हू साहब. दो-तीन दिनो से आपसे मिलना चाह राहा था..लेकिन.."
"हा..पर तब मेरे पास तुम्हे बताने के लिये कुछ नही था."
"हुआ क्या है साहब?"
"अहमद..इरफान की केस बहोत अलग है. शायद दुनिया की ये पहली ऐसी केस है जिसमे इन्सान की दोनो किडनीया जुडी हुवी नही है. इन दो-तीन दिनो में हमने दुनियाभर के बहोत सारे केसेस देखे. कुछ एक्सपर्टसे बात भी की है..लेकिन किसीके के पास कोई ठोस जवाब नही है."
"ये क्या केह रहे हो साहब?"
"बहोत सोचविचार के बाद हमने इरफान दोनो किडनीया सर्जरीसे जोडने का फैसला किया है. पर ये इक तरह का प्रयोग ही होगा."
"क्या ऐसा हो सकता हैं?"
"हम विश्वास हैं के जरूर कामयाब हो जायेंगे."
"जैसा आप सही समझे साहब."
"आपकी सहमती हो हम आज बढ सकते हैं"
"मैं क्या सहमती दूंगा डॉक्टरसाहब? बेटेसे बढकर किसी के लिये क्या हो सकता हैं!!...लेकिन.."
"क्या हुआ अहमद?"
"साहब..खर्चा कितना हो सकता हैं?अंदाज मिल जाये तो मैं इंतजाम करता हू."
"अहमद खर्चा बहोत ज्यादा हैं. युकी ये हमारे लिये भी एक प्रयोग हैं, हमारा कोई भी डॉक्टर इरफान के इलाज की फीज नहीं लेंगा..सर्जरी की भी नहीं. पर बाकी सारा खर्चा तुम्हे करना होगा.तकरीबन चार से पाच लाख रुपये लग सकते हैं."

अहमद डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे बघत राहिला.

"क्या तुम इतना कर सकते हो अहमद?"
काही तरी ठरवून अहमद म्हणाला,
"पता नही साहब..पर आप इलाज सुरू किजीये. मैं कुछ भी करके पैसे जमा करुंगा."
"ठीक हैं..पर तुम्हे अभी एक लाख रुपये जमा करने होगे."
"कल तक समय मिल सकता हैं?"
"हा जरूर"

जाता जाता अहमदने डॉक्टरांना एक प्रश्न विचारला,
"सबकुछ ठीक तो हो जायेगा ना डॉक्टरसाहब?"
"खुदा पे भरोसा रखो अहमद!"

हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर अहमदने सर्वात आधी सोन्याचा गोफ आणि हातातली अंगठी सोनाराकडे विकली. जवळचे पैसे आणि दागिन्यांचे असे मिळून एक लाख रुपये त्याने संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये जमा केले. इरफानला त्याने यापैकी काहीही सांगितले नाही. बाकी पैसे जमवण्यासाठी त्याला तीन-चार दिवस गावी जाणे भाग होते. काही पैसे सलीमला देऊन अहमद गावी निघाला. गावी गेल्यावर अहमदने बायकोला पूर्ण परिस्थिती सांगितले. तिचे डोळे पुसतानाच काही झालं तरी आपण या परिस्थितीचा मुकाबला करायचाच असे त्याने मनोमन ठरवले. एक -दोन दिवसात त्याने बायकोचे दागिने, घरातले चांदी-पितळेचे भांडे आणि अन्य काही गोष्टी विकून साडे-तीन चार लाख रुपये जमवले. आणि तो नाडियाडला वापस आला. इरफानची ट्रीटमेंट आता वेगाने सुरु होती. अहमद वापस येताच तीन दिवसांनी इरफानची सर्जरी झाली. त्यात डॉक्टरांना म्हणावे तसे यश आले नाही.

दिवसामागून दिवस जात होते. डॉक्टरांचे प्रयत्न सुरूच होते.पुढच्या काही दिवसात इरफानचे आणखी एक ऑपरेशन झाले. याकाळात अहमद इतर सगळ्या पेशंट्सला पाहत होता. किडनी ट्रान्सप्लांटसाठी कुवैतवरून भारतात आलेला एक शेख. अवाढव्य शरीरयष्टीचा हा शेख लहान बाळासारखा कळवळून रडायचा.गडगंज श्रीमंत असलेल्या शेखकडे बघायला त्याचं जवळचं कोणीही नव्हतं. उत्तरप्रदेशावरून आलेल्या हरीशची कथा निराळीच होती.एका रेल्वे अपघतानंतर झालेल्या ऑपरेशनमध्ये डॉक्टरकडून झालेल्या चुकीमुळे एक छोटी कात्री त्याच्या पोटातच राहिली. त्या कात्रीने हरीशची किडनी जायबंदी केली होती. असे कितीतरी पेशंट्स अहमद रोज बघायचा. रोज समुद्राकडे बघताना या अथांग विश्वात आपण किती नगण्य आहो ही त्याची भावना आता प्रत्यक्षात उतरत होती.

गेल्या तीन महिन्यात इरफानचे चार ऑपरेशन झाले. चौथ्या ऑपरेशनमध्ये इरफानच्या किडन्या जोडण्यात डॉक्टरांना यश आले. किडनी जायबंदी न करता जोडणे ही डॉक्टरांसाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती. डॉक्टर समाधानी होते. पण या सगळ्यासाठी जवळपास पंधरा लाख रुपये खर्च आला होता. पण अजिबात पुढेमागे न बघता अहमदने राहतं घर, घरातल्या सर्व गोष्टी, आणि त्याच्या उपजीविकेची होडीसुद्धा विकली. नवीन घरमालकाने अहमदची गरज बघता काही दिवस घरात राहण्याची मुभा दिली. अहमदसमोर बरेच प्रश्न होते. पण मुलगा वाचला हे त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं.

एके दिवशी डॉक्टरांनी अहमदला बोलावलं.
"आओ अहमद. मुबारक हो!!"
"सब आपकी मेहेरबानी हैं साहब"
"इरफान अब ठीक हैं. तुम उसे घर ले जा सकते हो"
"आपको शुक्रियादा कैसे दु साहब!! आप खुदा हो!"
"नही अहमद ये खुदाकी हम सब पे मेहेरबानी हैं! वैसे......"
"क्या हुआ साहब?"
"इरफान करता क्या हैं? पढता हैं??"
"जी वो आयटीआय का स्टुडंट हैं"
"ओह्ह !"
"क्या हुआ साहब?"
"अहमद..इरफान अब मेहनतवाले काम नाही कर पायेगा.हमें उसका खयाल रखना होगा."
"मतलब?"
"उसे आराम करना हैं. अभी भी और आगे भी. आयटीआयवाला जॉब वो नहीं कर सकता."
"क्या केह रहे हो साहब? कभी ना कभी तो इरफान को नौकरी करनीही पडेगी ना..मेरे बाद क्या होगा?"
"हा इरफान जरूर नौकरी करेगा. पर ज्यादा भागदौडवाली नहीं"
"ठीक हैं साहब"
"मायूस मत होना अहमद. खुदा के दुवा से सब ठीक हो जायेगा!"
"ठीक हैं."
अहमद खुर्चीवरून उठला. दरवाज्यापर्यंत गेल्यावर तो क्षणभर थांबला. तो म्हणाला,
"डॉक्टरसाहब इन्शा अल्लाह सबकुछ ठीक हो जायेगा!!....लेकिन"
"लेकिन?"

"क्या इरफान फिर कभी क्रिकेट खेल पायेगा?", अहमद डोळे पुसत म्हणाला.
क्रमश:

कथाअनुभव