डान्सबार !!!!

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
26 Feb 2017 - 6:13 pm

बीप बीप ..पाटील आज फुल्ल करते
बीप बीप ..आज आनेवाले हो ना ?
"आकाश अपडेट देना में निकाल राहा हू "
गाडी नंतर काढू च्यायला तो पर्यंत नेहमीच्या ठिकाणी बसू.
रोजचं झालंय ह्या ऑफिस च्या ड्रायवर ला काही कळत नाही ."ठीक है चलो. पार्क करो और निकलो. "दोस्त आ राहा मै उसकी गाडी से जाऊंगा पता है ना आपको ."
आप" ऋषी के गाडी से आओगे मै थोडी रुक पाऊंगा. "
"हाहाहा "
नेहमीसारखी लेट कारणं मंत्रालयाची ..आम्ही काय पागल बसलोय का ऋषी .
१ व्हॅट ६९ और ४ माईल्ड बोलना.
चला ऑर्डर दिली . ऋषी यायला १०-१५ मिनिट आहेत. आकाश ला काय काम करायचं सांगून आलोय . ड्रायवर घरी जाईल आता निवांत मी .
आज मी काहीतरी करायला हवं
५-७ लाख महिन्याभरात जाऊन अजून फोन नंबर नाही म्हणजे काय ?
आपण मागे पडतोय कुठेतरी .साले रोज येतात अंकल लोग ५०-५० हजार घेऊन करायचं काय होतकरू मुलांनी .आधीच सिलेक्टड एन्ट्री आणि इतकी उडवणारी लोकं अरे मला काही स्कोप आहे का नाही??
आले साहेब .. अरे रिपीट ऑर्डर .
"चलो मोहिते "
"काय करणार ऋषी बोर होतंय आता पैसा जातोय तरी काही हातात नाही .किमान इज्जत तर राहायला हवी बार मध्ये" .
देखते पाटील कुछ आयडिया .
बघू भानुशाली ने पण मेसेज केलाय आज फुल्ल असं .
भानुशाली आणि सालियन माझे ग्रुप मेम्बर .आठवड्यातून एकदा बसणं आणि त्याच वेळी सगळ्यात मिळून किमान ३०-४० हजार उडवणं हा कार्यक्रम .
माझ्या प्रयत्नांना महिनाभर यश येत नव्हतं . पैसे तरी देऊन देऊन किती देणार .असायला तर पाहिजे तितके.
शेवटी मी जाणारच नाही असा आग्रह धरल्यावर एक आयडिया निघाली .
बिन तेरे क्या है जिया .....गाणं चालू ..गाण्यासाठी एका १० हजार मोजलेले आलो कि तेच गाणं हवं म्हणून .बाकी वेळेवर गाण्यांचे रेट लागू १ हजार ते १० हजार . स्वतःची इच्छा असेल तर उडवायला अमर्याद .
गाणं झालं माझ्या हातात एका नामवंत शो रूम मधून घेतलेली सोन्याची अंगठी होती . तिला बोलावलं हातात अंगठी दिली .म्हटलं आपके लिये .तो एकच क्षण सगळे अमर्याद पैसे उडवताना मॅडम आमच्यावर फिदा .
आय २० घेऊन यायची ती . स्वतः चालवत .अजून काही होत्या स्कोडा पासून स्वतः चालवत गाड्या आणायच्या मुली .थोडे दिवस खोटं नाव सांगण्यापासून ते खरं नाव काय यात गेले .पण नंतर काही समजलं ते ग्रेट होत .
सुलतानपूर नावाच्या उत्तर प्रदेश मधील जिल्ह्यातून बाईसाहेब होत्या . घरी आजवर १२ वि पास झालेला माणूस नाही . महिन्याची कमाई २ लाख कमीतकमी .काडीची अक्कल नाही .बाहेर जाताना एकदा बाईसाहेबांकडे आयडी कार्ड पण न्हवतं. आजपण नसेल .विमानाने प्रवास दिल्ली, लखनौ इथे आय कार्ड म्हणून रेशनिंग कार्ड .आल्या तेव्हा मुंबई एअरपोर्ट नजीक एका हॉटेलात काम करायच्या . आल्या त्या वेळी ह्या सगळ्या मुलींना भांगेची एक गोळी दिली जायची . त्यामुळे चेहऱ्यावर सतत हसू . लोकं पण खुश . भावड्या बघ माझ्याकडे बघून हसतेय . भाई मेरे पास हि देख रही.. अश्या टाईप ची.
हॉटेलं पण एक्सक्युझीव त्यामुळे शरीराची मागणी लगेच व्हायची नाही . आवडतं गाणं किंवा नाच ह्यावरच थांबायचं पुढे इच्छा असेल तर तोपर्यंत ३-५ लाख सहज निघून गेले असायचे .
(क्रमशः )

