पण, लक्षात कोण घेतो!!!

विद्या चिकणे मांढरे's picture
विद्या चिकणे मांढरे in जनातलं, मनातलं
17 Mar 2017 - 5:56 pm

परवा ऑफिसला जाताना बालगंधर्वच्या चौकात आले अन सिग्नल लाल झाला, म्हणून मग गाडी बंद करून सिग्नल पुन्हा हिरवा होण्याची वाट बघत उभी राहिले. तेव्हढ्यात साधारण अठरा-एकोणीस वर्षांची मुलगी गर्दीतून वाट काढत, सिग्नलवर थांबलेल्या काही निवडक लोकांना भेटून त्यांच्याशी काहीतरी बोलून त्यांना हातातल्या पुड्यातून एक-एक चॉकलेट काढून देताना दिसली. माझ्यासकट सगळेच 'ती नक्की काय बोलतीये आणि चॉकलेट्स का वाटतीये' या उत्सुकतेने तिच्याकडे बघत होते. अलीकडेच POK मध्ये मोदींनी घडवून आणलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर त्यांच्या समर्थकांनी चौकाचौकात वाटलेली साखर आठवली आणि आजही असंच काहीतरी घडलंय कि काय, म्हणून उत्सुकता अजूनच वाढली. त्या दिवशी साखर वाटणार्यांनी प्रत्येकाला साखर दिली होती पण आजची चॉकलेट्स मात्र काही निवडक लोकांच्याच हातात पडत होती. काय भानगड आहे हे कळायला काहीच मार्ग नव्हता. हळूहळू ती माझ्याजवळ आली आणि हातातल्या पिशवीतून एक चॉकलेट काढून देत मला म्हणाली, 'thank you mam for wearing a helmet.' तिच्या हातातून चॉकलेट घेत तिच्याइतकीच मोठी स्माईल देत मी म्हणाले, 'i wear it for my own safety'. तिने माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले अन 'but many wont understand' असं म्हणत पुढच्या हेल्मेटधारकाला चॉकलेट द्यायला निघून गेली. घ्या! म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी तुम्ही हेल्मेट वापरा हेही सांगावं लागतं लोकांना. हेल्मेट नं घालण्याची अनेक भन्नाट कारणं असतात बरं का या लोकांकडे, जसं कि आजूबाजूचे आवाज येत नाहीत, डोकं जड होतं, डोकं दुखायला लागतं, सगळ्यात भारी म्हणजे हेअरस्टाईल खराब होते! अरे, पण डोकंच शाबूत नाही राहिलं तर कसली हेअरस्टाईल अन कसलं काय. सर सलामत तो पगडी पचास, 'पण लक्षात कोण घेतो?'

याआधीही मी बर्याचदा वेगवेगळ्या एन जी वो च्या मुलामुलींनी सिग्नल वर बघितलंय, 'Thank You' नोट्स घेऊन उभे असतात बिचारे उन्हातान्हात. कधी सिग्नल पाळलात म्हणून थँक यु, तर कधी झेब्रा क्रॉसिंगच्या मागे थांबलात म्हणून थँक यु. आणि आज हेल्मेट घातल्याबद्दल थँक यु! बघा, म्हणजे या एन जी वो च्या निस्वार्थी पोरा-टोरांपासून लाच घेणाऱ्या अन नं घेणाऱ्या म्हणजे पावती फाडणाऱ्या पोलिसांपर्यंत सगळेच वेगवेगळ्या पद्धतीने वाहतुकीचे नियम शिकवत असतात, पण 'साम दाम दंड' यातली कुठलीच भाषा नं समजणारे किंवा समजून नं घेणारे महाभाग आहेतच. आणि हो पुण्याच्या नावाखाली सगळे नियम धाब्यावर बसवणारेही कमी नाहीत. एकीकडे कट्टयावर बसून पुण्यातले लोक कसे नियम पाळत नाहीत याची तासंतास चर्चासत्रं रंगवायची आणि दुसरीकडे स्वतः गाडी चालवताना पुण्यात चालतं म्हणत सगळ्या नियमांची ऐशी-तैशी करायची. :)

