...त्या वेळी कळले नाही

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
26 Feb 2017 - 1:08 pm

त्या एक स्वराची बिजली
स्पर्शून निसटती गेली.....
ती मैफल मग जमलेली
ती बंदिश मज सुचलेली
....मग माझी उरली नाही

उघडता दार अज्ञात
होऊन अनावर आत
कोसळतो कुठुन प्रपात
हे काय भिने रक्तात
...त्या वेळी कळले नाही

ओथ॑बुन चिद्घन आला
निष्पर्ण वृक्ष सळसळला
डवरून फुलांनी गेला
अवचित मग कळले मजला
..... मी देही असुन विदेही!!!

कविता माझीमुक्तक

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

26 Feb 2017 - 1:24 pm | प्राची अश्विनी

वा! क्या बात!
कुमार गंधर्वांच्या एका किश्श्याची आठवण झाली.

अनन्त्_यात्री's picture

26 Feb 2017 - 2:01 pm | अनन्त्_यात्री

काय होता कुमारा॑चा किस्सा?

प्राची अश्विनी's picture

27 Feb 2017 - 7:16 am | प्राची अश्विनी

बहुतेक वसंत पोतदारांनी लिहिलंय की एकदा एका मैफलीत कुमारांनी त्या रागात वर्ज्य सूर लावला. कुणीतरी त्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की तो सूर केव्हापासून दरवाजातून येऊका असं खुणवत होता, मला नाही म्हणवेना .
तुमचं पहिलं कडवं वाचून हे आठवलं.

पैसा's picture

27 Feb 2017 - 12:49 pm | पैसा

अप्रतिम!

अत्रुप्त आत्मा's picture

28 Feb 2017 - 6:40 pm | अत्रुप्त आत्मा

वाह रे व्वाह!

शार्दुल_हातोळकर's picture

1 Mar 2017 - 9:36 pm | शार्दुल_हातोळकर

मस्त !!

राघव's picture

2 Mar 2017 - 7:03 pm | राघव

खूप सुंदर! आवडेश..!!!

अनन्त्_यात्री's picture

3 Mar 2017 - 9:42 am | अनन्त्_यात्री

प्राची, पैसा, आत्मबन्ध, शार्दूल, राघव ...धन्यवाद !