प्राणी पुराण - १ (मार्जारआख्यान)

औरंगजेब's picture
औरंगजेब in जनातलं, मनातलं
17 Mar 2017 - 7:56 pm

टीप :-हा धागा एका बोक्याची गोष्ट ह्या धाग्यांवरून स्फूर्ती घेऊन लिहिला आहे.

तस मार्जार कुळाशी माझ काही वैर नाही. मार्जार मुळाशी माझा पहिला संबंध माझ्या बालपणीच आला. आमच्या बिल्डिंग मध्ये खाली राहणाऱ्या एकांनी घरी मांजरे पाळली होती.
सोनू आणि मोनू मांजर ह्यांनी माझ्या लहानपणीच्या आठवणींचा बराच मोठा भाग व्यापला आहे. शाळेतून आल्यावर त्यांना दूध देणे हा मी आणि माझ्या चुलत भावाचा एक-कलमी कार्यक्रम असायचा.
ते पायात पायात घोटाळणं, म्याव म्याव अशी लाडिक आर्जव करणं , जिन्यावरून थेट घरापर्यंत येणं अशी लाडीगोडी तर रोजचीच होती. बशीत दूध घालून खाली अंगणात जाई पर्यंतही त्यांना सवड नसायची.
लहानपणची अजून एक आठवण म्हणजे सोनू-मोनू चे केलेले बारसे. मी माझा भाऊ आणि बहिणींनी त्याचे बारसे अगदी थाटात ( ५ पेढे खाऊन) केले बरका!

सोनू मांजर त्यातल्या त्यात विशेष आवडीच. त्याची आवडती जागा म्हणजे जिन्याखालच इलेक्ट्रिक बॉक्स असलेल कपाट. भाऊ आला कि त्याच्या पायात पायात फिरेल , लाडीगोडी लावेल पण माझ्या वाट्याला कधी गेला नाही.
मी पहिल्या पासूनच मांजरांच्या बाबतीत Neutral आहे. मला मांजर आवडतात पण आणि नाही पण आवडत.

दुसरे मांजर म्हणजे मोनू मांजर. हे मांजर म्हणजे एकदम स्थितप्रज्ञ! दूध द्या , जवळ घ्या,गोंजारा त्याला काहीही फरक पडत नसे. हा पण सोनू ला दूध दिल आणि मोनू ला दिल नाही तर मात्र तो बारीक म्याव करून तक्रार मात्र नक्की करी. पण पुढे जाऊन लाडीगोडी वगरे लावेल तर शप्पथ!

मोनू ची अजून एक आठवण म्हणजे आमच्या बिल्डिंग खाली एक मद्रासी कुटुंब राहायच कौलारू घरात. त्यांच्या कडे एक एमएटी होती. त्याचा मागच्या सीट वर हा शहाणा नेहेमी बसलेला असायचा. कोणी कितीही हाकलू दे मोनू तिथून अजिबात हलायचा नाही.

तुमच्या काही मांजराच्या आठवणी आहेत का? त्या प्रतिसादात नक्की लिहा.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

हेमंत८२'s picture

17 Mar 2017 - 8:24 pm | हेमंत८२

मांजर आमच्याकडे नव्हती पण शेजारांच्याकडे होती जरा विचारून लिहतो कुत्र्याच्या बाबतीत आहेत.. इथे लावू कि वेगळा धागा काढावा...

औरंगजेब's picture

17 Mar 2017 - 8:31 pm | औरंगजेब

लिहा हो. आठवणी वाचायला सगाळ्यांनाच आवडातात.

टवाळ कार्टा's picture

17 Mar 2017 - 10:46 pm | टवाळ कार्टा

आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये एक मांजर होती....मग तिचे लग्न होऊन गेली परदेशात

प्रचेतस's picture

17 Mar 2017 - 11:15 pm | प्रचेतस

काय सांगता...!
आमच्या शाळेतही एक मांजर होती, ती सध्या परदेशात चक्क मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी करते.

५० फक्त's picture

18 Mar 2017 - 10:32 am | ५० फक्त

काय राव परदेशात जाउन मायक्रोसॉफ्ट मध्ये नोकरी, वाईट दिवस आले बघा,, गेला बाजार मॅक्डि, सब्वे अगदी पिझा तरी बघायचं,

अन्नदानासारखं पुण्य नाही हो.

उगा काहितरीच's picture

18 Mar 2017 - 10:47 am | उगा काहितरीच

अगदी रहावलंच नाही म्हणून टंकतोय...http://www.misalpav.com/node/17219 घ्या लिंक आणि प्रतिक्रिया वाचा !

मांजर आवडणे आणि ते उघडपणे सांगणे असे सहसा होत नाही. मांजराच्या पिलांच्या लीला सहसा कुणालाही आवडतात. पण श्वानप्रेमींच्या तुलनेत मार्जार प्रेमी हे जरा अल्पमतात असतात. त्यात मांजर पडले प्रचंड स्वाभिमानी. इतके स्वाभिमानी कि खाण्यासाठी कुणाची हांजी हांजी करावी लागू नये म्हणून ती झोपतात ज्या योगे त्यांना ऊर्जा कमी लागते (संदर्भ: विकिपीडिया.) माणसाच्या अस्मितेला चुचकारण्याचे काम करीत नसल्यामुळे मांजरे सहसा कुणाला फारशी आवडत नसावी.

मी बरीच मांजरं पाळली. त्यांच्या मानसिक आणि शारीरिक गरजा अतिशय कमी असतात. ती स्वतः स्वच्छ राहतात आणि पोट भरले कि आपण बरे कि आपले काम बरे या वृत्तीने कुठे तरी वळचणीला पडून राहतात.