वाळूमाफिया कोण असतात? काय करतात?

अत्रे's picture
अत्रे in काथ्याकूट
3 Mar 2017 - 2:27 pm
गाभा: 

बऱ्याचदा वर्तमानपत्रात "वाळूमाफिया/ रेतीमाफिया" हे शब्द ऐकिवात आले आहेत. पण यांच्या "व्यवसायाची" सखोल माहिती कधी कुठे वाचली नाही. मला काही प्रश्न आहेत

१. वाळूमाफिये नेमके काय काम करतात? किती पैसे कमावतात?

२. त्यामुळे निसर्गाला कांय धोका होतो?

३. जर भविष्यात बांधकामासाठी वाळूच नाही मिळाली तर त्याचे काय परिणाम होतील? हा प्रॉब्लेम जगात कुठे निर्माण झाला आहे का?

प्रतिक्रिया

अत्रे's picture

3 Mar 2017 - 2:27 pm | अत्रे

टायपो - निर्मल -> निर्माण

ह्यावर बोलायचा मला जास्त अधिकार आहे कारण माझा जिल्हा (सोलापूर) त्यासाठीच प्रसिध्द आहे. पण ही सगळी संवेदनशील माहीती आहे. तुम्हाला कशासाठी माहीती हवी आहे? मला कारण पटले नाही तर सांगणार नाही.

मला क्युरिऑसिटी आहे, एवढं कारण पुरेसं आहे का ? :) आपल्याकडे बऱ्याच विषयांवर माहिती ऑनलाइन नसते, म्हणून म्हटलं विचारून बघावं.

ऑफकोर्स तुम्हाला त्रास होणार असेल अशी माहिती नका देऊ, मला फक्त मोडस ऑपरेंडी जाणून घ्यायची आहे. लोकांची नावं नकोत. धन्यवाद.

प्रसाद गोडबोले's picture

3 Mar 2017 - 3:44 pm | प्रसाद गोडबोले

अभ्याजी , मला वाळु माफिया व्हायचे आहे , हे कारण तुम्हाला पटते का ? जरा व्यवसाय मार्गदर्शन करा ना गडे !

घे दोन हायवा अन ये बिनधास्त. चालूच लगेच.
.
शब्द शिक आता.
हायवा म्हणजे मोठा हेवी डंपर. टाटा, वॉल्वो, लेलँड, एएमडब्ल्यु वाला.
सगल्यांना हायवाच म्हणतेत.

प्रसाद गोडबोले's picture

4 Mar 2017 - 2:04 pm | प्रसाद गोडबोले

वाह वाह !

पण आता सीना, पवना किंव्वा कृष्णा नदीपात्रा मध्ये नाही , डायरेक्ट हडसन नदीपात्रामध्ये जेसीबी उतरवण्यात येईल !

-भावीवाळुमाफिया मार्कस ऑरेलियस

हो न बावा बोल ना मंग :) अभ्या लेका ३.५ वर्ष भिगवण ला काढलियत त्या दरम्यान जेव्हढे भिषण अपघात सोलापुर हायवे ला बघितले त्यात जास्तित जास्त अपघातात ह्या रेति च्याच गाड्या असायच्या. पाटस च्या पहिले (टुवर्ड्स पुणे) ते रेल्वे फाटक आहे बघ तिथे एक फौजि धाबा आहे, त्यापहिले टेंभुर्णी, मोडनिंब ला पण असे खुप धाबे आहेत जिथे उसाच्या मळिपासुन संत्र्याचा कृत्रिम स्वाद घालुन तयार केलेले पेय मिळते, हे वाळुचे ट्र्क जास्ततर तिथेच थांबलेले असतात (असायचे). अर्ध्याच्यावर तर हे वाळुचे ट्रक क्लिनर लोकांना चालवतांना बघितलय.