असो, या नियम नं पाळणाऱ्या लोकांमध्ये अजून एक मजेशीर प्रकार आहे बरं का, तो न्हणजे 'सदैव घाईत असलेले'. समोर चक्क लाल सिग्नल लागलेला असतानाही हे लोक बऱ्याचदा प्य्या-प्य्या करून हॉर्न वाजवतात. पुढे उभे राहिलेल्यांनी सिग्नल मोडून यांचा रस्ता मोकळा करावा किंवा बाजूला सरकून यांना जायला रस्ता द्यावा अशी काहीतरी अजिबो-गरीब अपेक्षा असते बहुदा या लोकांची. मी अशा लोकांच्या हॉर्नकडे मुळीच लक्ष देत नाही, बहिरीचं होते म्हणा ना. ऍम्ब्युलन्स असेल तरंच बाजूला होऊन रस्ता देते. मी सिग्नल पाळते आणि कमीत कमी अशा दहा-पाच जणांना पाळायलाही लावते :). बरं, आता एवढे हॉर्न वाजवूनही हि हालत नाहीये म्हणल्यावर गप्प बसावे कि नाही, तर नाही सिग्नल हिरवा व्हायच्या पाच-दहा सेकंद आधीच पुन्हा हॉर्न वाजवायला लागतात, जणू काही पुढच्या रांगेत उभे राहिलेल्यांना रंगआंधळेपणा आहे आणि हिरवा झालेला सिग्नल त्यांना दिसणारच नाहीये. बरं एवढं करून थांबत नाहीत बरं का हे लोक, सिग्नल सुटल्यावर निघून जाताना अस्सा लूक देतात, जणू अर्धा मिनिट सिग्नलवर उभं रहायला लागल्यामुळे यांचं एखादं ऑस्कर किंवा नोबेल पारितोषिक हुकलं आहे. हे लोक असा लूक देतात ना तेव्हा मला फार भारी वाटतं, अगदीच गुदगुल्या होतात म्हणा ना. आणि नकळत का होईना आपण या लोक्कांना सिग्नल पाळायला लावला म्हणून वेगळाच आनंद होतो. मला एक गोष्ट कळत नाही, कि या लोकांना एवढं महत्त्वाचं काम असतं तर हे लोक वेळेवर का निघत नाहीत घरातून?

हेल्मेट वापरावं, वेळेवर निघावं म्हणजे घाई होणार नाही आणि बरेच अपघातहि टळतील या सगळ्या साध्या आणि स्वहिताच्या गोष्टी, "पण लक्षात कोण घेतो?"

विद्या चिकणे ( मांढरे )

समाजलेख

प्रतिक्रिया

यसवायजी's picture

17 Mar 2017 - 7:47 pm | यसवायजी

हौ ना या..

एस's picture

18 Mar 2017 - 4:17 am | एस

सहमत.

पैसा's picture

18 Mar 2017 - 10:05 am | पैसा

लेख आवडला आणि थँक यू म्हणण्याची कल्पनाही आवडली. पण या लेखावर याटिकानी #हेल्मेटकावापरूनये ब्रिगेडचा सर्जिकल स्ट्राईक होण्याची शक्यता दिसते आहे.

संजय पाटिल's picture

18 Mar 2017 - 1:00 pm | संजय पाटिल

११:१० am ला सुरू झालेला आहे

उगा काहितरीच's picture

18 Mar 2017 - 10:12 am | उगा काहितरीच

असं रस्त्यावर कुणी चॉकलेट वगैरे खायला दिलं तर खाऊ नये असं वाटते . बाकी हेल्मेट बद्दल सहमत . हेल्मेटची सवय झाली की हेल्मेटशिवाय गाडी चाववायची इच्छाच होत नाही. ते पडल्यावर वगैरे दुखापत कमी होते , जास्त होते जाऊ द्या , पण हवा , ऊन लागत नाही हाच काय तो फायदा वाटतो.

एकतर बाजूचं काही पटकन दिसत नाही आणि ऐकूही येत नाही. दुसरी गोष्ट मानेला कमालीची रग लागते. शिवाय बाळगण्याचा त्रास वेगळाच. हायस्पीडवाल्यांना हेल्मेट ठीके पण २०/३० फारतर ४० च्या स्पीडनं निवांत गाडी चालवली तर प्रवासाची पण मजा येते, आजूबाजूच्या ट्रॅफिकचं भानही उत्तम राहातं आणि सुटसुटीतपणाही राहातो. हेल्मेट इज अ टॉर्चर फॉर सिंपल सिटी ड्रायवींग असं (हेल्मेट काही वेळा वापरुन) सांगतो.

ट्रॅफिक नियमांबद्दल असहमतीचं कारणच नाही.

>>>एकतर बाजूचं काही पटकन दिसत नाही आणि ऐकूही येत नाही. दुसरी गोष्ट मानेला कमालीची रग लागते.

