कोणती बाईक आणि मोपेड घ्यावी?

दा विन्ची's picture
दा विन्ची in काथ्याकूट
18 Feb 2017 - 8:52 pm
गाभा: 

मी जवानीत रॉयल एन्फिल्ड ३५० वापरली आहे. खरे तर माझी अत्यंत आवडती गाडी आहे.
सध्या मी महाराष्ट्राबाहेर आहे आणि जुलै मध्ये परतणार आहे. त्यावेळी मला अर्धांगिनीसाठी एक मोपेड आणि माझ्यासाठी एक नवीन बाईक घ्यायची आहे.
शहरात वापरण्यासाठी कोणती मोपेड सध्या चांगली आहे?
बुलेट ३५० तर मनात आहेच, पण मला एका मित्राची अव्हेंजर क्रूझ १८०, फक्त दीपावली २०१६ मधील व फार फार तर १००० किमी वापरलेली बाईक ५०००० पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडा गोंधळ आहे मनात.
दुसरा एक मुद्दा म्हणजे तीन वर्षांनी चिरंजीव सुद्धा लायसेन्स काढण्याच्या वयाचे होतील, तेव्हा आता घेतलेली मोपेड किंवा बाईक त्याला देता आली तर बरेच.. त्यामुळे चांगली मोपेड आणि बाईक सुचवा हि विनंती. रॉयल एन्फिल्ड ३५० आणि अव्हेंजर क्रूझ १८०,चे ऍव्हरेज खूप कमी म्हणजे ३५-४० आहे हे मला माहित आहे, त्यामुळे कुणी दुसरी बाईक सुचवली तरी चालेल. मुख्य वापर हा शहरात रोज २० किमी एवढाच आहे.. धन्यवाद

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

20 Feb 2017 - 9:35 am | टवाळ कार्टा

२० किमीसाठी मायलेज बघू नका....बजेट किती आहे....बुलेटवाले असाल तर तीच घ्या...दुसरे काही आवडू(च) शकत नाही
स्कुटरसाठी माझा धागा वाचा

टवाळ कार्टा's picture

20 Feb 2017 - 10:00 am | टवाळ कार्टा

२० किमीसाठी मायलेज बघू नका....बजेट किती आहे....बुलेटवाले असाल तर तीच घ्या...दुसरे काही आवडू(च) शकत नाही
स्कुटरसाठी माझा धागा वाचा

दा विन्ची's picture

20 Feb 2017 - 10:04 am | दा विन्ची

टका शेठ धन्यवाद. तुमच्या घाग्याची लिंक द्या प्लिज. मला शोधता येत नाही.

टवाळ कार्टा's picture

20 Feb 2017 - 10:08 am | टवाळ कार्टा

मी ***सारखी स्वतःच्याच धाग्याची (इतकीही) झाइरात करत नाही :D

सतिश गावडे's picture

20 Feb 2017 - 10:12 am | सतिश गावडे
टवाळ कार्टा's picture

21 Feb 2017 - 8:18 pm | टवाळ कार्टा

अता सगळे निर्णय अर्धांगाला विचारून घ्या =))

स्थितप्रज्ञ's picture

20 Feb 2017 - 11:33 am | स्थितप्रज्ञ

तुमच्या डिटेल्स मध्ये काहीतरी गडबड झाली दिसतेय दा विन्चीराव...२०१६ मध्ये लाँच झालेली अव्हेंजर क्रूझ २२० CC ची आहे. जर ती १८० CC चीच असेल तर किमान ७ वर्ष जुनी असेल. असो...दोन्ही गाड्या चांगल्या आहेत पण तुमचा मित्र एका वर्षात गाडी का विकतोय? गाडीला काही प्रॉब्लेम नाही ना तपासून घ्या.

मोपेड: सध्या TVS ज्युपिटर खूप छान गाडी आहे. हलकी आहे आणि कमी मेंटेनन्स आहे. परफॉर्मन्स ला उत्तम.

