बेडूक, नार्सिसस, भस्मासुर, अतिशयोक्ती आणि चड्डीत राहणे

आजानुकर्ण's picture
आजानुकर्ण in जनातलं, मनातलं
7 Dec 2007 - 11:29 pm

कॉलेजात असताना आमच्या मित्रमंडळींमध्ये "चड्डीत राहणे" हा एक वाक्प्रचार अत्यंत प्रसिद्ध होता. "अंथरूण पाहून पाय पसरावे" अशा साधारण अर्थाचा हा वाक्प्रयोग असला तरी त्याला अनेक छटा होत्या. कोणी जादा 'माज' करत असला की त्याला सरळ करण्यासाठी ‌"ए भो, चड्डीत राहा ना!" असे आम्ही म्हणत असू. आता हा वाक्प्रयोग येथे आठवण्याचे काय कारण? सांगतो. त्यापूर्वी ह्या अडीच गोष्टी वाचा.

१. मेंढककाण्ड अर्थात बेडकाची प्रेमकहाणी: प्लवंगेंद्र बेडकाचे मंदोदरी बेटकुळीवर फारच प्रेम. अगदी शाहरूख खानचं काजोलवर असतं ना तस्सं. पण अर्थातच मंदोदरीचे तातश्री मेंढकोबांना हा विवाह पसंत नव्हता. अमरीश पुरीच म्हणा ना! त्यांनी तिचा हात वृषभकुमार नावाच्या बैलाच्या हाती देण्याचे ठरवले होते. मंदोदरी दिसायला फारच सुंदर. वार्‍यालाही तिच्या रेशमी काळेभोर कुंतलाशी खेळावे वाटे. तिच्या भ्रुकोदंडांना पाहून अर्जुनाचे गांडीवदेखील शरमेने खाली पाहू लागले असते. तिचे गाल लालबुंद सफरचंदांची आठवण करून देत असत तर डाळिंबाचे दाणे शाखेमध्ये उभ्या राहणार्‍या स्वयंसेवकाप्रमाणे रांगेत एकामागे एक "दक्ष" उभे होते. तिचे ओठ... हाय... तिच्या ओठांकडे पाहून प्लवंगेंद्राला मदिरेची आठवण होई तर तिची नाजूक मान पाहून त्याला सुरईची म्हणजे पुन्हा मदिरेचीच आठवण होई. बेवडा कुठला! आता वर्णनासाठी मी जास्त खाली जात नाही. काय ते तुम्ही समजून घ्या!

हा तर आपले अमरीश पुरी ऊर्फ मेंढकोबांनी मंदोदरीचे म्हणणे ऐकून घेण्याचे ठरवले आणि प्लवंगेंद्राला सांगितले की त्याने जर वृषभकुमाराइतके मोठे होऊन दाखवले तर मंदोदरी त्याचीच. प्रेमात शहाणी माणसे देखील 'चड्डीत राहत' नाहीत तर बेडकाचे काय. एखाद्या पंपाने सायकलच्या ट्यूबमध्ये हवा भरावी तद्वत प्लवंगेंद्र फुस्स फुस्स करत स्वत:च्या शरीरामध्ये हवा भरत गेला. प्रेमात दिवाणी झालेली मंदोदरीचे मुखकमलही प्लवंगेंद्राच्या शरीरासोबत फुलत होते. पण शेवटी व्हायचे तेच झाले. नियतीने कपाळावर जे लिहिले आहे त्याला कोणी टाळू शकतो का? फुल्ल हवा भरलेल्या टायरला पंक्चरच्या दुकानदारांनी रस्त्यावर टाकलेला ४३ खिळ्यांपैकी नेमका खिळा लागावा आणि टचकन टायर फुटावा त्याप्रमाणे प्लवंगेंद्र फुटला. वृषभकुमारासारख्या धटिंगणाला नाजूक मंदोदरी मिळाली आणि प्लवंगेंद्राच्या फोटोला हार मिळाले.कारण काय तर 'चड्डीत राहा ना भो!' असे सांगणारे मित्र त्याला मिळाले नाहीत!

