महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

अंगारा - भाग २ (अंतिम भाग)

Primary tabs

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
21 Mar 2017 - 12:51 am

अंगारा - भाग १
http://www.misalpav.com/node/38784

अंगारा - भाग २ (अंतिम भाग)
मी त्याच्याकडे पहातच राहिलो. आधी आमची भेट होण्याचा काही संबंधच नव्हता. तरीही त्याच्या पाणीदार डोळ्यातील नजर मला आश्वासक वाटली.

डोक्यावरचे ब-यापैकी केस पिकलेले.अंगात भगवे कपडे. खांद्यावर एक शबनमची पिशवी लटकत होती. खांद्यावरुन सारख्या घसरणा-या पिशवीला सांभाळत तो घोग-या आवाजात बोलू लागला. "म्या निलकंठेश्वर. ह्यो लोकांचा तू मला डाक्टर म्हणू शकतो. तूझी शुध गेली नव्ह , तवा मला यांनी बुलावा पाठवला.."
नंतर आजुबाजुला कोणी नाही ह्याची खात्र्ी करुन आवाजाची पट्टी अजुनच खाली आणुन तो बोलु लागला ," खरं काम निराळच हाय. म-हाठी येनारा मी एकटाच हाय नव्ह इथ, मग तुमची माहिती काढायला बोल्ले हाईत. पर म्या पहिल्या नजरेतच वळखल , तुम्ही साधी पोरं आहात. पण त्यो इतक्यात नाई माननार. थोडी कळ सोसा , मी हाय पाठीशी. पर पळुन बिळुन जायला बघू नका , त्या टाईमला कोन बी वाचवू शकणार नाई. मी बी नाई. इथच हाय मी. काय लागल तर बोला.."

त्ानंतर त्याने त्याची ती पिशवी खांद्यावरुन काढली. आतून एक कसलिशी पुडी काढली. त्यातला अंगारा काढुन माझ्या कपाळावर लावला . अजुन एक पुडी काढून माझ्या हातात दिली. "खिशात ठेव. बर नाय वाटलं तर लाव. "

मला अजुनही परिस्थितिचा निटसा अंदाजच येत नव्हता. आम्ही रस्ता चुकतो काय , आम्हाला नक्षलवादी पकडतात काय , आणि त्यातलाच एक नक्षलवादी 'मी तुमच्या पाठीशी आहे' म्हणतो काय! सारेच काही गोंधळवून टाकणारे होते.

मला एकदम मोहित आणि गजाननची आठवण झाली. खोलीभर माझी नजर फिरली. माझ्या मागेच भिंतीला टेकून दोघे बसले होते. त्यांचा नजरेतला थकवा , भिती सार काही स्पष्ट दिसत होतं . मी उठुन त्यांच्यापाशी जावून बसलो. मोहितने माझा हात हातात घेऊन जोरात दाबला. कानात कुजबुजत तो बोलु लागला ," तेज्या , अरे लेका काय पण ठेवतो का खिशात , मला तर मांत्र्ीक वाटतोय. मंतरलेला असेल तो अंगारा. नाही ते होईल परत. " " मोहित , अजुन काय व्हायचं बाकी आहे रे ? बघू काय होईल ते आता. " असं बोलुन मी ती पुडी खिशात टाकली.

आळिपाळीने मोहित आणि गजानन दोघांचाही डोळा लागला. माझी त्या पुडीबाबतची उत्सुकता मात्र अजुन शमली नव्हती. हातात त्या पुडिला खेळवत अधुनमधून त्या म्हाता-याकडे पहात होतो. तोही एकटाच बसुन कंटाळला होता. त्यानेच पुन्हा संभाषणाला सुरवात केली.
"कुठले हो तुम्ही ? काय शिक्षण घेता तिकडं ? "

मग आमचे शहर , कॉलेज याची सगळी यथासांग माहिती सांगितली. मग मी त्याला त्याच्या भुतकाळाविषयी विचारले.

