अंहकार जातीचा -पवाडा समतेचा

परशु सोंडगे's picture
परशु सोंडगे in काथ्याकूट
13 Mar 2017 - 8:04 pm
गाभा: 

अंहकार जातीचा
पोवाडा समतेचा
जात माणसाच्या मनातून जात नाही .हे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री कांबळे साहेब यांनी यांच्या वक्तव्याने सिद्ध केलं. मी घाबरत नाही. मी घाबरायला ब्राम्हण नाही. असं जातीवर येऊन बोलायचं काही गरज नव्हती.ते का असं बोलले ? सहज बोलले असतील तर प्रश्न गंभीर आहे. त्यात त्यांचा काही राजकीय डाव असेल. स्टंट असेल तर
आपण फार गंभीर व्हायचं कारण नाही. राजकारण हे असचं असतं. हा सुविचार झाला आहे.
त्यांच्या या वक्त्यावरून त्यांना त्यांच्या जातीचा अभिमान आहे हे सिध्द झालंच की ! (असा जातीचा अभिमान असणारा महाराष्ट्र राज्याचा सामाजिक न्याय व कल्याण मंत्री आहे.हे आपलं दुदैव.)
प्रश्न हा आहे. जात मानव निर्मीत आहे की नैसर्गिक आहे ? जात कृत्रीम असेल तर त्या जातीतील समग्र माणसं अमक्या गुणांची, अमक्या दोषाची असतात असं का मानायचं ?
काही बाबतीत मानववंशशास्त्रीय स्पष्टीकरण ही आहे पंरतु जातीला गुण आणि दोष आपण चिकटवू नाही शकतं.
मंत्री महोदय जर अगदी सहज बोलले असतील तर मानवतावादी प्रत्येक नागरिकांनी ही बाब गंभीरपणे
घेतली पाहिजे. माणसाच्या मनात ज्या
धारणा असतात.जाणिवा असतात.त्या अगदी सहज व्यक्त होत असतात. ए-हवी माणसं फार नटवं बोलतात. आपल्या बोलण्याला अलंकृत करतात.त्यात ढोंग असतं.ते गोड शब्दात आणि सुरात असते. ते फसवं असतं. ते जाहीरपणे समतेच्या वल्गना करतील.खाजगीत आप आपल्या जातीचा अंहकार कुरवाळतील. जातीजातीच्या द्वेषात तेल टाकतील.
फक्त मंत्री महोदयांची गोष्ट नाही.
अशी असंख्य माणसं आपआपल्या जातीचा अंहकार घेऊन सदैव आपल्या भोवती वावरत असतात. स्व जातीचा अंहकार मानला की दुस-या जातीचा द्वेष आलाचं. अहंकारची इमारत द्वेषाच्या पायावरच उभी राहते.
हा अंहकार कुरवाळून राजकीय गणित मांडली जातात. जाती द्वेषावरचं निवडणूका जिंकण्याचे व्यूह रचले जातात. हा अंहकार, द्वेष जर नष्ट झाला तर राजकारण समतेच्या दिशेने सरकेल.
जातीची म्हणून काही वैशिष्ट्य नसतात. माणसाचे स्वभाव , गुण दोष असतात.जातीचे असे गुण दोष नसतात. काही जातीने काही कौशल्य आत्मसात केलेली असतात. तो त्यांच्या शिक्षण व प्रशिक्षणाचा भाग असतो. त्यात जातीचे काही जनूके नसतात. आपण अनेक गुण आणि दोष जातीला चिकटवून बसलोत. तेच समज गैरसमज घेऊन प्रत्येकाने आप आपल्या सोयीचं तत्वज्ञान बनून घेतले आहे.
समतेसाठी काम करायचं का जातीचा अंहकार कुरवाळत राजकारण करत बसायचं हा भारता पुढील खरा प्रश्न आहे. काल ही होता. आज ही आहे. उदया तो भंयकर होणार आहे.
परशुराम सोंडगे,पाटोदा (बीड)
9673400928

प्रतिक्रिया

ravpil's picture

14 Mar 2017 - 8:10 pm | ravpil

Anybody has mobile number of vattel te WhatsApp group ? Please share.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Mar 2017 - 10:44 pm | अत्रुप्त आत्मा

पांडुच्या आवडत्या विषयांपैकी एका विषयावरचा लेख. ;)