२. नार्सिससची कथा: नार्सिससची कथा ही अभिजात ग्रीक कथा असल्याने सामान्यजनांना माहिती नसावी. नाही तर त्याला अभिजात कसे बरे म्हटले असते? पुराणकाळातील हृतिक रोशन शोभावा असला राजबिंडा हा तरूण. वर्णन बरेचसे मंदोदरीसारखेच. म्हणजे रेशमी कुंतल, चाफेकळी नाक वगैरे. फक्त त्याची शरीरयष्टी बलदंड असावी. त्याला सिक्स प्याक ऍब्जही असावेत. शाहरूखखानपूर्वी अशी शरीरयष्टी लाभलेला केवळ नार्सिससच. स्वत:चे रूप कधीही न पाहिलेल्या या तरूणाचे (म्हणजे नार्सिसचे. शाहरूखचे नव्हे!) सौंदर्य अगदी मंत्रमुग्ध करणारे होते.

नेहमी सूर्योदयापूर्वी उठणारा नार्सिसस रात्री जास्त 'झाल्यामुळे' सकाळी उशीरा तळ्यावर गेला. (कशाला ते विचारू नका! घाणेरडे कुठले!) आणि स्वत:चे रूप त्याने प्रतिबिंबरूपात तळ्यामध्ये पाहिले आणि काय हो आश्चर्य. स्वत:च्याच रुपाच्या प्रेमात पडून तो तळ्यात पडला. कारण काय तर 'चड्डीत राहा ना भो!' असे सांगणारे मित्र त्याला मिळाले नाहीत!

३. भस्मासुराची कथा: ही भारतीय कथा असल्याने अभिजात नसावी. त्यामुळे कथा सर्वांनाच माहिती असावी. मोहिनीवर लाईन मारण्यात दंग झालेल्या भस्मासुराला कसलेही भान राहिले नाही आणि स्वत:च्या डोक्यावर हात ठेवून त्याने स्वत:चे भस्म करून घेतले. कारण काय तर 'चड्डीत राहा ना भो!' असे सांगणारे मित्र त्याला मिळाले नाहीत.

उपसंहार:
शाळेत असताना आम्हाला व्याकरणामध्ये अतिशयोक्ती हा अलंकार होता. इयत्ता सातवीपर्यंत आमच्या वर्गात फक्त वर्गबंधू असत. सहशिक्षणाचे पुरोगामी वारे व परिणामी वर्गभगिनी वर्गात नसल्याने आम्ही मास्तरांकडेच लक्ष देऊन प्रामाणिकपणे शिक्षण घेत होतो. (आठवीपासून वर्गभगिनी वर्गात आल्या नि शिक्षण बोंबलले! ते असो.) तर अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण देताना आमचे मास्तर खूप मस्त उदाहरण देत असत.

"दिडकीचे तेल आणले, सासुबाईंचे न्हाणे झाले, मामंजींची शेंडी झाली, भावोजींची दाढी झाली, उरले तेल झाकून ठेवले,ते येऊन मांजराने सांडले, वेशीपर्यंत ओहोळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला"

सुंदरच. अगदी +१.

भविष्यकाळात मराठी भाषेचे अलंकार शिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आली तर दिडकी, ओहोळ वगैरे शब्दांचे अर्थ सांगताना घाम फुटायचा ह्या विचाराने झोप येत नव्हती. तरी बरे मुले आजकाल कॅमलिन कंपनीचे साहित्य वापरतात त्यामुळे उंट म्हणजे काय हे सांगायला अडचण येणार नाही. पण आमची सर्व काळजी आता मिटली आहे. अतिशयोक्ती अलंकाराचे अतिशय सुरेख उदाहरण आमच्यासमोर आहे.

