लॉर्ड मॅकोलेच्या नावे फिरणारा कागद

सुचिकांत's picture
सुचिकांत in काथ्याकूट
18 Feb 2017 - 4:13 pm
गाभा: 

लॉर्ड मॅकोलेच्या नावाने फिरणारा जुन्या कागदाचा तुकडा खोटा आहे.

"मी पूर्ण देशात फिरलो, मला एकही भिकारी किंवा चोर दिसला नाही..........या देशातील प्राचीन शिक्षणव्यवस्था बदलून इंग्रजी शिक्षण व्यवस्था आणायला हवी," वगैरे वगैरे वगैरे..... त्यावर लिहिलेलं आहे.

खालील दुव्यावर हा कागदाचा तुकडा बघायला मिळेल.

लॉर्ड मॅकोलेची वाक्ये

आपण २ शक्यता तपासुया.

- लॉर्ड मॅकोले २ फेब्रुवारी १८३५ रोजी संसदेत होता :
- लॉर्ड मॅकोले २ फेब्रुवारी १८३५ रोजी संसदेत नव्हता :

१. लॉर्ड मॅकोले २ फेब्रुवारी १८३५ रोजी संसदेत होता :

कोलंबिया विद्यापीठ - इथे पूर्ण मिनिट्स वाचायला मिळतील.

यात कुठेही 'लॉर्ड मॅकोले' ने, भिकारी, चोर दिसले नाहीत किंवा कागदाच्या तुकड्यात असणारा मजकूर बोललेला नाही. शिवाय कागदाच्या तुकड्यावर असलेली इंग्रजी भाषा, १८३० च्या मानाने खूपच अलीकडची आहे.

२. लॉर्ड मॅकोले २ फेब्रुवारी १८३५ रोजी संसदेत नव्हता :

लॉर्ड मकॉले १८३४ मध्ये भारतात आला, आणि १८३८ पर्यंत होता, असे बरेच संदर्भ आपल्याला मिळतील. इंग्लंडमधून भारतात यायला त्याकाळी जहाजाने ३ महिने लागायचे. मग तो हे वाक्य नक्की कुठे बोलला?
----------------------------------
या पूर्ण प्रकरणाचे बरेच पैलू आहेत. लॉर्ड मकॉले इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कर्ता होता हे जगजाहीर आहे, पण कागदाच्या तुकड्यावर फिरणारा, मजकूर त्याचा नाही, हे सत्य आहे. यावर मिपाकरांना काय वाटते? या विषयाशी संबधित अजून काही खात्रीशीर संदर्भ आहेत का?

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

18 Feb 2017 - 8:10 pm | जयंत कुलकर्णी

हा कागद खोटा असण्याची शक्यताच जास्त आहे. भारतीयांनी असे अनेक कागद तयार केले आहेत.
विशेषतः विज्ञानाच्या संदर्भात. अगदी पोट धरुन हसण्यासारखे..... :-)

Nitin Palkar's picture

19 Feb 2017 - 8:05 pm | Nitin Palkar

हे एक छोटेसे चिटोरे आहे. त्याची सत्यासत्यता पडताळायला हरकतच नाही पण 'भारतीयांनी असे अनेक कागद तयार केले आहेत' हे विधान आक्षेपार्ह आहे. कारण खोटे कागदपत्र करण्यात ब्रिटीश जगभर कुप्रसिद्ध आहेत.

अस्वस्थामा's picture

18 Feb 2017 - 8:44 pm | अस्वस्थामा

यावर सविस्तर या 'मेकॉले आणि शिक्षणपद्धती' लेखात वाचायला मिळेल. मेकॉलेच्या पत्राची व्यवस्थित शहानिशा त्याच लेखाच्या या प्रतिक्रियेत आहे. याउप्पर काही शंका रहात असेल असे वाटत नाही. असल्यास मिपा आहेच.

हाच लेख शोधत होतो. धन्यवाद.

सतिश गावडे's picture

19 Feb 2017 - 2:40 pm | सतिश गावडे

या दुव्यासाठी धन्यवाद. खुप छान चर्चा तसेच विविध दुवे आहेत या लेखात.

पैसा's picture

19 Feb 2017 - 12:55 pm | पैसा

नेट आहे, वेळ आहे, थोडीशी कारागिरी जमते. मग काहीही तयार करतात लोक!

Nitin Palkar's picture

19 Feb 2017 - 7:55 pm | Nitin Palkar

हे अगदी बरोबर. अशा उचापतींना भोळे अज्ञ जन (जे बहुसंख्येने असतात) ते फसतात, विश्वास ठेवतात. एकंदरीत ब्रिटीश मानसिकता लक्षात घेता सदर चिटोरे खोटे असण्याचीच अधिक शक्यता वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Feb 2017 - 3:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्हॉट्सॅपिय दाव्यांची इतकी दखल घेऊ नका.

"एका आठवड्यात कर्करोगमुक्त करणार्‍या औषधांची" आणि "पिंपळाचे (किंवा इतर कोणते) पान खाऊन हृदयाच्या रोहिणीतील ब्लॉक काढणार्‍या पद्धतींची" यासारखी डझनावारी संशोधने दर दिवशी व्हॉट्सॅपवर फिरत असतात... त्यांच्यावर विश्वास ठेवायचा म्हटले तर सरकारने आपले वैद्यकीय बजेट केवळ "सर्व जनतेला व्हॉट्सॅप वापर करता येईल" या एकाच गोष्टीवर खर्च केले तरी पुरेसे होईल ! :) ;)

अभिजीत अवलिया's picture

20 Feb 2017 - 1:10 pm | अभिजीत अवलिया

नाही तर काय. आज काल इतके जबरदस्त व्हॉट्सॅपिय संदेश यायला लागलेत की कोणताही रोग झाला तर कुठल्याही झाडाचे पान नाहीतर मूळ खाऊन बरा होऊन जाईल असे वाटायला लागलेय.

