व्हॉट्सॅपिय दावे

Nitin Palkar's picture
Nitin Palkar in काथ्याकूट
20 Feb 2017 - 1:03 pm
गाभा: 

व्हॉट्सॅपिय दाव्यांची इतकी दखल घेऊ नका.--- डॉ सुहास म्हात्रे
या वरून सहज सुचलं ......
मुंबई पोलीस, डॉ. अमुक अमुक रामभरोसे हॉस्पीटल अथवा मेजर सो and सो अशांच्या नवे प्रसारित होणारे खोटे संदेश.

प्लीज हे वाचा...
तुम्हांला माहित आहे का?
जर का तुम्हांला तुमच्या एटीएम (ATM)
कार्डासमवेत
तुमचं अपहरण केलं तर काही काळजी करू
नका, तुम्ही त्यास
अजिबात विरोध करू नका,
अपहरणकर्त्याच्या सांगण्यानुसार ATM मशीनमध्ये तुमचं
ATM कार्ड
टाका. तुम्ही काळजी करण्याचं
काहीही कारण नाहीये .
त्यामुळे फक्त तुम्ही अपहरणकर्ते सांगतात
त्याप्रमाणे
त्यांना पैसे काढून द्या.
पण आपल्या ATMचा कोडवर्ड
हा उलटा टाईप करा.
समजा जर का आपला कोडवर्ड १२३४ असेल
तर
त्या जागी ४३२१ असा टाईप करा.
आणि मग त्यानंतर
पाहा काय होतं ते. तुम्ही नंबर
उलटा टाईप केल्याने
ATM मशीनला कळेल की,
तुम्ही काही तरी अडचणीत
आहात. त्यामुळे ATM मशीनमधून पैसे बाहेर
तर येतील
मात्र तेही अर्धे आणि अर्धे पैसे अडकतील
मशीनमध्येच.
याच दरम्यान तुमची ATM मशीनला कळेल
की,
तुम्ही फारच अडचणीत आहात . आणि ते
जाणवल्याने ATM
मशीन ही तुमच्या बँकेला आणि जवळील
पोलीस
स्टेशनला ही सुचना देईल,
आणि त्याचबरोबर
ATMचा बँकेचा दरवाजा देखील लगेचच बंद
होईल.
आणि अपहरणकर्त्याला काहीही न
कळता तुम्ही सुरक्षितरित्या वाचू शकता.
ATM मध्ये
पहिल्यापासूनच सिक्युरिटीबाबत
अशी सोय करण्यात
आली आहे याबाबत फारच
कमी लोकांना माहित आहे. तर
तुम्ही अपहरणाकर्त्याला सहजपणे पकडून
देऊ शकता.
प्रत्येकाने हि पोस्ट शेअर करून
तुमच्या मित्रांना पण
ह्याबद्दल सांगा...
From...
MUMBAI POLICE

या सारखे निखालस खोटे संदेश चक्क मुंबई पोलिसांच्या नावाने प्रसारित केले जातात. असे तुमचेही अनुभव इथे शेअर करा....

प्रतिक्रिया

गवि's picture

20 Feb 2017 - 1:47 pm | गवि

हॅहॅहॅ..

आताशा वॉटसॅपवर काही माहिती येणे हाच ती माहिती खोटी असल्याचा एक पुरावा असतो.

गॅरी ट्रुमन's picture

20 Feb 2017 - 1:56 pm | गॅरी ट्रुमन

मागे शिवथरघळीविषयी असे कैच्याकै दावे आले होते. म्हणे जीपीएस उपग्रह शिवथरघळ कॅप्चर करू शकत नाहीत म्हणून तिथे बुद्धी विचलित होत नाही. रामदासस्वामींनी त्या कारणासाठी दासबोध लिहायला शिवथरघळीची निवड केली :)

एकतर रामदासस्वामींच्या काळी जीपीएस उपग्रह नव्हते हे पोस्ट लिहिणार्‍यांना माहिती नसावे. आणि दुसरे म्हणजे जगातील कुठचेही महत्वाचे विद्यापीठ घ्या-- एम.आय.टी, हार्वर्ड, शिकागो, केंब्रिज इत्यादी. त्यातील प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक इमारत जीपीएस उपग्रह कॅप्चर करू शकतात. तरीही तिथल्या प्राध्यापकांची बुद्धी विचलित होत कशी नसावी हेच समजत नाही. प्रिन्सटनमध्ये तर एकेकाळी अल्बर्ट आईनस्टाईनही प्राध्यापक म्हणून होते :)

