वाचनखुणा

सावत्या's picture
सावत्या in काथ्याकूट
10 Mar 2017 - 8:59 pm
गाभा: 

मिपाच्या पूर्वीच्या थिममध्ये लॉगिन केल्यावर वाचनखुणा पर्याय उपलबध होता. आपल्याला हव्या असलेल्या लेखाची वाचनखूण साठवता येत असे आणि हवे तेव्हा ती मिळवता येत असे. नवीन थिम मध्ये लॉगिन केल्यावर हा पर्याय उपलब्ध दिसत नाही. तसंच पूर्वी साठवलेल्या वाचनखुणा परत कश्या मिळवायच्या. मार्गदर्शन हवाय.

प्रतिक्रिया

वाचनखूण अद्यापही साठवता येतात, तथापि त्या पाहता येण्याची सोय सध्या काही तांत्रिक अडचणींमुळे स्थगित आहे. तेव्हा तूर्तास जालदृश्यकाच्या (ब्राऊजरच्या) वाचनखुणांचा (बुकमार्कचा) वापर करावा.

वाखू परत मिळाव्यात अशी प्रार्थना! आमेन!

ravpil's picture

14 Mar 2017 - 8:13 pm | ravpil

Anybody has mobile number of vattel te WhatsApp group ? Please share.

पिलीयन रायडर's picture

11 Mar 2017 - 2:54 am | पिलीयन रायडर

वाचनखुणा हव्यात हे खरंय. येतील परत.

इतरही फिचरची चर्चा करुया का?

स्वगृह हे फिचर आवडायला लागलेले आहे. आधी एवढे पटले नव्हते. पण नवे लेख इतक्या सगळ्या लेखांमध्ये बुडुन जात आहेत, त्यांना चटकन पहाता येतंय.
साहित्य शोध वापरायला जमले नाही, त्यामुळे अजुनही गुगलच वापरतेय.
माझे लेखन हा पर्याय हाताशीच आलाय हे उत्तम. त्याने लगेच प्रतिसाद दिलेले धागे बघता येत आहेत.
मिपा विशेषांक टॅब ही सर्वात आवडलेली गोष्ट आहे.

प्रत्येक आइडीला २० एमबी खासगी जागा देता आली तर वेबसाइटचा लोड वाढेल परंतू यात बरेच काही साठवता येईल.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

11 Mar 2017 - 1:19 pm | अॅस्ट्रोनाट विनय

कथा आणि कादंबरीसाठी वेगळी खिडकी हवी. लेख या एकाच खिडकीत सगळं कोंबल्यामुळे तिथे लिहलेलं साहित्य पंख लागल्याप्रमाणे उडून जातं. बऱ्याच चांगल्या साहित्याला वाचक मुकतात. लेखकांचा लिखाणउत्साह कमी होतो. कथा कादंबरी लेखकांवर अन्याय झाल्यासारखं वाटतं. तूर्तास वेगळी खिडकी बांधणं शक्य नसेल तर कमीत कमी लेखाच्या खिडकीची उंची वाढवावी ही विनंती

जव्हेरगंज's picture

11 Mar 2017 - 2:58 pm | जव्हेरगंज

कथा आणि कादंबरीसाठी वेगळी खिडकी हवी. >>>+१ यास पुन्हा एकदा अनुमोदन!!!

पुंबा's picture

11 Mar 2017 - 4:27 pm | पुंबा

++11111

अनन्त्_यात्री's picture

11 Mar 2017 - 5:41 pm | अनन्त्_यात्री

मिपावरील निवडक (=सम्पादकानी निवडलेल्या) कविता॑चा स॓ग्रह कवितादिनी म्हणजेच २१ मार्च रोजी प्रकाशित करावा.

पिलीयन रायडर's picture

12 Mar 2017 - 2:09 am | पिलीयन रायडर

कविता दिन असतो हे माहिती नव्हतं. चांगली कल्पना आहे. संपादकांना करणं शक्य नसलं तर आपणच मिळुन जुन्या चांगल्या कविता वर आणु. नवीन कविता टाकु.

रुस्तम's picture

12 Mar 2017 - 11:25 am | रुस्तम

वर आलेले धागे कुठल्या टॅब मधे दिसतात?

पिलीयन रायडर's picture

12 Mar 2017 - 8:00 pm | पिलीयन रायडर

नवे लेखन

ह्या टॅबमध्ये सगळ्यात नवीन प्रतिसादाच्या क्रमाने धागे सॉर्ट होतात. म्हणजे कोणत्याही धाग्याला प्रतिसाद दिलात की तो धागा ह्या टॅबमध्ये सर्वात वर दिसेल.

स्वगृहमध्ये ज्या क्रमाने धागे प्रकाशित केले आहेत, त्या क्रमाने दिसतात.

रुस्तम's picture

14 Mar 2017 - 11:32 am | रुस्तम

धन्यवाद पिराताई....

पिलीयन रायडर's picture

12 Mar 2017 - 9:43 pm | पिलीयन रायडर

मिपाचा मेन बोर्ड बदलला आहे. आवडली नवी आयडीया!

+१. नवीन रचना छान आहे.

आषाढ_दर्द_गाणे's picture

14 Mar 2017 - 10:38 pm | आषाढ_दर्द_गाणे

नवीन विभाग आवडले
एक सुचवावेसे वाटते - 'नवे लेखन' ह्या पानावर 'प्रकार' हा एक स्तंभ (कॉलम) आहे तसा तो 'नवे प्रतिसाद' ह्या विभागातही असला तर जरा सोयीचे होईल

सप्तरंगी's picture

21 Apr 2017 - 6:26 pm | सप्तरंगी

आजकाल मिपा बघणे पूर्वीसारखे सोपे वाटत नाही. पूर्वीचा फॉरमॅट चांगला होता असे वाटते. माझा धागा कंमेंट्स असणंही मला कधीच वर दिसला नाही / दिसत नाहीये , आणि मला शोधूनही पटकन सापडला नाही. माझे लेखन मध्ये जाऊन बघावा लागला. (मलाच नाही मिळाला तर लोकांना कसा दिसेल ?) कलादालन पण क्लीक करता आले नाही .
सहसा शेवटी टाकलेली पोस्ट किंवा कंमेंट केलेला धागा वरती असतो ना ? आजकाल मिपा बघणे पूर्वीसारखे सोपे वाटत नाही. पूर्वीचा फॉरमॅट चांगला होता असे वाटते. कि माझेच काही चुकते आहे ?

पिलीयन रायडर's picture

25 Apr 2017 - 5:04 am | पिलीयन रायडर

आल्या हो परत वाचनखुणा!

सावत्या's picture

25 Apr 2017 - 11:14 am | सावत्या

आभारी आहोत !!!!

नि३सोलपुरकर's picture

25 Apr 2017 - 11:21 am | नि३सोलपुरकर

धन्यवाद आणि आभारी आहे..