पासपोर्ट बद्दल मदत

बाप्पू's picture
बाप्पू in काथ्याकूट
22 Mar 2017 - 9:40 pm
गाभा: 

माझ्या एका मित्राचा पासपोर्ट बद्दल मदत हवी आहे. त्याने सर्व सोपस्कार पार पडले परंतु पोलीस मामांना त्यांची दक्षिण दिली नाही.(याच्यासाठी भरपूर काही लिहायचे आहे पण तूर्तास विषयाकडे वळूयात ) त्यामुळे त्यांनी adverse रिपोर्ट फाईल केला आहे. त्याचे पोलीस वेरिफिकेशन साठी खूपदा फोन करून देखील त्याच्या घरी पोलीस आले नाही. ३-४ वेळेला त्याने स्वतःहून पोलीस स्टेशन गाठले आणि चौकशी केली तेव्हा आज येऊ उद्या वेळू अशी थातुर मातुर उत्तरे मिळाली. शेवटी ५ व्य वेळेला त्याचे वेरिफिकेशन झाले आणि ते करण्यासाठी त्याला स्वतःहून पोलीस स्टेशन मध्येजावे लागले. त्याने लागणारे सर्व कागदपत्रे पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कोणतेही इतर कागदपत्र द्या किंवा आहेत या कागदपत्रांमध्ये काही उणिवा आहेत असे काही हि सांगितले नाही. नेहमी प्रमाणे पोलीस मामांनी दक्षिण मागितली तेव्हा त्याने देण्यास नकार दिला. त्यावेळेला तो पोलीस काही हि बोलला नाही.

पुढच्या आठवड्यामध्ये त्याला समजले कि आपल्या पासपोर्ट मध्ये पोलिसांनी adverse शेरा दिलेला आहे.
त्याने पुढे काय करावे? त्याचे सगळे कागदपत्र व्यवस्थित आहेत तसेच कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नाहीये. परंतु पोलिसांनी काहीतरी प्रॉब्लेम काढलेला आहे. (सध्या तो नेमका काय आहे ते online समजत नाहीये ) जास्त करून तो रहिवासी पुराव्याशी निगडित असण्याची शक्यता आहे.

तर आता या पुढे त्याने नेमके कोणत्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत जेणेकरून पासपोर्ट लवकरात लवकर मिळू शकेल.
मिपावर असा कोणाला काही अनुभव आहे का ?

हि घटना ऐकल्यानंतर नंतर पोलिसांची थोडी स्तुती करण्याची खूप इच्छा होत आहे त्यामुळे त्यांच्यासाठी फक्त २ शब्द. ..

या आणि अश्या पोलिसांशी निगडित असलेल्या इतर खूप घटना मी फार जवळून पहिल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस हि च सर्वात मोठी चोरांची टोळी आहे असे माझे वयक्तिक मत आहे. इथे कोणी पोलीस मिपाकर असतील तर त्यांना साष्टांग प्रणाम.
म.पो ( महाराष्ट्र पोलीस ) (मला पोसा)

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Mar 2017 - 10:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमचा मित्र, आताही, ईमेलने,
(अ) पोलीस मुख्यालयाकडे;
(आ) कलेक्टर व डेप्युटी कलेक्टर यांना CC मध्ये ठेऊन;
(इ) पोलिसांना पुरवलेल्या कागदपत्रांच्या प्रती जोडून; पोलिसांबरोबरचे सर्व (त्याच्या धमक्यासकटचे) संभाषण पाठवू शकतो.
(ई) त्याच ईमेलमध्ये या सगळ्यांकडे प्रत्यक्ष भेटीची वेळ मागायला विसरू नका.

तुमची कागदपत्रे पुरेशी व योग्य असल्यास, तुम्हाला हवा तो परिणाम होईल असे वाटते.

==================

या समस्येवर इथे एक उपाय लिहिलेला आहे.

हा उपाय इतरांच्या सर्वसाधारण माहितीसाठी दिला आहे.

ओके. सध्यातरी त्याला पासपोर्ट कार्यालयात जाऊन नेमके कोणत्या कारणास्तव adverse शेरा दिला गेला आहे याची माहिती काढण्यास सांगितले आहे. त्यानंतरच कळू शकेल कि पुढची स्टेप काय घ्यायची त्याने.

आत्तापर्यंतचे पोलिसांबरोबरचे सर्व संभाषण तर त्याच्याकडे नाहीये. पण इथून पुढचे सर्व संभाषण हे रेकॉर्ड करून घेण्याचा सल्ला दिला आहे.

चौथा कोनाडा's picture

22 Mar 2017 - 11:08 pm | चौथा कोनाडा

गंभीर मामला !

१. वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार करा. वस्तूस्थितीचे पुरावे हजर करून अ‍ॅडव्हर्सचा बट्टा मिटवुन पासपोर्ट मिळवा.
२. पोलिस खात्यातील कर्मचार्‍याशी ओळख काढून समस्या सोडवा (इथेही त्यांच्या मदतीसाठी काहीतरी दक्षणा द्यावी लागेल का विचारून मगच पुढचे पाऊल उचला)
३. हातशी वेळ नसेल तर दक्षिणा द्यावी लागेल हे मान्य करून त्याच पोचौकी मधुन समस्या सोडवा.

अशी कामे करताना सदर यंत्रणांमधील काही कर्मचारी फारच नीचपणा करतात असा माझाही अनुभव आहे. आपल्या सारख्यांची अवस्था खुपच दयनिय होते.
अश्याच काही तडजोडी करुन वेळ मारून नेण्यावाचून गत्यंतर नसते.