पण आईन्स्टाईन च्या काळात कुठे होते जीपीएस? म्हणूनच तर त्यांची बुद्धी विचलित झाली नाही. त्यानंतरच्या, म्हणजे जीपीएस आल्यानंतरच्या काळात त्यांच्या तोडीचा एक तरी शास्त्रज्ञ झाला आहे का? अध्यात्म आणि स्पेस टाईम ह्या सामान्यांचा बुद्धीपलीकडच्या गोष्टी आहेत. आत्ताचे जीपीएस सिग्नल टाईम ट्रॅव्हल करून रामदासांच्या काळात गेले असते आणि रामदासांचे चित्त विचलित केले असते तर? म्हणून रामदासांनी फूलप्रूफ प्रोटेक्शन साठी शिवथर घळ निवडली. जी स्पेस टाईम थिअरी आईन्स्टाईन ला जेमतेम कळली ती रामदासांना आधीच माहित होती . त्यांनी लिहून ठेवले नाही तरी त्यांच्या ह्या कृतीवरून सहज समजते. आता त्यांचा नावाकडेच बघा RAM DAS म्हणजे Random Access Memory व Distributed Antenna System ह्या गोष्टी तेव्हा खूपच प्रचलित होत्या हे वेगळे सांगायला नको. आजच्या काळात शोधक नजरेने पाहण्याची वृत्ती लोप पावली आहे. केवळ उथळ थट्टा करणाऱ्यांचा जमाना आला आहे.

आता त्यांचा नावाकडेच बघा RAM DAS म्हणजे Random Access Memory व Distributed Antenna System ह्या गोष्टी तेव्हा खूपच प्रचलित होत्या हे वेगळे सांगायला नको.

हहपुवा

sagarpdy's picture

20 Feb 2017 - 2:13 pm | sagarpdy

नोटेत GPS ट्रॅकिंग

धर्मराजमुटके's picture

20 Feb 2017 - 2:14 pm | धर्मराजमुटके

व्हॉटसअप वर विश्वास नांगरे पाटील जास्तच फेमस आहेत. ते अगदी मोबाईलच्या बॅटरीपासून कशाकशावरही सल्ले देतात. त्यांनी बिचार्‍यांना आपला कामधंदा सोडून हे एकच काम हाती घेतले आहे असे वाटते.

काही मेसजची सत्यता पडताळणे शक्य नसते मात्र काहींची पडताळणी करणे शक्य आहे. तुम्ही दिलेल्या फॉरवर्डप्रमाणे एकदा उलटा पासवर्ड टाकून पहा व पोलीस आणि बँक मदतीला येतात काय ते ह्या मेसेज पाठविणार्‍याला आणी आम्हाला देखील एकदा कळवा.

अशा प्रकारची कोणतीही पध्दत अद्यापतरी जगभरात कुठेही अस्तित्वात नाही.

पुंबा's picture

20 Feb 2017 - 3:13 pm | पुंबा

आणि प्रकाश आमटे पण.. :))) फ्रीज केलेले लिंबू काय आणि काय काय..

समाधान राऊत's picture

20 Feb 2017 - 5:48 pm | समाधान राऊत

जर संकेतांक 4444 ,9889 प्रमाणे असेल तर

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2017 - 2:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

जेथे कोणीही, कोणताही संदेश, कोणत्याही संपादनाविना/जबाबदारीविना टाकू शकतो आणि/किंवा पुढे ढकलू शकतो अश्या व्हॉट्सॅपसारख्या मुक्त सामाजिक माध्यामांतल्या (सोशल मेडिया) माहितीला त्याच्या लायकीएवढेच महत्व द्यावे... पक्षी : विश्वासू स्त्रोताकडून खात्री करून घेतल्याशिवाय त्या माहितीवर विश्वास ठेऊ नये.

हा सर्वांनी, सर्वकाळ, सर्व बाबतीत पाळावा असा सुरक्षेचा मानदंड आहे, हे सांगायची गरज आहेच का ? मुख्य म्हणजे अशी पडताळणी करण्यासाठी अनेक सहज आणि सोपे मार्ग उपलब्ध आहेत.

त्यामुळे, अफवा, द्वेष किंवा गैरसमज पसरवणारे संदेश प्रसारित करणे गैर (काही उदाहरणांत बेकायदेशीरही) आहेच. परंतू, तश्या कोणत्याही माहितीवर डोळे मिटून विश्वास ठेवल्याने नुकसान झाल्यास, तसे करणारा स्वतःच्या बेजबाबदारपणाचे समर्थनही करू शकत नाही.

उदाहरणार्थ,

१. लेखातल्या उदाहरणात पोलिसांशी संबंध असलेली माहिती आहे. अश्या बाबतीत पोलिस खात्याकडे चौकशी करून खात्री करून मगच विश्वास ठेवावा. यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या संस्थळावर (http://www.mahapolice.gov.in/ ) फोन व व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग करावा किंवा जवळच्या पोलिस चौकीत जाऊन चौकशी करावी. किंवा पोलिसांनी उपलब्ध केलेले चौकशी करण्याचे इतर मार्ग वापरावेत.