गामा पैलवान's picture

20 Feb 2017 - 5:52 pm | गामा पैलवान

लोकहो,

मेकोलेच्या नावाने खपवण्यात आलेला कागद बनावट आहे. मात्र इंग्रजांनी एतद्देशीय शिक्षणपद्धती बंद पाडली हेही तितकंच खरंय. मोहनदास गांधींचे अनुयायी श्री. धरमपाल यांनी The beautiful tree: Indigenous Indian education in the eighteenth century या पुस्तकात भारतीय शिक्षणव्यवस्थेचं वर्णन केलं आहे. ही व्यवस्था इंग्रजांनी मोडीत काढली.

मात्र तरीही याच पद्धतीतून मद्रास सिस्टीम ऑफ एजुकेशन नावाची एक पद्धती इंग्रजांनी निर्माण केली. ही पद्धती इंग्लंड व जगभर १९ व्या शतकात लोकप्रिय झाली होती. सांगण्याच मुद्दा काय की ब्राह्मणांनी दलितांना शिक्षण नाकारलं हा शुद्ध बकवास आहे. सर्वांना शिक्षण देणारी एतद्देशीय पद्धती नाकारली ती इंग्रजांनी.

आ.न.,
-गा.पै.

लॉर्ड मॅकोलेच्या नावे फिरणारा कागद आज मॅकोलेचा कागद खोटा आहे म्हणता आहात,

उद्या ब्रिटीशांनी देशातल्या विणकरांना काही सुद्दा ईजा केलेली नव्हती अस म्हणाल. मँचेस्टरमधुन आयात केलेल्या कपड्याला भारतातली बाजारपेठ मिळावी या करता भारतातल्या प्रत्येक गाव खेड्यात बनणार्या देशी कापडाला बंदी आणण ब्रिटीशांना आवश्यक झालेल होत अस म्हणतात. त्यासाठी प्रत्येक गावातील विणकरांचे हात कलम केले म्हणे ब्रिटीशांनी, जर हे सुद्धा खोटच असेल तर मँ चेस्टर हुन कपडा येण्यापुर्वी भारतीय कपडे न घालता उघडेच फिरत असत हे सुद्दा मान्य कराव लागेल.

सुचिकांत's picture

21 Feb 2017 - 11:00 am | सुचिकांत

मुद्दा कागदाचा आहे. त्यावर बोललात तर बरे होईल. ब्रिटिशांनी केलेल्या नासधुसीसाठी वेगळा धागा काढू.

सचु कुळकर्णी's picture

21 Feb 2017 - 3:04 am | सचु कुळकर्णी

शिवाय कागदाच्या तुकड्यावर असलेली इंग्रजी भाषा, १८३० च्या मानाने खूपच अलीकडची आहे.

last nail in the coffin
पुढे काई बोल्याचच काम नाय ना भौ.

नाय भौ. लास्ट खिल्ला तर बाकीय.
फॉन्ट पाहा ना भौ. सॅन्सेरीफ हाय तो. एरीयल चक्क. रनिंग टेक्स्टसाठी सेरीफ वापरत पहिल्यापासून. सॅनसेरीफ अलिकडे अलिकडे आले. हे तर चक्क डीटीपी केलेंय. फोर्स जस्टीफिकेशन १८३० च्या ट्रेडल प्रिंटिंगला लै अवघड. इथे तर इज्जी मध्ये केलेय. शिवाय बोल्ड, इटालिक अन इटालिक बोल्ड केस पण वापरलीय. अशी सर्रास वापरली नाई जायची १८३० ला. शिवाय फोटो. १८३० साली हाफटोन फोटोला ब्लॉकशिवाय पर्याय नसावा. इथे सेपरेट साईडला टाकलाय फोटो. पूर्वी रॅपअराउंड केला जायचा. बरं ह्याचा पर्पजही कळत नाही, म्हणजे हे पुस्तकातले पानंंय की पेप्रातली बातमी की झैरात की पॅम्प्लेट की अजून काही. त्यानुसारही लेआउट कळत नाही. ह्यातल्या कुठल्याही प्रकाराला हा लेआउअट बसत नाही. असे फेमस कोटस डीटीपी करुन पब्लिश करायची पध्दत अलिकल्ली.
सो... जुन्या कागदाचे टेक्श्चर बॅक्ग्राउंडला ठेवून लेटेस्ट मध्ये केलेली डीटीपी हाय ही. बाकी कै नै.

अभिजीत अवलिया's picture

22 Feb 2017 - 10:36 am | अभिजीत अवलिया

बापरे. अगदी CID प्रमाणे छडा लावलाय.

हा असिद्ध केलेला कागद आहे कुठे?
======
म्हणजे तुम्ही १००% असिद्ध केलेली गोष्ट देखिल वास्तवात कुठे तरी हवी. मंजे काय नक्की असिद्ध करायचंय ते कळेल.