पुणे ते लेह (कारने)

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in भटकंती
24 Feb 2017 - 9:20 pm

नमस्कार मंडळी,
गेली ४ वर्षे प्लॅन केलेली आणी दरवेळी काहीतरी टिनपाट कारणाने बारगळलेली पुणे ते लेह लडाख ट्रिप ह्या वर्षी जून मध्ये करण्याचे ठरवले आहे. अंदाजे १ जूनला पुण्यातून निघायचे असा बेत आहे. (९९.९९% ह्या वेळी ट्रिप होईलच).
(मनाली वरून लेह गाठायचे आणी श्रीनगर वरून परत यायचे का उलट करायचे ह्याचा अजून निर्णय झालेला नाही)

ट्रिपच्या अनुषंगाने मोदक रावांना भेटून तसेच कारने ट्रिप केलेल्या एका व्यक्तीचा अनुभव वाचून प्राथमिक माहिती घेतली आहे. मोदक रावांच्या अनुभवानुसार जून हाच योग्य महिना आहे जायचा. फक्त त्यांच्या आणी माझ्या ट्रिप मधील एक मोठा फरक म्हणजे मोदकरावानी बुलेट वरून ट्रिप केली होती तर मी ही ट्रिप फोर्ड फिगो डिझेल कारने करणार आहे. एक लहान मूल (वय वर्षे ५) धरून ३ मेंबर असल्याने बाईक शक्यच नाही. तरी ह्या अनुषंगाने काही माहिती अपेक्षित आहे.
१) ह्या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स थोडा कमी असल्याने तिथल्या दगडगोट्यांनी भरलेल्या रस्त्यांवर गाडी नक्की खालून खूप घासली जाणार आहे. एका व्यक्तीने 'किमान २०० मिमी. ग्राउंड क्लिअरन्स असलेली गाडी हवी. फोर्ड फिगोने ही ट्रिप करू नका' असा सल्ला दिलेला आहे पण माझ्याकडे दुसरा पर्याय आज तरी नाही. तर काहीतरी मोठा दणका बसून आम्ही तिथे अडकून पडू नये यासाठी गाडीची कोणती कामे करून घेणे आवश्यक आहे ? ?
२) स्वतः कोणत्या मूलभूत गोष्टी शिकणे गरजेचे आहे. जसे की पंक्चर बदलणे शिकले जाईल. पण अन्य कोणत्या गोष्टी 'स्वतःला' येणे गरजेचे आहे ?
३) कारचे कोणते स्पेअर पार्टस घेऊन जाणे गरजेचे आहे ?
४) सर्व काळजी घेऊन देखील काही कारणाने गाडी तिथे बंद पडली तर कोण मदत करू शकेल तिला किमान मनाली किंवा चंदीगड पर्यंत आणायला ?
५) अन्य कोणतीही माहिती जी उपयुक्त ठरेल.
उदा. - तिथल्या रस्त्यांवर गाडी चालवतानाची घ्यायची काळजी, जवळ बाळगायची कागदपत्रे, वस्तू वगैरे.

प्रतिक्रिया

शक्यतो फिगो घेऊन नको .

अभिजीत अवलिया's picture

24 Feb 2017 - 10:10 pm | अभिजीत अवलिया

माझ्या माहितीप्रमाणे लडाख मध्ये आपली स्वतःची किंवा आपल्या रक्तातल्या नात्यातल्या माणसाची गाडी नेण्यास परवानगी आहे. आमच्या नात्यात कुणाकडेही S.U.V. किंवा जास्त ग्राउंड क्लिअरन्स वाली गाडी नाही. त्यामुळे फिगोला पर्याय नाही माझ्याकडे.

अभिदेश's picture

24 Feb 2017 - 9:59 pm | अभिदेश

बिनधास्त जा..लोक मारुती ८०० ने सुद्धा गेलेली आहेत. Team-BHP वर पोत्याने लेख आहेत. ते वाचा. रूट्स , राहायच्या जागा, तयारी, सामानाची लिस्ट अगदी सगळं सगळं मिळेल. माझ्या मते जून मध्ये रस्ते थोडे खराब असतील , थोडा जास्त प्लॅन करा. कसे जाणार आहात ? मनाली मार्गे कि श्रीनगर मार्गे ? १-२ दिवस अधिक हाताशी ठेऊनच प्लॅन करा. सगळ्य्यात महत्वाचे म्हणजे जमल्यास थेट नाहीतर आल्यावर सविस्तर वर्णन करा..