२. सामाजिक माध्यमांत फिरणार्‍या संशयित माहितीच्या खरे-खोटेपणाची शहनिशा करून सत्य सांगणारी अनेक मुक्त संस्थळे जालावर उपलब्ध आहेत. त्यातली काही खाली देत आहे...

Snopes : http://www.snopes.com/
About Urban Legends : http://urbanlegends.about.com/
Break The Chain : http://www.breakthechain.org/
TruthOrFiction.com : http://www.truthorfiction.com/
Sophos : http://www.sophos.com/security/hoaxes/
Hoax-Slayer : http://www.hoax-slayer.com/swine-flu-fear-mongering.shtml
VMyths : http://www.vmyths.com/
Symantec : http://www.symantec.com/business/security_response/threatexplorer/risks/...
Hoax Busters : http://www.hoaxbusters.org/
Virus Busters : http://virusbusters.itcs.umich.edu/hoaxes.html

जरा थोडे अधिक जालोत्खनन केले तर अजूनही नक्की सापडतील.

***************

सावधान !

मुक्त, मोकळ्या आणि वेगवान इन्फर्मेशन हायवेचा उपयोग करायला लायसन्स लागत नाही,
पण त्याचा निर्धोक उपयोग करायचा असेल तर...
त्यावरचे धोके आणि सुरक्षा नियम/उपाय स्वतःला माहीत असणे अत्यावश्यक आहे...
केवळ दुसर्‍यांना दोष देऊन झालेले नुकसान भरून मिळणार नाही ! :)

***************

विशुमित's picture

20 Feb 2017 - 2:43 pm | विशुमित

धन्यवाद सर..!!

गवि's picture

20 Feb 2017 - 2:54 pm | गवि

INDIA चा अर्थ Independent Nation Declared In August.

अहाहा.

ब्रिटिश किती द्रष्टे होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वेळेपासून त्यांनी ठरवून ठेवलं होतं की भारताला स्वातंत्र्य द्यायचं आणि तेही कधीतरी कुठच्यातरी वर्षी ऑगस्टमधेच..

स्मिता.'s picture

20 Feb 2017 - 5:23 pm | स्मिता.

अगदी अगदी! दर वर्षी १५ ऑगस्टच्या आसपास कोणत्या ना कोणत्या गृपमधे हा मॅसेज येतो.
कळस म्हणजे २ वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीला मी हे वरचं उत्तर दिलं होतं त्याच व्यक्तीने गेल्या वर्षी पुन्हा तोच मॅसेज त्याच गृपवर फॉर्वर्ड केला होता.

इरसाल कार्टं's picture

21 Feb 2017 - 12:35 pm | इरसाल कार्टं

हेच्यावरून तर लै झापलं होतं मी एकाला.

मराठी कथालेखक's picture

20 Feb 2017 - 3:11 pm | मराठी कथालेखक

रक्तातील सामन्य (किंवा योग्य ) साखरेची पातळी आंतरराष्ट्रीय संस्थेने कशी औषध कंपन्यांच्या दबावात खाली आणली आणि त्यामुळे मधूमेहाचे रुग्ण वाढलेले दिसलेत याबद्दल एक संदेश आहे. त्यात बहूधा तथ्य असावे असे दिसते.

पण या संदेशावरुन कुणीतरी रक्तदाबाबद्दलही असाच संदेश प्रसृत केला. म्हणे १६०-११० ही खरेतर रक्तदाबाची योग्य पातळी होती , औषध कंपन्यांच्या दबावात आता १२०-८० इतकी खाली आणली आहे !!

पुंबा's picture

20 Feb 2017 - 3:15 pm | पुंबा

मला प्रश्न पडतो, हे इतके भुक्कड, फालतू पण कल्पक असत्य प्रसवणारे महाभाग असतात तरी कोण? त्यांचा हेतू काय असतो नक्की. आपण लिहितोय ते खोटे आहे हे सहज कळू शकेल असे असतानासुद्धा सफाईदारपणे थापा मारत असतात.

मराठी कथालेखक's picture

20 Feb 2017 - 3:25 pm | मराठी कथालेखक

१४ फेब्रुवारी - शहीद दिन !!

गॅरी ट्रुमन's picture

20 Feb 2017 - 3:36 pm | गॅरी ट्रुमन

नासाच्या उपग्रहांनी दिवाळीच्या रात्री काढलेला भारताचा फोटो:

D

गामा पैलवान's picture

20 Feb 2017 - 6:06 pm | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

भारत-पाक सीमारेषा स्पष्ट दिसतेय. मात्र भारत-बांगलादेश सीमा दिसंत नाहीये. पाक सीमेवर कुंपण घालून प्रखर दिवे लावलेत काय? की ही प्रतिमा संशयास्पद आहे? खखोदेजा.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

20 Feb 2017 - 6:10 pm | गामा पैलवान

अधिक माहिती : https://fossbytes.com/truth-behind-real-fake-picture-india-space-diwali-...

-गा.पै.

दूध आईस्क्रीम व्हर्सेस "डालडा" आईस्क्रीम...

