ती...

प्रफुल्ल's picture
प्रफुल्ल in जनातलं, मनातलं
21 Mar 2017 - 5:02 pm

डोक्याचा खुर्दा पडला होता, कधी एकदा २-३ पॅक मारतो असं झालं होत. बिअर बार मध्ये गेलो, बिअर बार कसला सालं बेवडयांची सोय व्हावी म्हणून काहीतरी बांधून ठेवलं होते हेवशीर होत एवढच काय ते चांगलं. एक कोपरा पकडून बसलो तेंव्हा ती दिसली एका खिडकी जवळ बसली होती, लक्ष गेले कि डोळ्यात डोळे घालून बघायची, डोळ्यांमध्ये आतुरता होती. मनात विचार आला का आली असेल इथे, एक पेग झाला तरी ती काय जागेवरून हलली नाही. एकटक माझ्या कडेच बघत होती , माझे ३ पेग संपले काय माहित मला चढली होती कि काय पण तिच्या डोळ्यात आता जास्तच आरव दिसत होती.

मी माझे बिल दिल आणि घरी निघालो डोक शांत झाले होते. सहज मागे वळून बघितल तर ती माग माग च येत होती, थांबून तिच्या वर डोळे उगारले वाटलं आता तरी मग येणार नाही पण नाहीच तरी तीच माग येन चालू च होते. मी तिच्या कडे दुर्लक्ष करून चालू लागलो पण ती काही पिच्या नव्हती सोडत. तसाच घरी आलो दरवाजा उघडला तर काय हि माझ्या आधीच घरात घुसली. आता डोकं सटकलं मी तिच्यावर हात उगारणार एवढ्यात ...

तिने एकदम आर्त आवाजात म्याव म्याव केले.

कथालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

21 Mar 2017 - 6:39 pm | मराठी कथालेखक

क्रमशः विसरलात का ?

लोथार मथायस's picture

21 Mar 2017 - 6:39 pm | लोथार मथायस

अगदि सारखी आहे. नाव आठवत नाही

ज्योति अळवणी's picture

21 Mar 2017 - 10:01 pm | ज्योति अळवणी

हा हा हा. मस्त