छोट्यांचं युद्ध (विचित्रकथा: Weird Fiction)

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
25 Feb 2017 - 8:56 pm

“या फोटोकडे एकदा काळजीपूर्वक पहा. मुलांनो, तुमच्यापैकी दोघांना आतापर्यंत मिशा चिकटवता आल्या नाहीत. व्यवस्थित खेळा, रशियाचं भविष्य तुमच्या हातांत आहे.”

रशियाच्या बर्फाळ भागातल्या त्या गुहेत काही मुलं हिटलरला स्टालिनच्या मिशा चिकटवण्याचा खेळ खेळत होती. त्यांच्या डोक्यावर रशिया अन जर्मनीच्या लष्करी विमानांचं घनघोर युद्ध सुरु होतं.
रशियाचा फ्लाइट कमांडर इगॉर सर्वाँच्याच आवडीचा होता. आतपर्यंत शत्रुंची अनेक विमानं त्यानं हा हा म्हणता नेस्तनाबूत केली होती. आतासुद्धा तो प्रचंड वेगानं शत्रुच्या विमानाकडे झेपावला. रॉकेट लॉन्चरचं तोंड जर्मन विमानाकडे वळवून तो बटण दाबणार तेवढ्यात एक मिसाईल त्याला प्रचंड वेगाने त्याच्याच रोखाने येतांना दिसलं. त्याने झटपट निर्णय घेऊन वेगाने हालचाली केल्या, दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. पण अखेर ते रॉकेट लॉन्चर त्याच्या विमानाला घासून गेलंच. दिशादर्शक यंत्रणा क्षणात कोलमडली, विमान हेलकावे खाऊ लागलं खुप कमी वेळ होता त्याच्याकडे. त्याने आपल्या सिटखालचं Emergency Exit बटण दाबलं; पण दुर्दैव. विमान वेगाने भिरभिरत खाली जायला लागलं. त्याचं आयुष्य आता आठ वर्षांच्या स्वेतलॅनाच्या हातांत होतं.

स्वेतच्या डोळ्यांना करकचून पट्टी बांधण्यात आली. उजव्या हातात स्टालिनची मिशी घेऊन ती डाव्या हाताने हिटलरचा फोटो चाचपडू लागली. गुहेतल्या सर्वांचा श्वास रोखला गेला. स्वेतने हिटलरच्या नाकाचा बरोबर अंदाज घेतला अन मिशी चिकटवणार एवढ्यात एक बॉम्बगोळा गुहेपासून अगदी जवळ फुटला. स्वेत फोटोपासून दूर फेकली गेली. तिचे कान अन शरीर सुन्न झाले होते. तरीसुद्धा ती उठली अन जखमी पावलांनी पुढे जाऊ लागली.

दोनेक पावलं जाउन ती परत कोसळली. पण कुणीच तिला आधार द्यायला पुढे गेलं नाही. ती स्वतःच सावरली, टोंगळ्यांवर घासत कशीबशी फोटोपर्यंत जाउन पोहोचली. डोळ्यांसमोरचं सगळं अंधुक दिसत होतं. तरीसुद्धा तिने चाचपडत अंदाज घेतला अन थरथरत्या हातांनी नाकाच्या बरोबर खाली मिशी चिकटवून टाकली. गुहेत प्रचंड जल्लोष उसळला. लहान-मोठी सगळी मुलं नाचू लागली.
अन त्याचक्षणी इगॉरच्या विमानाचं Emergency Exit बटण दबलं अन तो पॅराशूटबरोबर विमानाबाहेर पडला.
जाताजाता त्याने मिसाईल लॉन्चरचं बटण दाबलं. एक रॉकेट सरळ जाऊन शत्रुविमानाच्या शेपटीत जाउन घुसलं.

“चला नेक्स्ट.कुणाचा नंबर आहे?”