व्हेजिटेबल ऑईल बेस्ड डेझर्ट म्हणजे अनारोग्यकारक "डालडा". ते फ्रीज नसला तरी वर्षभर वितळत नाही म्हणे. .

डेयरी फॅट्स (सॅच्युरेटेड) मात्र शुद्ध आणि आरोग्यदायी.) ते स्वदेशी, गोज विदाऊट सेईंग.)

मराठी कथालेखक's picture

20 Feb 2017 - 3:48 pm | मराठी कथालेखक

दूध आईस्क्रीम व्हर्सेस "डालडा" आईस्क्रीम...

व्हेजिटेबल ऑईल बेस्ड डेझर्ट म्हणजे अनारोग्यकारक "डालडा". ते फ्रीज नसला तरी वर्षभर वितळत नाही म्हणे

पण हे तर खरं आहे ना ? त्या संदेशात वितळण्याबद्दल नाही म्हंटलंय, खराब न होण्याबद्दल म्हंटलय.
आणि क्वालिटी वगैरे बरेचसे 'आईसक्रीम' हे फ्रोझन डेझर्ट असतात हे ही खरंच आहे..म्हणजे आपण त्यांना आईसक्रीम म्हणतो पण त्या पॅकवर आईस्क्रीम असं लिहिलेलं नसतंच

व्हॉट्सअ‍ॅपीय दाव्यांचं एवढं काही वाटत नाही. फेकिंग न्यूज किंवा दि ओनियन वाचल्याचा आनंद मिळतो.

पण सर्वात विषाद वाटतो ती फॉर्वर्ड करणार्‍यांच्या कोडगेपणाचा.

दाव्याच्या सत्यतेबद्दल शंका व्यक्त केली की "तुझा नांगरे पाटलांवर / मुंबई पोलिसांवर / नासावर / आमट्यांवर विश्वास नाही??? देशद्रोही कुठला!" वगैरे म्हणतात. पुराव्यानिशी खोटेपणाचं माप पदरात घातलं की "अरे फॉर्वर्ड होता... मी काय सगळं तपासत बसू की काय!" वगैरे बचाव करतात.

अशाच एका फॉर्वर्डखोर शाळकरी मित्राला "उद्या तुला मुलगा झाला तरी त्या दाव्याच्या सत्यतेविषयी आम्हाला शंका वाटेल" असं लिहिलं तर तो तुफान भडकून बोलायचा बंद झाला आहे ;)

सूडोसायन्सवाल्यांपेक्षा 'घाणघापूरचा एसेमेस' किंवा 'वैभवलक्ष्मीचं व्रत' वाले परवडले.

एकुलता एक डॉन's picture

20 Feb 2017 - 4:47 pm | एकुलता एक डॉन

समजा पासवर्ड palindrome अर्थात १२२१ किंवा ३५५३ असला तर उलट कसा टाकायचा ?

वरुण मोहिते's picture

20 Feb 2017 - 5:17 pm | वरुण मोहिते

चक्क देशाच्या प्रगतीबद्दल शहानिशा न करता काहीही सेंड करतात . आयुर्वेद,इतिहास,भारतीय संस्कृती हे कायमचे विषय असतात .
आम्ही सध्या तरी म्हणजे अनेक दिवसांपासून फोटोशॉप मेसेज प्रकाराला वैतागलोय एका पक्षाच्या :))काही रामबाण उपाय आहे का ? बर जवळचे म्हणून अनब्लॉकही करता येत नाही. दिवसभर देशाची अभूतपूर्व प्रगती वाट्सअँप वर पाहत ऑफिसातील वेळ जातो .

अभिजीत अवलिया's picture

20 Feb 2017 - 5:41 pm | अभिजीत अवलिया

टुकार संदेश पाठवणारे ग्रुप्स mute करून ठेवायचे आणी रात्री एकदा फक्त काय काय पाठवले असेल ते वाचायचे. मी हेच करतो.

सोंड्या's picture

20 Feb 2017 - 5:40 pm | सोंड्या

Whatsapp वर मागे naja naja या होमियोपाथी ड्रग ची पोस्ट फिरत होती. कोणत्याही सर्पदंशावर या औषधाचे दोन थेंब तोंडावाटे घ्यावे तुम्ही बरे व्हाल लगेच आणी किंमत फक्त 5रु.
अशा पोस्ट ने जीव जाईल कोणचा.

मी-सौरभ's picture

20 Feb 2017 - 6:21 pm | मी-सौरभ

ह्या सगळ्या गदारोळात काही खरोखर ऊपयुक्त माहिती पण अफवा म्हणून दुर्लक्षलि जाते त्याचं जास्त वाईट वाटते.

