जागतिक कवितादिन - २१ मार्च

Primary tabs

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in काथ्याकूट
20 Mar 2017 - 9:35 am
गाभा: 

मिपावरील निवडक (=सम्पादकानी निवडलेल्या) कविता॑चा स॓ग्रह जागतिक कवितादिनी म्हणजेच २१ मार्च रोजी प्रकाशित करावा.

प्रतिक्रिया

फुत्कार's picture

20 Mar 2017 - 8:35 pm | फुत्कार

छान कल्पना !

चांगली कल्पना. इतक्या लवकर प्रकाशन वगैरे करणे कोणालाच शक्य होईल असे वाटत नाही.. म्हणून आपणच येथे प्रतिसादात आपल्या आवडीच्या कविता देऊया..

**********************

पहिला मान अर्थातच "मोकलाया दाहि दिश्या"

निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे
शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे
एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी
म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि
रत्रिच्य तिमिरत होति धालली जी आसवे
दवबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या पुश्पासवे
पानाफुलातुन निर्झरतुन श्रुश्तिची ही स्पन्दने
उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने
हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो
आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या
आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा
कवि सुरेश्चन्द्रा जोशि
९५२५१२४९१५१३

प्राची अश्विनी's picture

20 Mar 2017 - 11:02 pm | प्राची अश्विनी

:):):)

मितान's picture

21 Mar 2017 - 1:01 pm | मितान

:)) :))

मिसळलेला काव्यप्रेमी अर्थात आपल्या मिकाच्या सगळ्याच कविता आवडतात.

मिकाची सगळ्यात जास्त आवडलेली कविता

यु आर लेट यु फुल

आज भेटायचे ठरले होते आपले किनार्‍यावर
जरा लवकरच आलो
अन् दूर उभा राहिलो
.
मी नसतांनाचा समुद्र आणि
मी तुझ्याबरोबर नसतांनाची तू
दोघांना बघायचे होते म्हणून
.
पण तू माझ्या आधीच पोहचली होतीस
किनार्‍यावर, समुद्राकडे तोंड करून
.
मनात म्हटले,
यु आर लेट यु फुल!
.
बेभान वाहणारा खारट वारा
तुझ्या कुंतलात अडकून तुला छळत होता
वाटले तुझ्या केसांमधून बोटे फिरवून
त्याला मोकळे करावे
पण इतक्यात तू मानेला
एक मोहक झटका देऊन त्याला झटकलेस
वाटले...
यु आर लेट यु फुल!
.
तुझ्या पायाखालची वाळू
तुझ्या कोमल पाऊलांना चिटकत होती
तुला ती हुळहुळ सतावत होती
वाटले पुढे होऊन ती झटकून द्यावी
पण इतक्यात तू येणार्‍या लाटेत
आपले पाऊल हळूवार वरचेवर घुसलळेस
वाटले...
यु आर लेट यु फुल!
.
समुद्र जरा रागावलेला वाटला, बहुदा माझ्यावरच
तिला वाट पाहायला लावत होतो
म्हणून असेल बहुतेक
नाही,बहुदा तिच्या डोळ्यातला समुद्र जास्त सुंदर होता,
म्हणून कदाचित
माहित नाही नक्की काय ते
पण त्याच्या लाटा अजूनच
उग्रपणे किनार्‍यावर आदळत होत्या
.
कुठल्याशा अनावर ओढीने मी तुझ्याकडे सरसावलो
तुझा हात धरून तुला मागे ओढले
मला पाहताच तू लटक्या रागाने
ओठांचा लोभस चंबू करत म्हणालीस
.
यु आर लेट यु फुल!!

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|

*******************

या कवितेखाली मिपावरील हौशी प्रतिसादकांनीही कडवी रचली होती..

गवि

देवळाच्या थंड काळ्या दगडाने कळ लागलेले पाय
अन कापराअंगार्‍याचा गंध अंगभर लेवून
मी दगडाच्याच देवाकडे तिला मागितली,
अगदी डोकं टेकून..
एरवी कधी एका शब्दानेही बोलत नाही..
पण आज तोही म्हणाला ... यू आर लेट यू फूल..

