कदाचित (भयगुढ कविता)

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जे न देखे रवी...
22 Feb 2017 - 11:00 am
कदाचित ही फक्त हवा असेल जी चाल करून येतीये विव्हळणाऱ्या जीर्ण फांद्यांना खिडक्यांवर फटकारतीये कदाचित हा फक्त पाऊस असेल जो ढगांना प्रसवतोय दाराछतातून टपटपून अंगावर बर्फशहारे आणतोय कदाचित ह्या फक्त सावल्या असतील ज्या श्वापदांसारख्या दिसताहेत सराईत शिकाऱ्यासारख्या मला चारीबाजूंनी घेरताहेत कदाचित हा फक्त कावळा असेल जो आत्ताच खिडकीवर धडकलाय रक्ताळलेली चोच आदळून काचांना तडे देत सुटलाय कदाचित हा फक्त भास असेल कुणीतरी जोरात किंचाळल्याचा आपोआप दिवे विझल्याचा अन मानेवरच्या उष्णगार श्वासांचा कदाचित भासच असेल हा कदाचित स्वप्न असेल कदाचित... ती आली असेल -----------------------------------------------
प्रेम कविताभयानककविताशब्दक्रीडा

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2017 - 11:45 am | अत्रुप्त आत्मा

व्वाह! मजा आ गया.

पद्मावति's picture

22 Feb 2017 - 2:54 pm | पद्मावति

वाह, क्या बात है! मस्तच.
आणि बर्फशहारा हा शब्दाला सुपर लाइक.

पैसा's picture

22 Feb 2017 - 5:51 pm | पैसा

खरंच भीतीदायक!

अॅस्ट्रोनाट विनय's picture

22 Feb 2017 - 6:38 pm | अॅस्ट्रोनाट विनय

सर्वांना धन्स. _/\_

ती कोण आहे आणि का आली असेल याबद्दल कोणाला काय अर्थ लागला वाचायला आवडेल

एक एकटा एकटाच's picture

23 Feb 2017 - 4:35 pm | एक एकटा एकटाच

कदाचित हां फ़क्त इशारा असेल
ती परत आल्याचा
राज्य तिचे, डाव तिचा
खेळ जीवघेणा प्रतिशोधाचा

- एक एकटा एकटाच

एक एकटा एकटाच's picture

23 Feb 2017 - 7:33 am | एक एकटा एकटाच

मस्त

आवडली

सचिन७३८'s picture

23 Feb 2017 - 11:51 am | सचिन७३८

कदाचित ती आली असेल, रक्त तहान विझवायला,
न शमणाऱ्या तृष्णेला, वेदना हुंकारांनी सजवायला!
बेसावध देह आपल्या नखांनी लुचायला,
आसुसली अंधारी रात्र, मला काळगर्तेत ओढायला!!!

सिरुसेरि's picture

24 Feb 2017 - 4:58 pm | सिरुसेरि

ती कोण आहे आणि का आली असेल याबद्दल कोणाला काय अर्थ लागला वाचायला आवडेल

---- निवडणुक ?

भयानक प्रेमकविता, जबरदस्त जमलेली !

अॅस्ट्रोनाट विनय's picture

24 Feb 2017 - 10:51 pm | अॅस्ट्रोनाट विनय

सर्वांना कविता आवडली याचा आनंद आहे.

ती बद्दलच्या अनेकाविध शक्यतांच्या गर्तेत डुंबवल्याबद्दल आभारी

सचिन७३८'s picture

25 Feb 2017 - 12:31 pm | सचिन७३८

शांतचित्त भक्ष्य ते एककल्ली निजले,
शमविण्या कंडू तीचे हात दोन झेपावले,
भ्रम तीचा असा की सहज सावज मिळाले,
पण सत्यास सामोरे जाता तीचे अवसान गळाले!

सावज शिकाऱ्याच्या जाळ्यात होते,
तीला भुलविण्या नाटक रंगले होते,
सुटण्याची धडपड व्यर्थ कळून चुकली,
ही चकवी रात्र पुन्हा डाव खेळून गेली!