वरुण मोहिते's picture

3 Mar 2017 - 3:48 pm | वरुण मोहिते

करा ऑपॉप कळेल कि असा व्यवसाय सर्वाना

वरुण मोहिते's picture

3 Mar 2017 - 4:09 pm | वरुण मोहिते

आणि एक जेसीबी ..नसतील तर जवळच्या मित्राकडून भाड्याने तासावर
पण त्या आधी बिल्डर शी संधान बांधा म्हणजे ती वाळू कुठे वापरणार
किंवा शासकीय कॉन्ट्रॅक्ट ज्यांना मिळतं त्यांच्याशी .
वाळू एम पी ,गुजरात ला पण वापरतात त्यामुळे रेट कमी मिळतो .
बाकी उत्सुकता असली कि सांगतो

आदूबाळ's picture

3 Mar 2017 - 4:25 pm | आदूबाळ

जरा गुगलून बघा की आन्ना.

अभ्या..'s picture

3 Mar 2017 - 7:50 pm | अभ्या..

आँ?
नायब तहसीलदाराच्याच अंगावर वाळूच्या गाड्या घालायचे टिपिकल गुन्हे हा चॅप्टर गुगलवर कुठे असतो?
रेडीयमने हायवावर काय लिहिले की गाड्या सोडल्या जातात हे ज्ञान गुगलवर कुठे असते?
वाळूच्या टीपी (ट्रान्सोर्ट परमीट) कोण इश्श्यु करते अन त्या ओपन कशा मिळतात हे गुगलवर कसे सापडणार?
रात्री कुठल्या रस्त्याने वाळू कीती वाजता नेली तर सापडत नाही हा मॅप कुठे मिळतो?
ब्रास, स्केवर मीटर आणि टनेजचा हिशोब कसा केला जातो हे कुठले अ‍ॅप्लिकेशन सांगते?
सीना नदीचेच वाळू बांधकामाला चांगली का? हे गुगलवर कुठे आहे?
.....
.....
.....
.....
.....
जे न देखे गुगल, ते फक्त आम्ही बघंल. ;)

अत्रे's picture

3 Mar 2017 - 8:07 pm | अत्रे

बापरे!

लय भारी! कमाल प्रकार दिसतोय. भेटलो की डिटेलमध्ये सांग!

तुषार काळभोर's picture

4 Mar 2017 - 11:16 am | तुषार काळभोर

नविन माणसाला ह्या धंद्यात घुसायचं असंल तर संघटनेच्या कोणत्या माणसाला गाठून पटवायचं हे?

एकुलता एक डॉन's picture

3 Mar 2017 - 7:42 pm | एकुलता एक डॉन

http://www.agrowon.com/agrowon/20160509/5347158259434403799.htm

इथे सगळी माहीत मिळेल

अत्रे's picture

3 Mar 2017 - 8:06 pm | अत्रे

धन्यवाद!

चतुरंग's picture

3 Mar 2017 - 10:25 pm | चतुरंग

नगर जिल्ह्यातही हा त्रास भरपूर आहे!

अवांतर - वाळूमाफियाचं हिंदीत 'बाळूमाफिया' असं होईल का? :)

ओम शतानन्द's picture

10 Mar 2017 - 1:16 pm | ओम शतानन्द

हिन्दीत 'ळ' नाही

बाबा पाटील's picture

7 Mar 2017 - 12:52 pm | बाबा पाटील

आप्पा लोंढे ,उत्तम होले,महाराज, भाऊसाहेब आंधळकर ही नावे सर्च करा, सगळी माहिती मिळाले.

बाबा पाटील's picture

7 Mar 2017 - 12:54 pm | बाबा पाटील

सरजी - पंढरपुर.

दीपक११७७'s picture

9 Mar 2017 - 1:02 am | दीपक११७७

कोळसा माफिया जे करतो तेच वाळु माफिया सुध्दा करतो
म्हणजे वाळु चोरतो, परवाणा व्यतिरिक्त वाळु ट्र्क मध्ये भरतो व शासनाचा महसुल बुडवतो
कधि दम देउन कधि संगन मताने, दिवसातुन चोरुन २-३ ट्र्क जरी वाळु चोरली तरी सर्वं वाटेकरीला
देउन किमान १५०० रु तरी निव्वळ नफा मिलतो( गावाकडे न किंवा कमी शिकलेल्या माणसाला १००० रु रोज म्हणजे चंगळच).
नदी आणि त्याच पात्र ह्यांचा पसारा खुप मोठा असल्याने साहजिकच बंदोबस्ताची यंत्रना अपुरि पडते.
मग जिथे परवानगी नाही अश्या ठिकाणी सुद्धा वाळु उपसा होतो.
एकंदरीत काय पेसा कमवायचा सोपा मार्ग.

