तो परत येतोय !

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
25 Feb 2017 - 2:36 pm
गाभा: 

तो आला, त्याला पाहिलं आणि त्याने सगळ्यांना जिंकलं. अनेक वर्षे त्याने लोकांच्या मनावर अधिराज्य केलं. त्याच गारुड इतकं की लोक 'त्याच्यासाठी कायपण' म्हणायचे.
होय. तोच तो, नोकीया ३३१०.
नोकियाचा सुपरहिट 3310 हा 'अनब्रेकेबल' आणि 'अनबिटेबल' मोबाइल परत एकदा बाजारात येतोय. नवीन रुपातील या मोबाईलची किंमत सुमारे ४५०० रुपयापर्यंत असू शकते. तो स्मार्ट फोन नसुन फिचर फोन असणार आहे. स्क्रीन कदाचित रंगीत असणार आहे. नव्या 3310ची बॅटरी आधीसारखीच दीर्घकाळ टिकावी, यादृष्टीने डिस्प्ले जास्त प्रकाशमान नसेल. दणकटपणा ह्या फोनचा प्लस पाईंट असणार आहे.

आपल्यापैकी बहुतेक जणांनी हा फोन आयुष्यात एकदा तरी नक्की वापरला असेल. तोच आता परत नव्या रुपात परत येतोय. मी त्याची वाट बघतोय. मी तर नक्की घेणार.
तुम्ही काय करणार ?

टीप : हा मार्केटींग साठीचा लेख नाही. नॉस्टेल्जीयाचा एक भाग आहे.

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

25 Feb 2017 - 2:47 pm | संजय क्षीरसागर

मला वाटलं निवडणूकांच्या निकालावर धागाये !

समाधान राऊत's picture

25 Feb 2017 - 7:09 pm | समाधान राऊत

Same here!!!

धर्मराजमुटके's picture

25 Feb 2017 - 8:48 pm | धर्मराजमुटके

निवडणूक ?? अजुन एक धागा ?? नको बुवा. तिकडे अगोदरच दोन चार धाग्यावर रान पेटलयं, अजुन एक धागा कशाला ?

राजकारणी लोक्स तिकडे एकमेकाच्या गळ्यात गळे, पायात पाय, हातात हात घ्यायच्या तयारीत आहेत आणि इकडे मिपाकर 'बेगाने की शादी में अब्दुल्ला दिवाना' की तरह भांड रहे है !
:)=

संदीप डांगे's picture

26 Feb 2017 - 12:18 am | संदीप डांगे

'ते' पण नोकिया ३३१० आहेत... काही होवो, तुटणार नाही, फुटणार नाही, बॅटरी उतरणार नाही. चालत राहणार दणकट....

असो.

नोकिया३३१० वापरला नाही... पण एकूण लोकांची नॉस्टेल्जिया बघून आणि त्याचे परत येणे बघून काहीसं छान छान फिलिंग येऊ राहयलंय...

औरंगजेब's picture

27 Feb 2017 - 7:25 am | औरंगजेब

रम्य त्या आठावणी...........नोकिया ३३१०च्या हो.

संजय क्षीरसागर's picture

27 Feb 2017 - 10:11 am | संजय क्षीरसागर

तो स्मार्ट फोन नसुन फिचर फोन असणार आहे.

म्हणजे टच-स्क्रीन नसणारे का ?

कबीरा's picture

27 Feb 2017 - 12:46 pm | कबीरा

१०-१२ वर्षांपूर्वी वापरात होतो ३३१०. तेव्हा त्याला ट्रान्स्परन्ट बॉडी बसवलेली. असला प्रकाश टाकायचा सगळीकडून. कहरच.नक्की घेणार परत. लौट आए हम वो गलीया.

सागर's picture

27 Feb 2017 - 3:23 pm | सागर

भारतात रिलिज झाला की लगेच घेणार आहे. :)

मराठी कथालेखक's picture

27 Feb 2017 - 6:10 pm | मराठी कथालेखक

बाकीचे फीचर्स सोडा पण जर रेडिओ नाही, sms आणि contacts साठी सुद्धा storage नाही (गाण्यांसाठी तर दूरच)..जर असंच असेल तर ४५०० ला फोन घेण्यात काय अर्थ आहे ? मी ही वापरला आहे ३३१० .. अगदी द्राविडी प्राणायम करुन तो कॉम्पुटरला जोडून sms आणि contacts चा कॉम्प्युटरवर बॅकअप देखील घ्यायचो. पण आता अशा फोनसाठी हजार रुपये देखील खर्च करणार नाही.

धर्मराजमुटके's picture

27 Feb 2017 - 7:02 pm | धर्मराजमुटके

मायक्रो यूएसबीनेही चार्ज करता येणार..
२ मेगापिक्सेलचा एलईडी फ्लॅश कॅमेरा,
१६ एमबी स्टोरेज क्षमता आणि मेमरी कार्डद्वारे ती ३२ जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा
एफ एम रेडिओसोबतच एमपी ३ प्लेअर
२जी नेटवर्क

अर्थात नवा अवतार जुन्या अवतारापेक्षा बराच वेगळा आहे पण नोकीया बरोबर एक जुने नाते आहे त्यामुळे एक फोन तर नक्कीच घेणार.

धर्मराजमुटके's picture

27 Feb 2017 - 7:05 pm | धर्मराजमुटके

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्मार्टफोनच्या जमान्यात लाख लाख रुपयाचे फोन वापरणार्‍या व्यक्तींबरोबर बसून त्यांच्यासमोर हा फोन नाचवणार आणि त्यांच्या तोंडावरील प्रतिक्रिया बघणार !
:)=

माझीही शॅम्पेन's picture

28 Feb 2017 - 8:29 pm | माझीही शॅम्पेन

माझा पण हा पहिला फोन , कितीही वापरला तरी बाहेर असताना चार्ज करावा लागला नाही अजूनही असेल कुठे तरी घरात !!
असो कितीही नॉस्टॅल्जिक वाटत असेल तरी पैसे आपल्या खिशातून जाणार आहेत त्यामुळे इतर फोन फिचर नक्की तपासले जातील.

ह्या फोन बद्दल बर्‍याच अफवा आहेत काय खर आणि काय खोट कळत नाही :(

धर्मराजमुटके's picture

16 Jul 2017 - 12:43 pm | धर्मराजमुटके

नोकीयाचं काय चाललयं काही कळत नाही. ३३१० अजुनही दुकानांत दिसत नाही. नोकिया ६ हा फोन १४ जुलैपासुन मिळेल असा अंदाज होता. अ‍ॅमेझॉनने फक्त रजिस्ट्रेशन घेतले. सेल २३ जुलै २०१७ पासुन सुरु होणार आहे. नोकीया ३, ५ देखील दुकानांत केव्हा मिळणार कळत नाही. नोकीया प्रेमींना परत दुसरा झटका बसणार वाटते.