एरंडाचं गु-हाळ

परशु सोंडगे's picture
परशु सोंडगे in काथ्याकूट
12 Mar 2017 - 9:40 pm
गाभा: 

एरंडाचं गु-हाळ
निवडणूक निकालाचं विश्लेषण
भाजपानं उत्तरप्रदेशावर कब्जा केला.
अनेक ठिकाणी भाजप पक्ष वाढतोय.म्हणजे सत्ता काबिज करतोय.जो सत्ता काबिज करतो तोच पक्ष श्रेष्ठ म्हणायची प्रथा सुरू झालीय.
आता काॅग्रेस मुक्त भारत करायचं स्वप्न मोदीच खरं ठरतयं की काय असं वाटत असतानी पंजाब मध्ये एक तर्फी कौल काॅग्रेसला दिला गेला.
लोकशाहीत हेच होणं अपेक्षित आहे.
विरोधी पक्षाचं बळ ही लोकशाही मूल्यासाठी अवश्यक असतं. आता सारेचं विजय मोदीच्या नावाने खूप लागले आहेत. राहूल गांधीचा पराभव मानू लागले आहेत.अशी दोन व्यक्ती मध्ये तुलना का करायची ? मुळात त्याची काय गरज ?
प्रांतीय निवडणूकात या राष्ट्रीय नेत्यांची तुलना का करायची ? अपयशाचं खापर त्यांच्या माथी का ? उदया एखाद्या राष्ट्रीय पक्षाचे गाव कारभारी हारले तर ते आपण त्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याच अपयश मानणारं आहोत का ?
संसदीय लोकशाहीत असं व्यक्तीला महत्व देणं त्या व्यवस्थेला हानीकारकच असते. राष्ट्रीय,समाज व लोकशाही मूल्यावर आपला विश्वास असला व त्यासाठीच आपल्याला काम करायचं असेल तर असं पक्ष मुक्तीच्या घोषणा का करायच्या ?
विकास, तत्त्व व विचार या बाबीवर निवडणूका लढल्या जात नाहीत.लोक त्याला स्वीकारत नाहीत.हे सर्व मान्य आहे. पैसा, जात, गट धर्मवाद या बाबी पाहूनचं मतदान होते. म्हणून तसेचं उमेदवार देण्याचा प्रयत्न असतो.अनेकदा समोरच्या पक्षाचा कोण उमेदवार आहे हे पाहून उमेदवारी दिली जाते. लोक विकास, राष्ट्रीय, समाज व लोकशाहीच हित लक्षात न घेता का मतदान करतात ?
मतदार सुधारायची तथाकथित तज्ञ व समाज का वाट पाहतोय ? लोकांच हे लोकशिक्षण कधी होईल? अस वाटतं ?
याची उत्तर दुदैर्वाने आज तरी नकारात्मक आहेत. अशात हे होणं नाही. ज्या निवडणूकच्या निकालाचे विश्लेषण व पृथ:करण जातीयवाद, प्रांतीयवाद, वसाहतवादावर केले जाते.तिथे ही अपेक्षा फोल.
एका पक्षाने तिकीट नाकारले की दुस-या पक्षात जाऊन लगेच उमेदवारी मिळवून विजय साजरा करत असेल कुणी तर
त्याच्या विजयाचं विश्लेषण वेगळेच मुद्दे धरूनच कराव लागेल.ते लोकशाही साठी खरच खतरनाक असेल.
निवडणूक जर शर्यत असेल तर चिटिंग करून जिंकणारला बाजीगर नाही म्हणता येतं.
जिंकण्याची क्षमता असणारे माणसं पक्षात घेऊन तुम्ही पक्ष नाही वाढू शकत.तुम्ही फक्त सत्ता हस्तगत करू शकता. मला वाढत सत्ता हस्तगत करणं हे कोणत्याचं लोकशाहीवादी पक्षाचं ध्येय असू शकत नाही आणि ते असू नये.जर आपल्या चर्चा लोकशाही मूल्यापेक्षा एखादया पक्षाचं जिंकण्याचं गणितच मांडण-या असतील तर त्या आपण का करायच्या ? सुजान नागरिक म्हणून आपली काय भूमिका असावी. लोकांना निकोप लोकशाहीसाठी सक्षम बनवायचं असेल. प्रग्लभ करायचं असेलतर आपण काय करायला हवे. आता जे पक्ष आहेत ते
पक्षच नाहीत मूळी !
जिंकण्यासाठी मैदानात उतरणा-या टोळया आहेत त्या...
आता आपण ठरवायचं ....
कोणत्या टोळी साठी काम करायचं ?
का लोकशाहीसाठी एल्गार करायचा ?
जय हिंद...
परशुराम सोंडगे (बीड )
9673400928

प्रतिक्रिया

जेपी's picture

12 Mar 2017 - 9:58 pm | जेपी

एरंडाच गुर्हाळ ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.!;)

ravpil's picture

14 Mar 2017 - 8:12 pm | ravpil

Anybody has mobile number of vattel te WhatsApp group ? Please share.