एक कसनुसं हसु त्याच्या चेह-यावर पसरलं. त्याचा भुतकाळ माझ्यासमोर एखाद्या कथेसारखा समोर येऊ लागला आणि प्रत्येक वाक्याबरोबर ही कथा अंगावर येऊ लागली.

"माझे आजोबा या भागात आल्ते म्हनं.
एक शेतीचा तुकडा घेऊन ती कसायला चालु केली. माझ्या बाच्यावेळी ह्यो नक्षलवादाची टूम निघालि होती. बा अन मी दोघ बी अडकलो त्यात. दिवसाबरुबर पाय अडकतच चालला. पर परतची वाट व्हतीच कुठं ? मग त्यानं सरळ वरचीच वाट पकडली. फकस्त पंधरा वर्षाचा पोर होतो मी तवा.." अचानक त्याला धाप लागली. पिशवीतुन सिगरेट काढुन तो ती अोढू लागला आणि निर्विकारपणे पुढे बोलू लागला..

"पर म्या कधीच बंदुक हाती नाय घेतली. सटरफटर काम करायचो. पुढ लगीन बी झाल आनि एक पोर देवानं प्रसाद म्हनुन दिलं. एक दिस काय झाल कुणास ठाव पोर अस तापलय म्हणता की इचारायची सोय नाही. तवा जिपबिप काय बी नव्हत. बैलगाडीत पोराला टाकून जवळच्या दवाखान्याकड निघालो , पर अर्ध्या रस्त्यात पोरान मान टाकली. फकस्त दवाखाना दुर असल्यान माझ पोर जिवानिशी गेलं. .
त्याला जाळल्यानंतर आठवण म्हणून राख गोळा करुन ठेवली होती. पुडल्या दहाच दिवसात एक बा तिच्या पोरीला घेऊन माझ्याकडं आला. पोरगी डोळ फिरवीत होती. काय कराव सुचेना. समोर चुलीत लाकुड जळत व्हत त्याची राख घेतली. समोर माझ्या पोराच्या राखेच भांडबी होत. ती चिमुटभर राखच त्या लाकडाच्या राखेत मिसळली आणि पोरीच्या कपाळाला लावली. आधा घंटा तिचे हात हातात घेऊन चोळत होतो. अन पोरगी शुधीत आली.

ह्यो गोष्ट सगळीकड पसरली. काय बी झाल की लोग माझ्याकडं यायची. काहि बर व्हायचे , काही नाही. पर येड लोक येतच राहिलं अन मला बाबा करुन टाकला. ."

"तुम्हाला माहिती का लोकांच्या जिवाशी खेळताय तुम्ही. तुम्हाला हा अधिकार नाहि. काय मिळवता हे करुन सगळ ? " इति मी

"लेकरा अर लय लहान हाय तू अजुन! जिवाशी खेळनारा मी कोण बाबा ! तो
तो तर वर बसलाय. ही लोक आज ना उदया मरनारच हाईत. दवाखान्याकड जायच बी नाय परवडत त्यास्नी. अन मी काहून करतो ते माहिती ? मी निस्त आधार देतो लोकास्नी. कोन तरी आपल्याला वाचवू शकतय एवढ जरी वाटल तर मानुस जित्ता राहू शकतो बघ. आणि चांगलवाईट म्हणशील तर याच्या कवाच पुढ गेलो बघ मी. अरे कुनाला चांगल म्हन्तो तू ? कित्येकांचे मुडदे माझ्या समोर पडलेत. सादी मानस, नक्षलवादी , पोलिस समद्यास्नी मरताना बघितल. मरताना मरतोच मानुस कसा का असेना.."

"मला नाही पटत हे सगळ.." इति मी

उत्तरादाखल तो फक्त हसला. बाहेर कोणाचीतरी चाहुल लागली. एक १५ वर्षाचा मुलगा आमच्यासाठी जेवण घेऊन आलेला होता. गजानन आणि मोहित दोघेही जागे झाले. ताट बघताच आम्ही जेवायला चालु केले.

"आजोबा तुम्ही पण या की जेवायला" इति मी. मोहित आणि गजानन चमकुन माझ्याकडे बघू लागले. मी खाली मान घालून गुपचुप जेवण संपवले. थोड्याच वेळानंतर यावेळेस माझाही डोळा लागला.
.