धर्मराजमुटके's picture

20 Feb 2017 - 6:52 pm | धर्मराजमुटके

सहमत आहे ! पण फेस्बुक आणी व्हॉटसपच्या गटारगंगेत चुकुन सापडू शकणार्‍या एखाद दुसर्‍या मौल्यवान माहितीसाठी जास्त वेळ का घालवावा ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2017 - 8:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

ह्या सगळ्या गदारोळात काही खरोखर ऊपयुक्त माहिती पण अफवा म्हणून दुर्लक्षलि जाते त्याचं जास्त वाईट वाटते.

विश्वासार्हता नसलेल्या / गमावलेल्या कोणत्याही (यात व्हॉट्सॅप नक्कीच येते) स्त्रोतापासून उपयोगी महिती मिळविण्याची अपेक्षा ठेऊ नये.

जास्तीत जास्त "पुढील पडताळणी करण्यासाठी मिळालेला माहितीचा धागा" इतकीच व्हॉट्सॅपसारख्या स्त्रोताची पात्रता आहे.

निखळ विनोदाने मनोरंजन करण्याची; वेळेचा अपव्यय करण्याची; दुसर्‍यांना उपदेश करण्याची; आपली बरी-वाईट मते प्रसिद्ध करून विरोध न होता (किंवा पोस्ट टाकून पळ काढण्याची संधी राखून) आपल्या मनात खदखदणारा संताप/द्वेष/चेष्टा व्यक्त करण्याची; इत्यादी अनेक संधी देण्याची क्षमता व्हॉट्सॅपकडे नक्कीच आहे आणि तिचा पुरेपूर फायदा घेतला जात असल्याचे दिसत आहेच !

व्हॉट्सॅपवरील गृप्स बरेच बंदिस्त असल्यामुळे, तेथे प्रसिद्ध होणार्‍या माहितीवरून कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता तुलनेने फार कमी/नगण्य आहे. अर्थातच, त्याच्यावरील माहितीची विश्वासार्हता कमी होण्याची शक्यता बरीच जास्त जास्त झाली आहे.

त्यामुळे, "काही विशिष्ट ध्येय समोर ठेऊन आणि ठराविक नियमांवर/मुल्यांवर आधारलेले (उदा : व्यावसायिक) व्हॉट्सॅप गृप्स" सोडून व्हॉट्सॅपवरच्या इतर संभाषणाला "गल्लीच्या कोपर्‍यावर उभे राहून, थट्टामस्करी करत केलेल्या मित्रांच्या हलक्याफुलक्या संभाषणापेक्षा" जास्त महत्व देणे शहाणपणाचे होणार नाही.

आत्ताच (म्हंजे थोड्या वेळापूर्वी) ते जगातलं १ नंबरचं राष्ट्रगीत म्हणून जाहीर झालं, ते ही 'Unesco'ने जाहीर केलं.
'युनेस्को'ला काही कामधाम नव्हतं. मग असले काहीबाही उद्योग करत बसले होते.

इरसाल कार्टं's picture

21 Feb 2017 - 12:42 pm | इरसाल कार्टं

हे तर व्हाट्सअप नव्हते तेव्हापासूनचं आहे. अजून हा मेसेज फिरतोय.
कॉस्मिक किरणांचाही असाच येतो कधीकधी. तोही एस एम एस च्या जमान्यातील आहे.

बापरे! हे उलटा क्रमांक टाईप करण्याचं नुसतं वाईट नाही तर धोकादायक आहे. काय लोक असतात........

हुप्प्या's picture

21 Feb 2017 - 12:07 am | हुप्प्या

नासाने असे शोधून काढले आहे की हनुमान चालिसा ह्या परमपवित्र ग्रंथात पृथ्वी आणि सूर्याच्या मधले अंतर अत्यंत अचूकपणे सांगितले आहे. मग संबंधित ओळींचा अर्थ लावून ते कसे अचूक आहे हे समजावणे.

आता नासा ह्या संस्थेच्या कुठल्या प्रकल्पात हनुमान चालिसा अभ्यासला जात असेल? अशा प्रकारच्या प्रकारच्या प्रकल्पाला वरिष्ठांकडून मान्यता मिळवायला तो संशोधक कसा अर्ज करत असेल? "पृथ्वी व सूर्याच्या अंतराचे गणित नीट जुळत नाही. सबब ह्यातील चुका सुधारण्याकरता भारतात १६ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या एका देवाच्या स्तुतिचा ग्रंथ अभ्यासण्याची अनुमती द्यावी. त्याकरता १० दशलक्ष डॉलरचे अनुदान मंजूर करावे! " असा अर्ज केला तर त्या शास्त्रज्ञाची रवानगी मनोरुग्णालयात होणार नाही का?

बरे ती ओळ पाहिली तर त्यात काहीतरी गोलमाल लिहिले आहे. योजन म्हणजे इतके मैल वगैरे कर्व्ह फिटिंग करुन ते उत्तर आणले आहे. आणि दुसरी ओळ अशी आहे की इतका दूर असणारा सूर्य आपण फळ समजून खाऊन टाकलात. आता हे धादांत सत्य दुसर्या ओळीत असताना पहिल्या ओळीत मात्र एखाद्या वैज्ञानिकाच्या तोंडात मारेल अशी अचूकता का?

