मोबाईल घेण्यासंदर्भात मदत हवी आहे.

अव्यक्त's picture
अव्यक्त in काथ्याकूट
15 Feb 2017 - 10:17 am
गाभा: 

… त्याचे झाले असे माझा भ्रमणध्वनी गेली दोन वर्षं आपल्या धन्याची इमाने इतबारे त्याच्या वकुबाप्रमाणे चाकरी करत होता…पण अचानक गत आठवड्यात असहकाराचे निशाण उगारले… आता झाली का पंचाईत ! आता कसं करायचं आणि काय करायचं असा यक्षप्रश्न अस्मादिकासमोर उपस्थित झाला ? येत्या मराठी दिनाच्या निमित्ताने नवीन भ्रमण ध्वनी घेण्याचे योजत आहे… तरी कोणता भ्रमण ध्वनी घ्यावा हा गहन पेच अस्मादिकांस पडला आहे… तरी मिपाकर हा गुंता सोडवण्यास नेहमी प्रमाणे मदत करतील हीच आशा बाळगतो… माझे budget रु. १३०००/- आहे. तरी मिपाकरांनी विविध पर्याय सुचवावे. भ्रमण ध्वनीत प्रगत तंत्रज्ञान असणे अपेक्षित. वरील विषयावर साधक बाधक चर्चा होणे अगत्याचे आहे. जास्तीत जास्त पर्याय सुचवावे आणि ते का योग्य आहेत ह्याचा उहापोह झाल्यास दुधात केशरच…. मिपाकर आणि मिपा व्यासपीठाचा आभारी !

ता.क. - MI -४ note च्या specifiaction सारखे अजून कोणते मोबाईल बाजारात उपलब्ध आहेत ह्याविषयी ऊहापोह व्हावे ही नम्र विनंती.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

15 Feb 2017 - 10:58 am | कंजूस

नवीन मोबाइलची माहिती ( reviews ) देणाय्रा साइट्स. यांत बजेट/कॅम्रा/फ्लॅगशिप ढालगज प्रमाणे यादी पाहा. वापरण्याचा युझर इंटरफेसमुळे वापरण्यास सोपा /अवघड होतो.
मेमरी कार्ड स्लॅाट असलेले/नसलेले बघा. अडचण वाढते. बॅटरी काढता येत असेल तर एक स्पेअर बॅट्री नेता येते. प्रत्येकात काहीतरी गोची असतेच. वैयक्तिक मत देत नाही.

१ ) Mobiles Reviews, Latest Mobiles Reviews: NDTV Gadgets360.com :http://m.gadgets.ndtv.com/mobiles/reviews

२ ) Digit: Technology Advice, Product Reviews, Latest News, Free Downloads :http://www.digit.in/

सध्याचा ट्रेन्ड -
Qualcom 410 processer असलेले १०हजार,
620 : १३हजार, 808/820/ : १८हजार रु

अव्यक्त's picture

15 Feb 2017 - 11:39 am | अव्यक्त

धन्यवाद कंजूसजी, अपेक्षेप्रमाणे प्रथम अभिप्राय नोंदवल्याबद्दल त्रिवार वंदन...

(१.) MI-note ४ ह्या स्पेसिफिकेशनशी मिळते जुळते अजून कोणते पर्याय उपलब्ध आहेत सध्या बाजारात.

(२.) online खरेदीचे फायदे आणि तोटे कोणते आहेत माझ्या सारख्या नवख्या online ग्राहकाला.

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2017 - 11:48 am | संजय क्षीरसागर

काहीही विचार न करता फ्लिपकार्टवरनं घेऊन टाका !

Nitin Palkar's picture

15 Feb 2017 - 9:00 pm | Nitin Palkar

!!! छान!!!!

Nitin Palkar's picture

15 Feb 2017 - 9:01 pm | Nitin Palkar

हा प्रतिसाद संक्षी च्या प्रतिसादाला आहे.

