किंडल वरची टायपिंग मिस्टेक नसलेली चांगली मराठी पुस्तके कोणती?

अत्रे's picture
अत्रे in काथ्याकूट
26 Feb 2017 - 12:05 am
गाभा: 

काही दिवसांपूर्वी किंडल वर "का रे भुललासी वरलीया रंगा" - व पु काळे (प्रकाशक: मेहता) हे इ-बुक विकत घेतले. त्यात बर्याच काना/मात्रा/ वेलांटीच्या प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत. म्हणून मी म्हटले की इथून पुढे इ-पुस्तक घेण्याआधी लोकांना विचारावे आणि मगच घ्यावे.

कोणी किंडल वर घेतलेली वाचनीय आणि टायपिंग मिस्टेक नसलेली पुस्तके सुचवू शकेल काय?

धन्यवाद!

प्रतिक्रिया

पिशी अबोली's picture

26 Feb 2017 - 12:16 am | पिशी अबोली

https://msblc.maharashtra.gov.in/download1.html

इथे .mobi पुस्तके आहेत आणि ती चांगली आहेत असा अनुभव. ही नवीन प्रादेशिक भाषांमधली पुस्तकं अजून ट्राय नाही केली, हवीत ती नाहीच आहेत अजून. चुका असतात हे सांगितलंत बरं केलं. काही काळ थांबणं बरं अजून.

नीलकांत's picture

27 Feb 2017 - 9:11 am | नीलकांत

खुप छान पुस्तके आहेत. या माहितीबद्दल धन्यवाद.

प्रीत-मोहर's picture

1 Mar 2017 - 5:06 pm | प्रीत-मोहर

धन्यु पिशे!!

जयंत कुलकर्णी's picture

26 Feb 2017 - 12:20 am | जयंत कुलकर्णी

मला एक सांगा, किंडल व्हाईटवर मराठी वाचता येते का ? मी एक पुस्तक किंडलसाठी विकत घ्यायला गेलो तर तसे पुस्तक नव्हते. मी पण माझे एक पुस्तक किंडल फॉरमॅटमधे तयार केले (मराठी) -अण ते मोबाईल व मशीनवर किंडल अ‍ॅपवर वाचता येते पण किंडलवर नाही. कोणाला वाचता येत असेल तर जरुर सांगावे...

हो. पण त्यासाठी मला किंडल सॉफ्टवेअर अपडेट करावे लागले होते.

आणि पुस्तके विकत घेण्यासाठी ऍमेझॉन.इन वर जा , सर्च बॉक्स मध्ये किंडल स्टोर वर जा , खाली INDIAN LANGUAGE सेक्शन मधे मराठी पर्याय निवडा.

मनो's picture

26 Feb 2017 - 10:04 pm | मनो

तुमच्याकडे जर त्याची PDF असेल तर किंडल मध्ये ती फाईल पेस्ट करा. वाचता येते. मी सगळी ईबुक्स अशीच वाचतो. सगळीच पुस्तके ऍमेझॉन वॉर विकत घेणे जरुरी नाही.

नीलकांत's picture

27 Feb 2017 - 9:16 am | नीलकांत

तुम्ही किंडल८वी पिढी वापरत असाल असे वाटते. त्याचे नवीन सॉफ्टवेअर अपडेट करून घ्या. २०ं० एम बी चे आहे. त्यानंतर देवनागरी वाचता येईल. त्यानंतर अमेझॉन वरून देवदत्तचे किंवा अन्य कुठले हिन्दी मराठी सम्पल बुक वाचून बघा.

मला किंन्डल खुपच आवडले. सध्यातरी काही इंग्रजी पुस्तके वाचतोय. पण लवकरच देवनागरी सुध्दा वाचता येईल असे आहे.

तसेच जर तुमच्या जवळ एखादे पुस्तक .ईपब फॉरमॅटमध्ये असेल आणी ते किंडलवर वाचायचे असेल तर तुम्ही ते .मोबी फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करा. हे करण्यासाठी कॅलीबर नावाचे सॉफ्टवेअर मोफत मिळेल.

कॅलीबर केवळ फॉरबदलण्यासाठीच नव्हे तर त्याचे बाकी सुध्दा उपयोग आहे.

- नीलकांत

जयंत कुलकर्णी's picture

2 Mar 2017 - 6:12 pm | जयंत कुलकर्णी

आपल्याकडे कुठले व्हर्जन आहे हे कृपया सांगाल का म्हणजे मला चेक करता येइल. कारण माझा किंडल तर अपडेटेड आहे....

आदूबाळ's picture

26 Feb 2017 - 12:35 am | आदूबाळ

त्या typing mistakes नसून rendering mistakes आहेत. जगात रोमनव्यतिरिक्त लिप्यामध्ये काही वाचनीय लिहिलं जाऊ शकतं यावर किंडळचा अजून विश्वास बसला नाहीये. त्यामुळे 'सप्रीण' हा शब्द किंडळवर 'सर्पीण' असा दिसतो. सपऱयांनी तक्रार केल्याशिवाय काही होईलसं वाटत नाही.

अजून काही चांगली पुस्तके - ययाती ( वि स खांडेकर) मृत्युंजय (शिवाजी सावंत)

आधी सॅम्पल download करून बघु शकता.
मला एक सांगा भारतात किंडल वर पुस्तक विकत घेताना दुसऱ्या देशातून issue केलेले क्रेडिट कार्ड वापरता येते का? आणि फक्त क्रेडिट कार्डच वापरता येते कि बाकी डेबिट कार्ड सुद्धा.

फोनमध्ये डाउनलोड केलेली epub / txt पुस्तके Kindle स्टाइलमध्ये वाचता येणारे Windows app " Bookviser Reader" मधून--

पिशी अबोली's picture

1 Mar 2017 - 5:39 pm | पिशी अबोली

किती सुंदर!

डांगराचा वेल म्हणजे काय?

पिशी अबोली's picture

1 Mar 2017 - 5:40 pm | पिशी अबोली

Oops.

चुकीचा धागा!

आदूबाळ's picture

1 Mar 2017 - 7:43 pm | आदूबाळ

ते ठीक आहे, पण...

डांगराचा वेल म्हणजे काय?

पिशी अबोली's picture

1 Mar 2017 - 5:39 pm | पिशी अबोली

किती सुंदर!

डांगराचा वेल म्हणजे काय?

आनंदयात्री's picture

1 Mar 2017 - 9:23 pm | आनंदयात्री

काशीफळ भोपळ्याला डांगर असेही म्हणतात. हा शब्द मी मराठवाड्यात औरंगाबादेत ऐकलेला आहे. (हे आठवणीतून त्यामुळे चूभूद्याघ्या)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Mar 2017 - 9:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बरोबर...! आपण मराठवाड्यातले लोक काशीफळाला डांगरच म्हणतो.

-दिलीप बिरुटे