Naked नक्की पाहायला हवी अशी शॉर्ट फिल्म !

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
12 Mar 2017 - 6:03 pm

ह्यातला विषय काही नवा नाही. निष्कर्ष तर अजिबातच नवा नाही पण फक्त नाविन्याचीच कास धरायची गरज काय आहे... कालिदासाच्या शाकुन्तलापासून जुही चावला आणि ऋषी कपूर च्या "बोल राधा बोल" पर्यंत आपण दिल चुराके भागणेवाला परदेसी बाबू आणि गाव कि भोली भाली गोरी(भारतातल्या गावच्या पोरी आणि गोरी?.....) च्या कथा ऐकत वाचत पाहत आलो आहेतच कि ...तेहा तेच तेच पुन्हा पून्हा पाहण्याचे आपल्याला काही इतके वावडे नाही .... नक्की बघा , लिंक दिलेली आहे
https://www.youtube.com/watch?v=R29hoYjAF6w

चित्रपटप्रकटन

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Mar 2017 - 10:08 am | डॉ सुहास म्हात्रे

नक्की पाहण्यासारखी फिल्म आहे ! एक महत्वाचा सामाजिक मुद्दा प्रभावीपणे मांडला आहे. दोन्ही अभिनेत्र्यांनी उत्तम काम केले आहे.

धन्यवाद ही माहिती इथे दिल्याबद्दल !

इरसाल कार्टं's picture

13 Mar 2017 - 7:53 pm | इरसाल कार्टं

मनापासून पटलं.

कंस's picture

13 Mar 2017 - 8:46 pm | कंस

आवडली

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2017 - 9:02 pm | पिलीयन रायडर

पाहिली. काही विशेष वाटली नाही.

जव्हेरगंज's picture

14 Mar 2017 - 7:47 pm | जव्हेरगंज

+१

संजय क्षीरसागर's picture

14 Mar 2017 - 9:40 pm | संजय क्षीरसागर

मला सनसनाटी शीर्षकाच्या मानानं विशेष वाटली नाही.

ज्योति अळवणी's picture

14 Mar 2017 - 6:42 pm | ज्योति अळवणी

खरच पटलं.

मुळात आजच्या आयांनी आपले विचार थोडे बदलायला हवेत असं वाटत.

'उशीर केलास तर याद राख. मित्र वगैरे चालणार नाहीत हं.' असं घाबरवून बंधनात ठेवण्यापेक्षा तुमची मुलगी नक्की कुठे आहे... कोणाबरोबर आहे हे तिला आपणहून तुम्हाला सांगावंसं वाटेल असं 'घरातलं' वातावरण ठेवा... फक्त तुमचा आणि तिचा dialogue नाही!

पद्मावति's picture

14 Mar 2017 - 7:22 pm | पद्मावति

फिल्म चांगली आहे. मात्र त्यामधला संदेश हा सायबर बुलींग विषयी आहे का अनवॉन्टेड मॉरल पोलीसिन्ग विषयी आहे याबाबत जरा गोंधळ उडालेला दिसतो फिल्ममेकरचा. हे दोन मुद्द्यांपेक्षा एकाच मुद्द्यावर फोकस केला असता तर फिल्म जास्ती प्रभावी झाली असती असे वाटून गेले.