होय , हा मराठीतला पहिला संपूर्ण ऑनलाइन दिवाळी अंक आहे. आजवर ऑनलाइन दिवाळी अंक अनेक झाले. पण प्रत्येकानं स्वतःच आपली कुंपणं आखून घेतली होती. आता ही कुंपणं उचकून टाकण्याची वेळ आहे. मराठी ऑनलाइन म्हणजे फुटकळपणा , या समजाला मुळापासून गाडून टाकत , दर्जाच्या मैदानात छापील दिवाळी अंकांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचा हा प्रयत्न आहे.

अधिक माहितीसाठी हे पहा.

स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून मायबोली, मनोगत, उपक्रम, मिसळपावासारखी दर्जेदार संकेतस्थळे चालवणारे संकेतस्थळचालक. त्यांनी राबवलेले दिवाळीअंकांसारखे सुंदर उपक्रम. अतिशय गुणी माणसांशी ऑनलाईन ओळखी, गप्पाटप्पा, काव्यशास्त्रविनोद करण्याची दिलेली संधी. हे सगळे फुटकळ.
आणि आपले 'उत्पादन' अधिकाधिक 'ग्राहकांपर्यंत' पोचवण्यासाठी अशुद्धलेखनाने बुजबुजलेले, हिंदाळलेले मराठी. अर्धवस्त्रांकित उठवळ नट्यांची चित्रे पहिल्या पानावर छापणारे हे वृत्तपत्र तेवढे दर्जेदार ही अतिशयोक्तीच नाही का?
असो.
आम्हाला जास्त काही म्हणायचे नाही. त्या वृत्तपत्राला एकच सांगायचे आहे.
तुम्ही ओळखलेच असेल काय ते.
बरोब्बर. 'चड्डीत राहा ना भो'

आपला,
महाराष्ट्रकुमार आजानुकर्ण राऊत

औषधोपचारमुक्तकमौजमजाप्रकटनसद्भावनाशुभेच्छामाध्यमवेधसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

राजे's picture

7 Dec 2007 - 11:39 pm | राजे (not verified)

जबरदस्त.

"आणि आपले 'उत्पादन' अधिकाधिक 'ग्राहकांपर्यंत' पोचवण्यासाठी अशुद्धलेखनाने बुजबुजलेले, हिंदाळलेले मराठी. अर्धवस्त्रांकित उठवळ नट्यांची चित्रे पहिल्या पानावर छापणारे हे वृत्तपत्र तेवढे दर्जेदार ही अतिशयोक्तीच नाही का?"

सहमत.
ह्याच मुळे माझे ऑनलाईन दिवाळी अंक वाचण्याची देखील हिम्मत झाली नाही ;}

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

देवदत्त's picture

7 Dec 2007 - 11:52 pm | देवदत्त

मस्त लिखाण... सुरूवातीला कळलेच नाही नक्की कोणावर हा बाण जाणार आहे ते :)

अजून तरी मी तो अंक वाचलेला नाही. पण नक्की वाचेन. अहो, अनूकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया (बरोबर आहे का ही शब्दरचना?) देण्यासाठी ते काय आहे ते तर माहित पाहिजे ना?

आजानुकर्ण's picture

7 Dec 2007 - 11:55 pm | आजानुकर्ण

कोणावर बाण मारायचा हे ठरवताना आम्ही चड्डीतच राहतो. ;)

- (हाफ चड्डी आणि केप्री प्रेमी) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

8 Dec 2007 - 12:34 am | विसोबा खेचर

कर्णा, मटाच्या ऑनलाईन दिवाळी अंकाची चड्डी अगदी झकास उतरवली आहेस! तुझ्या लेखात नेहमी अडीच कथा, साडेतीन कथा किंवा कुठल्या कुठल्या बोधकथा असतात त्याही वाचायला मजा येते! :)

अतिशय सुंदर आणि दर्जेदार लेखन! औरभी लिख्खो..

