गजलांकित प्रतिष्ठान

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
15 Feb 2017 - 12:07 pm

जनार्दन केशव म्हात्रे आणि त्यांच्या गजलांकित प्रतिष्ठान बद्दल (आंतरजालावर स्वतंत्र स्रोतातून पुरेशी माहिती मिळत नसल्यामुळे माहितीची खात्री करुन हवी अथवा दुजोरा हवा आहे.

गजलांकित प्रतिष्ठान
https://mr.wikipedia.org/s/30r3
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गजलांकित प्रतिष्ठान ही महाराष्ट्रातील मराठी गजलांचे मुशायरे व गजलगायन मैफिली आयोजित करणारी संस्था आहे. १४ जून २०१३ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे संस्थापक जनार्दन केशव म्हात्रे आहेत.

अनुक्रमणिका

१ गजल मुशायरे
२ गजल गायन मैफिली
२.१ गजलांकित गजल गायन मैफिली
३ गजल पुरस्कार
३.१ गजलांकित पुरस्कारांबद्दल माहिती
३.१.१ गजलांकित गजलरत्न पुरस्कार
३.१.२ गजलांकित गजलसृजन पुरस्कार
३.१.३ गजलांकित गजलांकूर पुरस्कार
३.१.४ गजलांकित गजलगुंजन पुरस्कार
३.१.५ गजलांकित गजलउत्कर्ष पुरस्कार
३.१.५.१ गजलांकित पुरस्कार विजेते
४ गजल परिसंवाद
४.१ काही महत्वाचे परिसंवाद
५ गजल क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती
५.१ काही महत्वाच्या मुलाखती
६ गजलांकित कार्यक्रमांमधील सहयोगी निवेदक
७ गजल वाचन स्त्रोत

गजल मुशायरे

या संस्थेने ठाणे येथे १४ मार्च २०१४ रोजी सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त पहिला गजल मुशायरा ठाणे येथे आयोजित केला. त्यानंतर ठाण्यासह मुंबई, वाशी, सोलापूर, नवी मुंबई, कोल्हापूर, अशा राज्यभरातील विविध ठिकाणी मुशायरे सादर केले आहेत.
गजल गायन मैफिली

कोणत्याही काव्य, गीत, गजल या विधांमध्ये गायन कलेला विशेष महत्व आहे. गेय साहित्य रसिकांपर्यंत पोहचण्यासाठी गायन क्षेत्राचे योगदान नेहमीच महत्वाचे राहिले आहे. गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था गजल मुशायऱ्यांच्या सोबतीने गजल गायन मैफिलींचे देखील आयोजन करीत असते.
गजलांकित गजल गायन मैफिली

आदित्य फडके
मंदार पारखी व अर्चना गोरे
प्रवरा लिमये
रसिका जानोरकर व मयूर महाजन
दत्तप्रसाद रानडे
प्रशांत काळूंद्रेकर व अनघा पेंडसे
गाथा जाधव आणि गंधार जाधव

गजल पुरस्कार

गजल क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गजलांकित प्रतिष्ठान या संस्थेमार्फत दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.
गजलांकित पुरस्कारांबद्दल माहिती
गजलांकित गजलरत्न पुरस्कार

या पुरस्कारासाठी उत्तम कविता, उत्तम गजल लेखनासोबतच दीर्घकाळ मराठी कविता व गजलेला आपले भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ गजलकार व्यक्तीला गजलरत्न हा पुरस्कार देण्यात येतो.
गजलांकित गजलसृजन पुरस्कार

उत्तम कविता, उत्तम गजल लेखनासोबतच कविता व गजल या दोन्ही क्षेत्रात विशेष कामगिरी करण्याऱ्या कवी, गजलकारांसाठी "गजलसृजन" हा पुरस्कार दिला जातो.
गजलांकित गजलांकूर पुरस्कार

सातत्याने सकस आणि दर्जेदार कविता व गजल लिहिणाऱ्या नव्या दमाच्या कवी, गजलकारांसाठी प्रोत्साहन ठरू शकेल, असा "गजलांकूर" हा पुरस्कार दिला जातो.
गजलांकित गजलगुंजन पुरस्कार

