सावध… सावध… सावध…

सचिन७३८'s picture
सचिन७३८ in काथ्याकूट
17 Feb 2017 - 4:37 pm
गाभा: 

ते परत येतायत, शांतीप्रियतेचा मुलामा घेऊन
जखमेवरची खपली काढायला, अन तिथे मिठाचे मलम लावायला
बाहेरील भांडवलाने आतला गाभा खिळखिळा करायला
आम्ही किती संयमी हे दाखवायला
सावध… सावध… सावध…

जुने जणू झालेच नाही, करणारे ते आम्ही नाही
नाव जरी आमचेच घेतात, तरी आम्ही ते मानणार नाही
क्षमा व शांती आमच्या ठायी, आमचा “प्रेमळ” सवाल तुम्हालाही
तुमच्या चिकीत्सेचा आम्हा अधिकार, तरी आमची चिकीत्सा मान्य नाही

सावध… सावध… सावध…
काहींची भूमिका यात संशयास्पद असतात, जे स्वत:च्या पुढारलेपणाची टिमकी मारतात
सर्व समान हा मानवतावाद फक्त एकासच सांगता सुटतात
कथित शांतीदूतांचा हवाला दिल्यास, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे हे ठासून बजावतात
शांतीपथकाचे बळ वाढल्यावर विरोधाला तरी उरणार काय याचे उत्तर गोलगोल देतात
सावध… सावध… सावध…

वाळवंटातील वावटळ येथल्या समृद्धीत कशी टिकेल
आजवर जरी टिकली तरी यापुढे समृद्धीच बनून रहावे लागेल
आजवर वावटळीला आपलंसं केलं या समृद्धीने
तसेच यापुढेही करेल
पण तोपर्यंत सावध… सावध… सावध…

प्रतिक्रिया

इरसाल कार्टं's picture

17 Feb 2017 - 4:56 pm | इरसाल कार्टं

काय म्हणायचंय काय तुम्हाला???

संजय क्षीरसागर's picture

17 Feb 2017 - 5:07 pm | संजय क्षीरसागर

उद्देशून असावं काय तरी कारण तो एक हॉट विषये सध्या .

संदीप डांगे's picture

17 Feb 2017 - 5:05 pm | संदीप डांगे

Emayam...

सूड's picture

17 Feb 2017 - 5:39 pm | सूड

+१

प्रेशितांच्या नावावर मतांची मेहेर मागत होते इथे पुण्यात. दुआ कुबुल झाली तर अवघड आहे.

इरसाल कार्टं's picture

18 Feb 2017 - 10:07 am | इरसाल कार्टं

जि. प. शाळेतल्या बाईंची आठवण झाली. त्यांनी छान समजावून सांगितलं असतं.

प्रियाभि..'s picture

19 Feb 2017 - 5:05 pm | प्रियाभि..

.. अर्थबोध होत नाही पण कुणालाही चपखल बसेल अशी आहे