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

26 Feb 2017 - 8:11 pm | अभ्या..

ह्यो नाद लै बेक्कार. :(

तुषार काळभोर's picture

4 Mar 2017 - 10:55 am | तुषार काळभोर

ह्यो नाद लै बेक्कार. :(

सहमत!
असे लाखो उडवलेले चांगल्या परिचयातले आहेत.
सगळ्या प्रकारची लोकं.
जमिनीचा फुकटचा पैसा मिळवलेले, चांगल्या व्यवसाय-उद्योगातून (कष्टाची) भक्कम मिळकत असलेले
लग्न झालेले, न झालेले,
विशीचे, तिशीचे, चाळीशीचे, (पन्नाशीचापण एक होता, मे हिज पुअर सोल रेस्ट इन पीस!)
दिवसाला तीन-चार हजारापासून पन्नास-साठ हजार उडवणारे

जेजूरी-चौफुला-आर्यभूषण-पनवेल-मुंबई...

शन्वारी पिच्चरला जाताना संध्याकाळच्या ऐवजी दुपारी जाऊ, अडिचशे ऐवजी दीडशे रुपयात तिकीट मिळंल. नाहीतर पुढच्या आठवड्यात बुधवारी संध्याकाळी जाऊ, नव्वदला मिळंल, असा 'चिंधी' विचार करणारे आम्ही नोकरदार मध्यमवर्ग! मला हे पैसे उडवणं लै विस्मयकारक वाटतं.

अभ्या..'s picture

4 Mar 2017 - 12:15 pm | अभ्या..

मला हे पैसे उडवणं लै विस्मयकारक वाटतं.

हा ना हिंदकेसरी.
आमचा एक पार्टनर होता पुण्यात. मी आयटीत, तो स्टुडन्ट. चांगला सीए बीए ची तयारी करतोय असे सांगायचा. आमच्या इकडील आमदाराचा भाच्चा. अंगात बेसिक मस्ती. पॅशन विकून त्याला बुलेट घ्यायची होती. (तेंव्हा एवढा बुलेटचा सुळसुळाट नव्हता) जवळ तीस चाळीस हजार होते. कमी पडतेत म्हणून गावाकडे बाईकवरुन आणाया निघाला. हडपसर गाडीतळापर्यंत सोडवायला आम्ही गेलो. रीतसर पोटात पेट्रोल टाकून नेते निघाले. रात्रीपर्यंत पोहोचेल म्हणून फोन काही आला नाही. दुसर्‍या दिवशी पण स्विच ऑफ. म्हणलं नेत्यांनी कुठे ठोकलं बिकलं की काय. भावाला फोन केला तर म्हनला आलाय म्हणून.
दोन दिवसानी साहेब रेल्वेने परत.
म्हणलं बुलेट कुठाय?
साहेब म्हनलं बुलेट कॅन्सल.
मग पॅशन?
ती बी विकली.
मी चाटच.
म्हणलं का ओ? (आमच्यात बरेच गावाकल्ले मित्र शुध्दीवर असता अहोजाहो बोलतात)
काय सांगायचं पेशवे, जाताना मोडनिंबाला थांबलो. मग काय. संपले पैसे.
तीस हजार संपले?
हा ना. मग भावानं पॅशन बी काढून घेतली. मोडनिंबाला पैसे घेतलेले एकाचे. त्याच्यासाठी विकून टाकली.
पण पाच पन्नास हजार उधळण्यागत त्या बाया काय दाखवत्यात ओ?
तुम्हाला नाही कळाया देवा.
विषय संपला. आम्ही बी संपवला.

अभिजीत अवलिया's picture

26 Feb 2017 - 8:39 pm | अभिजीत अवलिया

ही गोष्ट कोणत्या सालातील? कारण डान्सबार वर बंदी येऊन बरीच वर्षे झाली ना ?