सचु कुळकर्णी's picture

21 Feb 2017 - 2:57 am | सचु कुळकर्णी

नासाने असे शोधून काढले आहे की हनुमान चालिसा ह्या परमपवित्र ग्रंथात पृथ्वी आणि सूर्याच्या मधले अंतर अत्यंत अचूकपणे सांगितले आहे.
हे मात्र लय भारी !
हनुमान चालिसा पाठ आहे कधि काळि रोज म्हणायचो, पण असले व्हॉट्सॅपिय दावे पाहिले / वाचल कि वाटत पुन्हा म्हणाव "बुध्दिहिन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुध्दि विद्या देहु मोहि हरहु कलेस बिकार" इथे कलेस, बिकार (क्लेश, विकार) म्हणजे व्हॉट्सॅप आणि असले फॉरवर्ड करणारे.

एकुलता एक डॉन's picture

21 Feb 2017 - 10:52 am | एकुलता एक डॉन

मराठा मोर्चा वेळी नासाने हेड काउन्ट केला होता म्हणे

मराठी_माणूस's picture

21 Feb 2017 - 12:23 pm | मराठी_माणूस

व्हॉट्सॅपिय फॉरवर्ड नको असतील तर ज्याने ते पाठवले त्याला खालील लिंक वाचायला द्या.

http://www.loksatta.com/baghaychi-bhumika-news/the-daily-life-of-urban-m...

धर्मराजमुटके's picture

21 Feb 2017 - 12:42 pm | धर्मराजमुटके

मंदार भारदे यांचे हे सदर जानेवारी २०१७ पासून (दर रविवार) चालु झाले आहे. अगदी पहिल्याच लेखापासून मला त्यांचे विषय भाषाशैली आवडली आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Feb 2017 - 12:48 pm | प्रकाश घाटपांडे

अफवा ,अंधश्रद्धा सुरवातीला करमणुक करतात पण नंतर समूह मनाचा कब्जा घेतात.

गामा पैलवान's picture

21 Feb 2017 - 7:40 pm | गामा पैलवान

प्रकाश घाटपांडे,

हिदी सिनेमाबद्दलही असंच म्हणता येईल, नाहीका? ;-)

आ.न.,
-गा.पै.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Feb 2017 - 8:01 pm | प्रकाश घाटपांडे

येस्स जगायला काहितरि नशा लागते ना!

सत्याचे प्रयोग's picture

21 Feb 2017 - 4:01 pm | सत्याचे प्रयोग

कोणीतरी बालक हरवल्याचा मेसेज पण फिरतो वारंवार.

संजय पाटिल's picture

21 Feb 2017 - 10:37 pm | संजय पाटिल

धोक्याचा इशारा! दुर्लक्ष करू नका

काळजी घ्या.
P/500 असे लिहलेल्या गोळ्यांचे तापाचे औषध घेऊ नये... हे नवीन औषध एक अत्यंत पांढरी शुभ्र आणि चमकदार Paracetamol(तापाची गोळी) आहे.
डॉक्टरांच्या माहीतीप्रमाणे सिद्ध केले आहे की यात "Machupo Virus व्हायरस(विषाणू) जो जगातील सर्वात धोकादायक व्हायरसपैकी एक मानला जातोय आणि या औषधामुळे मृत्युचे प्रमाण खूप जास्त आहे .

सर्व लोकांना आणि कुटुंबांना हा संदेश शेअर करा, आपल्या या कार्यामुळे त्यांचाही जीव वाचू शकतो ..... माझं कर्तव्य मी पूर्ण केले, चालूच राहील... आता आपली वेळ आहे ...

लक्षात ठेवा, देव त्यांनाच मदत करतो जे इतरांना मदत करतात.

निखालस खोटा. खालील दुवा पहा.
www.hoax-slayer.net/hoax-machupo-virus-in-paracetamol/

जेसीना's picture

22 Feb 2017 - 9:15 am | जेसीना
जेसीना's picture

22 Feb 2017 - 9:16 am | जेसीना
दिलीप सावंत's picture

22 Feb 2017 - 11:16 am | दिलीप सावंत

असा संदेश बऱ्याच ग्रुप वर पसरला होता मला तर यात काही सत्य वाटत नाही आहे. व्हॉट्सअॅप वरील संदेश पाहिले पडताळून मग त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करावा.

नितिन थत्ते's picture

22 Feb 2017 - 2:13 pm | नितिन थत्ते

a

इरसाल कार्टं's picture

22 Feb 2017 - 2:31 pm | इरसाल कार्टं

हा हा हा

धर्मराजमुटके's picture

22 Feb 2017 - 7:11 pm | धर्मराजमुटके

एका मुलाने अंडे आणि केळे पाठोपाठ खाल्ले आणी त्याच्या पोटात विष तयार होऊन तो मरण पावला !