तुमचा मित्राचा मला पोसाचा अनुभव वाचायला आवडेल. जरूर इथे टाका.

बाप्पू's picture

23 Mar 2017 - 12:19 am | बाप्पू

नक्कीच. लवकरच एक लेखमाला लिहिण्याची इच्छा आहे.
कोणत्या तरी एका वाहिनीवर शौर्य नावाची एक मालिका लागते (z युवा बहुतेक ) त्यामध्ये पोलिसांचे पराक्रम रंगवून सांगितले जातात आणि बऱ्याच वेळेला पोलीस हे खूप कष्ट करणारे, ओव्हर टाइम करणारे ,अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांचे म्हणणे आपुलकीने ऐकून घेणारे, समस्या सोडवणारे असे दाखवतात ... कदाचित ०.१ % केसेस मध्ये ते खरं असेलही.

०.१ % एवढयासाठी कि आजवर माझ्या पाहण्यात असे पोलीस कुठे आलेले नाहीत. त्यांचे हे सो कौलड शौर्य आजतागायत अनुभवायास मिळाले नाही. परंतु इतर सर्व गोष्टीतले यांचे पराक्रम खूप जवळून पहिलेत त्यामुळे त्यांचे हे शौर्य देखील नक्कीच समोर आणण्याचा प्रयत्न राहील.

नेत्रेश's picture

23 Mar 2017 - 5:21 am | नेत्रेश

महाराष्टाला करकरे, साळसकर, कामते, ओंबळे यांचा विसर पडु लागलेला दीसतो. असंख्य पोलिस तुटपुंज्या पगारावर, स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता १२ - १५ तास सलग ड्युटी आजही करत आहेत. जी काही सुव्यवस्था आज दीसतेआहे त्याचे श्रेय नि:संशय महाराष्ट्र पोलीसांना आहे.

काही पोलिसांच्या पैसे खाण्याचे समर्थन करायचा उद्येश नाही, पण मला भेटलेले ९०% पोलिस प्रामाणीक आणी मदतीला तत्पर होते.

नव्व्याणव टक्के पोलीस हे लाचखाऊ आणि भ्रष्ट असतात. पोलीस आयुक्तालयात ओळख असेल तर पहा. पासपोर्ट कार्यालय तुमचा पासपोर्ट रि-व्हेरिफिकेशनला पाठवू शकते. तिथे विचारा. देवेंद्र फडणवीस नामक गृहस्थांना ट्विटरवर ट्विट करा. महाराष्ट्राच्या कोणी वाली नसलेल्या गृहखात्याचा अधिभार यांच्याकडे आहे म्हणे. कपिल शर्मा नामक सेलेब्रिटीसारख्यांना लगेच प्रतिसाद मिळतो. असो.

पासपोर्ट कार्यालयाकडे माहिती अधिकाराअंतर्गत तुम्ही पारपत्र अर्ज नाकारला गेल्याचे कारण मागू शकता. तसेच पोलीस आयुक्तालयाकडेही मागा.

पोलीस स्थानकासमोर मांडव टाकून आणि सोशल मीडियावर जाहीर करून उपोषणाला बसा, असा सल्ला दिला असता. पण मपोची कातडी गेंड्यालाही लाजवेल इतकी निब्बर असते. किमान नऊ दिवस उपोषण केल्यावर दहाव्या दिवशी दखल घेतली जाण्याची शक्यता असते.

या प्रतिसादात महाराष्ट्र पोलीस नामक सडलेल्या यंत्रणेला कसलाही दोष दिलेला नाही. त्यांची तेव्हढीसुद्धा लायकी नाही. असो. तुमच्या मित्राला झालेल्या त्रासाबद्दल वाईट वाटलं. शुभेच्छा कळवा.

संजय क्षीरसागर's picture

23 Mar 2017 - 11:23 am | संजय क्षीरसागर

नव्व्याणव टक्के पोलीस हे लाचखाऊ आणि भ्रष्ट असतात.

म्हणजे नोटाबंदीनंतर सुद्धा हे चालूच आहे ? आणि म्हात्रे सरांना याची कल्पनाच नाही ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Mar 2017 - 2:04 am | डॉ सुहास म्हात्रे

आणि म्हात्रे सरांना याची कल्पनाच नाही ?

संक्षी, तुमच्यासारख्या महान विभूतिला चक्क असे (स्वतःला उत्तर माहित नसलेले) प्रश्न पडतात ???!!!

तुम्ही विसरले असल्याचे दिसत असल्याने, कोणताही प्रश्न चुटकीसरशी सोडविण्याच्या तुमच्याच्च कृतीची आठवण करून देत आहे....

नेहमीप्रमाणे, हा प्रश्नही तुमच्या मनाच्या कंप्युटरमध्ये टाकून त्याला बंद करा. म्हणजे त्या बंद (कोण तो म्हणतोय रे... बिघडलेल्या) कंप्युटरमधून नेहमीप्रमाणे "सर्वव्यापी, सर्वकालीन, सर्वसामायक, इत्यादी, इत्यादी, इत्यादी" असे केवळ आणि केवळ तुम्हालाच्च माहीत असलेले आणि तुम्हालाच्च पटणारे उत्तर मिळेल. विसरलात ?!(अतीअतीआश्चर्यदर्शक स्मायली कल्पावी)

खास सूचना :

१. संक्षी, तुमच्यासारख्या स्वघोषित अध्यात्मिक अधिकार्‍याला, असा "आपल्या मनातील कलुषितपणा, दुखर्‍या जखमेसारखा, दीर्घकालापर्यंत कुरवाळत राहणे" आणि ते करताना "दुसर्‍याच्या एखाद्या गंभीर धाग्याचे असंबंध अवांतर करणारी राळ उडवणे" शोभा देत नाही ! अरेरे, असे मानसिक अधःपतन अध्यात्मिक मनःशांतीचा भंग झाल्याचे लक्षण आहे असे म्हणतात ! हे पाहून तुमच्या बिचार्‍या (काल्पनिक) चेल्यांच्या मनाला किती यातना होतील याची तरी थोडीशी फिकीर करा !!!