बाईक: फक्त शहरातल्या शहरात वापरायला बुलेट आणि अव्हेंजर दोन्ही गाड्या फारशा सोयीच्या नाहीत. हा मुद्दा अगदी डील ब्रेकर नाही पण जर नवीन गाडी घ्यायचीच असेल आणि फक्त शहरात फिरणार असाल तर होंडा युनिकोर्न सगळ्यात छान वाटते. त्याचे इंजिन खूपच refined आणि rev-ready आहे. शिवाय कम्फर्ट सुद्धा मस्त आहे. माझ्याकडे सध्या (long distance riding ची हौस असल्यामुळे) अव्हेंजर क्रूझ आहे आणि मी माझ्या मित्राची युनिकोर्न साधारण १ वर्ष ताबडली आहे. त्यातून हे सांगू शकतो. फ्रिक्वेंटली बाईकवर बाहेरगावी जायचा विचार असेल आणि गाडीला काही प्रॉब्लेम नसेल तर क्रूझ घ्यायला हरकत नाही. पण जर तुम्ही बुलेट च्या ढुग-ढुग आवाजाचे फॅन असाल तर ती अवश्य घेऊ शकता. फक्त मेंटेनन्स थोडा जास्त पडेल.

बाकी अंदाज अपना अपना....हॅपी रायडींग!!!

दा विन्ची's picture

21 Feb 2017 - 9:54 am | दा विन्ची

कदाचित cc सांगण्यात माझी चूक झाली. गाडी २०१६ चीच आहे आणि गाडीला काहीही प्रॉब्लेम नाही. ऑइल कूलड इंजिन वाली २२० कसा क्रूझ आहे. मित्राला गाडी लकी draw मध्ये मिळाली आणि त्याला गाडीची फार गरज नाही म्हणून स्वस्तात मिळणार आहे.

दा विन्ची's picture

21 Feb 2017 - 9:55 am | दा विन्ची

कदाचित cc सांगण्यात माझी चूक झाली. गाडी २०१६ चीच आहे आणि गाडीला काहीही प्रॉब्लेम नाही. ऑइल कूलड इंजिन वाली २२० cc क्रूझ आहे. मित्राला गाडी लकी draw मध्ये मिळाली आणि त्याला गाडीची फार गरज नाही म्हणून स्वस्तात मिळणार आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2017 - 2:13 pm | अत्रुप्त आत्मा

घ्या हो. मग नक्की घ्या! म्या वापरलीया तसली गाडी. रॉकेटलॉंचर हाय येकदम.

निम्यात मिळतीया मलई,मंग कशाला डुस्री कल्हई!

(तुम्हाला नको असेल, तर माझ्याकडे फॉरवर्ड करा! )

उगा काहितरीच's picture

21 Feb 2017 - 8:51 pm | उगा काहितरीच

Avenger बद्दल अजून माहिती मिळेल का ? मी पण ही गाडी घ्यायचा विचार करतोय . या गाडीच्या प्रकारामधे कंफ्युज आहे. (१५०/220 , street/ cruise) माझा रोजचा प्रवास 3०-35 किमी आहे. विकेंडला मनात असलं तर १०० किमीच्या आसपास. रोजच्या प्रवासात एकवेळ ट्रॕफिक लागते एकवेळ नाही.

टवाळ कार्टा's picture

21 Feb 2017 - 8:58 pm | टवाळ कार्टा

रस्ते खराब असतील तर अ‍ॅव्हेंजर घेउ नका

रोजचे रनिंग १५ -२० किमीच असेल, तर १५००० हजारात गिअरची हलकी सायकल घ्या. सिरीयसली. तब्येतही चांगली राहील, पैसेही वाचतील.

स्थितप्रज्ञ's picture

22 Feb 2017 - 2:42 pm | स्थितप्रज्ञ

हणुमोदन