श्रीनगर मार्गे जाऊन मनाली वरून येणे बरे होईल असे वाटतेय. पण काश्मीर मधली परिस्थिती त्यावेळी कशी असेल त्यावर सगळे अवलंबून आहे.

अभिदेश's picture

24 Feb 2017 - 11:08 pm | अभिदेश

जाताना श्रीनगर मार्गे गेल्यामुळे लेहला वातावरणात रुळायला मदत होते.

तुम्हाला शक्य असेल तर मोबाईल वर तिथे रेकॉर्ड करा तुमचं धावतं वर्णन. आपण युट्युब चॅनल वर टाकू तुम्ही आल्यावर. सुंदर वृत्तांत तयार होईल.

तुम्हाला या प्रवासा साठी भरपूर शुभेच्छा !

अभिजीत अवलिया's picture

25 Feb 2017 - 9:07 am | अभिजीत अवलिया

नक्कीच. हा मुद्दा लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

भरपूर फोटो घ्या आणि रेकॉर्ड करताना व्हिडीओ शुट पण घ्या लेह चं.. मागे तुमचं वर्णन. तुमच्या निमित्ताने चॅनल वर भटकंतीचा श्रीगणेशा होईल. अगदी प्रवास पण करा .. व्हिलॉग तयार करुयात झकास पैकी.

मनावर घ्याच.

स्रुजा's picture

25 Feb 2017 - 11:23 pm | स्रुजा

अगदी प्रवास पण करा

हे अगदी प्रवासातले महत्वाचे टप्पे पण हवे असतील तर रेकॉर्ड करा - असं वाचा. मधलं वाक्य कुठे गेलं कोण जाणे.

अरे वा! शुभेच्छा. वृत्तांत जरूर लिहा.

फिरण्यातलं काही कळत नसताना एक साम्गायला आलिये की इथे पूर्वी एक मिपाकर मोटरसायकलवरून मोठा प्रवास करून आले होते ते धागे उपयोगी येतायत का ते बघा किंवा त्यांना संपर्क केल्यास कदाचित मदत होईल.

लिओ's picture

24 Feb 2017 - 11:27 pm | लिओ

जर मारुती ८०० ने लोक लेहला जाऊन आले असतील तर तुम्हि सुध्दा फोर्ड फिगोने जाऊ शकाल यात काहि शंका नाहि.

काहि गोष्टि मला सांगु ईच्छितो.

१.गाडिला रुफटॉप कॅरिअर बसवा.
२. शक्यतो "कडक" उन्हाळ्यात पुण्याजवळील सर्वात कच्या रस्त्यावर एसी शिवाय किमान २०० किमी ड्राइव्ह करुन स्वतःची सयंम परिक्षा घ्या.
३. स्वतंत्र GPS बाळगा फोन GPS पेक्षा ते उत्तम राहिल.

तुमच्या प्रवासास शुभेच्छा.

खासगी गाडीला (पांढऱ्यावर काळे आकडे असलेली नंबर प्लेट) रूफ टॉप कॅरिअर बसवणे बेकायदा आहे. काचांना फिल्म सुद्धा नको.

हे सगळे नियम निसंदिग्ध भाषेत कुठे मिळतील..?

कारला सायकल कॅरीयर बसवण्याचा पण असाच कांहीतरी नियम आहे, सायकल कॅरीयर बसवणे बेकायदा आहे असे ऐकले आहे.