*******

लौंगी मिरची

सरत्या आयुष्याला मागे वळुन पाहाताना
टोचलेल्या काट्याचं कुरुप झालय आता
सैरभैर होउन तुला पाठमोरी पहात राहिलो
तुला निघुनच जायचं होतं पण तरिहि क्षणभर थांबलीस
डोळ्यात आलेल्या पाण्याशीच कुजबुजलिस
यु आर टू लेट ... यु फुल !

*******

मोदक

माझी वाट पाहून नकळत.
तू स्वतःला स्वतःच्या मिठीत घेतलेस..
तिथे रेंगाळणारा वारा थोडासा सुखावला.
ओलसर वाळूमध्ये भिजणार्‍या तुझ्या नाजूक पाऊलांना पाहून
चुकार लाटा अधीरतेने किनार्‍याकडे झेपावल्या..

त्या नाजूक ओलसर पाऊलांशी विरणारी एक लाट मागच्या लाटेला म्हणाली..

यु आर लेट यु फुल!

*******

प्रमोद देर्देकर

प्राजक्त सड्यावर तु अस्ताव्यस्त पहुडलेली,
ओंजळी भर फुलं तुझ्यावर उधळण्यासाठी हळुवार पावलांनी पुढे झालो,
पण तिथेच रेंगाळणार्‍या वार्‍याने जोर केला अन्
झाडावरची सगळी फुले तुझ्यावर बरसली,
तुझ्या तनुवर विसावलेल्या ,
त्या फुलांनी हसुन वेडावत मला म्हंटले ,
यु आर लेट यु फुल!

*******

बोका-ए-आझम

कविता करण्याजोग्या अनेक भेटल्या
पावसातही अनेक विकल्या
पण जेव्हा ती भेटली तेव्हा मी नि:शब्द झालो
काहीच न बोलता स्तब्ध झालो
भानावर आलो तेव्हा ती निघून गेलेली
अाणि उदासवाणा अासमंत मला म्हणाला
यू आर लेट यू फूल!

ही कविता कशी काय नजरेतून निसटली होती? बाकी मिसळलेला काव्यप्रेमी म्हणजे _/\_.

पुंबा's picture

21 Mar 2017 - 10:44 am | पुंबा

अहाहा.. दिन बन गया..

मितान's picture

21 Mar 2017 - 1:02 pm | मितान

अहाहा !

प्रीत-मोहर's picture

21 Mar 2017 - 2:44 pm | प्रीत-मोहर

येस. मिकाच्या कवितांपैकी ही माझी सर्वात जास्त आवडती कविता आहे.

अनन्य साधारण कविता.

डुडुळगावचा गोलंदाज

शरदिनी in जे न देखे रवी...
16 May 2010 - 9:59 pm

स्वप्नी निवडू धुडूम्म गाज
डुडुळगावचा गोलंदाज
तोराबोरा ओमरसामा
काय ललाटी ओ ओ मामा

गोलाबारी सुसूत्र ताडन
रुजुवातीला करूण धावन
शोषण भीषण पोषण वेसण
धवल गिटारी कडकड मंथन

तित्तिरबाला ग्रंथीलाला
ग्रसनी जिव्हा कुरूप भोला
यमनाला घालू तेलघडा
हाका बिचारी मुकी चिडा

धोरण भाषा मुक्तक भयानक करुण

प्राची अश्विनी's picture

20 Mar 2017 - 11:08 pm | प्राची अश्विनी

:):) गर्दुल्लयाची पण छान होती.

पुंबा's picture

22 Mar 2017 - 12:46 pm | पुंबा

हे काय आहे???

मेघवेडा's picture

20 Mar 2017 - 10:51 pm | मेघवेडा

संपादक नसलो तरी, मतदानाचा हक्क बजावतो. मिपावरचे माझे सर्वात आवडते कविराज श्री. चैतन्य दीक्षित यांची काही काव्यरत्ने :

सर्सर आल्या सरीत कोणी दोन मैत्रिणी
शोधत होत्या एक आसरा, त्या ओल्या क्षणि!

