एवढ्यात काय खरेदी केलत - २

रेवती's picture
रेवती in काथ्याकूट
19 Mar 2017 - 8:05 am
गाभा: 

नमस्कार,
गविंनी सुरु केलेल्या खरेदीच्या पहिल्या धाग्याने शतक ठोकल्याने दुसरा धागा सुरु करत आहे. हा धागाही शतकी व्हावा अशी इच्छा आहे. आज माझी अ‍ॅमेझॉनची उरलेली ऑर्डर आली. मुलाच्या खोलीत इकडे तिकडे ठेवलेली पुस्तके नीट राहण्यासाठी जड बुक एन्डस मागवले होते ते आले. दोन मनुष्याकृती आधार देऊन पुस्तके सरळ करतायत अशा प्रकारातले बुक एन्डस आहेत. एक लोशन मागवलेले आले. कारमधील सेलफोन होल्डर मागवला होता तो आला. नवर्‍याच्या कारसाठी चार्जर, ५ युएसबी आउटपुटस असलेला मागवला होता. या वस्तू अजून वापरलेल्या नाहीत. उद्यापासून वापरात येतील. हे प्रकार खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये हिंडावं लागलं नाही म्हणून बरं वाटतय. एक वॉल क्लॉक मागवलं आहे ते अजून आलं नाही. त्यावर टॉम ब्रेडीचं चित्र आहे. तुम्ही तुमची खरेदी येथे लिहून धागा यशस्वी करा किंवा धागा यशस्वी होण्यासाठी खरेदी करा.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

2 Apr 2017 - 9:14 pm | श्रीगुरुजी

क्विकहील चांगले आहे. ७ वर्षांहून अधिक काळ ते वापरत आहे. एकदा ३ वर्षांसाठी नूतनीकरण केले की ते ३९ महिन्यांसाठी होते. त्यांची सेवासुद्धा चांगली आहे. ऑनलाईन अ‍ॅटोमॅटिक अपडेट्स हा त्याचा मोठा फायदा आहे.

क्विकहील मी बर्‍याच वर्षा पूर्वी वापरले होते, डिटेक्शन रेट चांगला नाही... म्हणजे त्यावेळी तरी नव्हता सध्याच काही ठावूक नाही. या पेक्षा चकटफु Avira उत्तम !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सपनों में इंडिया है जाना है मुझको... :- Arash - Bombay Dreams (feat. Aneela & Rebecca)

अनुप ढेरे's picture

21 Apr 2017 - 9:57 am | अनुप ढेरे

ऑनलाईन अ‍ॅटोमॅटिक अपडेट्स हा त्याचा मोठा फायदा आहे.

सगळेच देतात ती सोय