उन्मेश पाटील's picture

24 Feb 2017 - 11:51 pm | उन्मेश पाटील

मगच्य वर्षि अम्हि पन गेलो होतो जुलै मध्ये. पुणे ते लेह कार ने. आम्हाला साडेपाच दिवस लागले. आम्ही मनाली मार्गे गेलो होतो. पूर्वीचा प्लॅन श्रीनगर चा होता पण त्या वेळेस तिकडे संचारबंदी होती. तुम्हाला शक्य असल्यास सुव घेऊन जा.
आम्हाला कार कळूतच चा प्राब्लेम आला होता. सवय नाही घाटात चालवायची आणि तिकडे तर उंच घाट आहे. थोडी चुकी झाली आणि कळूतच बदलावा लागला. तर तिकडचे ड्राइवर म्हणाले कि जास्त गियर बदलू नका आंही गियर लो ठेवा.
गाडी बंद पडणार नाही पण जर झालाच तर रस्त्याने जाणारे लोकल ड्रायव्हर्स ची मदत घ्या. ते सांगतील. ते जवळच्या आर्मी बसे कॅम्प ला जायला सांगता. आर्मी चे मेलानिक असता. आम्हाला केली होती मदत.
गाडी चालवतांना स्पीड लिमिट मध्ये ठेवणे. जशी गाडी वर जाते तिकडे ओक्सयजन कमी होतो तर कार चे बंद वयाचे चांगेस वाढत. कारण कार ला पण एअर लागते. घाबरू नका. थोडा थांबा आणि मग परत सुरु करा होईल. जर समोरून कोणती गाडी आली तर असा जागा बघा जिथे तुम्हाला पास द्यायला जागा असेल. आर्मी कॉन्व्हॉय आला तर सरळ गाडी बाजूला पावून टाकणे आणि वाट बघायची कॉन्व्हॉय पास वयाची.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Feb 2017 - 9:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रवास सुलभ आणि मजेशीर होण्यासाठी शुभेच्छा ! सचित्र वृत्तांत जरूर टाका.

अभिजीत अवलिया's picture

25 Feb 2017 - 9:54 pm | अभिजीत अवलिया

माहिती देणाऱ्या तसेच प्रवासाला शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार.

@कंजूस काका,
केदार जोशींची ट्रिप वाचली होती. त्यांची ट्रिप वाचूनच ही ट्रिप कारने करण्याचा किडा डोक्यात आलाय :)

कंजूस's picture

26 Feb 2017 - 7:45 am | कंजूस

:)

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

26 Feb 2017 - 1:53 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

माझ्याकडे फिगो आहे,ग्राउंड क्लिअरन्स फार कमी आहे,लेह लडाख करायचे तर किमान २५० मीमी ग्राउंड क्लिअरन्स बेस्ट आहे.प्लस काही स्लोपवर 4*4 असल्याशिवाय गाडी चढत नाही,फिगोमध्ये तेव्हढे ट्रॅक्शन नाही.
सल्ला..ट्रीप करु नये.

किरणजी's picture

27 Feb 2017 - 10:42 am | किरणजी

तुमची फिगो authorised service center ला दाखवा, ते लोक suspension tight करुन ground clearance maintain राहिल अशी सोय करुन देतात.
दुसरी गोष्ट, तुम्ही एक इंच मोठे टायर लावू शकता service center मध्ये ते पण विचारा
मी ALTO, SANTRO अशा गाड्या पाहिल्या आहेत त्या रोड वर, त्यामुळे फिगो नी जाऊ शकता फक्त जो झीला आणि रोहतांग येथे खुप खड्डे असतात त्या मुळे अंदाज घेऊन गाडी चालवा.
घाट चढताना गाडी अजिबात बंद करू नका, इंजिन थंड होते आणि पहिल्या सारखा performance देत नाही.
आम्ही जुन 2015 मध्ये गेलो होतो ५/६ वषा (years) च्या मुलांना घेऊन, त्या बद्दल नंतर लिहितो.

अमर विश्वास's picture

27 Feb 2017 - 3:15 pm | अमर विश्वास

लडाख ट्रिप साठी शुभेच्छा

वर काही प्रतिसादात लिहिले आहे त्याप्रमाणे मारुतीच्या काही गाड्या तेथे दिसतात .. पण त्या अपवाद म्हणुन ....
फोर्ड फिगो सारख्या गाडयांना खरा प्रॉब्लेम होतो तो लँड स्लाईड मुळे रस्ता उखडलेला असेल तर ...
वर लिहिल्याप्रमाणे जोझीला पास यासाठी प्रसिद्ध आहे ...
अशावेळी कमी ग्राउंड क्लीअरन्स / कमी पॉवर च्या गाड्या त्रासदायक ठरतात.

जर तुम्हाला स्वतः गाडी चालवण्याची हौस नसेल तर मी एक उपाय सुचवतो .