अव्यक्त's picture

15 Feb 2017 - 11:53 am | अव्यक्त

धन्यवाद ! ... संक्षी आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल. अजून काही best expert कंमेंट्स...

अभ्या..'s picture

15 Feb 2017 - 2:38 pm | अभ्या..

संक्षी आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल. अजून काही best expert कंमेंट्स...

श्युअर्ली यु आर जोकींग, मि. अव्यक्त.

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2017 - 2:57 pm | संजय क्षीरसागर

MI Note 4 त्यांच्या बजेटमधे बसणारा एकदम भारी फोने .

अभ्या..'s picture

15 Feb 2017 - 3:14 pm | अभ्या..

तेच ना संजयजी, एमाय ४ नोट भारीच आहे पण त्यांना फोनपेक्षा प्रतिसाद अन उहापोह पाहिजे.

सतिश गावडे's picture

15 Feb 2017 - 9:19 pm | सतिश गावडे

घाबरला काय? ;)
वरच्या प्रतिसादात तुला हे नक्कीच अभिप्रेत नसावं :)

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2017 - 11:42 pm | संजय क्षीरसागर

तो एकदम ऑथेंटीक माणूस आहे !

अभ्या..'s picture

16 Feb 2017 - 2:58 pm | अभ्या..

धन्या, आता तू मला घाबर. ;)

सतिश गावडे's picture

17 Feb 2017 - 9:59 am | सतिश गावडे

तू भेट "हिंगणे चौकात". तुला "MI Note 4" भेट देतो. :)

"फोनपेक्षा प्रतिसाद अन उहापोह पाहिजे."

???

अपेक्षा काय आहेत? अगोदरच्या फोनमध्ये काय चांगले होते हे कळले तर पुढचे सांगतील मिपाकर.
काही फोन्स access साठी तर काही creations साठी चांगले असतात.

मी-सौरभ's picture

15 Feb 2017 - 7:35 pm | मी-सौरभ

जो आवडलाय तो घेऊन टाका, चांगला फोन आहे तो असे वाटते. फार फार तर मोटोरोला चा एखदा फोन आहे का बघा. सॅमसंग चे चांगले फोन महाग आहेत.

येडा कि खुळा's picture

15 Feb 2017 - 7:41 pm | येडा कि खुळा

त्यात काय असतंय.... घ्यायचा कुठला तरी, कितीही चांगला घेतलात तरी वर्षभरात बंडाचं (किंवा बंदच सुद्धा) निशाण उगारणारच तो भ्रमणध्वनी. :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Feb 2017 - 8:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शामशुंग जे ७ न्यु २०१६ घ्या. एक तर ब्याटरी ३३०० एमएच. आहे. सध्या वाट्सप आणि तत्सम सर्च करीत राहण्यामुळे मोबाईलची ब्याटरी लवकर ढूस होती आणि आपला मुड जातो आणि मोबाईलला काड्या आणि किडे करायचा नाद असेल तर त्याच्या इतका जबरा फ़ोन नाही, असे माझं व्यक्तीगत मत आहे. रुट केल्यावर तर मरणाच्या ओएस बदलता येतात. (हा जोखमीचा खेळ असतो, हे विसरु नये. बाकी, पैसा आपका, मर्जी आपकी. फ़ीचर्स आणि किंमत गुगलून घ्यावी ही नम्र विनंती.. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे
(शामसंग ज७ २०१५ एक वर्षापासून वापरत असलेला ग्राहक)

सतिश गावडे's picture

15 Feb 2017 - 9:09 pm | सतिश गावडे

सामसुंगच्या फोनना अँड्रॉइडचे अपग्रेड झेपत नाहीत अशी बरेच जणांची बोंब आहे.

अँड्रॉइडचे अपग्रेड हे एक कॅाझ्मेटिक प्रकरण आहे असं बरेच लेख वाचल्यावर वाटू लागलं आहे. जेलिबिननंतर किटकॅट मोठी झेप होती म्हणतात. नंतर मेमरी कार्ड ते फोन मेमरी अॅप कशी सरकवायची याचाच कोड बदलत आहेत.