२. तुमचा वरचा खवट प्रश्नार्थक प्रतिसादच्च शेवटटाच्च आहे, असे तुमच्या समाधानासाठी जाहीर करत आहे. तेव्हा, उगा अजून काहीबाही लिहून धाग्याचे काश्मीर करण्याचा विनोदी प्रयत्न करू नये. केल्यास त्याला दीर्घकालीन कलुषित मनाचा दुसरा ईनोद असे समजून फाट्यावर मारण्यात येईल. धन्यवाद !

संजय क्षीरसागर's picture

24 Mar 2017 - 10:50 am | संजय क्षीरसागर

पोस्ट भ्रष्टाचारावर आहे आणि नोटाबंदीमुळे त्यात काहीही फरक पडलेला नाही.
इतका साधा मुद्दा आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Mar 2017 - 9:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

संक्षी, तो वैयक्तिक आणि खवट प्रतिसाद लिहिताना स्वत:चा तोल गेला होता हे कबूल करण्याऐवजी सारवासारव करण्याची ही नवीन वैयक्तिक अध्यात्मिक पद्धती आहे काय ?! =)) =)) =))

उगी, उगी, उगी ! अचं ललायचं नाय ! =)) कारण...

१. स्वतः निष्कारण खोडी काढल्यावर असे लहान मुलासारखे रडायची परवानगी नसते हे वास्तविक सत्य तुमच्या वैयक्तिक अध्यात्मात नसेल, पण खर्‍या अध्यात्मात अध्याहृत असते. इतके बेसिक सत्य तुम्हाला माहीत नाही हे कळल्यावर तुमच्या चेल्यांना (तुम्हाच्या अध्यात्माला मानणारे आहेत आणि ते अध्यात्मावरचे पुस्तक प्रसिद्ध करण्याचा आग्रह तुम्हाला सतत करतात, असा दावा तुम्हीच मिपावर सार्वजनिक प्रतिसादात केला होता, ते आठवा) काय वाटेल याची जराशी तरी फिकीर ठेवा हो !

२. तुमच्या त्या कुजकट प्रतिसादामागे काय भावना लपली होती हे मिपाकरांना कळले नसेल, असा तुमचा (बालिश) विचार असेल तर तुमच्या विचारशक्तीबद्दल आणि "स्वघोषित अध्यात्मिक अधिकाराबद्दल" संशय घेण्याला नक्कीच जागा आहे... आणि,

३. त्या प्रतिसादामागची भावना लोकांना कळून येईल हे माहीत असूनही ते लिहिण्याची सुरसुरी तुम्हाला आवरली नसेल तर त्यानेसुद्धा तुमच्या "स्वघोषित अध्यात्मिक अधिकारावर" प्रश्नचिन्ह निर्माण होतच आहे ! हे तुम्हाला समजले असले-नसले तरी, सर्वसामान्य वाचकांसकट तुमच्या (तथाकथित व स्वघोषीत ) चेल्यांनाही समजेल इतके स्पष्ट आहे.

४. स्वामिजी, (हे नामाभिदान तुम्हीच तुम्हाला स्वतःच नुकतेच मिपावरच लावून घेतले आहे, तेव्हा त्यावरून फुकाचा तळतळाट करून घेऊ नये) आम्ही स्वतःहून कोणाची खोडी काढत नाही आणि कोणी निष्कारण खोडी काढलीच तर आलतूफालतू स्वामींचे नाही, तर "भले तरी देऊ कासेची... " म्हणणार्‍या तुकाराममहाराजांचे म्हणणे ऐकतो आणि तेच आचरणात आणतो. तेव्हा, भविष्यात परत केव्हाही, असंबंध अवांतर करून, आपल्या मनातील वैयक्तिक अ-अध्यात्मिक जळजळ बाहेर काढण्याची सुरसुरी आली की दहादा विचार करावा, न केल्यास प्रत्युतरास तयार असावे, असा न मागितलेला व्यावहारीक सल्ला (हॅ, हॅ, हॅ, अध्यात्मिक सल्ला देणारा स्वामिजी असण्याचा हास्यास्पद दावा करणार्‍यांपैकी आम्ही कधीच नव्हतो/नाही/नसणार आहोत.) आहे.

बाकी सगळे तुमच्यावर अबलंबून आहे. राम राम !

संजय क्षीरसागर's picture

24 Mar 2017 - 10:52 pm | संजय क्षीरसागर

भ्रष्टाचारात नोटाबंदीमुळे काहीही फरक पडलेला नाही हे मी तुमच्या पोस्टवर लिहीलं होतं. पण तिथे तुम्हाला ते पटलं नाही. या पोस्टच्या निमित्तानं ते प्रूव झालं. मी ते तुमच्या निदर्शनाला आणून दिलं इतकंच.