एक फुकटचा सल्ला-

वरील लेखाप्रमाणेच अगदी साधी, सोपी आणि प्रवाही लेखनपद्धती नेहमी ठेव. त्यामुळे माझ्यासारख्यांना वाचणं आणि समजून घेणं सोपं जातं आणि वाचनाचा आनंदही अधिक मिळतो!

तात्या.

सृष्टीलावण्या's picture

25 Mar 2008 - 9:29 pm | सृष्टीलावण्या

मटाच्या ऑनलाईन दिवाळी अंकाची चड्डी अगदी झकास उतरवली आहेस!

चड्डी न घातलेल्या आणि दुपट्यातच शू आणि अखंड किरकिर करणार्‍याला नवजात बाळाला चड्डीत राहा सांगण्यात अर्थ नाही त्यापेक्षा त्याची आई रडतकुमारी राऊत हिलाच चार शब्द सांगता आले तर बरं.

>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

मंदोदरी आणि नार्सिसस या अभिजात सुंदर लोकांची वर्णने वाचून आम्ही त्या त्या कथा वाचताना त्यांच्या त्यांच्या प्रेमात पडलो होतो. फोटो बघता, त्यांची टक्कल आणि झुलपे (अनुक्रमे) ही दोन्ही अत्यंत लोभसवाणी असली, तरी त्या गोष्टी (अनुक्रमे) आमच्या वैयक्तिक आवडीच्या विपरीत असल्याचे लक्षात आले. (पण त्यांच्या प्रत्येकाच्या अत्यंत अनुरूप जोडा आमच्या मित्रमंडळीत सापडेल, हे नमूद करतो.) फोटो नसते तर आजानुवर्णनाच्या जोरावर मंदोदरी आणि नार्सिसस यांच्या नावाने आज एक-एक प्रेमकविता जरूर लिहिणे झाले असते. तेवढ्याच फुटकळ अशुद्धलेखनापासून मराठी भाषा बचावली.

विसोबा खेचर's picture

8 Dec 2007 - 12:50 am | विसोबा खेचर

स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून मायबोली, मनोगत, उपक्रम, मिसळपावासारखी दर्जेदार संकेतस्थळे चालवणारे संकेतस्थळचालक.

नाही, ते पैसे वगैरे खर्च करण्याचं ठीक आहे परंतु मिसळपावच पुरतं बोलायचं झालं तर मिपाचा जन्म हा त्याच्या मालकाला असलेली खाज आणि पुढे पुढे करायची सवय! यातून झालेला आहे अशी माझी माहिती आहे! :)

अर्थात, एखादे लोकशाहीवादी संस्थळ असणे हीदेखील काळाची गरज होती हे नाकारता येणार नाही!

असो..

आपला,
(मराठी आंतरजालावर सुरवातीला हुकूमशाही वातावरणात वाढलेला एक्स मनोगती!) तात्या.

मिसळपावच्या ऑनलाईन होळी विशेषांकाबद्दल लवकरच सरपंचांचा एखादा चर्चाप्रस्ताव येईल अशी माझी माहिती आहे! :)

प्रियाली's picture

8 Dec 2007 - 1:23 am | प्रियाली

मुंबईतील कुठल्यातरी अग्रगण्य वर्तमानपत्रात छापून येईल अशी व्यवस्था करून टाका बॉ! लक्षावधी लोकांनी वाचायला हवा हा लेख.

सहज's picture

8 Dec 2007 - 6:20 am | सहज

उच्च लिहलयस रे.