असे होत असेल तर चुकीचे हेल्मेट वापरत आहात

संजय क्षीरसागर's picture

18 Mar 2017 - 11:17 am | संजय क्षीरसागर

बघतो

किसन शिंदे's picture

18 Mar 2017 - 1:32 pm | किसन शिंदे

तुम्ही असे हेल्मेट वापरत चला मग. अनुवटीपाशी मोकळे असल्याने चेहरा कोंडल्यासारखा वाटत नाही आणि आजुबाजूच्या ट्रॅफिकचे भानही राहतेय.

1

विद्या चिकणे मांढरे's picture

18 Mar 2017 - 11:55 am | विद्या चिकणे मांढरे

मी स्वतः गेली १० वर्ष हेल्मेट वापरते आहे, यातला एकही त्रास मला झाल्याचे आठवत नाही, असो, शेवटी हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे असे मला वाटते, मी आपले माझे मत मांडले :)

स्वीट टॉकर's picture

18 Mar 2017 - 12:48 pm | स्वीट टॉकर

माझे सासरे अतिशय हळु स्कूटर चालवायचे. इतके धीमे की त्यांच्या व्हेस्पाचा टॉप गियर कधीही वापरला गेला नाही. एकदा उधळलेली गाय येऊन धडकली. डोकं जमिनीला आपटलं. हेल्मेट नव्हतं. आय सी यू मध्ये खर्चाचा आकडा कसा सशासारखा उड्या मारत जातो ते अनुभवल्याशिवाय कळंत नाही.

शिवाय डोक्याला मार लागलेले कित्येक लोक आयुष्यभरात परत कधीच शंभर टक्के नॉर्मल होत नाहीत. कितींच्या नोकर्या गेल्या त्याची गणतीच नाही. आपण कितीही निवांत गाडी चालवली तरी बाकीच्यांचा वेग, आकार आणि शहाणपणा याची आपण खात्री देऊ शकत नाही.

लग्न होईपर्यंत काय वाट्टेल ते करावं. एकदा का कुटुंबाची जबाबदारी घेतली की ती व्यवस्थित पार पाडण्यासाठी कित्येक बंधनं घालून घ्यावी लागतात. हेल्मेट हे त्यातलंच एक. मग ते टॉर्चर असो वा प्लेझर.

सचिन काळे's picture

19 Mar 2017 - 7:04 am | सचिन काळे

आपला प्रतिसाद आवडला.

संजय क्षीरसागर's picture

19 Mar 2017 - 9:33 am | संजय क्षीरसागर

सासऱ्यांच्या कहाणीबद्दल आभार्स. हेल्मेट वापरणार नाही पण स्पोर्टसमन असल्यानं बॉडी अवेअरनेस भरपूर आहे त्यामुळे ऑक्सिडेंट वगैरेत शक्यतो डोकं वाचवायचा प्रयत्न करीन !

संजय क्षीरसागर's picture

19 Mar 2017 - 9:50 am | संजय क्षीरसागर

कालच एका मित्राचं किशी म्हणतायंत तसं हेल्मेट वापरून पाहीलं, त्रास थोडा कमी वाटला, पण त्रास आहेच !

मोदक's picture

19 Mar 2017 - 10:11 am | मोदक

.

अभ्या..'s picture

19 Mar 2017 - 10:55 am | अभ्या..

Kishi...?????
How sweet.

ऑक्सिडेंट वगैरेत शक्यतो डोकं वाचवायचा प्रयत्न करीन !

असा ठरवून प्रयत्न होत नसतो संक्षी.. बॉडी रिअ‍ॅक्शन टाईम आणि रिफ्लेक्झेस वर थोडे संशोधन करा.

तरीही आत्मविश्वास असेलच तर असे डोके वाचवायचे प्रयत्न करण्यापेक्षा सरळ अ‍ॅक्सीडेंट टाळायचे प्रयत्न करा - आणि "अ‍ॅक्सीडेंट टाळता आले नाही तर काय?" या प्रश्नाचे उत्तर शोधा.

अर्थात ! मला आयुष्यात एकदाही अ‍ॅक्सिडेंट झालेला नाही. याचा अर्थ पुढे होणार नाही असा नाही पण आय ड्राइव वेरी सेफ. आणि याचं एकमेव कारण म्हणजे मला कधीही कुठेही जायची गडबड नसते !

रावसाहेब म्हणत्यात's picture

20 Mar 2017 - 12:22 am | रावसाहेब म्हणत्यात

लोकं हेल्मेट का घालत नाही किंवा तुम्ही का घालत नाही? याचं एक कारण म्हणजे आपला मेंदू rare व्हेंट्स पूर्णपणे प्रोसेस करू शकत नाही. आपण लाखातून एकदा घडणाऱ्या गोष्टीला ती घडणारच नाहीय असं धरतो. हे सगळं आपल्या sub-conscious मेंदूत सुरु असतं त्यामुळे ते निर्णय दुसऱ्यांनी बघितले कि ही लोकं over-confident दिसतात.