डोक्यावरुनी घेत ओढणी चालत भरभर
जशा सरी त्या येतच होत्या सर्सर सर्सर !

चेहर्‍यावरती चिंता होती चिंब तनांची
मनात गणिते चालू आणिक क्षणाक्षणांची!

शोधक नजरा, अंगचोरट्या, थरथर देही
ओघळणारे थेंब टपोरे सचिंत तेही!

वारा वाहे, उठे शिरशिरी चिंब तनातून
ओला श्रावण हळूच डोकावला मनातून!

मनात भरता श्रावण कोणा हवा अडोसा?
चिंब भिजावे, ओलेती बोलावी भाषा !

त्या थेंबांशी हितगुज व्हावे छान टपोरे
अन सृजनाचे मुक्त फुलावे मनी फुलोरे !

म्हणून भिजल्या सरीत अवखळ,दोन मैत्रिणी
होउन गेल्या चिंब चिंब त्या थेंब श्रावणी!

-------------------------------------------------------------------------------------

कालचा काळोख माझा आजचा अन् हा प्रकाश
होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश ||

अंतरीचे सूख माझ्या आज झाले बोलके,
आणि माझे दु:ख आपोआप झाले पोरके
गवसलो माझा मला मी, भोगले मी त्या क्षणास
होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश ||१||

काळज्या होत्याच खोट्या आणि भीती ती खुळी
जे जसे दिसते जगाला ते तसे नसते मुळी
कळुन आले, जाणिवेने बघत गेलो आसपास
होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश ||२||

काल नव्हतो मोकळा मी, आज नाही बद्ध मी
कालच्याइतकाच उरलो आज आहे शुद्ध मी
बंधने वा मोकळेपण हे मनाचे फक्त भास
होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश ||३||

जेवढा अव्यक्त आहे तेवढा प्रत्यक्ष मी
मीच माझी सर्व कर्मे आणि माझी साक्ष मी
कर्म त्याचा मार्ग चालो, चालतो मीही उदास
होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश ||४||

प्राची अश्विनी's picture

20 Mar 2017 - 11:11 pm | प्राची अश्विनी

फारच सुंदर!

मितान's picture

21 Mar 2017 - 1:04 pm | मितान

सुरेख !!!
(मेव्या अजुनी जिवंत ?????)

आनंदयात्री's picture

21 Mar 2017 - 12:53 am | आनंदयात्री

तुझ्या अंगणी - पद्मश्री चित्रे

तुझ्या अंगणी असेल बरसत
असाच पाउस अबोल, हळवा
टपटपत्या त्या थेंबांमधुनी
ऐकशील तू मंद मारवा....

तुझे ही डोळे येतील भरुनी
मेघ जणु आकाशी आतुर
सांग कसे मग लपवशील तू
मनातले ते वेडे काहूर...

कुठे लपवशील माझे हसणे
कसे रोखशील माझे गाणे
डोळ्यामधले आसू लपवण्या
कितिक करशील खुळे बहाणे...

तुला सान्गतील जुन्या वेदना
आकाशातील मेघ सावळे
पुन्हा नव्याने रूजून येतील
आठवणींचे कोंब कोवळे......

ऋतु किती हे येतील जातील
पुन्हा पुन्हा तू मला शोधशील
मनातल्या त्या मुक्या भावना
पाउस होवुन नयनी येतील.....

प्राची अश्विनी's picture

21 Mar 2017 - 8:37 am | प्राची अश्विनी

मार्कस ऑरेलियस यांची
तिची साधीशी कविता
माझा अर्थाचा गोंधळ
काळेसावळे ते ढग
तिचा सखा घननीळ |

तिची साधीशी कविता
शोध अंतरीचा घेई
खोल विरहाचे दु:ख
अलगद वर येई |

तिची साधीशी कविता
म्हणे तुझी माझी भेट
आज वसंत बहर
पुढे वैशाखाची वाट |

तिची साधीशी कविता
थोडे डोळे पाणावती
दोन मोतियांचे अश्रु
तिच्या गाली ओघळती |

तिची साधीशी कविता
माझ्या गळा एक मिठी
शब्द विरुनिया गेले
अर्थ एक दोघा ओठी !!