मराठी कथालेखक's picture

22 Feb 2017 - 7:49 pm | मराठी कथालेखक

अंडं कुणाचं होतं ? झालंच तर केळं कुणाचं होतं ? :)

Nitin Palkar's picture

22 Feb 2017 - 8:41 pm | Nitin Palkar

एका मुलाने अंडे आणि केळे पाठोपाठ खाल्ले आणी त्याच्या पोटात विष तयार होऊन तो मरण पावला ! हे लिहिणारा शतमूर्ख!! त्य वर विश्वास ठेवणारा ..... मूर्ख!!!

धर्मराजमुटके's picture

22 Feb 2017 - 9:57 pm | धर्मराजमुटके

आणि ते फॉरवर्ड करणारा ?

हे तर मला एका मिपाकरानेच फोर्‍वर्ड केले. रात्री १.३० वाजता.
धन्य तो मिपाकर अन धन्य त्याच्या लीला.

वेशीवरचा म्हसोबा's picture

22 Feb 2017 - 11:10 pm | वेशीवरचा म्हसोबा

एव्हढा मोठा सव्वाशे कोटींचा देश, पण एकाची कुवत नाही व्हाट्सप, फेसबुक किंवा ओरकुटसारखं काही बनवण्याची. हे सारं बनवलं पाश्चिमात्यांनी आणि आम्ही मात्र दुरुपयोग करायला पुढे.

काय एक एक फॉरवर्ड येतात. स्त्रीबद्दल इतकं गलिच्छ आणि बिभत्स लिहीलेलं असतं की जसं काही यांना आई, बहीण, बायको कुणीच नाही. थेट आभाळातून खाली पडले. एक शंभर रुपयांचा महीन्याचा नेट पॅक मारला की चालला हे जगाला ज्ञान शिकवायला. जर या प्रत्येक फॉरवर्डला जर पैसे पडले तर एक हरामखोर लेकाचा असलं काही करणार नाही.

व्हाट्सपने खरंच असं करावं. सगळे भारतीय हितचिंतक, शुभचिंतक आपली ही सकाळ संध्याकाळ लोकांना उपदेशाचे डोस पाजण्याची समाजसेवा बंद करतील.

मराठी कथालेखक's picture

23 Feb 2017 - 6:56 pm | मराठी कथालेखक

एव्हढा मोठा सव्वाशे कोटींचा देश, पण एकाची कुवत नाही व्हाट्सप, फेसबुक किंवा ओरकुटसारखं काही बनवण्याची

अहो Hike Messenger आहे ना भारतीय कंपनीने बनवलेला. चांगला आहे आणि तो ही.

वेशीवरचा म्हसोबा's picture

24 Feb 2017 - 10:44 am | वेशीवरचा म्हसोबा

Hike Messenger तुमच्या ओळखीतले किती लोक वापरतात? :)

हैक मेसेंजर मेंढपाळांमध्ये फार लोकप्रिय आहे असं ऐकलं.

मराठी कथालेखक's picture

24 Feb 2017 - 1:23 pm | मराठी कथालेखक

काही लोक वापरतात.. त्यावर काही चांगल्या सोयी आहेत. जसे की chat hide करणे
Whats App जास्त वापरले जाते कारण ते आधी आले, लोकप्रिय झाले पण म्हणजे तेच सर्वोत्तम आहे, Hike चांगले नाही असं काही नाही.

गॅरी ट्रुमन's picture

24 Feb 2017 - 10:40 am | गॅरी ट्रुमन

काल एक असाच व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड आला. त्यात दावा केला होता की रामायण-महाभारत काळात विमानांचा वापर युद्धांमध्ये होत होता. त्याचा अभ्यास करायला जर्मन शास्त्रज्ञ तिबेटला गेले होते आणि त्यातील ज्ञानाचा वापर हिटलरने व्ही-८ मिसाईलसाठी केला होता.

त्यावर एक प्रश्न विचारला-- जर त्याकाळी इतक्या पुढारलेल्या शस्त्रांनी लढाई होत असेल तर मग त्याचवेळी धनुष्यबाण, तलवारी, गदा, घोडे, रथ इत्यादी गोष्टींचा लढाईत वापर का होत होता? ही गोष्ट जरा ऑड वाटत नाही का?

त्या प्रश्नाला उत्तर आले नाही हे वेगळे सांगायलाच नको :)

वेशीवरचा म्हसोबा's picture

24 Feb 2017 - 10:52 am | वेशीवरचा म्हसोबा

हा दावा एरव्ही सुद्धा केला जातो.

