कामगार शक्तीचा.....

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
14 Mar 2017 - 6:57 pm

२०१०... पाहिलंच पोस्टिंग होतं अंदमान ला . या आधी गेलो नव्हतो तिकडे . ४-५ महिने राहायचं जरा वैताग आलेला . आर एपी डी आर पी चा प्रोजेक्ट होता . त्सुनामी नंतर . जावं लागलं बाहेर असताना ,मी परदेशात होतो तेव्हा काही दिवस तरी अचानक जावं लागलं . ते पण आपण फिरतो ते अंदमान नाही रंगत पासून मायाबंदर ते दिगलीपूर पर्यंत . सुरवातीचे ५-६ दिवस मजेत गेले . मायाबंदर ला शासकीय विश्रामगृह होतं राहायला . फिरून वैगरे मजा आली पोर्टब्लेयर ला पण . काम अवघड होतं त्यात मला बाहेरून अचानक इथे पाठवलेलं. मुख्य कंपनी सरकारी पॉवरग्रीड आणि कंत्राट आमच्या कंपनीला मिळालेलं. आम्ही ज्यांना उपकंत्राट दिलेलं त्यांनी कामगार ओरिसा मधून आणलेले . मुळात कष्टाच्या कामाला आंध्र मधून कामगार आणतात . केबल हाय वोल्टेज साठी . तरी उपकंत्राटदार कंपनी ज्यांची होती ते ओरिसा चे होते . म्हटलं जाऊद्या ..त्यांचे २ इंजिनियर १ सुपरवायझर आणि ७० कामगार असे आधीच तिथे पोचलेले . मी एकटाच होतो आमच्या कंपनी कडून आणि एक सरकारी मुख्य अधिकारी . थोड्या दिवसांनी शासकीय विश्रामगृह सोडावं लागलं कारण कपंनीने सोय करून दिली . राहता येणार नव्हतंच तसं तिकडे म्हणा .तेव्हा थोडी गंभीरता जाणवू लागली काही असलं तरी एकदा साईट वर गेलं कि एक तासानंतर दुकान लागायचं . त्वरित काही नाही . कार निकोबार ला गेलो कि विषयच संपला . काही वेळा २ दिवस येता नाही यायचं . समुद्र खवळला कि . त्यात कधीपण पाऊस . सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आणि कधीतरी माझे वरिष्ठ यायचे पोर्ट ब्लेयर वरून तितकाच दिलासा . मिटिंग ला पोर्ट ब्लेयर ला जावं लागायचं. जंगलातून जाताना सगळ्या गाड्या एका लायनीत निघायच्या . पुढे पोलीस मग गाड्या आणि मागे पोलीस . कोणी अनुभवलं असेल तर लक्षात येईल मी जिथे राहायचो तिथे नेहमी हि परिस्थिती होती. तरी दिवस बरे चालले होते . म्हणजे फक्त कामगारांचं टेन्शन होतं. कारण माझ्या कंपनीतर्फे मीच होतो तिकडे . सरकारी अधिकारी होते ते विशेष लक्ष नाही द्यायचे ते त्यांच्या मूड मध्ये असायचे . विशेषतः अंदमान ला दुपारनंतर मस्त प्यावी खेकडे वैगरे खावे आणि आराम हा खाक्या असायचा . मी पण सामील व्हायचो पण कामानंतर कारण ७० कामगार अभियंते आणि काम हि जबाबदारी होती . ते माझ्या हातात त्यामुळे मला काही जमायचं नाही नेहमी . कारण केबल टाकताना पिसाळलेले हत्ती तसेच काही प्राणी तसेच काही मागास जमाती हे टेन्शन असायचं . अभियंते प्रामाणिक पणे काम करत होते तरी मला विशेष टेन्शन होतं त्या कामगारांचं . अगदी अंदमान म्हणजे बाहेर चालोय खूप कमवून येणार असं म्हणून ते गावातल्या सरपंचांना सांगून आले होते . काही दिवसात त्यांचा भ्रमनिरास व्हायला लागला . असं कुठे काम असतं का ? पैसे महत्वाचे नसतात ? असं एक कामगार रोज म्हणू लागला . आम्ही घाबरलो ७० लोकांना परत पाठवायचं काही सोपी गोष्ट नाही . अशातच एक दिवस एक गोष्ट घडली फार दुर्मिळ अश्या जारवा जमातीच्या संवर्धनासाठी त्या काळी आम्ही राहायचो त्या विभागात दारूचं दुकान बंद झालं . आम्हाला काहीच त्रास नव्हता गाडी हाताशी होती पण कामगारांमध्ये ह्याने असंतोष अजून वाढला, फसवून आणलं अशी ओरड चालू झाली .
क्रमशः

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

सुमीत भातखंडे's picture

14 Mar 2017 - 7:19 pm | सुमीत भातखंडे

पुभाप्र.

राघवेंद्र's picture

14 Mar 2017 - 7:20 pm | राघवेंद्र

लवकर संपवला ना हा भाग भाऊ... पु. भा. प्र .

ravpil's picture

14 Mar 2017 - 8:20 pm | ravpil

Anybody has mobile number of vattel te WhatsApp group ? Please share.

उगा काहितरीच's picture

14 Mar 2017 - 8:38 pm | उगा काहितरीच

वाचतोय

वाचतोय.. पुढील भाग लवकर टाका..!!

तुम्ही लेखमालेचे एक-दोन भाग टाकून लटकवत ठेवता नेहमी. तेव्हा या किश्श्याबाबत तसे करू नये व सर्व भाग लवकरात लवकर टाकावेत ही विनंती.

+१ आणि मोठे भाग पण येऊ द्या..
आम्हाला बोलायला काय जातय..:)

पिलीयन रायडर's picture

16 Mar 2017 - 8:51 am | पिलीयन रायडर

अगदी हेच म्हणणार होते.

आणि कधी कधी प्रतिसाद मन लावुन लिहीतात, पण लेख लिहीताना मात्र का इतकं जीवावर येतं काय माहिती. थोडं तरी लक्ष द्या हो वाक्य रचनांकडे. फार लक्ष देऊन वाचावं लागतं. शिवाय भागही छोटे.

किसन शिंदे's picture

15 Mar 2017 - 8:39 pm | किसन शिंदे

दहा शिक्षित कामगारांना सांभाळणे सोपे असते पण एका अशिक्षित कामगाराला सांभाळणे कर्मकठीण काम.

सांभाळणे इन द सेन्स, आपल्याला हवं ते काम दिलेल्या वेळेत व्यवस्थितरीत्या त्यांच्याकडून करून घेणे हे सगळं कठीण आहे.

जव्हेरगंज's picture

16 Mar 2017 - 10:12 am | जव्हेरगंज

भारीच!!!

अभ्या..'s picture

16 Mar 2017 - 10:26 am | अभ्या..

वरूणराव, येउंद्या पटपटा,
जमलंय

संजय पाटिल's picture

16 Mar 2017 - 10:32 am | संजय पाटिल

पुभाप्र.

पैसा's picture

16 Mar 2017 - 10:41 am | पैसा

लिहा पटापट