वरुण मोहिते's picture

26 Feb 2017 - 9:50 pm | वरुण मोहिते

फरक जास्त नाही २००५ पासून जेव्हा बंदीचा कायदा आला .
बाकी गोष्ट २०१२-१३ ची

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2017 - 8:32 am | पिलीयन रायडर

हे काही तरी वेगळंच जग आहे. असलं काही वाचलं की आपण अतिच वरण-भात छाप लोक आहोत असा फील येतो.

पुभाप्र.

पैसा's picture

4 Mar 2017 - 10:18 am | पैसा

लिहा पटापट

संदीप डांगे's picture

4 Mar 2017 - 12:05 pm | संदीप डांगे

लिहा हो...पटापट

(तुमच्या धक्क्याने मी ही लिहायला लागेल)

सुबोध खरे's picture

4 Mar 2017 - 12:24 pm | सुबोध खरे

डान्स बार मध्ये बरेचसे हरामाचा किंवा बिनकष्टाचा मिळालेला पैसा उडवायला येतात. आणि गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा म्हणून काही लोक आपला घामाचा पैसा सुद्धा उधळतात. आबा ( आर आर पाटील) यांनी डान्स बार बंद करण्याचा निर्णय म्हणूनच बरोबर वाटतो.
http://timesofindia.indiatimes.com/india/Telgis-Rs-93-lakh-gift-to-bar-g...

मस्त सुरवात. इथे डान्स बार मध्ये आणि परदेशात स्ट्रीप बार मध्ये पैसे उडवणारे लोक पाहिले कि आश्चर्य वाटते. इथे अहंकाराला फुंकर घालणे जास्त महत्वाचे असते असा अंदाज आहे.

खटपट्या's picture

8 Jul 2019 - 10:35 pm | खटपट्या

स्ट्रीपबारमध्ये "हाताला" काहीतरी लागतं तरी लोकांच्या असं म्हणतात. इथं तर कैच नै :)

nanaba's picture

18 Jun 2019 - 2:16 pm | nanaba

Ase udavanare asatat he aikun mahit ahe.. But cant comprehend... :O

समीरसूर's picture

19 Jun 2019 - 5:24 pm | समीरसूर

२००१ किंवा २००२ मध्ये मुंबईत एका तिथेच राहणार्‍या मित्रासोबत बांद्र्याच्या एका डान्स बारमध्ये गेलो होतो. या मित्राला त्या बारमधली एक मुलगी खूप आवडायची. तिच्यावर खूप पैसे उधळले त्याने. मी एकदाच गेलो आणि पुन्हा जाणार नाही हे ठरवून टाकले. खूप भयानक वाटलं तिथे. पुरुषांच्या मनोरंजनासाठी स्त्रियांनी अश्लील नाच करावा हा फारच क्रूर प्रकार आहे. नंतर त्या मित्रालाही योग्य धडा मिळाला. तोपर्यंत बरेच पैसे गमावून बसला होता. म्हणूनच तमाशा या प्रकाराचा मला भयंकर तिटकारा आहे. महाराष्ट्राची लोककला वगैरे सगळा भंपक प्रकार आहे. खरं बघायला गेलं तर अतिशय घाणेरडा, रुचिहीन, आणि दळभद्री प्रकार आहे तमाशा म्हणजे. लावणी वगैरेला आता ग्लॅमर मिळतंय पण तो सगळा गलिच्छ प्रकार आहे.

अभ्या..'s picture

19 Jun 2019 - 11:01 pm | अभ्या..

खरं बघायला गेलं तर अतिशय घाणेरडा, रुचिहीन, आणि दळभद्री प्रकार आहे तमाशा म्हणजे. लावणी वगैरेला आता ग्लॅमर मिळतंय पण तो सगळा गलिच्छ प्रकार आहे.

तुम्ही खरं काही असं बघितलेलंच नाहीये. तसंही आजकाल तुमच्या प्रतिसादावरुन ते टिपिकल वरवरचेपण दिसूनही येतंय.
धन्यवाद.

