एस्टी विश्व प्रदर्शन- ठाणे जिल्हा दौरा

औरंगजेब's picture
औरंगजेब in काथ्याकूट
13 Mar 2017 - 10:35 am
गाभा: 

नमस्कार,

दिनांक १४ मार्च २०१७ पासुन पुन्हा एकदा वर उल्लेखलेल्या प्रदर्शनाचा महाराष्ट्र दौरा सुरु होत आहे. सांगायला आनंद वाटतो की यावेळी सुरवात ठाणे जिल्हा पासुन झाली आहे.

प्रदर्शनाविषयी थोडेसे-

लालडब्बा नावाने कोणे एके काळी विख्यात असलेली एस्टी आज आमुलाग्र बदलली आहे. हा सगळा प्रवास या प्रदर्शनात आपल्याला पाहता येणार आहे.

तसेच कि-चेन्स / कागदी मॉडेल्सही विक्रीसाठी ऊपलब्ध असतील*

सामान्य प्रवाशांना कधी बचारला न मिळणारी एस्टीची अवाढव्य यंत्रणाही आपल्याला बघायला मिळणार आहे. गंमत म्हणजे एस्टीचे हे प्रदर्शन एस्टीतच आहे. सर्वांना विनंती आहे की प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा.

वेळापत्रक

वेळ सर्व ठिकाणी सकाळी ९ ते सायं ६
१४/०३ - ठाणे रेल्वे स्टेशन
१५/०३ - भाईंदर
१६/०३ - भिवंडी
१७/०३ - ठाणे-खोपट आगार
१८/०३ - वंदना बस स्थानक ठाणे
१९/०३ - कल्याण
२०/०३ - डोंबिवली
२१/०३ - मुरबाड
२२/०२- शहापूर
२३/०३ - वाडा
२४/०३ - सुकुरवाडी बोरिवली

अधिक माहितीसाठी facebook वर Stvishwarath पेजला भेट द्या अथवा msrtcloversgroup वर जॉईन व्हा.

बाकीच्या जिल्हा दौर्याची माहिति वरील पेज /ग्रुप मधुन मिळेल.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

13 Mar 2017 - 4:35 pm | कंजूस

स्त्रिया,अपंग,ज्येष्ट नागरिकांबरोबरच पत्रकार,नगरसेवक,आमदार,खासदारांसाठी राखीव शिटा ठेवणाय्रा लाल यश्टीला सलाम. ट्रेकमध्ये प्रियदर्शनी असणारी आता दूरदर्शिनी होत चाललेली.

इरसाल कार्टं's picture

14 Mar 2017 - 12:34 pm | इरसाल कार्टं

तुम्ही असणार आहेत का या प्रदर्शनात?
म्हणजे वाड्याला आलात तर भेट होईल. इकडे मिपाकर दुर्मिळ आहेत हो. फार्रर्रफार एकटे वाटते.
आणि हो, सुरुवात आमच्या ठाणे-पालघर मांडून केल्याबद्दल धन्यवाद.

नाही मी बक्त ग्रुपमधला मेंबर आहे.प्रदर्शनाचा व्यवस्थापनात माझा सहभाग नाही.

इरसाल कार्टं's picture

14 Mar 2017 - 12:34 pm | इरसाल कार्टं

तुम्ही असणार आहेत का या प्रदर्शनात?
म्हणजे वाड्याला आलात तर भेट होईल. इकडे मिपाकर दुर्मिळ आहेत हो. फार्रर्रफार एकटे वाटते.
आणि हो, सुरुवात आमच्या ठाणे-पालघर मधून केल्याबद्दल धन्यवाद.

ravpil's picture

14 Mar 2017 - 8:11 pm | ravpil

Anybody has mobile number of vattel te WhatsApp group ? Please share.