साडेनऊ वर्षांचा चुणचुणित येफीम समोर आला. त्याच्या डोळ्यांना करकचून पट्टी बांधण्यात आली.
आकाशात शत्रुची विमानं आग ओकंत होती. आता मुलांना गाफील राहून चालणार नव्हतं. त्यांनी जास्तीत जास्त मिशा चिकटवायला हव्यात. कारण दूSर जर्मनीमध्ये, अशाच एखाद्या गुहेत जर्मन मुलं स्टालिनला मिशा चिकटवण्याचा खेळ खेळत असतील.
--------------------------------------------------

कथाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

एस's picture

25 Feb 2017 - 9:35 pm | एस

खरंच विचित्र कथा.

जव्हेरगंज's picture

25 Feb 2017 - 10:05 pm | जव्हेरगंज

ब्राव्हो!!!!

हे भाषांतर आहे की तुमची स्वत:ची कथा?

स्वतची असेल तर दंडवत स्विकारा राजे!!

एक नंबर चालू आहे!!

अॅस्ट्रोनाट विनय's picture

25 Feb 2017 - 11:38 pm | अॅस्ट्रोनाट विनय

अनुवाद नाही, स्वतःची आहे कथा.

पद्मावति's picture

25 Feb 2017 - 10:53 pm | पद्मावति

किंचित कळली पण बरीचशी नाही. इण्टरेस्टिंग वाटतेय.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

25 Feb 2017 - 11:50 pm | अॅस्ट्रोनाट विनय

कथेसंबंधी माझ्या डोक्यात काय विचार होता हे शेअर करू इच्छितो-

दुसरं महायुद्ध लढणारे प्रमुख देश म्हणजे जर्मनी आणि रशिया. त्यावेळी दोन्ही देशांमधील प्रत्येक स्त्री आणि पुरुष त्याच्या परीने युद्धात योगदान देत होता. यातून सुटले होते फक्त लहान मुलं. ( हिटलरने काही लहान मुलांनासुद्धा गुप्तहेर बनण्याच्या कामाला लावलं होतं. यात अनेकांचा जीव गेला)

माझ्या डोक्यात विचार आला की जर शक्य झालं असतं तर या दोन्ही देशांच्या राज्यकर्त्यांनी मुलांचापण वापर करून घेतला असता का? घेतला असता असं वाटतं कारण त्यावेळी माणुसकी निच्चतम पातळीला पोहोचली होती. यासंबंधी दोन शक्यता डोक्यात होत्या -

१. आपल्याकडे भुलाबाई नावाची छोट्या मुलींची देवी असते, ती त्यांच्या इच्छा पुर्ण करते असा समज आहे. जर्मनी आणि रशिया दोन्ही देशांच्या धर्मग्रंथांमध्ये छोट्या मुलांचे देव आहेत असं ऐकलं होतं. महायुद्धाच्या धामधुमीत जर एखाद्या अघोरी विद्या जाणणाऱ्याने त्या देवांना प्रसन्न केलं असेल आणि त्यांनी मुलांना वरदान दिलं असेल तर?( तुमच्या शत्रुना तुम्ही मारू शकाल आणि तुमच्या सैनिकांना वाचवू शकाल अशा प्रकारचं काहीतरी.)
छोटी मुलं युद्धभूमीवर जाऊ शकत नाहीत म्हणून मग एखाद्या गुप्त बसून मुलांना सगळ्या गोष्टी नियंत्रित असं ठरलं असेल. मग डोक्यात आला एखादा खेळ. खेळ खेळताना task पुर्ण करावे लागतील. जितके जास्त लोक task पुर्ण करतील तितका जास्त फायदा. Task जेवढं अवघड असेल तेवढा फायदा जास्त. ( म्हणजे स्वेतला कमी अडचणी आल्या असत्या तर फायदाही कमी मिळाला असता. फक्त इगॉर वाचला असता, जर्मन विमान उड़ालं नसतं)