समीरसूर's picture

19 Jun 2019 - 11:36 pm | समीरसूर

खरं काय आहे हे बघितलं नाहीये म्हणूनदेखील असं मत असेल माझं पण जे काही पाहिलंय, ऐकलंय, वाचलंय त्यावरून तरी तमाशा, लावणी हा प्रकार गलिच्छच वाटतो. हंसा वाडकरांचं आत्मचरित्र "सांगत्ये ऐका"मध्ये या व्यवसायाचे आणि स्त्रियांना या व्यवसायात सोसाव्या लागणार्‍या हाल-अपेष्टांचे, भयानक नजरांचे, आर्थिक संकंटांचे जे वर्णन आहे ते वास्तव आहे. नुकतंच राजश्री नगरकर-काळे यांचा मुलगा अमित काळे बहुधा 'आएएस' झाला. या विषयावर एक लेख वाचनात आला होता. अतिशय विपरित आणि कष्टप्रद परिस्थिती कशी असते याचा प्रत्यय हा लेख वाचून आला. तमाशाचे मूळ रुप काय होते आणि ते किती उदात्त होते आणि आता तमाशा कसा उथळ झाला आहे वगैरे थिअरीज मी बर्‍याचदा ऐकल्या आहेत पण या व्यवसायात स्त्रियांना खूप काही (इच्छा नसतांना) सोसावे लागते हे तितकेच खरे. माझे मत चुकीचे असू शकेल कदाचित...

टिपिकल वरवरचेपण...असेल बहुधा. सगळेच विषय खोलात जाऊन चिकित्सा करण्याच्या लायकीचे नसतात...तमाशा, लावणी वगैरे आचरट प्रकार तर अजिबातच नाहीत.

वरुण मोहिते's picture

19 Jun 2019 - 11:48 pm | वरुण मोहिते

बाई संवेदना वैगरे समजून घ्या वरवरची मते नको. अर्थात मी लिहिनच. मोहिते पाटील ह्यांच्या लावणी ला सोलापूर ला गेला आहात का कधी? अशी आपल्यासारख्या लेखकाने पटकन मते बनवणे हा स्त्री चा अपमान आहे.

समीरसूर's picture

20 Jun 2019 - 9:57 am | समीरसूर

आतापर्यंत जे पाहिले आहे, वाचले आहे त्यावरून माझे (आणि बहुतेक सर्व समाजाचे) हे मत झाले आहे.

- तमाशातील स्त्री कलावंतांना जी अवहेलना सोसावी लागते ते सर्वशृत आहे. मी कित्येक मुलाखती वाचल्या आहेत. तुम्ही हंसा वाडकरांचं 'सांगत्ये ऐका' वाचून बघा. आनंद यादवांच्या कादंबरीवर आधारित 'नटरंग' हा चित्रपट पुरेसा बोलका आहे.
- पूर्वी पाटलांनी वगैरे तमाशात विशेष रस घेऊन काय काय उद्योग करून ठेवलेत हे सगळा महाराष्ट्र जाणतोच. 'बाई, या वाड्यावर' हा प्रकार खरेच अस्तित्वात होता. आणि या बायकांना हे पाटील कसे वागवायचे हे सगळ्यांना माहित आहेच. सगळे तमाशा कलावंत पाटलाच्या नाहीतर अशा कुठल्यातरी मातब्बर माणसाच्या आश्रयाने रहायचे. यात काही फार चांगलं आहे असं मला वाटत नाही.
- बाकी अ‍ॅक्चुअल फडात जे प्रकार चालतात ते काही खूप वाखाणण्याजोगे असतात असे नाही.

यात स्त्रीचा अपमान अजिबातच नाही. स्त्रीने पुरुषांच्या नजरेला सुखावण्यासाठी विचित्र अंगविक्षेप करत नाचणे हा खरा स्त्रीचा अपमान आहे. ज्या हीन पद्धतीने या कलाप्रकारातल्या स्त्रियांना वागवले जाते तो स्त्रीचा खरा अपमान आहे. नको त्या प्रकारांचे उदात्तीकरण करणे आपण थांबवले पाहिजे असे मला वाटते.

तुमच्या लेखाची प्रतीक्षा आहे. कदाचित त्यातून काही नवीन तथ्यांवर प्रकाश पडेल! आपल्या लेखनशैलीचा मी फॅन आहेच!