माझ्या एका ट्रिपच्या वेळी आम्ही हा मार्ग अवलंबला होता (इतर दोन वेळा पुणे-लदाख-पुणे बाईक ने केले)
त्यावेळी मी श्रीनगर पर्यंत विमानेने गेलो, नंतर लेह मध्ये २ दिवस बाईक आणि ४ दिवस जीप भाड्याने घेतली
श्रीनार ते लह जीप सर्व्हिस मिळते ...

ह्या पर्यायाचा जरूर विचार करा ... याबाबत अधिक माहिती हवी असल्यास जरूर सांगा

वेल्लाभट's picture

27 Feb 2017 - 3:47 pm | वेल्लाभट

शुभेच्छा! मजा करा, सांभाळून जा, या, आणि आम्हाला सचित्र वृत्तांत सादर करा आल्यावर.

गेली अनेक वर्ष हे स्वप्न उराशी बाळगून असलेला,
वेल्लाभट.

प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा !

झूमकार ची एस. यू. व्ही. घेऊन जाऊ शकता तुम्ही.

तिकडे झूमकार वर हल्ले होतात असे Teambhp.com वर वाचले आहे. शक्यतो स्वतःची गाडी न्यावी त्यातही खार्दुंगला पासला जाताना आमची आरसी बुके आणि आयडी कार्ड चेक केली होती.

त्यामुळे नीट माहिती घेऊन झूमकारचा पर्याय निवडावा.

वेगळा धागा काढलात ते चांगले झाले. मला चारचाकीमधले काहीही कळत नसल्याने मी माहिती देवू शकलो नाही. मिपाकर आहेतच.

तसेच आंम्ही जाताना मुक्कामाचे कोणतेही प्लॅनिंग केले नव्हते त्यामुळे तुमच्या बाबतीत हे गणित खुपच वेगळे असेल.

मनरावने दिलेला आणि मी स्वतः तयार केलेला रूट व एकंदर प्लॅनिंगचा आराखडा तयार आहे, मुद्दाम देत नाहीये. तुमच्या हाताशी भरपूर वेळ आहे त्यामुळे तुम्ही स्वतः प्लॅनिंग करा असे सुचवेन. आपण एप्रिल महिन्यात डिट्टेलमध्ये बोलूच..!

चतुरंग's picture

27 Feb 2017 - 11:45 pm | चतुरंग

तुमची मुख्य समस्या गाडीचा ग्राउंड क्लिअरंन्स आहे असे दिसते..
https://www.snapdeal.com/product/new-tech-ground-clearance-kit/684074687086
याचा काही उपयोग होईल का ते बघा. गाडीत मॉडीफिकेशन्स करुन वॉरंटी वगैरे जात नाही ना ते तपासून घ्यावे लागेल...
लहान मूल बरोबर असल्याने विशेष काळजी घ्यावी लागेल परंतु तुम्ही ती घ्यालच.
शुभेच्छा!

अभिजीत अवलिया's picture

28 Feb 2017 - 8:53 am | अभिजीत अवलिया

किरणजी ,
तुम्हाला व्य.नी. केलाय.

अमर विश्वास साहेब,
स्वतः गाडी चालवून ट्रिप करण्याची हौस असल्याने विमानाचा पर्याय नको वाटतो :)

मोनुजी,
फक्त जून ते सप्टेंबर हे ४ महिने तिथल्या लोकांचे पर्यटकांकडून उत्पन्न मिळवण्याचे महत्वाचे महिने असल्याने झुमकारवर खूप हल्ले होतात.

चतुरंग साहेब,
तुम्ही दिलेले किट चांगले वाटतेय. सर्व्हिस सेन्टरकडे अधिक चौकशी करतो.

मोदकराव,
सहमत. स्वतः प्लॅनिंग करण्यात जास्त मजा येईल. आणी जाण्यापूर्वी एकदा भेटेनच.

भटकंती अनलिमिटेड's picture

28 Feb 2017 - 10:28 am | भटकंती अनलिमिटेड

फिगोचा ग्राऊंड क्लियरन्सचा प्रॉब्लेम आहेच तसा. पण इच्छाशक्तीच्या जोरावर ही ट्रिप तुम्हांला पूर्ण करता येईल. लडाखचे रस्ते मोठमोठाल्या खड्ड्यांनी भरलेले (किंवा खड्डे रस्त्यांनी भरलेले आहेत). खारदुंगला, रोहतांग, झोजिला अशा ठिकाणी रस्ते अधिकाधिक खराब होतात. जूनमध्ये नुकतेच रस्ते खुले केल्याने खूप खराब असू शकतात. परंतु पेशन्स कायम ठेवून ही ट्रिप पूर्ण करता येईल. खड्ड्यांमधून गाडी काढणे यासाठी थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. राजमाचीच्या रस्त्यांवर किंवा मुळशी-लोणावळा यांना जोडणारे जे दोन आडरस्ते आहे तिथे ही प्रॅक्टिस नियमित करा.