ऑक्सिडेंट वगैरेत शक्यतो डोकं वाचवायचा प्रयत्न करीन

एकदा आहे का हे तपासून घ्या.
मु. पो. पुणे.

संजय क्षीरसागर's picture

20 Mar 2017 - 12:56 am | संजय क्षीरसागर

बाल्यावस्थेतली बडबड !

जन्मस्थान पुणे

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Mar 2017 - 10:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख !

आपण कितीही निवांत गाडी चालवली तरी बाकीच्यांचा वेग, आकार आणि शहाणपणा याची आपण खात्री देऊ शकत नाही.

+१००

याला थोडे बदलून असेही म्हणता येईल की,
"आपण कितीही समजाऊन सांगितले तरी बाकीच्यांची वृत्ती (अटिट्यूड), समज आणि शहाणपणा याची आपण खात्री देऊ शकत नाही." :) :(

संजय क्षीरसागर's picture

19 Mar 2017 - 11:43 pm | संजय क्षीरसागर

आपण सहजतेनं एखादी गोष्ट घेतो पण लोकांचा धसका, त्यांची सतत जीवाला जपण्याची वृत्ती आणि सतत नेगटीव विचार करण्याची वृत्ती बदलणं अवघड आहे !

रेवती's picture

19 Mar 2017 - 7:45 am | रेवती

लेखन आवडले.

जेपी's picture

19 Mar 2017 - 6:34 pm | जेपी

मला डोक नाही..
अस बरेच लोक म्हणतात,त्यामुळे हेल्मेट वापरत नाही.

(ह घ्या.
मी दुचाकी वापरणे वर्षभरापुर्वीच बंद केले आहे)

मी हेल्मेट वापरते आणि लाल सिग्नल असेल तर बहिरी,तुसडी आणि मख्ख पण होते ! द्या टाळी....... :)

मनिमौ's picture

19 Mar 2017 - 8:18 pm | मनिमौ

विशेषतः सिग्नल तोडणार्यांची मजा गरवारे शाळेजवळ च्या सिग्नल ला मस्त बघायला मिळेल.
रच्याकने मी समजा रिक्षा किवा कॅब ने जात असेन तर चालकाला आवर्जून सिग्नल ला थांबाच असे सांगते

रावसाहेब म्हणत्यात's picture

20 Mar 2017 - 12:14 am | रावसाहेब म्हणत्यात

छान ऑबसेर्व्हशन आणि लेखन.

सुमीत's picture

20 Mar 2017 - 9:43 pm | सुमीत

"असो, या नियम नं पाळणाऱ्या लोकांमध्ये अजून एक मजेशीर प्रकार आहे बरं का, तो न्हणजे 'सदैव घाईत असलेले'. समोर चक्क लाल सिग्नल लागलेला असतानाही हे लोक बऱ्याचदा प्य्या-प्य्या करून हॉर्न वाजवतात. पुढे उभे राहिलेल्यांनी सिग्नल मोडून यांचा रस्ता मोकळा करावा किंवा बाजूला सरकून यांना जायला रस्ता द्यावा अशी काहीतरी अजिबो-गरीब अपेक्षा असते बहुदा या लोकांची"
कधी तरी अशा लोकांची हिंसक व्रुत्ती बाहेर येते. पुण्यातल्याच एका मैत्रिणीचा अनुभव होता, तिच्या पुढे असलेल्या स्वाराला अशा नगाने मारले होते.
मला तर एकदा आयआयटी गेट बाहेर च्या सिग्नल ला सिविल ड्रेस मधला निव्रुत्ती ला आलेला हवालदार त्याच्या जुनाट बुलेट ने धडका मारत होता.

झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडे भरपूर जागा ठेवून शेजारच्या दुचाकीवर बसलेल्या मित्राशी गप्पा मारत बसलेले स्वघोषीत रस्ता मालक माझ्या समोर असले तर मी हॉर्न वाजवून पुढे जायला भाग पाडतो

मराठी_माणूस's picture

21 Mar 2017 - 10:52 am | मराठी_माणूस

सिग्नल ला चार चाकी थांबली आणि एका विशीष्ट कारणासाठी दरवाजा अर्धवट उघडला आणि कार्यभाग उरकला की एक चॉकलेट द्यायचे आणि धन्यवाद म्हणायचे.