चांदणे संदीप's picture

20 Jun 2019 - 11:46 am | चांदणे संदीप

(आणि बहुतेक सर्व समाजाचे)

तुम्ही आपल्यापुरतं बोला. सर्वच समाजाचे तुम्ही प्रतिनिधित्व कशाच्या आधारावर करताय? मेन स्ट्रीम मराठी सिनेमाने आणि संगीताने "बाई वाड्यावर या" गाणे स्वीकारले. मग आता तुमच्या मते मराठी सिनेमा आणि संगीतपण टाकाऊ झाले का?

Metoo प्रकरण येऊन गेले. त्याआधीही कित्येकदा सिनेसृष्टीत अशा घटना घडल्या ज्यावरून सिनेसृष्टीची प्रतिमा मलिन झालीच तरीही त्यात कित्येक मानवंत कलाकार आजही आपला आब राखून आहेत. सिनेसृष्टीचा कारभार आधी होता तसा अव्याहतपणे सुरू आहे. सरसकटपणे सर्वांना एकाच पारड्यात टाकता येत नसतं, तुम्हीही टाकू नये एवढीच अपेक्षा.

समाजात अपप्रवृत्तींना वाढीस घालण्याचे काम समाजातले चांगले घटकच करत असतात जे स्वतःला यापासून नेटाने दूर ठेवतात. आपण दोघे यांपैकीच एक. :)

Sandy

समीरसूर's picture

20 Jun 2019 - 1:51 pm | समीरसूर

मी थांबतो. उत्तर-प्रत्युत्तर, वाद-प्रतिवाद थांबवत नाही तोपर्यंत चालूच राहणार. तुम्हाला माझे म्हणणे कधीच पटणार नाही; मला तुमचे म्हणणे अजिबात पटणार नाही. प्रत्येकाला असेच वाटत राहील की माझेच मत बरोबर आहे; समोरच्या व्यक्तीची गल्लत होतेय, गल्ली चुकतेय, सूर बेसूर होतोय, वरवरचे मत आहे, मत ऐकून धक्का बसला, वगैरे. :-) त्यापेक्षा थांबलेले बरे! :-) लेट्स अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री हिअर! :-)

जॉनविक्क's picture

19 Jun 2019 - 11:04 pm | जॉनविक्क

पुरुषांच्या मनोरंजनासाठी स्त्रियांनी अश्लील नाच करावा हा फारच क्रूर प्रकार आहे.

नेमका हाच विचार पहिल्यांदा गेलो तेव्हा आला होता. होय खूप भयानकच वाटलं तिथे. आणि बहुदा माझ्या संवेदना बधीर झाल्याने अथवा आवश्यक मोकळेपणा नसल्याने असे घडले असेल.

अर्थात नंतर त्यांची ही पुरुषी क्रुरता हाताळायची हातोटी बघून मत जरा सौम्य झालं.

परंतु मुळातच असा उधळायला पैसा नसल्याने स्वतः होऊन कधी जाणे व पैसे उडवणे घडले नाही. आणि सोबतचे वाहवत जात असताना (तसे दाखवतात तरी) मला तिथं विशेष कम्फर्टझोन मधे आहोत असे वाटतही नाही. तरी एक वेगळं वातावरण म्हणून मी संधी असेल तर अशा ठिकाणी भेट टाळतही नाही.

महाराष्ट्राची लोककला वगैरे सगळा भंपक प्रकार आहे. खरं बघायला गेलं तर अतिशय घाणेरडा, रुचिहीन, आणि दळभद्री प्रकार आहे तमाशा म्हणजे.

हम्म. थोडं व्यक्तिगत बोलतो.
मला लावण्या(पडद्यावर) बघायला आवडतात ही रुचीहीन गोष्ट आहे हे आपणामुळे ठळक झाले पण माझा रुचिपालट मी कसा करावा ?

समीरसूर's picture

19 Jun 2019 - 11:46 pm | समीरसूर

अगदी सोप्पयं...लावण्या (पडद्यावर) बघणं बंद करा. त्याऐवजी चांगली गाणी बघायला सुरुवात करा...हळूहळू नक्कीच रुचिपालट होईल. मला तर भडक हावभाव करत, प्रत्येक अंग घुसळून, डोळे मारत आचरट शब्दांवर नाचणार्‍या बायका पाहिल्या की कधी एकदा मी चॅनल बदलतो असं होतं. काय ते फेटे उडवणारे, लाळ गाळणारे बाप्ये, पैसे फेकणारे हिरवट म्हातारे...या प्रकाराला लोककला, संस्कृती वगैरे म्हणावं? तसं असेल तर तमाशा महाराष्ट्रातल्या सगळ्या थरांमध्ये लोकप्रिय का नाही? या कलेला समाजात सन्मान का नाही मिळत? असो.