गजल सादरीकरणातील "तरन्नुम" हा प्रकार तसा फार कमी अनुभवायला मिळतो. उर्दू गजलमध्ये हा प्रकार बरेचदा ऐकायला मिळतो. गजलकाराने आपलीच रचना सुरेल पद्धतीने संगीतवाद्याच्या साथीशिवाय सादर करणे, याला तरन्नूम संबोधले जाते. तरन्नुममधून गजलकाराला किती छान गाता येतेय, यापेक्षा त्या छान गायनातून भाव किती चपखल पोहचतोय, हेच अधिक महत्वाचे असते. तरन्नुम सादर करण्यासाठी गजलकाराला संगीताचे जुजबी का होईना ज्ञान असणे गरजेचे आहे. यासोबतच सुरांची योग्य ओळख, जाण असण्यासोबत गळ्यात सूर असणे नितांत गरजेचे आहे. यात तो किंवा ती गजलकार गायनकलेत निपूण असेल तर दुधात साखरच... गजलसादरीकरणाचा हा सुरेल प्रकार "योग्य रीतीने" रुजला पाहिजे, याच्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून उत्तम कविता, उत्तम गजल लेखनासोबतच तरन्नूममध्ये उत्तम रित्या गजल सादर करणारी एक स्त्रीगजलकार व एक पुरूष गजलकार निवडून अशा गजलकरांना "गजलगुंजन" हा पुरस्कार दिला जातो.
गजलांकित गजलउत्कर्ष पुरस्कार

गजल क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गजलउत्कर्ष हा पुरस्कार दिला जातो.
गजलांकित पुरस्कार विजेते

दिलीप पांढरपट्टे : गजलरत्न २०१५
सदानंद डबीर : गजलरत्न २०१६
संगीता जोशी : गजलरत्न २०१६
पवन नालट : गजलसृजन २०१६
शिल्पा देशपांडे : गजलसृजन २०१६
गणेश नागवडे : गजलांकूर २०१६
अल्पना नायक : गजलांकूर २०१६
आनंद पेंढारकर : गजलगुंजन २०१६
नितीन देशमुख : गजलगुंजन २०१६
गाथा जाधव : गजलगुंजन २०१६
प्रथमेश तुगांवकर : गजलउत्कर्ष २०१७

गजल परिसंवाद

गजल विषयी चर्चा घडवून आणण्यासाठी गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था गजल क्षेत्रातील अभ्यासकांना बोलावून परिसंवाद आयोजित करत असते.
काही महत्वाचे परिसंवाद

आशयप्रधान गजल गायन : सहभाग - डॉ. आशिष मुजुमदार, विनय राजवाडे, मिलिंद जोशी, जनार्दन केशव म्हात्रे
उर्दू व मराठी गजल तौलनिक चर्चा : सहभाग - संगीता जोशी, डॉ. सुनंदा शेळके, डॉ. दिलीप पांढरपट्टे, मोनिका सिंग
आजची मराठी गजल : सहभाग - डॉ. राम पंडित, सदानंद डबीर, प्रा. अशोक बागवे, मिलिंद जोशी, जनार्दन केशव म्हात्रे

गजल क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती

मराठी गजल विषयक अधिकाधिक माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था गजल क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखतींचे आयोजन करत असते.
काही महत्वाच्या मुलाखती

डावीकडील ठळक नाव - मान्यवर व्यक्ती : उजवीकडील नाव - मुलाखतकार

सुधाकर कदम : सुरेशकुमार वैराळकर
प्रा. अशोक बागवे : जनार्दन केशव म्हात्रे
डॉ. राम पंडित : मिलिंद जोशी

गजलांकित कार्यक्रमांमधील सहयोगी निवेदक

जनार्दन केशव म्हात्रे
शिल्पा देशपांडे
पावन नालट
प्रमोद खराडे
मयुरेश साने
हेमंत राजाराम
सतीश दराडे
यामिनी दळवी

गजल वाचन स्त्रोत

गजलांकित संकलित गजल
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=गजलांकित_प्रतिष्ठान&oldid=1443069" पासून हुडकले
वर्ग:

मराठी साहित्यसंस्था

या पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०१७ रोजी ११:२७ वाजता केला गेला.
येथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागु असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघावापरण्याच्या अटी.

गझल