एक साधा नियम आहे. छोट्या मुलभूत शोधाच्या आधी मोठा शोध लागत नाही. म्हणजे जिथे जमिनीवरुन चालणारी स्वयंचलीत वाहने नव्हती तिथे थेट आकाशातून उडणारे वाहन कुठून येणार. हे म्हणजे साध्या आठ बीट मायक्रोप्रोसेसरचा शोध लागायच्या आधीच अचानक सुपर कॉम्प्युटर बनवला जाण्यासारखे झाले.

कधी काळी आपण ज्ञानाच्या क्षेत्रात प्रगत होतो यात वादच नाही मात्र काळाच्या ओघात आपण अगदी पिछाडीवर गेलो. हे वास्तव स्विकारणे लोकांना अवघड जाते आणि मग असे अतर्क्य दावे लोक करतात.

अनुप ढेरे's picture

24 Feb 2017 - 11:02 am | अनुप ढेरे

एकाने उद्या पुण्यात क्लाउड बर्स्त होणारे असा मेसेज पाठव्ला होता. लय झापला तर ऑफेंड झाला. असले धोकादायक फेक फॉरवर्ड पसरण्यापेक्षा नाराज मित्र परवडले.

धर्मराजमुटके's picture

24 Feb 2017 - 11:34 am | धर्मराजमुटके

:)=
अहो त्याला मायक्रोसॉफ्टचे क्लाऊड बर्स्ट होणार असे म्हणायचे असेल. कशाला उगाचा ताण करुन घ्यायचा. अशा जोक्समधून आपल्याला हवे तसे अर्थ काढायचे आणि मनोरंजन करुन घ्यायचे झालं.

सतिश गावडे's picture

7 Mar 2017 - 4:43 pm | सतिश गावडे

DID YOU KNOW?

Our belly button (NABHI ) is an amazing gift given to us by our creator. A 62 year old man had poor vision in his left eye. He could hardly see especially at night and was told by eye specialists that his eyes were in a good condition but the only problem was that the veins supplying blood to his eyes were dried up and he would never be able to see again.

According to Science, the first part created after conception takes place is the belly button. After it’s created, it joins to the mother’s placenta through the umbilical chord.

Our belly button is surely an amazing thing! According to science, after a person has passed away, the belly button is still warm for 3 hours the reason being that when a woman conceives a child, her belly button supplies nourishment to the child through the child’s belly button. And a fully grown child is formed in 270 days = 9 months.

This is the reason all our veins are connected to our belly button which makes it the focal point of our body. Belly button is life itself!

The “PECHOTI” is situated behind the belly button which has 72,000 plus veins over it. The total amount of blood vessels we have in our body are equal to twice the circumference of the earth.

Applying oil to belly button CURES dryness of eyes, poor eyesight, pancreas over or under working, cracked heels and lips, keeps face glowing, shiny hair, knee pain, shivering, lethargy, joint pains, dry skin.

*REMEDY For dryness of eyes, poor eyesight, fungus in nails, glowing skin, shiny hair*

At night before bed time, put 3 drops of pure ghee or coconut oil in your belly button and spread it 1 and half inches around your belly button.

*For knee pain*

At night before bed time, put 3 drops of castor oil in your belly button and spread it 1 and half inches around your belly button.

*For shivering and lethargy, relief from joint pain, dry skin*

At night before bed time, put 3 drops of mustard oil in your belly button and spread it 1 and half inches around your belly button.

*WHY PUT OIL IN YOUR BELLY BUTTON?*

You belly button can detect which veins have dried up and pass this oil to it hence open them up.

When a baby has a stomach ache, we normally mix asafoetida (hing) and water or oil and apply around the navel. Within minutes the ache is cured. Oil works the same way.

Try it. There's no harm in trying.

You can keep a small dropper bottle with the required oil next to your bed and drop few drops onto navel and massage it before going to sleep. This will make it convenient to pour and avoid accidental spillage.

I am forwarding this valuable and very useful information received from a very good friend.Its really amazing.

A million thanks to the friend who forwarded this.

Happy to share it with my friends.

पुंबा's picture

8 Mar 2017 - 5:52 pm | पुंबा

अरे देवा..

पिलीयन रायडर's picture

7 Mar 2017 - 8:19 pm | पिलीयन रायडर

हे व्हॉट्सॅपिय दाव्यात येतं की नाही ते माहिती नाही. पण मनोरंजनाची १००% खात्री!

बबन ताम्बे's picture

8 Mar 2017 - 7:22 pm | बबन ताम्बे

क्लाउडमधून ज्ञानकणांचा प्रचंड वर्षाव झालाय :-)

मराठी कथालेखक's picture

9 Mar 2017 - 2:51 pm | मराठी कथालेखक

७/१२ उतार्‍याचा अहिल्याबाई होळकरांशी संबंध जोडणारा काहीतरी संदेश वाचला होता. म्हणे त्यांनी गरिबांना झाडे दिली ७ झाडे सरकारची, ५ गरीब शेतकर्‍याची एकूण १२ त्यावरुन म्हणे ७/१२ चा उतारा आला !!