एक सल्ला:-
चुकनही विचार करुनका ह्या क्षेत्रात येण्याच, डोळे झाकुन सांगतो तुम्हाला जमणार नाही.

म्हणजे वाळु चोरतो, परवाणा व्यतिरिक्त वाळु ट्र्क मध्ये भरतो व शासनाचा महसुल बुडवतो

एवढा सोपा नाही हो हा प्रकार. प्रथमदर्शी असे काहीच होत नसते.
वाळू कुणाची? परवाना कशासाठी? महसूल कशासाठी? हे सगळे अत्यंत गहन उपप्रश्न आहेत. त्याची छान अशी उत्तरे वाळूमाफीया तयार करतात अन कधीमधी आपल्या नवीन बांधकामासाठी योग्य दरात वाळू पुरवतात. इतकेच. त्या सरकारला पाहिजे असलेल्या उत्तरांसाठी कित्येक सनदी अधिकारी जीवाला मुकलेत, कित्येक माणसांचा, वाहनांचा अन रोडचा रोज चुथडा होतोय. पर्यावरण, नागरी जीवन, हाडामांसाची माणसे, पैसा अन स्वातंत्र्य हे सगळे नुसते गरगरा फिरवले जातात. अचाट अफाट दुष्टचक्र आहे हे.

ravpil's picture

14 Mar 2017 - 8:23 pm | ravpil

Anybody has mobile number of vattel te WhatsApp group ? Please share.

अत्रे's picture

28 Mar 2017 - 6:13 am | अत्रे

आजच हा लेख वाचला. वाळूमाफियांचं कार्यपद्धतीवर उजेड पडतो.

The 'sand mafia' fuelling India's $120 billion building boom

It's time for us to go too, but the sand mafia want to make sure we won't come back. So they send an escort — a couple of men on a motorbike. They follow us for a while, but when they're sure we are heading out of the area, they take off and we manage to leave safely.

असलं धाडस विदेशी पत्रकारच करू शकतात, आपल्याकडच्याना नाही जमत.

ऑइल माफिया आणि ड्रग्स माफियां बरोबरच मांडीला मांडी लावुन या माफियांचा नंबर लागतो !
हे वाळू माफिया इतके प्रबळ आणि निरंकुश आहेत कि अंगावर ट्रॅक्टर घालण्या पासुन मुडदा पाडण्या पर्यंत ते काहीही करु शकतात...
हे वाळू माफिया किती मोकाट सुटले आहेत त्याचे उत्तम उदाहरण पहावयाचे झाल्यास मुंब्रा ते डोंबिवली दरम्यान सक्शन पंपा द्वारे वाळूची चोरी... यावर आत्ता पर्यंत बरेच काही लिहुन आलेले आहे, मध्य रेल्वेचा हा मार्ग ज्या रुळांवर चालतो ते रुळ जेव्हा या वाळू माफियांच्या उध्योगा मुळे बाद होतील आणि मध्य रेल्वेची वाहतुक बंद होईल तेव्हाच राज्य सरकार आणि मध्यरेल्वे यांचे डोळे उघडतील ! मुंब्रा खाडीवरील ब्रिज तर कोसळण्यासाठी वाट बघत असावा ! [ हा ब्रिज माझा आवडता, तो मी इथे टिपला आहे. ]
तर मुंब्रा ते कोपर इथे इतकी वाळू तस्करी झाली कि मध्य रेल्वेच्या रुळा खालील मातीचा भाग वाहुन जावा इतके खाडीचे पाणी जवळ आले आहे ! पावसाळ्यात रुळाची परिक्षा घेतली जाईल.

P1

दुवा :- https://goo.gl/maps/wCopojD1eA920
आणि
http://wikimapia.org/#lang=en&lat=19.205086&lon=73.069704&z=18&m=b&show=...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Home! :- [ Anoushka Shankar ]