कम्युनला `स्वामीजी' ही एकमेकांना संबोधण्याची कॉमन प्रणाली आहे. ते विशेष नाम नाही. कधीही तिथे जाऊन पाहा किंवा ओशोंच्या कुणाही साधकाला विचारा. तुम्ही निष्कारण व्यथित होतायं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Mar 2017 - 11:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

"स्वामी गिरा पर टांग उपर" अशी नवीन म्हण आस्तित्वात आणण्याचा यशस्वी प्रयत्न ! अभिनंदन !!

बादवे,
(अ) "भ्रष्टाचार आणि तो जगाच्या १००% चौ सेमीवरून १००% नाहिसा होऊ शकतो की नाही याबद्दलचे तुमचे अगाध अज्ञान" याबद्दलचे
आणि
(आ) "तुम्हाला स्वतःला भ्रष्टाचार आणि भ्रष्ट व्यक्तिंची खात्रीलायक माहिती असताना, त्याबद्दल काहीही न करता हातावर हात ठेऊन तुम्ही गप्प राहता व फक्त विनापुरावा सरसकटीकरण करणारी विधाने करण्यात धन्यता मानता" हे मान्य करणारे...
...तुमचे उच्च विचार मिपावर कायमस्वरूपी लिखित स्वरूपात आहेतच.

असा माणूस 'सजग नागरिक' म्हणूनच नव्हे तर "सर्वसामान्य माणूस" म्हणून किती "नीतिमान" आहे, हे मी सांगायची गरज नाही आणि नीतिमत्ता अध्यात्मिकतेची पहिली पायरी आहे असे म्हणतात, हे पण सांगायलाच हवे का ?

वरचे (अ आणि आ) सर्व सगळ्यांना सर्वकाळ जमेलच असे नाही, इतपत ठीक आहे. पण असा माणूस "मलाच्च सर्व कळते, मीच्च नेहमी बरोबर असतो आणि मलाच्च जगातल्या यच्च्यावत विषयांवर दुसर्‍यांना उपदेशाचे डोस पाजायचा जन्मसिद्ध हक्क आहे" असे म्हणू लागतो तेव्हा किती हास्यास्पद दिसतो हे तुम्हाला कळणे, अर्थातच, फार्फार कठीण आहे ! =)) =)) =))

स्वतःची चूक कबूल करणे तुमच्या स्वभावात अजिबात नाही हे जगजाहीर आहेच. त्यामुळे, यावेळेसही, चूक कबूल न करून वाचकांना (हसून हसून किंवा आश्चर्यातिरेकाने) फिट येण्यापासून वाचविल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद !

असो. माझा संबंध नसेल आणि सर्वसाधारण जनतेला धोकादायक नसेल, अश्या वेळेस एखाद्याचे वैचारिक दिवाळे जगजाहीर करणे मी टाळतो (कारण, दुसर्‍यांच्या हक्कांवर गदा न आणता आपल्या दिवास्वप्नांत मश्गुल राहण्याचा प्रत्येकाचा लोकशाही हक्क मी मानतो). तरीही, माझ्या वरच्या प्रतिसादातल्या चार क्रमांकाच्या परिच्छेदातला मजकूर लक्षात ठेवला तर मात्र तुमच्या फायद्याचे होईल. ते पटत नसले तर बाकी तुमची मर्जी.

बाय बाय !

मी बरोबरच यावर चर्चा चालू नसून, नोटाबंदीमुळे भ्रष्टाचारात फरक पडलेला नाही, फक्त तो नव्या नोटात चालू आहे, हा चर्चाविषय आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Mar 2017 - 6:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

ओके. सध्यातरी त्याला पासपोर्ट कार्यालयात जाऊन नेमके कोणत्या कारणास्तव adverse शेरा दिला गेला आहे याची माहिती काढण्यास सांगितले आहे. त्यानंतरच कळू शकेल कि पुढची स्टेप काय घ्यायची त्याने.

आत्तापर्यंतचे पोलिसांबरोबरचे सर्व संभाषण तर त्याच्याकडे नाहीये. पण इथून पुढचे सर्व संभाषण हे रेकॉर्ड करून घेण्याचा सल्ला दिला आहे.

चौकटराजा's picture

23 Mar 2017 - 7:37 am | चौकटराजा

आतापर्यंत मला आलेला पोलीस खात्याचा अनुभव अगदी उलटा आहे. गेले तीसेक वर्षात फारसा पोलिसांशी संबध आलेला नाही पण जेंव्हा आला त्यावेळी अनुभव चांगलाच आलेला आहे. मला देखील पासपोर्ट साठी दोन तीन वेळा पो स्टे ला चक्क्कर मारावी लागलीच पण अडवणूक वगरे नाही. आपली तांत्रिक अडचण काही आहे का ते समजावून घ्या . आपल्याला खात्री असेल तर सरळ वरपर्यंत जा. पोलिसाना घाबरू नका ! आता सरकारे बदलल्या मुळे अनेकाना चांगले अनुभव येत आहेत.

शब्दबम्बाळ's picture

23 Mar 2017 - 8:46 am | शब्दबम्बाळ

डोम्बाल चांगला अनुभव!
तात्काळ मध्ये पासपोर्ट काढल्यावर या पोलिसांना चांगलं माहित असत कि माणूस घाईत आहे. मग मुद्दाम उशीर लावतात पोस्ट व्हेरिफिकेशन करायला.
आणि लवकर करायचं असेल तर मग दक्षिणा असतेच!
माझ्या रूम पार्टनर ला १००० रुपये द्यावे लागले आणि आत्ताच एका ताज्या ताज्या घटनेत ५००० रुपये मागितलेत! अरे लाज तरी वाटते का यांना?
तात्काळची सोयच कशाला ठेवायची जर पोलीस व्हेरिफिकेशनला त्रास देऊच शकणार असतील तर?
सरकार बदलून काहीही फरक झालेला नाहीये उगीच मनाचं समाधान फक्त!