काही कंपन्या ओएस 'कस्टमाइज' करतात ते खरंतर 'कॅाम्प्रमाइज' असावं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Feb 2017 - 2:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाय हो असं काय नाय.

-दिलीप बिरुटे

रॉजरमूर's picture

16 Feb 2017 - 12:35 pm | रॉजरमूर

काय सर ........
एकदम शाम "संग" ?
बाकी..........., "लावा"रस आटला म्हणायचा?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Feb 2017 - 2:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लावासाठी कष्टम रोम कोणी उपलब्ध करुन देत नाही, म्हणून लावा नाद सोडला. अजुनही लावा वापरतो. आणि त्याच्यावर लव आहेच. :)

-दिलीप बिरुटे

भौ!
माझ्या अल्प माती प्रमाणे,
आपली गरजा बघून, आपल्या अंथरुणा प्रमाणे आपल्या तंगड्या पसराव्या. या इथे शंभर जण एक हजार प्रकारचे मोडेल सुचवतील....

योगी९००'s picture

15 Feb 2017 - 9:49 pm | योगी९००

लेनेव्हो के ५ नोट घ्या...१३००० रुपयात उत्तम पॅकेज आहे.

कॅमेरा पण छान आहे.

श्रीगुरुजी's picture

15 Feb 2017 - 11:27 pm | श्रीगुरुजी

Motorala G4 Plus १३५०० (2 GB) आणि १५००० (४ GB) ला आहे. Very good camera phone.

बटाटा चिवडा's picture

16 Feb 2017 - 9:39 am | बटाटा चिवडा

फोन घ्यायला जास्त आसुसलेले असाल तर Asus ghya..
ASUS ZENFONE MAX ची नवी सिरीज जरा लैच भारी आहे.. ब्याट्री स्पेशल हा फोन २ दिवस ब्याट्री पुरवतो आणि ह्यांग पण होत नै.. धा हजाराच्या आत मावेल बघा हा आसुसलेला फोन..

बाकी इतर फोन बद्दल विचार कराच. घेतल्यावर फक्त कोणता घेतला तेवढं सांगा म्हणजे झालं, कारण मतदान केल्यावर कोण निवडून आला हे समजलं नै तर उगीचच व्होटिंग कार्ड फाडून टाकावं असं एक दोन दिवस वाटत राहतं. उगीच आमचा मिपा सुटायला नको मधल्या मध्ये !!

बाकी नोकिया चा बटन वाला फोन परत येतोय असं ऐकलं, तुम्ही तो घेतलात तर जास्त आनंद मला होईल.

संजय क्षीरसागर's picture

16 Feb 2017 - 10:08 am | संजय क्षीरसागर

घेतल्यावर फक्त कोणता घेतला तेवढं सांगा म्हणजे झालं, कारण मतदान केल्यावर कोण निवडून आला हे समजलं नै तर उगीचच व्होटिंग कार्ड फाडून टाकावं असं एक दोन दिवस वाटत राहतं.

हे बाकी झकास !

उपयोजक's picture

17 Feb 2017 - 8:37 am | उपयोजक

पैसे वाया घालवायचे असतील तर असुस घ्याच! थोडक्या किंमतीत काय काय कोंबतात हे असुसवाले!

इरसाल कार्टं's picture

16 Feb 2017 - 10:38 am | इरसाल कार्टं

मोटोरोलाचा कुठलाही फोन घ्या.
एक तर फोन मजबूत असतात...लहान पोरांना गुरुत्वाकर्षणाचे प्रयोग करायला लागतात ना
दुसरं म्हणजे जास्त कस्टमाइज्ड नसतात...रॅम वर अतिरिक्त भर नाही येत
तिसरं जेन्युईन अँड्रॉइड वापरायला भारी वाटते
आणि अपडेट्स लवकर मिळतात.

विश्वजीत कदम's picture

16 Feb 2017 - 10:49 am | विश्वजीत कदम

Moto G4 Plus ghya. uttam ahe. 1000 rupdyani budget vadhel pan anubhav uttam ahe.