मिपावरची मला आवडलेली कविता प्राची अश्विनी या॓ची " अतूट काही" . ...साधी, थेट , अर्थवाही अन निर्दोष रचना !!!

पाप पुण्य अन् काल आजच्या
पल्याडही जर असेल काही,
अनादि, आदिम त्या तत्वाशी
नाळ जोडली आहे माझी ...

काळाची विक्राळ कातरी
कापू पाहते त्या धाग्याला..
जळजळीत कधी चटके देतो
तीव्र अतीव दु;खाचा प्याला..

गळ्यात बेडी अंध भक्तीची
प्राण तिचे कंठाशी येती..
डोळस, निर्दय नास्तिकतेचे
घाव बैसती माथ्यावरती ..

पण
अतूट आहे टिकून अजुनी
जीर्ण बकुळीसम ती ताजी..
अनादि आदिम त्या तत्वाशी
नाळ जोडली आहे माझी..

प्राची अश्विनी's picture

21 Mar 2017 - 10:43 am | प्राची अश्विनी

खूप खूप धन्यवाद!!

मितान's picture

21 Mar 2017 - 1:05 pm | मितान

आज इथेच टाकू तंबू :)
सुरेख कविता येताहेत..

स्नेहांकिता's picture

21 Mar 2017 - 1:11 pm | स्नेहांकिता

सरक ना जरा, मीपण आले....

सानझरी's picture

21 Mar 2017 - 1:11 pm | सानझरी

+१
असंच म्हणते..

प्रीत-मोहर's picture

21 Mar 2017 - 2:47 pm | प्रीत-मोहर

क्या बात है. प्राची अश्विनी ताईंची त्यांनीच महिला दिन अंकात अभिवाचन केलेली कविता फार आवडते. ती कुणीतरी टाका ना इथे. सध्या शोधकाम करु शकत नाही.

स्नेहांकिता's picture

21 Mar 2017 - 3:16 pm | स्नेहांकिता

बनलेही असते राधा..प्राची अश्विनी

चहु दिशांत पसरे कीर्ती, जग तुझिया पायावरती
पण अवखळ गोकुळवासी, मज कृष्ण भेटला नाही
....... किती काळ उलटला राधे ,नित नवीन दिसशी तूही
....... जरी रूप बदलले त्याचे, तो कृष्ण वेगळा नाही
तो परतून आला तरीही, माझा ना उरला काही
दमले मी शोधून त्याला , मज कृष्ण भेटला नाही
....... उमगता मोल नात्याचे गेलेला परतून येई
....... समजून तयाला घे तू , तो कृष्ण वेगळा नाही
सर्वस्व वाहिले त्याला , काही ना बाकी उरले
मी स्वत:स हरवून बसले , मज कृष्ण भेटला नाही
.........इतुके न कुणाला द्यावे, की भार तयाचा व्हावा
........ बघ तुझ्यात लपला आहे , तो कृष्ण वेगळा नाही
या नात्यातील उपेक्षा मी मूक साहिली नाही
बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही
........ राधेची निर्मम प्रीती , गोपास बनविते कृष्ण
........ मिटल्या नयनांनी बघ तू , तो कृष्ण वेगळा नाही

फुत्कार's picture

21 Mar 2017 - 8:32 pm | फुत्कार

व्वा व्वा व्वा !

पद्मावति's picture

21 Mar 2017 - 8:38 pm | पद्मावति

क्लास्स, प्राची.

प्राची अश्विनी's picture

22 Mar 2017 - 12:06 pm | प्राची अश्विनी

अरे वा! आज तो दीन बन गया!:)

अभ्या..'s picture

22 Mar 2017 - 1:25 pm | अभ्या..

मैंभी एकदमच दीन बन गया. :(

टवाळ कार्टा's picture

22 Mar 2017 - 1:21 pm | टवाळ कार्टा

आम्च्या गुर्जींना बोलावू?