गाडीच्या जुजबी मेंटनन्स शिकून घ्या. जसे टायर बदलणे, ट्युबलेसची पंक्चर काढणे, ओव्हरफ्लो फ्युएल झाल्यास ते ड्रेन करणे, एअर फिल्टर साफ करणे, फ्युएल पंप हाताने ऑपरेट करणे वगैरे. गाडीला खालच्या बाजूने एक ५ एमएम जाडीची स्टील प्लेट मारुन घ्या. किमान ऑईल चेंबर आणि अन्य प्रमुख पार्ट्स कव्हर होतील असे करा. फिगोचा क्लियरन्स थोडा कमी असल्याने ऑइल संप खूप vulnerable असतो. मी स्वतः ते फुटण्याचा अनुभव घेतला आहे. सस्पेन्शनमध्ये काही वेळा पितळी बुश टाकल्यास त्याचा फायदा होतो. तोही पर्याय तपासून पहावा. गाडीत किमान पाच-सहा लिटर इंधन, एक वेळला रिफिल होईल एवढे ऑईल आणि कूलंट जवळ ठेवा. आणि अतिमहत्त्वाचे म्हणजे एवढ्या लांबच्या प्रवासासाठी एक सराईत बॅकअप ड्रायव्हर गरजेचा आहेच.

रस्ते, ठिकाणे यांबद्दल अधिक माहिती लागल्यास व्यनि करा. फक्त तीन ट्रिप्स झाल्या असल्याने मला जुजबी माहिती देता येऊ शकेल.

भटकंती अनलिमिटेड's picture

6 Mar 2017 - 12:46 pm | भटकंती अनलिमिटेड

कंपनीचे शोरूम सस्पेन्शनमध्ये कोणतेही बदल करून देणार नाही कारण त्याने वॉरंटी void होते असे त्यांचे म्हणणे असेल. तुम्ही ते सप्सेन्शनचे बदल बाहेरुन करुन घेणे उत्तम राहील. आणि लडाख ट्रिप पूर्ण झाली की ते बुशेस काढून टाकायचे जेणेकरुन वॉरंटी असेल ती पूर्ववत चालू राहील. रॅली कारचे मॉडिफिकेशन करणार्‍या गॅरेजेसमध्ये तुम्हांस ही माहिती मिळेल.

राहिला प्रश्न रस्त्याबद्दल. तर... त्याचे उत्तर असे आहे की नॅनो कारने देखील लडाख ट्रिप पूर्ण करु शकते. पण त्यासाठी आवश्यक घटक म्हणजे दोन कुशल चालक, चालकांची मानसिक आणि शारीरिक तयारी, कारची तयारी आणि सराव. राजमाचीचा रस्ता "बरा ते खड्ड्यांचा खराब रस्ता" या कॅटेगरीत असेल तर खारदुंगला-झोजिला हे रस्ते "खड्ड्यांचे खराब ते अजिबात नाही" या कॅटेगरीतले मानावेत. साधारण लडाखमधल्या रस्त्यांपैकी २५-३०% प्रवास खराब रस्त्याने आहे असं गृहीत धरा.

शुभेच्छा!

भटकंती अनलिमिटेड's picture

6 Mar 2017 - 12:46 pm | भटकंती अनलिमिटेड

माझ्या माहितीतल्या एकाने रेड-डी-हिमालय रॅली अल्टो घेऊन पूर्ण केली होती. आणि त्याच वेळी एक कपल नॅनो घेऊन तीच रॅली करत होते. तेव्हा फिगोला अवघड असे काही नाही. योग्य मेकॅनिक (कम सल्लागार) शोधा. त्याला सविस्तर तुम्हांला काय हवंय ते सांगा आणि तसे बदल करुन घ्या. एक बार ठान ली तो फिर मागे नै हटने का. प्रत्यक्ष ड्राइव्हमध्ये काय काय लागेल ते मी तुमचा प्लॅन फिक्स झाला की सांगेनच. जूनचा पहिला आठवडा म्हणजे नुकतेच रस्ते ओपन झालेले असतात आणि रुळलेले नसतात. पुढे जसे जसे दिवस सरकतील तसे बीआरओ ते रिपेअर आणि वापरणेबल करते.