.
.
"चलो उठो. तुम्हे आझाद कर दिया है. जल्दी चलो. " एक पंचवीस-सव्वीस वयाचा तरूण आम्हाला उठवत होता. खोलीतील सकाळची किरणे पाहुन मन जरा सरसावले.

पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधून आम्हाला जिपमधून गावाच्या वेशीबाहेर सोडण्यात आले. "किसी को हमारे बारे मे बताना नही " असे बोलुन ती जिप वेगाने निघून गेली.

अर्ध्या एक तासानंतर आम्हाला मुख्य रस्ता सापडला. आणि शेवटी एकदाचे आम्ही हॉटेलवर पोहचलो. ठरल्याप्रमाणे आम्ही आदल्या दिवशीच्या संध्याकाळी परत हॉटेलवर न पोहचल्यामुळे हॉटेलमालकाने शंका येऊन पोलिसांना बोलावले होते. त्यांनी आमच्या घरच्यांना खबर दिली. तेव्हा इथे मोबाईल जप्त होवून बंद झाल्याने घरचेही तिथुन आधीच निघाले होते हेही कळाले.

आम्ही तिघेही या जिवघेण्या प्रवासात अतिशय दमलो होतो. चक्क आम्हा तिघांनाही दवाखान्यात हलवावे लागले.

दवाखान्यात पोहचल्यावर मग मला त्या म्हाता-याची आठवण झाली. त्याची पुडी अजुनही खिशातच होती.

सलाईल लावल्यानंतर पडुन समोरच्या भिंतीकडे पहाताना सुरवातीपासुनचे सगळे प्रसंग आठवू लागले.

आईवडिल आणि रेल्वेतला म्हातारा हे पालक आणि सहप्रवासी या एका विशीष्ट भुमिकांमधून माझ्यासमोर आले. पुढे जावून 'घरचे माझी खुपच काळजी करतात' , आणि 'त्या रेल्वेतल्या म्हाता-याला मराठी कळत नाही' ही अनुमाने मी काढली जी अर्थात पुढे चुकीची ठरली.

मात्र त्या बंदिवासातील म्हाता-याची एक अशी विशिष्ट भुमिका राहिलिच नाही. तो कधी नक्षलवादी होता , कधी लोकांना वाचवणारा मांत्र्िक , कधी जिवाशी खेळणारा संधीसाधु तर कधी पोरग गमावलेला एक बाप.

ह्या सगळ्याच भुमिका माझ्या समोर आल्या. आणि त्यामुळे मी कोणतेच अनुमान काढू शकलो नाही . बाकि नात्यात आपल्यासमोर त्या व्यक्तीचे फक्त ठराविक पैलुच येतात आणि त्यामुळेच त्यावर आधारलेली अनुमानेही चुकतात. आपल्या मते एखादी व्यक्ती एक तर चांगली असते वा वाईट , जणु दोन्ही गुणे असलेली माणसे नसतातच !!

अजुनही मी ती अंगा-याची पुडी जपुन ठेवली आहे. एका माणसाने दुस-या माणसाला दिलेली भेट म्हणुन !!
समाप्त ..

विचाररेखाटन

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

21 Mar 2017 - 11:42 am | कविता१९७८

मस्त , सत्यकथा आहे का??

शब्दानुज's picture

21 Mar 2017 - 5:33 pm | शब्दानुज

मध्यंतरी काही महाराष्टीयन मुले खरोखरीच नक्षलवाद्यांच्या हातात सापडली होती . नंतर त्यांची सुखरुप सुटकाही झाली.
या प्रसंगावर बेतलेली ही एक काल्पनिक कथा आहे

शब्दानुज's picture

21 Mar 2017 - 5:47 pm | शब्दानुज

मध्यंतरी काही महाराष्टीयन मुले खरोखरीच नक्षलवाद्यांच्या हातात सापडली होती . नंतर त्यांची सुखरुप सुटकाही झाली.
या प्रसंगावर बेतलेली ही एक काल्पनिक कथा आहे