आणि घाबरू नका तर मग काय करावे हे पण सांगा, आपण ज्या भागात राहतो त्या भागातल्या पोलिसांशी पंगा घेणे किती श्रेयस्कर वगैरे आहे सामान्य माणसाला ते हि सांगा! वरपर्यंत सगळ्यांनाच जात येत नाही आणि गेलं तरी प्रकरण मिटेल याची शास्वती काय!
भविष्यात त्रास दिला जाणार नाही याची खात्री कोण घेणार!

विशुमित's picture

23 Mar 2017 - 11:37 am | विशुमित

डोम्बाल चांगला अनुभव!

-- शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये याच धर्तीवर पोलीस स्टेशन मध्ये शहाण्या माणसाने कमीत कमी जावे. कारण पोलीस खात्याची कार्यपद्धितीच लोक कमीत कमी यावे ही आहे. जास्त हुजगत न घालता आणि चिरीमिरी ही न देता गोडीत कामे करून घेता येऊ शकतात. रेकॉर्डिंग वगैरेंच्या भानगडीत पडू नये. सापडले तर कश्यात अडकवतील सांगता येणार नाही.

चौकटराजा's picture

24 Mar 2017 - 10:03 am | चौकटराजा

आपल्याला जितकी घाई तितकी लाच मागण्याची शक्यता अधिक हे तर ओपन सिक्रेट आहे. मधे युरोप वारी संदर्भात एक सल्ला वाचला व हसलो. त्याने असे सांगतले होते की आपल्याला शौचाला घाईची लागली आहे असे दर्शवू नका नाहीतर अटेंडन्ट असेल तर आणखी एक दोन युरो वर टीप मागेल ! :)))

प्राची अश्विनी's picture

23 Mar 2017 - 8:47 am | प्राची अश्विनी

माझ्या आईवडिलांच्या पासपोर्ट नुतनीकरणाच्या वेळी हेच झाले होते. पासपोर्ट मिळाल्यानंतर तीन वर्षांनी हा रिपोर्टपत्राने आला. Helpline ला फोन केल्या वर त्यांनी सांगितल्याप्रमाणे वरळीच्या पासपोर्ट कार्यालयात गेलो. "पैसे खायला न दिल्याने हे झाले" या शब्दात कारण सांगितले. त्यांनी "पुन्हा पोलीस व्हेरिकेशन करावे लागेल पण पुन्हा पैसे मागितले तर जिल्हा धिका-यांकडे तक्रार करा." असे सांगितले.
आठ दिवसात लाच न देता दुसरे पोलीस व्हेरिफिकेशन झाले. पासपोर्ट clear झाला.

तुमचा मित्र काहीच करत नाही का? पोलिस त्याला ओळखून असतील. अशा वरवरच्या केस कशा सोडवणार मिपावर? त्याच्यावर भरोसा ठेवून कस्काय पोलिसांवर इथे आरोप लेखी करताय? उद्या तो म्हणेल मी असं काही बोल्लो नव्हतो.तुम्ही गोत्यात याल तो मोकळा.

मला ही अगदी हेच म्हणायचं होतं.

नक्कीच तुमच्या मित्राच्या कागद पत्रामध्ये काही त्रुटी असणार. त्याशिवाय डायरेक्ट ऍडवर्स शेरा नाही मारणार कोणी. त्या पोलिसाला पण वरती विचारणारे असतात हे विसरू नका.
माझ्या मते लाच ही फक्त सरकारी काम लवकरात लवकर व्हावी यासाठी असते. लाच घेतलेली असली तरी काम हे पूर्णपणे कायदेशीर च असायला पाहिजे याची खातरजमा केल्याशिवाय कोणी ही सरकारी अधिकारी/कर्मचारी कोणत्या ही कागदावर सही करणार नाही.

तुमच्या मित्राने लाच द्याची नाही हे ठामपणे ठरवलेच असेल तर किती ही वेळ जाऊ द्या शेवट पर्यंत माघारी घेऊ नका.

Nitin Palkar's picture

23 Mar 2017 - 2:53 pm | Nitin Palkar

http://pgportal.gov.in येथे तक्रार करा

Nitin Palkar's picture

23 Mar 2017 - 2:53 pm | Nitin Palkar

http://pgportal.gov.in येथे तक्रार करा

संजय क्षीरसागर's picture

23 Mar 2017 - 3:55 pm | संजय क्षीरसागर

त्या पोलिसाला पण वरती विचारणारे असतात हे विसरू नका.माझ्या मते लाच ही फक्त सरकारी काम लवकरात लवकर व्हावी यासाठी असते. लाच घेतलेली असली तरी काम हे पूर्णपणे कायदेशीर च असायला पाहिजे याची खातरजमा केल्याशिवाय कोणी ही सरकारी अधिकारी/कर्मचारी कोणत्या ही कागदावर सही करणार नाही.

हे एकदम बरोब्बरे!

तुमच्या मित्राने लाच द्याची नाही हे ठामपणे ठरवलेच असेल तर किती ही वेळ जाऊ द्या शेवट पर्यंत माघारी घेऊ नका.

