आवाज: स्त्रीमुक्तीचा

सचिन तालकोकुलवार's picture
सचिन तालकोकुलवार in जनातलं, मनातलं
8 Mar 2017 - 11:37 am

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही महिलांना आपल्या स्वातंत्र्यासाठी, समानतेसाठी झगडावे लागत आहे. हि अत्यंत खेदाची बाब आहे. स्त्रियांच्या या स्तिथीमागे हजारो वर्षांपासूनची गुलामगिरीची परंपरा आहे. खरे तर जेव्हा महिलांना आर्थिक व्यवहारातून वगळण्यात आले व त्यांचे उत्पन्नाचे स्रोत नाकारण्यात आले तेव्हापासून महिला पुरुषांवर अवलंबित ठेवून पुरुषसत्तेचे गुलाम म्हणून ठेवण्यात आले. त्यानंतर स्त्रियांना शिक्षणापासून वंचित करण्यात आले व निर्णय घेण्याचे हक्क पुरुषांना मिळाला. तेव्हापासून महिलांना मुलं पैदा करण्याचे यंत्र व घरकाम करणारी मोलकरीण म्हणून गणना होऊ लागली. 

हि गुलामगिरी खोलवर रुजविण्यासाठी धर्माचा वापर करण्यात आला. जसे कि स्त्रियांचे आयुष्य पूर्णतः पतीवर अवलंबून असून पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने सती जावे. किंवा सामाजिक जीवन, सुखसुविधा नाकारून पापाच्या मुक्तीसाठी ईश्वराचे चिंतन करीत जगावे. आपला पती कितीही बेजबाबदार, व्यसनी, क्रूर असला तरीही सात जन्म सोबत राहण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करावी. यामुळे पती म्हणजेच आपले जीवन मानून महिला पूर्णतः पतीवर अवलंबून राहू लागली. सोबतच लग्नाची व पती निष्टतेची खूण म्हणून स्रियांनी भांगात कुंकू लावावे, अनिष्ट कृत्य करू नये म्हणून हातात व पायात बेड्या घालून जगावे, अनिष्ट कृत्य केल्यास गळा आवळण्यासाटी लवकर साधन मिळावे म्हणून मंगळसुत्रचा फास लटकविला गेला. ऐकण्यावरही बंधने असावे म्हणून कानातही खिळे ठोकले गेले. खरे तर हे स्रियांनी वेळोवेळी केलेल्या अपराधांची शिक्षा म्हणून देण्यात येणारी सजा होत. मात्र याला संस्कृती आणि सौन्दर्य प्रसादने या लोभस नावाखाली हि परंपराच सुरु करण्यात आले व आजही सुरु आहे. 

यात आणखी भर म्हणजे आपले आदर्श (देव) असे मानले गेलेत ज्यांनी स्त्रियांवर अत्याचारच केलेला होता. जसे थोड्या संशयावरून आपल्या पत्नीला घराबाहेर काढणारा राम, शेकडो लग्न करणारा कृष्ण, जुगारात बायकोलाही पणाला लावणारे पांडव. यातून स्त्रियांना असे विचारसरणी बिंबविण्याचा प्रयत्न झाला कि, जे सीतामाता, रुख्मिणी, द्रौपदी या दैवी स्त्रियांना इतके भोग भोगावे लागलेत आपण तर सामान्य मनुष्य आपल्याला भोग कसे टाळणार म्हणून आपल्या वाटेल आलेले दुःख निमूटपणे भोगण्यास सिद्ध झाले. यांसारख्या गोष्टींमुळे गुलामगिरी खोलवर रुजण्यास मदत झाली. रिकाम्या वेळेत स्त्रियांना बंड करण्याचा विचार येण्याची वेळ येऊ नये म्हणून घरात मूर्तीची स्थापना करण्यात आली. स्त्रियांच्या मनावर पूजापाठ, मंत्रपाठ, बुवाबाजी, कर्मकांड मनावर रुजविले गेलेत. स्त्रियांचे महत्वाचे काम हे पुरुषांना रुजविणे हे असल्याने प्रत्येक स्त्रियाने आकर्षक कपडे, सौन्दर्य प्रसादाने यांचा वापर करावा व पुरुषांची सेवा करण्यात धन्यता मानावी. 

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर आता कुठे तर भारतीय महिला मुक्त आकाशात झेप घेण्यासाठी आपले पंख विस्तारू लागले आहेत. आर्थिक बाबतीत सक्षम होऊन स्वतंत्र अनुभवण्यास सिद्ध होत आहे. वैज्ञानिक, वैमानिक, अंतराळवीर, प्रशासक अश्या प्रत्येक क्षेत्रात उज्वल यश मिळविलं आहे आणि भविष्य घडविण्यास सज्ज झाली आहे. तरीही आज जे महिला यशाच्या शिखरावर आहे ते मोजकेच आहे. पाण्यावर तरंगत दिसणाऱ्या बर्फासमान आहे. अजूनही ९५% स्त्रिया या गुलामगिरीत खितपत पडून आहे. स्वातंत्रासाठी धडपडत आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी मदतीच्या हाताची गरज आहे. स्त्रीभ्रूण हत्या, सर्वांना चांगल्या दर्जाचे शिक्षण, रोजगाराच्या संधी, समान वेतन, सुरक्षेची हमी यासाठी आवाज उठविणे गरजेचे आहे. सरकारला याबाबाद सकारात्मक धोरणे ठरविण्यासाठी आणि हे सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्याला सामाजिक मतपरिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. यासाठी स्त्रीमुक्ती विचाराची व स्त्रियांच्या समस्या मांडणाऱ्या सशक्त स्त्री चळवळीची अवश्यकता आहे.

स्वतंत्रच अनुभव घेण्यासाठी स्त्रियांना चांगले शिक्षण घेऊन आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे लागेल. यामुळे पुरुषांवरचे अवलंबित्व कमी होईल . महिलांनी स्वतः पैसे कमवावा, नोकरी करावी यामुळे कुठल्याही अत्याचारास स्त्रिया बळी पडणार नाही. स्वतंत्र आर्थिक स्रोत असल्याने महिला आपले जीवन आपल्या नियमांनी जगू शकतील. 

स्त्रीमुक्तीमुळे ज्यांचे धंदे बुडत आहे व जे स्त्रियांच्या यशाने जळत आहे अश्या संकुचित बुद्धीचे लोक महिलांना पुन्हा गुलामगिरीकडे ढकलू पाहत आहे, महिलांना गुलाम करून ठेऊ पाहत आहे. तुम्ही काय खावे, काय प्यावे, कोणते कपडे घालावे, कोणते शिक्षण घ्यावे, कोणता व्यवसाय करावा हे तुमच्यावर लादू पाहत आहेत. तुम्ही विस्तारलेले पंख छाटू पाहत आहेत. यांपासून सावध राहा. स्वतःच्या बुद्धीला जे पटेल ते करा. कुठल्याही बंधनाशिवाय मुक्त विचार करा. मोठे स्वप्न पहा तेव्हा तुम्हालाच जाणवेल भविष्य तुमची वाट पाहत आहे.

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

8 Mar 2017 - 4:37 pm | उगा काहितरीच

हहपुवा ! काहीच्या काही लेख !

संदीप डांगे's picture

9 Mar 2017 - 1:50 am | संदीप डांगे

*1000000

प्रचेतस's picture

8 Mar 2017 - 7:17 pm | प्रचेतस

खूप छान , माहितीपूर्ण आणि विचारांस प्रवृत्त करणारा लेख.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Mar 2017 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा

असेच म्हन्तो. मी आगोबाशी शमत हाय!