सत्यजित...'s picture

24 Mar 2017 - 3:51 am | सत्यजित...

मिपावर नवीनच सामिल झालो असल्याने,पूर्वी प्रकाशीत झालेल्या सर्वच रचना वाचून होतील असे वाटत नाही! तेंव्हा हा धागा माझ्यासारख्यांसाठी,उत्तम निवडक कवितांचा नजराणा वाटतो आहे! उपरोक्त सर्वच कविता व त्यांचे कवी अभिनंदनीय आहेत!शिवाय ज्यांनी हा धागा सुरु केला,ज्यांनी या कविता येथे उपलब्ध करुन दिल्या त्या सर्वांचेही आभार!

जव्हेरगंज's picture

24 Mar 2017 - 11:12 am | जव्हेरगंज

'वटवट'यांची

"करार...!!"

त्याच्या स्वप्नांनी जेंव्हा तिच्या रात्रींशी करार केला...
समुद्रही आनंदाने, होता अगदी उधाणलेला...
चंद्रानंही त्याचं चांदणं दिलं असं शिंपडून…
आता कसली हाय?, कसली धग?.... आणि कसलं उन...?
नदीच्याही प्रवाहानं वळण घेतलं, इतकं सुंदर….
रातराणीनंही दाही दिशांना उधळून दिलं, तिचं अत्तर...
सार्या कळ्यांनी फुलांसकट माना टाकल्या, अगदी लाजून...
सारं रान श्रावण सरींनी गेलं, एका क्षणात भिजून…
जागोजागी पडू लागली, नक्षत्रांची रासं...
...................तर, करारात ठरलं असं...
कि .. त्यानं.. त्याच्या स्वप्नांनी.. भरून टाकायची तिच्या रात्रींची ओंजळ..
मुक्तपणे वाहू द्यायचे, तिच्या गालावरून सुखाचे ओघळ…
तिच्या अंगणात त्यानं कधीच, साधी वावटळही नाही येऊ द्यायची…
तिच्या आयुष्यात समाधानानं कधीच, भैरवी नाही गायची..
त्याचं काळीज तिच्याकडे, गहाण राहील आयुष्यभर...
आणि नेमानं त्यानंच भरत राहायचा, त्यावरचा कवितेचा कर…
तसे त्याच्या कवितेचे स्वामित्वहक्क, त्यानं तिला केंव्हाच बहाल केलेत…
तेंव्हापासून त्याच्या कवितेला, जरा बरे दिवस आलेत…
कराराचा अवधी ठरला, जोपर्यंत आहे श्वास श्वासात…
तोपर्यंत त्यानंच हे सारं करायचं, फ़क्त तिच्या आठवणींच्या बदल्यात…
मात्र त्यात नाही ठेवलं, करार-समाप्तीचं... वा करारभंगाचं कलम…
जाणूनबुजून जरा लांबच ठेवली होती.. त्यांनी ती संभाव्य जखम…
नुसत्या कराराच्या तरतुदी ऐकूनच फुलून गेली होती.. चांदणी अन चांदणी…
काय झालं असतं... जर खरंच झाली असती, ह्याची अंमलबजावणी...
........ जी कधी............................ झालीच नाही..
तिच्या ओठी त्याची कविता, नंतर कधी आलीच नाही..
चाळत बसला तो नंतर, कराराची पानावरती पाने…
काळावरती लिहिलेली ती, डोळ्यांच्या आसवाने…
वांझोट्या प्रश्नांची नंतर कोसळली मोठ्ठी सर…
वेदनेला कोठे असते समाधानाचे अस्तर..?
.
.
आता दुखर्या काळजाची फिर्याद नेमकी कुठे मांडायची…?
आणि मांडलीच तर कशाच्या आधारे लढायची??
कारण कोणालाच नाही दाखवता येत काळजाला बसलेला चटका…
आणि असले करार कुणी कागदावर करतं का??
.
.
आता एकटा एकटाच करारभूमीवरती फिरून येतो…
त्याच्या सोबत एक मेघ रोज तिथे झरून जातो…
सोबतीला उभं असतं हळहळणारं मुकं रान...
आणि "करार झाला होता बाबा कधीतरी… " एव्हढंच फक्त समाधान…

पैसा's picture

24 Mar 2017 - 12:02 pm | पैसा

छान कलेक्शन