काय बोललात ! आपली चूकच नसेल तर लाचेचा प्रश्नच येत नाही.

विशुमित's picture

23 Mar 2017 - 4:04 pm | विशुमित

जरी चूक नसली तरी वेळ वाचवण्यासाठी मित्राचे मन पागाळले तर?

संजय क्षीरसागर's picture

23 Mar 2017 - 4:16 pm | संजय क्षीरसागर

माझ्या मते लाच ही फक्त सरकारी काम लवकरात लवकर व्हावी यासाठी असते.

याच्याशी सहमत आहेच. मी जेव्हा प्रॅक्टीस सुरु केली तेव्हा हा प्लॅक माझ्या चेअरमागे लावला होता :

`If you do not have integrity & patience, you have come to a wrong place'

आणि त्यामुळे आजपर्यंत आणि कायमच निर्धास्त राहीलोयं !

विशुमित's picture

23 Mar 2017 - 4:51 pm | विशुमित

व्हेरी ग्रेट..!!

चौथा कोनाडा's picture

24 Mar 2017 - 9:09 pm | चौथा कोनाडा

काही हं वि !

काम हे पूर्णपणे कायदेशीर च असायला पाहिजे याची खातरजमा केल्याशिवाय कोणी ही सरकारी अधिकारी/कर्मचारी कोणत्या ही कागदावर सही करणार नाही.

काही हं वि !

कायदेशीर नसणार्‍या कित्येक केसेस राजरोस पणे कायद्यांना बगल देवुन व पडताळणीचे खोटे रिपोर्ट तयार करुन केसेस मार्गाला लावल्या जातात, त्यात पोलिस खाते आलेच.

तुमच्या मित्राने लाच द्याची नाही हे ठामपणे ठरवलेच असेल तर किती ही वेळ जाऊ द्या शेवट पर्यंत माघारी घेऊ नका.

असा निर्णय प्रत्येक वेळा घेता येतोच असं नाही.

टवाळ कार्टा's picture

23 Mar 2017 - 11:15 am | टवाळ कार्टा

रेकॉर्डिंग करायला गेला तर त्यालाच कशावरून अडकावणार नाहीत?

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Mar 2017 - 11:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

भ्रष्टाचारी माणसे सर्वसाधारणपणे, (अ) "केवळ घाबरट" आणि (आ) "जास्त जोर लावला तर आपलेच काही लपवलेले बाहेर येईल या विचारने घाबरणारे" असे लोक ओळखण्यात पटाईत असतात. पण त्याचबरोबर बहुदा, आपले बिंग आपल्या साहेबांपुढे, निदान "सार्वजनिकरित्या" उघडे होऊ नये याची काळजी ते घेतात.

त्यामुळे, जर तुमची बाजू बरोबर असेल तर, एक एक करत वरवरच्या स्तराच्या अधिकार्‍याकडे* आपली केस घेऊन जाण्याने काम होते असा स्वानुभव आहे.

======

* : "एक एक करत वरवरच्या स्तराच्या अधिकार्‍याकडे" हे ऑफिस एटिकेट्सच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. त्यामुळे, "मी तुमच्या विभागाच्या प्रोसेसच्या सर्व पायर्‍या योग्य रितीने पार करूनही काम होत नाही, केवळ याचकरिता नाईलाजाने तुमच्याकडे आलो आहे" हा मुद्दा स्पष्ट होतो. अन्यथा, "हे काम असे मी मधल्या अधिकार्‍यांना टाळून करणे बरोबर होणार नाही" असे वरिष्ठ अधिकार्‍यातर्फे टोलवले जाण्याचा धोका असतो.

अमर विश्वास's picture

23 Mar 2017 - 12:06 pm | अमर विश्वास

माझा पासपोर्ट व पोलिसांबद्दलचा अनुभव चांगला आहे

गेल्या वर्षभरात माझ्या ऑफिसच्या १०-१२ कलिग्सनी (मी स्वात: धरून) पासपोर्ट काढले / रिन्यू केले
एकदाही लाच द्यावी लागली नाही.

फक्त एका केस मध्ये पोलीस व्हेरिफिकेशन रिजेक्ट झाले. त्यावेळी पोलीस आयुक्तालयात रितसर पत्र देऊन पाठपुरावा केला.

कारण साधे होते .. त्या मित्राचे इलेक्शन कार्ड दुसऱ्या पत्त्यावर होते व त्याचा उल्लेख करंट ऍड्रेस मध्ये नव्हता. जरुरी कागदपत्रांची पूर्तता केल्यावर व्हेरिफिकेशनही झाले ... तेही एकही पैसा ना देता ..

कृपया प्रोसेस समजावून घ्या, निदान पुण्यात तरी स्थानिक पोलीस चौकीत व्हेरीफिकेशन झाले कि सर्वे कागदपत्रे आयुक्तालयात जातात व तेथून पोस्स्पोर्ट कार्यालयात. त्यामुळे योग्य ठिकाणी चौकशी (एस्कलेशन) केले तर नक्की दाद मिळते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Mar 2017 - 10:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहमत.

१९८२ पासून अगदी २००९ पर्यंत भारतातला आणि परदेशातला, दोन्हीकडचा, माझा पासपोर्ट ऑफिस, वकिलात आणि एकंदरित विदेश मंत्रालयाच्या कार्यालयांचा अनुभव अतिशय नकारात्मक आणि भारतिय म्हणून अभिमान वाटणारा होता. दोन वेळा तर सरळ असलेले काम जराशी बाचाबाची करून व "तुमच्या सेवेची प्रत आणि काम करण्याची पद्धत तुम्हाला अभिमानस्पद नाही" अश्या अर्थाची टीप्पणी करून, वर तक्रार करेन असे सांगून मगच झाले.