भटकंती अनलिमिटेड's picture

6 Mar 2017 - 12:48 pm | भटकंती अनलिमिटेड

योग्य महिना राहील जायला का ऑगस्ट वगैरे ?
>> होय. ऑगस्ट चांगला असेल. जुलैच्या सेकंड हाफपासून रस्ते बर्‍यापैकी रुळते झालेले असतात.

योग्य महिना राहील जायला का ऑगस्ट वगैरे ?
>> गाडीत किती लोड असेल? सामान वगैरेचेही वजन लक्षात घ्या. फिगोत पाच सीट बसले की गाडी बसते एकदम खाली. हे एकदा वाचून पहा. याने राउंड क्लिअरन्स वाढणार नाही, पण खड्ड्यांत गाडी आपटण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल.
https://www.team-bhp.com/forum/technical-stuff/98946-coil-spring-adjuste...

रस्ते रुळते झालेले असले तरी बर्फ कमी झालेला असेल ना..?

ऑगस्टमध्ये हे असे दृष्य दिसणार का..?

.

भटकंती अनलिमिटेड's picture

7 Mar 2017 - 11:35 am | भटकंती अनलिमिटेड

खरं आहे. असे दृश्य दिसणार नाही. पण त्यांची फिगो गाडी पाहता सीझनमध्ये लवकर जाऊ नये असं माझं म्हणणं आहे. SUVअसेल तर काय मग रस्ते ओपन झाल्या झाल्या गेलं तरी हरकत नाही.

किरणजी's picture

28 Feb 2017 - 10:46 am | किरणजी

दिवस १: पुणे ते वडोदरा
२: वडोदरा ते अम्रुतसर (आम्ही येथे पर्यंत bachelor होतो, त्यामुळे इतके जोरात आलो. कुटुंब विमानाने आले)
३: अम्रुतसर (सुवर्ण मंदिर, वाघा border)
- जेवण : केशर दा ढाबा ला करा, सगळे पदार्थ खुप छान मिळतात
४:अम्रुतसर ते पटणी टॉप
- मुक्काम : हॉटेल सँमसन
- पटणी टॉप येथील अरोरा ची मिठाई जरूर खा
५: पटणी टॉप ते श्रीनगर
- मुक्काम : new lucky start group of house boats
- मांसाहरी असाल तर मटण वाझवान, तबक माझ,रोगन जोश चुकवू नका
६: श्रीनगर ते कारगिल
- मुक्काम : हॉटेल जोझीला
- जाताना कारगिल वॉर मेमोरियल लागते त्यासाठी वेळ ठेवा
७: कारगिल ते लेह
- जाताना लामायारु मॉनेस्टरी, मुनलँड, फोटु ला पास, magnetic हिल (ह्यात काही दम नाही, गाडी आपोआप ओढली जात नाही) लागेल
मुक्काम : हॉटेल हॉलिडे लडाख
८: लेह
- हॉल ऑफ फेम, शांती स्तुप, हेमिस गोनपा, शे पलेस, थिकसे मॉनेस्टरी
- लेह मार्केट / मोती मार्केट मध्ये थंडी चे कपडे छान मिळतात, खुप घासाघीस करावी लागते
- Wok restaurant आणि Kang La Chen इथे तिबेटियन जेवण छान मिळते
- वाझवान रेस्टॉरंट मध्ये कश्मिरी जेवण मिळते
- टैक्सी स्टँड पाशी एक टपरी आहे, तिथे कावा, चहा, ऑम्लेट-रोटी मस्त मिळते
९: लेह ते नुब्रा व्हली
१०: लेह ला परत
११: लेह ते पँगोंंग लेक
१२: लेह ला परत
आम्ही येताना रोहतांग मार्गे येणार होतो पण तेव्हा (९-जुन-२०१५) रोहतांग पास चालु झाला नाही त्यामुळे येताना पण जोझीला मार्गे आलो
१३: कारगिल
१४: पटणी टॉप
१५: रोहतक
१६: चित्तोरगढ (family ला जयपूर वरुन विमान होते)
१७: पुणे