जॉनविक्क's picture

20 Jun 2019 - 12:06 am | जॉनविक्क

कारण, चांगली गाणी मी आजही बघतो, बघत होतो आणि राहीनही, पण त्यामुळे लावण्या अजूनही रुचीहीन ठरल्या नाहीत हो :(

समीरसूर's picture

20 Jun 2019 - 9:31 am | समीरसूर

तुमच्या आवडीचा सन्मान आहेच. समाजात या कलेला मानाचे स्थान मिळत नाही हे मात्र खरे. या वास्तवाचे प्रखर चित्रण आनंद यादव यांची 'नटरंग' कादंबरी आणि त्यावर आधारित चित्रपट यात बघता येईल. इतके भयानक वास्तव असेल तर असला थिल्लर प्रकार बंदच व्हायला हवा. शिवाय हंसा वाडकरांच्या 'सांगत्ये ऐका' मध्ये, काळू-बाळू, राजश्री नगरकर, रघुवीर खेडकर, वगैरे लोकांवर आधारित लेखांमध्ये जे वाचलंय ते अंगावर शहारा आणणारे आहे. इथे रुचीचा प्रश्नच नाहीये; माणसाचा आणि माणसाला माणसानेच दिलेल्या तुच्छ वागणुकीचा प्रश्न आहे. रुची, कला, लोककला, लोककलावंतांना सन्मान मिळाला पाहिजे वगैरे प्रकार खूप नंतरचे. शेवटी पसंद अपनी अपनी.

खटपट्या's picture

8 Jul 2019 - 10:41 pm | खटपट्या

तुमच्या मताचा आदर आहेच. पण तुम्ही जे म्हणताय तसं "प्रत्येक अंग घुसळून, डोळे मारत आचरट शब्दांवर नाचणार्‍या बायका" या चित्रपटातही असतातच की. अगदी तुम्ही ज्या चित्रपटांचे समिक्षण करता त्यातही अशी न्रुत्ये असतातच.
तुम्ही चित्रपटांनाही तोच न्याय लावाल अशी आशा करतो...

जालिम लोशन's picture

19 Jun 2019 - 11:19 pm | जालिम लोशन

कसे काय होते? आणी श्री गणेश लेखमाला ऊघडत का नाही?

जॉनविक्क's picture

20 Jun 2019 - 12:17 am | जॉनविक्क

काय ते फेटे उडवणारे, लाळ गाळणारे बाप्ये, पैसे फेकणारे हिरवट म्हातारे...

अहो पण तुम्ही त्यात नाही हे पुरेसं आहे की. तसेच तुम्ही चॅनल बदलतासुद्धा उगा देदेदे म्हणायची वेळही तुमच्यावर येत नाही मग काय प्रॉब्लेम आहे तुमचा जो तुम्हाला उगाचच जगाचा प्रॉब्लेम वाटतोय ?

या व्यवसायात स्त्रियांना खूप काही (इच्छा नसतांना) सोसावे लागते हे तितकेच खरे.

हे तर मलाही माझ्या पोटापाण्याच्या उद्योगात करावं लागतंय, मग काय मी काम करणं सोडून देऊ ?

समीरसूर's picture

20 Jun 2019 - 9:41 am | समीरसूर

अहो, या हिशेबाने ड्र्ग्ज, वेश्याव्यवसाय, दहशतवाद, बॉम्बस्फोट सगळंच चालतंय की. आपण नाही ना त्यात! या डान्स बार आणि तमाशामुळे कितीतरी लोकांनी स्वतःच्या आणि स्वतःसोबत कित्येक माणसांची जिंदगी खराब केली.

तुमच्या पोटा-पाण्याच्या उद्योगात तुमच्यावर मानसिक अत्याचार होत नाहीत. एक माणूस म्हणून तुम्हाला 'हाड-तूड' करून वागवलं जात नाही. तुमच्या देहाकडे वासनांध नजरेने पाहिले जात नाही. 'ठेवण्याचा' प्रयत्न केला जात नाही. महाराष्ट्रात कित्येक जमीनदार-पाटलांनी हे उद्योग केलेले आहेत. "बाई, या वाड्यावर" ही या लोककलेला लागलेली कीड होती. तुमचा व्यवसाय आणि तमाशा व्यवसाय यामध्ये खूप फरक आहे, साहेब! तुलना योग्य होणे आवश्यक आहे.