मात्र, त्या विभागाचे संगणिकरण चालू झाल्यानंतर लोकांचा अनुभव बदलला आहे. २०१४ च्या जानेवारीत, आमच्या घरातले दोन पासपोर्ट्सचे नवीनिकरण केले. एका पासपोर्टच्या नवीनिकरण्याचे काम सरळ प्रकारे झाले व कोणतीही चौकशी न करता पासपोर्ट तीन-चार आठवड्यात पोस्टाने घरी आला. एका तत्काल पासपोर्ट नवीनिकरणासाठी पासपोर्टधारकाच्या पोलिस चौकीत, "फॉर्म दोन दिवसांनी मिळेल व नंतर साहेब आज ऑफिसमध्ये नाहीत" असे सांगून दोन चकरा झाल्या. मात्र, पैश्याची मागणी केली गेली नव्हती. दोन चकरा झाल्यावर मला हा प्रकार कळला. "पैसे मागितल्यास अजिबात द्यायचे नाही. तिसर्‍या वेळेस काम झाले नाही तर पुढच्या फेरीला मी बरोबर येईन. आपण, स्टेशनच्या सर्वात मोठ्या अधिकार्‍यालाच भेटू" असे सांगितले. सुदैवाने तिसर्‍या फेरीत काम झाले त्यामुळे पुढे काही करायची गरज पडली नाही.

यानंतर, गेल्या दोनेक वर्षांत इमेल अथवा ट्विटरने विदेश मंत्रालयाला आपली समस्या कळवणार्‍या भारतातील व परदेशातील भारतियांची दखल घेऊन योग्य ती कारवाई होत आहे, हे माध्यमांतून दिसत आहेच... हे त्या मंत्रालयाचा अनेक दशकांचा वाईट अनुभव स्वतः घेतलेल्या आणि इतर अनेकांचे वाईट अनुभव पाहिले-ऐकलेल्याला सुखद अनुभव आणि एक भारतिय म्हणुन अभिमानास्पद गोष्ट वाटत आहे.

याचा अर्थ असा नाही की त्या विभागात सर्व आलबेल आहे. मात्र, त्या प्रक्रियेतील काही नासक्या आंब्यांचा अनुभव आलेल्यांनी त्याची माहिती आपल्याजवळच्या पुराव्यासकट योग्य त्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे पोचवणे, हे केवळ जरूरीचे आहे. यात त्या व्यक्तीचे काम होईलच, पण हे नागरी कर्तव्य न केल्यास ते "नासके आंबे" नष्ट करणे (कोणत्याही देशात) शक्य नाही.

"स्वतःचे काम करून घेण्यासाठी भ्रष्टाचारासमोर मान तुकवणे आणि/किंवा त्याबद्दल केवळ खाजगीत चर्चा करत बसणे," यामुळे आपण स्वतःच भ्रष्टाचार पुढे चालू ठेवण्यास मदत करत असतो, हे बहुदा सहजपणे विसरले जाते !

५० फक्त's picture

23 Mar 2017 - 12:35 pm | ५० फक्त

माझा देखिल पोलिसांचा आता पर्यंतचा अनुभव चांगला आहे, अगदी पासपोर्ट ते भाडे करार नोंदणी ते कात्रजचा मोठा तिरंगा फाटल्याची तक्रार ते बाकी काही गोष्टी कंपनीच्या असल्याने लिहिता येत नाहीत, पण वाईट नक्कीच नाही.

एकदा तर माझ्या गाडीला अपघात झाल्यावर रिक्षा युनियनकडुन मला पैसे मिळवुन दिलेले आहेत, अर्थात यात इतर काही व्यवहार झाले नाहीत असे नाही , ते होतेच पण माझं जे १८००० चे नुकसान झालेलं होते ते फक्त २००० वर आले.

वीस वर्षापुर्वी बाया व बाप्ये मिळून कमीतकमी तीन व जास्तीत जास्त पाच पोरं ( पोरी धरून) जनवत होते, मग त्यातले बरेच जनता पोसत आहे व राज्य कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहे.

आदूबाळ's picture

23 Mar 2017 - 2:02 pm | आदूबाळ

"अरे पण गच्चीचा काय?"

- आदोबा रेगे, बटाटा अपार्टमेंट

बाप्पू's picture

24 Mar 2017 - 12:07 am | बाप्पू

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार.
मित्राने या प्रकरणाची रीतसर तक्रार पासपोर्ट ऑफिस मध्ये नोंदवली आहे. पाहुयात आता काय होते ते.

संजय क्षीरसागर's picture

24 Mar 2017 - 12:14 am | संजय क्षीरसागर

पण आता एक करा, `गरज सरो आणि वैद्य मरो' ही म्हण इतर मदतीच्या धाग्यांप्रमाणे, निदान या धाग्याला तरी लागू होऊ देऊ नका. काय झालं ते कळवा. सगळ्यांनाच उपयोग होईल.

