पंचांग

Primary tabs

हेमंत८२'s picture
हेमंत८२ in काथ्याकूट
16 Mar 2017 - 12:52 pm
गाभा: 

मी आजकाल सकाळी TV बघताना मला एक पंचांग दिसले तसे व्हाट्सअप वर दररोज पंचांग येते..

हे पंचांग म्हणजे काय ?
हे फक्त हिंदू धर्मात असते का इतर धर्मात पण आहे?
याला काही अर्थ आहे का?
पंचांगानुसार जर एखादी चांगली गोस्ट खरेदी केली तर खरंच त्याचे फळ चांगले मिळते का..
जर पंचांग सगळे सारखे असेल तर प्रत्येक ठिकाणी त्याचे फलित वेगळे का सांगितले जाते? काही ठिकाणी क्ष राशी ला दिवस चांगला जाईल तर दुसऱ्या ठिकाणी मध्यम असे का?

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

16 Mar 2017 - 2:14 pm | शाम भागवत

अंघोळ झाल्यावर टॉवेलला अंग पुसायच्या ऐवजी पंचाने अंग पुसले तर त्या पंचाला पंचांग म्हणत असावे.
:)

पंचांग हे कालगणनेची एक पद्धत.
पाच हजार वर्षांपासून ग्रह तारे सूर्य चंद्र यांच्या स्थितीवरून पंचांगे आहेत.मोजमापात ती चुकत असतील कमीअधिक परंतू प्रयत्न स्तुत्य आणि सत्य आहे.

त्या स्थितीवरून भविष्य/फलित हा श्रद्धेचा वेगळा भाग आहे.त्यावर विश्वास ठेवणे/न ठेवणे ज्याचात्याचा दृष्टिकोन.

हे अगदी थोडक्यात.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Mar 2017 - 3:27 pm | प्रकाश घाटपांडे

अधिक माहिती आपल्याला इथे वाचता येईल http://mr.upakram.org/node/651

Nitin Palkar's picture

22 Mar 2017 - 8:33 pm | Nitin Palkar

या लिंकवर खूप छान माहिती आहे
मुळात आपल्या पूर्वजांकडे गणितीय ज्ञान होते असे ज्यांना वाटत असेल/असा ज्यांना विश्वास असेल त्यांनी ही लिंक tap करावी.