मोदक's picture

28 Feb 2017 - 1:23 pm | मोदक

वडोदरा ते अम्रुतसर

__/\__ दंडवत घ्या राजे.. १३००+ किमी एका दिवसात. कोणती गाडी होती..??

तसेच

"लेह - नुब्रा व्हली - लेह - पँगोंंग लेक - लेह" असा प्रवास करण्याचे कांही विशेष कारण..? लेह - नुब्रा- पँगाँग - लेह असे करता आले असते की.

वेल्लाभट's picture

28 Feb 2017 - 2:02 pm | वेल्लाभट

कोणती गाडी होती..??

डझन्ट मॅटर. अ कार इज अ‍ॅज गुड अ‍ॅज द ड्रायव्हर.

हलकेच घ्या. फरक अर्थातच पडतो, पण हे वाक्य आठवलं म्हणून टाकलं.

मोदक's picture

28 Feb 2017 - 3:12 pm | मोदक

=))

तरीपण १३०० किमी एका दिवसात म्हणजे भारी आहे राव. सगळे हायवे खूपच चांगले आहेत. पण गाडी कोणती आणि एकूण वेळ आणि थांबे कसे मॅनेज केले ते वाचायला नक्की आवडेल.

समजा १४० च्या वेगाने गाडी चालवली तरी फ्युएल, टोल आणि ट्रॅफिक यांमुळे वेग ताशी ९० च्या दरम्यानच आला असेल. म्हणजे १४ तास ड्राईव्हिंग टाईम झाला. मग ब्रेक कधी घेतले आणि कसे..?
किती ड्राईव्हर होते..?

किरणजी's picture

28 Feb 2017 - 7:20 pm | किरणजी

एकदा वेळ काढून लिहीतो सविस्तर

किरणजी's picture

28 Feb 2017 - 7:16 pm | किरणजी

नवी कोरी डस्टर होती, बराच रस्ता १६० नी गेलो आम्ही.
आम्ही "लेह - नुब्रा व्हली - लेह - पँगोंंग लेक - लेह" असा प्लॅन केला होता पण शेवटी लेह - पँगाँग -नुब्रा - लेह असअसाकरावा लागला (कारण खारदुंग ला बंद होता)
पण मी श्युर नव्हतो की फिगो ला शायोक चा रस्ता recommend करवा की नाही, म्हणून हा रस्ता सांगितला

अभिदेश's picture

28 Feb 2017 - 10:15 pm | अभिदेश

पण बरेच लोक पुणे ते उदयपूर असा पहिला टप्पा करतात. अमृतसरला केसर ढाबाला पर्याय नाही..

भटकंती अनलिमिटेड's picture

1 Mar 2017 - 10:50 am | भटकंती अनलिमिटेड

फिगो किंवा कुठल्याच हॅचबॅक कारला शयोकचा रस्ता recommend करु नका.

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2017 - 8:27 am | पिलीयन रायडर

तुमच्या प्रवासाला शुभेच्छा!

स्रुजा सारखंच म्हणते. शक्य तितके व्हिडिओ घ्या. आल्यावर फोटोंमागे व्हॉईस ओव्हरही टाकु शकाल (समजा नाही जमलं तेव्हाच व्हिडिओ करायला तर...) ह्याचा वृतांत युट्युब वर टाकण्याचे जमले तर फार मजा येईल. मदतीला आम्ही आहोतच!