शक्यता २. भूतांसोबत डील करणे हा प्रकार युरोप अमेरिकेत प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला एखादं काम करून हवं असेल तर ( अगदी कुणाला मारायचं असेल किंवा जिवंत करायचं असेल तरीसुद्धा) एका विशिष्ट प्रकारच्या सैतानाला बोलवायचं ( Demons of crossroad) आणि काय हवंय ते मागायचं. अर्थात या मोबदल्यात त्यांना काहीतरी द्यावंपण लागायचं. उदा: अ व्यक्तीला जिवंत करायचं असेल तर ब ला आपल्या आयुष्यातील क्ष वर्ष सैतानाला द्यावे लागतील.
दुसऱ्या महायुद्धात एखादी डील केली असेल तर? आम्ही तुमच्या सैनिकांना वाचवू पण शत्रुचे आत्मे आमच्या ताब्यात घेऊ असं काहीतरी.

मिशा चिकटवण्याचा खेळ त्यावेळी तिकडे प्रसिद्ध होता म्हणून निवडलाय.

अर्थात हा माझ्या डोक्यातला विचार होता. वाचकांना वेगळा अर्थही लागू शकतो.

( इगॉर हे नाव रशियन फायटर पायलट इगॉर काबेरोव पासून प्रेरित आहे)

बेर्लिनचा पाडाव होत असताना शेवटीशेवटी कोवळी मुलेसुद्धा हातात रायफली घेऊन लढायला गेली होती. हे जर्मनीतच नाही तर इतरत्रही घडले.

'Irgendwo in Berlin' हा चित्रपट नक्की पहा असे सुचवेन. (Somewhere in Berlin).

अॅस्ट्रोनाट विनय's picture

26 Feb 2017 - 7:55 am | अॅस्ट्रोनाट विनय

तुम्ही म्हणताय तशी परिस्थिती ऑपरेशन बार्बारोसा झाल्यानंतर बऱ्याच महिन्यांनंतरची आहे.
कथेतील वर्णन बार्बारोसाच्या सुरुवातीच्या काळातील आहे (कारण फायटर विमानांचं वर्णन त्यावेळी वापरण्यात आलेल्या Luftwaffle विमानांना समोर ठेऊन लिहलं आहे) त्यावेळी मुलं प्रत्यक्ष युद्धात उतरलेली नसल्याने वरील प्रकारे ते लढत असतील असं fantasy मागील लॉजिक आहे.

रशियात जर्मनीने वापरलेली ही विमाने जर्मनीच्या अपेक्षेपेक्षा जास्तच वेगाने नष्ट झाली. ती का झाली हे इतिहासातील समाधानकारक उत्तर न मिळालेलं लूपहोल आहे. त्या फटीतून कथानक घुसवण्याचा प्रयत्न केलाय :)

अॅस्ट्रोनाट विनय's picture

25 Feb 2017 - 11:54 pm | अॅस्ट्रोनाट विनय

Weird fiction या कथाप्रकाराबद्दल थोडंसं :

Weird fiction is a subgenre of speculative fiction originating in the late 19th and early 20th century in Britain. It can be said to encompass the ghost story and other tales of the macabre. Weird fiction is distinguished from horror and fantasy in its blending of supernatural, mythical, and even scientific tropes.
Like fantasy and science fiction, it has a logic of its own.

- Source: Wikipedia

अॅस्ट्रोनाट विनय's picture

25 Feb 2017 - 11:55 pm | अॅस्ट्रोनाट विनय

Famous author H.P.Lovercraft said:

"In true weird tale, certain atmosphere of breathless and unexplainable dread of outer, unknown forces must be present. There is logic and a supernatural happenings. There must be a hint, expressed with a seriousness and portentousness becoming its subject, of that most terrible conception of the human brain--a malign and particular suspension or defeat of those fixed laws of Nature which are our only safeguard against the assaults of chaos and the daemons of unplumbed space.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

25 Feb 2017 - 11:56 pm | अॅस्ट्रोनाट विनय

मराठीमध्ये हा प्रकार कितपत लिहला गेला असेल माहिती नाही

मला ती ड्रीमवर्क्स लोगोमधली चंद्रावर बसून गळ टाकणारी मुलगी आठवली.

बोबो's picture

27 Feb 2017 - 7:47 am | बोबो

मस्त