आपली पंचाईत अशी झाली आहे की आपल्याला ठाम भूमिका घ्यायला जमतच नाही. सोय बघून गुळमुळीत 'दोन्ही बाजूंचा विचार करून" वगैरे थातूर-मातूर भूमिका घेतो आपण! टू कॉल अ स्पेड अ स्पेड हे आपल्याला जमत नाही.

जॉनविक्क's picture

20 Jun 2019 - 12:02 pm | जॉनविक्क

आपला जो आवेश आहे त्यापुढे मी हतबल आहे कारण त्यात आपण चूक काय आहे आणि चूक का आहे या चर्चेच्या मुद्यांवर मोठी गल्लत करत आहात हे आपणास सांगावे का हे ठरवता येत नाही.

तुमच्या पोटा-पाण्याच्या उद्योगात तुमच्यावर मानसिक अत्याचार होत नाहीत. एक माणूस म्हणून तुम्हाला 'हाड-तूड' करून वागवलं जात नाही. तुमच्या देहाकडे वासनांध नजरेने पाहिले जात नाही. 'ठेवण्याचा' प्रयत्न केला जात नाही.

तुम्हास खात्री आहे #METOO आणि #MENTOO हे फक्त मनोरंजनाशी निगडित व्यवसायाशी संबंधीत हॅशटॅग आहेत ? मग ?

ज्या आदराने आपण डॉक्टरकडे बघतो तोच आदर आपल्यामधे रिक्षावाल्याला हात करताना असतो ? मग रिक्षा बंद करून टाकू कारण स्पेड ला स्पेड म्हणणे आवश्यक आहे.

समीरसूर's picture

20 Jun 2019 - 1:51 pm | समीरसूर

मी थांबतो. उत्तर-प्रत्युत्तर, वाद-प्रतिवाद थांबवत नाही तोपर्यंत चालूच राहणार. तुम्हाला माझे म्हणणे कधीच पटणार नाही; मला तुमचे म्हणणे अजिबात पटणार नाही. प्रत्येकाला असेच वाटत राहील की माझेच मत बरोबर आहे; समोरच्या व्यक्तीची गल्लत होतेय, गल्ली चुकतेय, सूर बेसूर होतोय, वरवरचे मत आहे, मत ऐकून धक्का बसला, वगैरे. :-) त्यापेक्षा थांबलेले बरे! :-) लेट्स अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री हिअर! :-)

मग आपणास लक्षात येईल शोषण कृतीमुळे/प्रवृत्तीमुळे न्हवे परिस्थितीमुळे होते, प्रवृत्ती प्रत्येकात असते. विरोध परिस्थितीला करा प्रवृत्ती आपोआप नियंत्रणात येईल.तो पर्यंत थांबूया.

Rajesh188's picture

22 Jun 2019 - 8:40 pm | Rajesh188

हल्ली हिंदी सिनेमात ५ % कपडे परिधान करून स्त्री शरीराचे सर्व अवयव स्पष्ट दाखवून नाच केला जातो ,आणि तो नाच कला ह्या ब्रँड वर विकला जातो .
ह्यात स्त्रीत्व चा अपमान होत नाही का .
लावणी ही पूर्ण कपड्यात सर्व अंग झाकून सादर केली जाते .

गामा पैलवान's picture

22 Jun 2019 - 11:54 pm | गामा पैलवान

समीरसूर,

खरं बघायला गेलं तर अतिशय घाणेरडा, रुचिहीन, आणि दळभद्री प्रकार आहे तमाशा म्हणजे.

मी तमाशा प्रत्यक्ष बघितलेला नसल्याने काही भाष्य करू शकंत नाही. मात्र तुमची मतं अशी का झालीत ते कळून येतंय. तमाशाच्या नावाखाली देहविक्रय चालू असेल तर लोकं तमाशाला नावं ठेवणारंच. याबाबतीत तुमच्याशी सहमत आहे.

आ.न.,
-गा.पै.

वरुण मोहिते यांना श्रध्दांजली