बर बॉ तुमची लाल! म्हणून ह्या इतर आंतरजालावरच्या दिवाळी अंकाचे दुवे, मटावर त्या लेखाच्या प्रतिक्रियात टाकायचा मोह होतो आहे
:-)

प्रमोद देव's picture

8 Dec 2007 - 8:46 am | प्रमोद देव

अंक चांगलाच आहे. त्याबद्दल वाद नाही. मात्र त्याची जाहिरात ज्या भाषेत केलेली आहे त्याला माझाही आक्षेप आहे. तसेच तो पहिला-वहिला ऑलादिअं आहे हा दावा करणे म्हणजे अतिशयोक्ति अलंकाराचे उत्तम उदाहरण आहे तसेच आपले आपण दिवे ओवाळुन घेण्यासारखे आहे. इतका निलाजरापणा कसा करवतो ह्या लोकांना ह्याचे आश्चर्यच वाटते.
आजानुकर्ण म्हणाल्याप्रमाणे(मनोगतावरील प्रतिक्रियेत) 'हसा लेको' चा मजकुर त्यांनी चुकुन तिथे छापला असावा.(हाहाहा) त्याचीच शक्यता जास्त वाटते.
होतात अशा चुका.बहुदा उसंडु असाव्यात. जाऊ दे सोडून देतो आपला मराठी माणूस म्हणून.(हघ्या)

'चड्डीत राहा ना भो'
हे बाकी एकदम सही!

सुनील's picture

8 Dec 2007 - 5:19 pm | सुनील

अंक चांगलाच आहे. त्याबद्दल वाद नाही. मात्र त्याची जाहिरात ज्या भाषेत केलेली आहे त्याला माझाही आक्षेप आहे

एकदम मान्य. अंक निश्चितच चांगला आहे. आता जाहिरातबाजीचे म्हणाल तर मला वाटतं की तो त्यांच्या मार्केटींगवाल्यांचा आततायीपणा आहे. त्यासाठी मटाच्या संपादकमंडळाला जबाबदार ठरविणे योग्य होणार नाही.

" मुंबईतील कुठल्यातरी अग्रगण्य वर्तमानपत्रात छापून येईल अशी व्यवस्था करून टाका बॉ! लक्षावधी लोकांनी वाचायला हवा हा लेख."
या प्रियाली यांच्या प्रतिक्रियेशी मी सहमत आहेच. पण उत्तम वाङ्मयगुणसमृद्ध अशा या लेखावर मला सविस्तर प्रतिक्रिया लिहायलाच हवी.

चित्तरंजन भट's picture

11 Dec 2007 - 6:46 pm | चित्तरंजन भट

" मुंबईतील कुठल्यातरी अग्रगण्य वर्तमानपत्रात छापून येईल अशी व्यवस्था करून टाका बॉ! लक्षावधी लोकांनी वाचायला हवा हा लेख."
या प्रियाली यांच्या प्रतिक्रियेशी मी सहमत आहेच. पण उत्तम वाङ्मयगुणसमृद्ध अशा या लेखावर मला सविस्तर प्रतिक्रिया लिहायलाच हवी.

असेच. यनावालांच्या आगामी सविस्तर प्रतिक्रियेशीही मी आगाऊपणे सहमत आहे, हे सांगणे न लगे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Dec 2007 - 3:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आणि लेखनाची शैली आवडली रे भो !!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकासराव's picture

8 Dec 2007 - 7:03 pm | झकासराव

त्या तिथे प्रतिक्रिया देवुन पण काहि फायदा नाही. (त्याना प्रतिक्रिया नाहीत प्रितिक्रिया छापण्याची आवड आहे )
त्याना चड्डीत राहा ना रे भो म्हणून सुद्धा ते ऐकत नाहीत हा अनुभव आहे.
असो
तुझा लेख अप्रतिम आहे रे.
खरच छापुन आणावा असाच आहे.
लोकसत्ता छापेल अस वाटतय कारण प्रतिस्पर्धी आहेत ते. बघ त्यानी छापला तर. :)
अवांतरः
कालच मायबोलीच्या अंकातील पुखपृष्ठावरील बासरी,मायबोलीकरानी बनवलेली दोन गाणी आणि सावनी शेंडे यांची एक बंदीश ऐकली. जबरदस्त आहे. नक्की ऐका. :)
तात्या स्वारी इकडे दुसर्‍या साईट बद्दल लिहिल पण मला खात्री आहे तुम्ही सुद्धा त्या एम पी ३ ऐकुन खुष व्हाल :)
(म्हणूनच हे धाडस केल)

