उत्तुंगतेचा प्रवास ||3||

ओ's picture
in भटकंती
18 Mar 2017 - 8:38 am

तुंगनाथाचा आशीर्वाद घेऊन आमचा प्रवास आता चंद्रशिलेच्या दिशेने सुरु झाला,जणू काही बापाचा आशीर्वाद घेऊन मुल गड जिंकायकला चालली आहेत की काय असा विचार माझ्या मनात येऊन गेला असो माझ्या मनात असं काय काय चालूच असत

आता रस्ता हिमालयानी स्वतः तयार केला होता,तुंगनाथ पर्यंतचा सरकारी छोटा पण सिमेंट चा रस्ता आता संपला होता

आम्ही आपल्या काठया टेकवून एक म्हाताऱ्या माणसा प्रमाणे ते शिखर चढू लागलो,कुठे पुढचा रस्ता कळत नव्हता तर कुठे थोडासा घसरडा रस्ता होता,पण थोडं चढल्या वर मन खिन्न झालं आम्हाला प्लास्टिक च्या बाटल्यांचा ढीग दिसला लोकांना चार शिव्या घातल्या निसर्गाची कशी विभत्सना करतात हे पाहून मन दुःखी झालं थोड्याशा अशा भावनांनी पुढची वाट धरली

पण आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य पाहून मन पुन्हा प्रफुल्लित झालं
धडपडत तर कधी व्यवस्तीत चालून आम्ही चंद्राशीला शिखरावर येऊन पोहोचलो, i am feeling top of the world म्हणजे काय ह्याची प्रचिती आम्हाला तिथे उभं राहिल्यावरच आली

हिमालायच भव्य दिव्य स्वरूप आमच्या डोळ्यासमोर होत,आभाळहि आता त्या पर्वत रागांवर आपली चादर पांघरत होत,आम्ही actually ढगात होतो

ते रूप पाहून कोणतीच भावना मनात येत नव्हती ना रडु येत होत ना हसू येत होतो,संपूर्ण रिक्त असल्याची जाणीव होती मी फक्त आजूबाजूचा परिसर डोळ्यात साठवून घेत होतो

काही क्षण कॅमेरा मधे बंधिस्त करून त्या छोट्याशा गंगाधाम मंदिरातील गंगा मातेच्या मूर्ती ला मनोभावे नमस्कार करून,तिचे तिथे घेऊन आल्या बद्दल मनःपूर्वक आभार मानले,आणि धन्य झाल्याची भावना मनात घेऊन पुन्हा तुंग नाथा कडे पाय वळवले

परतीच्या प्रवासात हि रास्ता आम्हाला कोड्यात पाडतच होता,आणि आम्ही उत्तर शोधात पुढे जायचो,असं करता करता बाराच्या सुमारास पुन्हा तुंगनाथ ला हजर

आता तुंगनाथाला भोग देण्याची तयारी सुरु झाली होती,खरतर माझी फारशी इच्छा नव्हती तिथे थांबून भोग चा प्रसाद घेण्याची पण माझ्या मित्रानं मला convince केलं,आणि भेटायला आलेल्या लेकरांना काही खाऊ न घालता पाठवणं बहुतेक तुंगनाथालाच मान्य नव्हत आणि आम्ही थांबलो,आता तिथे लक्ख ऊन पडलं होतं सूर्य हि तितकाच तळपत होता जितका गारव्याचा जोर होता,जणू काही दोघात शक्तिशाली कोण ह्याची स्पर्धा चालू होती

आता देवाला भोग लावून झाला सर्वाना एक जाड थालिपीठासारकी पोळी आणि भात प्रसाद म्हणून देण्यात आला आणि आम्ही पुन्हा एकदा तुंगनाथाला चा आशीर्वाद घेऊन निघालो...आता आमचा परतीचा प्रवास सुरु झाला होता,मन थोडस उदास होत पण परत जाण हि गरजेचं होतं उतरत असताना पुन्हा एकदा सकाळच्या ठेल्या वर थांबलो,आता तिथे थे ठेल्या वरचे काकू आणि काका दोघेही होते,आम्हाला दोघांना सपाटून भूक लागली होती छान 2 प्लेट maggie हदडून मग चहा घेतला आणि आमचा जठराग्नी शांत केला

पुन्हा एकदा तुंगनाथाच्या पायथ्याचा प्रवास सुरु ,उतरताना ती हिमशिखर जणू काही आम्हाला सांगत होती ,पुन्हा नक्की या आम्ही वाट पाहत आहोत ,उतरताना अद्भुत वनराई बघून माझ्या मित्रात दडलेला बॉटनिस्ट जागा होत होता,किती तरी झाडांचे त्याने असंख्य फोटो घेतले होते

आता आम्ही तुंगनाथाच्या पायथ्याशी आलो आणि पुन्हा एकदा फिरून त्याला नमस्कार केला,आणि त्याचे आभार मानले,माझ्या मनात अचानक महानंदा चित्रपटाच्या एका गाण्याच्या ओळी तरळून गेल्या

जटा जुट माथ्यावरी, चंद्रकळा शोभे शिरी
शैल सूता संगे गंगा मस्तकी वाहे
पुढे उभा मंगेश,मागे उभा मंगेश
माझ्या कडे देव माझा पाहतो आहे

अगदी असाच होता तुंगनाथाचा प्रवास ,जटां प्रमाणे त्या तुंगनाथाच्या पर्वत रांगा आणि वरती चंद्रकले प्रमाणे चंद्रशीला आणि चंद्रशिले वरचे गंगा धाम, आणि पावलागणिक मंगेशाचं अस्तित्व.

|| नमः शिवाय ||

-----ओंकार जोशी

प्रतिक्रिया

जगप्रवासी's picture

18 Mar 2017 - 10:48 am | जगप्रवासी

छान लिहीलंय

तुंगनाथ ते चंद्रशिला मार्गावर जंगल आहे का? चोपता ते तुंगनाथ सुद्धा जंगल आहे का?

चोपता ते तुंगनाथ जंगल आहे,पण तुंगनाथ ते चंद्राशीला जंगल नाही

लेख मोठे हवेत. फार नाही पण चार फोटो चालतील.

किल्लेदार's picture

22 Mar 2017 - 12:27 am | किल्लेदार

जुन्या आठवणी जाग्या केल्यात. तुंगनाथ पर्यंत काही जाता आले नाही पण चोपताहून दिसणारी केदारनाथची पर्वतरांग लाजवाब आहे.

Chopta