चौकटराजा's picture

24 Mar 2017 - 9:58 am | चौकटराजा

होय ..काय झालं हे सर्वाना कळ्ळच पायजेल ! आमचा अनुभव असे साम्गतो की जिथे गैर व्यवहार करायची दोन्ही पार्टीची तयारी आहे किंवा व्यवहार सऱळ आहे पण तिथे पर्याय निवडण्याचा अधिकार आहे तिथेच अडवणूक होते. उदा. ड्रायव्हिंंग लायसन्स काढताना ( कायमचे) पैसे द्यावेच लागतात. पण लायसन्स रिन्यू करायला नाही. कारण पहिल्यात नुसती प्रोसेस नाही तर एन्डोर्समेंट पण आहे. मी आता बिनतोड कागद्पत्रे सादर करून चार दिवसात विजा मिळविला आहे , कोणत्याही एजंटाची मदत न घेता.( अर्थात इथे चिरीमिरीचा प्रश्न येत नाही पण अडवणूक होउ शकते ना ! ) अनेक कामे लाच न देता करून घेतली आहेत. आर टी ओ त देखील.

भुमन्यु's picture

24 Mar 2017 - 4:37 pm | भुमन्यु

बर्‍याचदा गोष्टी आपण समजतो तितक्य गंभिर नसतात. सगळ्यात आधी त्याला पासपोर्ट कार्यालयात (सेवा केंद्र नाही) जाउन यायला सांगा. तिथे त्याला adverse रिपोर्ट्चे कारण असेल.
मी गेल्यावर्षी ऑगस्ट मध्ये पासपोर्टसाठी अर्ज केला होता. पोलिसांनी २-३ दा चकरा मारायला लावल्या. आणि एके दिवशी मला मेसेज आला की police submitted adverse report. मी ही पोलिसांना येथेच्छ शिव्या घातल्या कारण मी पण चाय पानी नव्हतं दिलं. पासपोर्ट ऑफिसला जाउन चौकशी केल्यानंतर कळलं की मी भाडेकरु असुन माझा सद्ध्याचा आणि कायमचा पत्ता एकच दिला आहे.

म्हणून एक सल्ला देतोय की एकदा जाउन चौकशी करा.

विशुमित's picture

24 Mar 2017 - 4:57 pm | विशुमित

असं कसं असं कसं..
अगोदर शिव्या देऊन मोकळं होयचा.

मला पोलिस यंत्रणेचा अतिशय चांगला अनुभव आला आहे दरवेळच्या पापो नूतनीकरणाच्या वेळी. मुलाचा नुकताच अठरावे वर्ष लागल्यामुळे दहा वर्षाचा पासपोर्ट केला. त्यामुळे पोलिस व्हेरिफिकेशन लागले. त्याच आठवड्यात आमच्या गावात पंतप्रधान येणार होते. त्यामुळे पोलिस यंत्रणेवर ताण होता. पण ते येऊन गेल्यावर लगेचच दोन दिवसात बोलावले गेले. त्या दिवशी मला जायला वेळ नव्हता म्हणून मी वेळ बदलून मागितली. त्या दिवशी पोलिसांना कुठेतरी जावे लागले तर त्या कामाशी संबंधित पोलिसाच्या पत्नीचा मला दिलगिरी व्यक्त करणारा फोन आला की आम्हाला आमच्या घरगुती कारणाने बाहेर जावे लागतेय उद्या तुमचे काम नक्की होईल. तरीही ते पोलिस मामा संध्याकाळी आल्या आल्या पो स्टेशनला गेले आणि त्यांनी यायला जमेल का विचारले. गेल्यावर पण अगदी पटापट काम करुन दिले. या आधीचा पण माझा पत्ता बदलायचा असल्यामुळे पोलिस व्हेरिफिकेशनचा अनुभव अतिशय चांगला होता. त्यामुळे पोलिसांना सरसकट शिव्या घालायला धजावत नाहीये. मी मागेही लिहिले होते कदाचित लहान गावात पोलिसांचा अनुभव बरा येत असावा. किंवा अॅडव्हर्स रिपोर्ट देण्यासारखे काही कारण असू शकेल.

चौकटराजा's picture

28 Mar 2017 - 5:53 pm | चौकटराजा

म्हणजे आता संतूरवाल्यांची एव्हर ग्रीन मम्मी ची जाहिरात ..... हॅ आपला नाही बसत विश्वास .. आठवे वर्षे असे म्हणायचेय का ... ?

ग्रामीण भागांमध्ये पोलीस व्हेरिफिकेशन ची पद्धत शहर पोलिसांपेक्षा वेगळी आहे का?

माझा पासपोर्ट ग्रामीण पोलिसांकडे व्हेरिफिकेशनसाठी गेला. २-३ आठवडे वाट बघीतल्यानंतर मी पोलिस स्टेशन मध्ये गेलो. त्यांनी मला सगळ्या कागदपत्रांची प्रत आणायला सांगितली. त्यात मला त्यांनी माझ्यावर कुठल्याही पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवलेला नाही असे लिहिलेला कागद नोटरीकडून साक्षांकीत करुन आणायला सांगितला. थोडक्यात माझे Non Criminal Record आहे असे नोटरीने सांगायचे. माझ्या द्रुष्टीने हे काम पोलिसांचे आहे. थोडी विचारणा केल्यावर त्यांनी मला पोलिस अधीक्शकांची सही असलेला कागद दाखवला ज्यात याचा उल्लेख होता.

माझ्यासारखीच नोटरीला देखील ही गोष्ट नविन होती असे वाटले. नियमाने फी घेउन नोटरीने तो कागद बनवुन दिला. सगळे कागद पोलिसांकडे दिल्यावर ५-७ दिवसांत व्हेरिफिकेशन झाल्याचे कळले.

एकही पैसा नियमबाह्य न देता काम झाले पण त्या कागदाचे लॉजिक अजूनही कळले नाही.