विसोबा खेचर's picture

8 Dec 2007 - 10:41 pm | विसोबा खेचर

तात्या स्वारी इकडे दुसर्‍या साईट बद्दल लिहिल पण मला खात्री आहे तुम्ही सुद्धा त्या एम पी ३ ऐकुन खुष व्हाल :)
(म्हणूनच हे धाडस केल)

अरे त्यात 'स्वारी' कशाबद्दल? इथे कुठल्याही संस्थळाबद्दल लिहायला माझी हरकत असण्याचं काहीच कारण नाही. आमचं फर्स्ट लव्ह मनोगत, मायबोली, उपक्रम, माझे शब्द, सुरेश भट डॉट इन, मराठी गझल, इत्यादी सर्व मराठी संस्थळे ही मिसळपावची थोरली भावंडे आहेत अशीच मिपाची भावना आहे!

असो, गाणी नक्की ऐकीन...

तात्या.

म्हणुन तर लिहिल की. :)
नायतर मी कशाला लिहु?
बर तात्या एक निरिक्षण माझ.
तुम्ही मेष वाले वाटत होता मला (ज्या प्रकारे धडक घेता त्यावरुन :))
पण तुम्ही तर मिथुन वाले निघालात की.
असो माझ मिथुन वाल्यांशी चांगल पटत आणि मेष वाल्यासोबत सुद्धा :)

चित्रा's picture

8 Dec 2007 - 8:18 pm | चित्रा

एकदम ओरिजिनल लिखाण!
माझे काही धाकटे भाऊ-लोक अशा काही खास शब्दांचा वाक्यात उपयोग करीत ते आठवले.

बाकी मटा "असा" अजिबात नव्हता असे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. सध्या टाईम्स समूहाकडून आलेल्या नको त्या गोष्टींचे वारे या (पूर्वीच्या अत्यंत उच्च अभिरूची असलेल्या) वर्तमानपत्राला दुर्दैवाने लागले आहे.

आजानुकर्ण's picture

8 Dec 2007 - 10:54 pm | आजानुकर्ण

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. सदर लेख लोकसत्तेत येणे शक्य नाही कारण सुमारसाहेबांशी आमची आधीचीच खुन्नस आहे. ;) तसेच मुंबईची इतर मराठी दैनिके म्हणजे मुंबई चौफेर वगैरे मध्ये हा लेख देणे योग्य वाटत नाही.

वाङ्मयगुणसमृद्ध वगैरे शब्द वाचून मात्र लाजल्यासारखे झाले आहे !

-(लाजाळू) आजानुकर्ण

या लेखाच्या निमित्ताने केलेल्या संशोधनात मंदोदरी व प्लवंग म्हणजे बेडूक ही नवीनच माहिती मोल्सवर्थ मध्ये कळाली.

-(ज्ञानपिपासू) आजानुकर्ण

मात्र धनंजयांचे मंदोदरी व नार्सिससबाबतचे लेखन वाचायला खूप आवडेल.

-(आशाळभूत) आजानुकर्ण

सर्किट's picture

11 Dec 2007 - 2:39 am | सर्किट (not verified)

मटाच नव्हे तर सर्वच वृत्तपत्रांनी चड्डीत राहणे आवश्यक आहे.

ह्यावर आम्ही बर्‍याच वर्षांपूर्वी येथे लिहिलेले होते.

- सर्किट

सुहास..'s picture

6 Dec 2011 - 8:42 pm | सुहास..

_/\_

क्लास !!