सविता००१'s picture

4 Mar 2017 - 8:38 am | सविता००१

प्रवासाला शुभेच्छा!
मस्त मजा करा

संदीप ताम्हनकर's picture

4 Mar 2017 - 8:55 pm | संदीप ताम्हनकर

शुभेच्छा. बाकी हल्ली सिझनला लडाख मध्ये अनेक ठिकाणी ट्राफिक जॅम चा अनुभव येतो असे ऐकलेय. मी ३ वेळा पुण्यातून गाडीने गेलोय.
मारुती झेन ने केलॉन्ग पर्यंत. हे म्हणजे 'व्हेअर एन्जल्स फीअर, फूल्स डेअर' असाच प्रकार होता.
नंतर गेटझने (पॅंगॉन्ग सोडून) लडाख. या गाडीला खालून जाड पत्रा बसवून घेतला होता. तरी पेंगोंग लेक ला ग्लेशिअर खालून येणाऱ्या रस्त्यातून वाहत्या प्रवाहातून जाता आले नाही.
म्हणून मग फोर व्हील मारुती जिप्सीने पुण्याहून सिमला कैलास किन्नोर की काझा किब्बर शुगर पॉईंट चायना बॉर्डर केलोंग सारचू लेह खार्दुन्ग ला पेंगोंग परत लेह आणि द्रास कारगिल श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर बाघा बॉर्डर श्री गंगानगर बॉर्डर जयपूर पुणे असे आलो.
आणि एकदातर मारुती ८०० ने नेपाळ फिरलोय. दोन तीन अस्सल ड्रायव्हर हवेत. काळजीपूर्वक चालवली तर सगळीकडे जात येते.
मोठी रिम व्हील टाकू नका. टायर आणि कार बॉडी मधील स्पेस कमी होते आणि खड्ड्यात टायर आतून बॉडीला घासतो. दोन स्पेअर व्हील, इंधन कॅन सोबत ठेवा. आपली बाजू धरून गाडी चालवायचा सराव करा. बाकी मेडिकली फिटनेस, अकलमटायझेशन हे पण समजून घ्या.

जुन २०१६ - रोहतांग आणि जोझिला सोडले तर कुठेही ट्रॅफिक लागले नाही.

कारगिल - श्रीनगर - पटनीटॉप - पठाणकोट रस्त्यावर बहुतांश उद्दाम काश्मिरींचे ड्रायव्हिंग सहन करत यावे लागले. सरसकटीकरण आहे माहिती आहे पण खूपच कमी प्रमाणात सेन्सीबल ड्रायव्हर भेटले.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Mar 2017 - 11:29 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रवासाला शुभेच्छा!!!

गाडीच्या फ्युएल टँक, ऑईल संप वगैरेंच्या खाली एखादा सेंटिमीटर जागा सोडुन स्टील शीट्स लावुन घ्या जेणेकरुन गाडी घासली तरी थेट फ्युएल टँक आणि ऑईल संप ला डॅमेज होणार नाही. बाकी सविस्तर व्यनि करतो. सद्ध्या इनो घेतो.

>>>बाकी सविस्तर व्यनि करतो

इथे लिहा

पैसा's picture

5 Mar 2017 - 11:49 am | पैसा

शुभेच्छा! गाडीसोबत लहान मूल, महिला यांचीही योग्य ती काळजी घ्यालच. आवश्यक औषधे, मुलासाठी त्याचे खाणेपिणे, अचानक जवळपास काही हॉटेल दुकान दिसले नाही तर त्याला भुकेची व्यवस्था, दूध मिळाले नाही तर त्याला पर्याय (मिल्क पावडर वगैरे) पुरेसे गरम कपडे इत्यादि बरेच काही बघावे लागेल.

मनिमौ's picture

5 Mar 2017 - 12:33 pm | मनिमौ

हार्दिक शुभेच्छा.

अभिजीत अवलिया's picture

5 Mar 2017 - 6:28 pm | अभिजीत अवलिया

मिपा परंपरेला जागून ही ट्रिप व्यवस्थित पार पडावी ह्यासाठी बरेचजण उपयुक्त माहिती देत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद.

चिमणराव,
मला जी माहिती द्याल ती इथे पण टाका. म्हणजे भविष्यात ट्रिप करू इच्छिणाऱ्या सगळ्यांना उपयुक्त होईल.

भटकंती अनलिमिटेड's picture

6 Mar 2017 - 12:45 pm | भटकंती अनलिमिटेड

इतरांच्या माहितीकरिता मीही आपले व्यनिवर झालेले संभाषण इथ पोस्ट करतो. झालाच कुणाला फायदा तर.

किल्लेदार's picture

13 Mar 2017 - 8:42 am | किल्लेदार

प्रवासासाठी शुभेच्छा !!!

माझ्याकडे XUV 500 automatic आहे, आणखी २-३ गाड्यांचा ग्रुप बनवुन जायचा विचार करतोय. पण यातील एकपण गाडी ४*४ नाही, तर उंची आणी विरळ वातावरनात काही त्रास होणार नाही ना ?