चौथा कोनाडा's picture

16 Feb 2017 - 2:45 pm | चौथा कोनाडा

तुम्ही मोट्टा ग४ अधिक स्वतः वापरताय का ?

स्मार्ट टीव्ही सोबत कास्ट-स्क्रीन करुन पहिलेय का ?
कसे करायचे ?

मी-सौरभ's picture

20 Feb 2017 - 6:34 pm | मी-सौरभ

मी ग२ कास्ट करुन वापरतो आणि अनुभव ऊत्तम आहे. त्यावरुन ग४ चांगलाच असेल असा अंदाज आहे.

संदीप डांगे's picture

16 Feb 2017 - 1:37 pm | संदीप डांगे

मोटो ग'चार ब्येस्ट आहे बजेटमध्ये...

बाकी धागा आणि प्रतिसाद धमाल... अनपेक्षित मनोरंजन. ;-)

अभिजीत अवलिया's picture

16 Feb 2017 - 3:58 pm | अभिजीत अवलिया

जास्त विचार करत किंवा लोकांना विचारत बसलात तर confusion होईल. आपले अंथरून किती मोठे आहे त्यानुसार फ्लिपकार्ट किंवा ऍमेझॉन वर फिल्टर लावायचा आणी जी मॉडेल्स येतील समोर त्यातला एक ऑर्डर करून टाकायचा. कुठलाही फोन १००% चांगला किंवा १००% वाईट नसतो. एखाद्याला जो फोन खूप चांगला परफॉर्मन्स देईल तोच फोन दुसऱ्या कुणाला तरी अतिशय वाईट अनुभव देऊ शकतो किंवा vice versa .

संदीप डांगे's picture

16 Feb 2017 - 5:23 pm | संदीप डांगे

+१००००००००

Nitin Palkar's picture

20 Feb 2017 - 3:08 pm | Nitin Palkar

लई भारी प्रतिक्रिया!

संजय क्षीरसागर's picture

20 Feb 2017 - 12:40 am | संजय क्षीरसागर

.

आनंदी गोपाळ's picture

20 Feb 2017 - 8:06 am | आनंदी गोपाळ

.

संजय क्षीरसागर's picture

20 Feb 2017 - 12:52 pm | संजय क्षीरसागर

http://www.ebay.in

Xiaomi MI Redmi Note 4 32GB |2 GB Ram |Gold Color |5.5 inch |Snapdragon 625 Xiaomi 1 Year Manufacturer Warranty + Free Powership

.

सुबोध खरे's picture

20 Feb 2017 - 12:56 pm | सुबोध खरे

E bay वर बऱ्याच वेळेस दुसर्याने वापरलेला फोन (स्वस्तात) मिळतो

संजय क्षीरसागर's picture

20 Feb 2017 - 1:02 pm | संजय क्षीरसागर

कायम ओरिजिनलच घ्यावा.

स्वप्क००७'s picture

6 Mar 2017 - 1:54 am | स्वप्क००७

Red mi note 4 ghya changala aahe
+ Pts
13000rs
1.5 day battery jate medium internet use karat asal tar
-pts
Motha aahe , handling la thoda tras hoto
Pantchya khishat neet mavat nahi

Ghetla tar 4gb vala phone ghya 2.5 gb usable ram milto

स्वप्क००७'s picture

6 Mar 2017 - 1:54 am | स्वप्क००७

Red mi note 4 ghya changala aahe
+ Pts
13000rs
1.5 day battery jate medium internet use karat asal tar
-pts
Motha aahe , handling la thoda tras hoto
Pantchya khishat neet mavat nahi

Ghetla tar 4gb vala phone ghya 2.5 gb usable ram milto

स्वप्क००७'s picture

6 Mar 2017 - 1:56 am | स्वप्क००७

Red mi note 4 ghya changala aahe
+ Pts
13000rs
1.5 day battery jate medium internet use karat asal tar
-pts
Motha aahe , handling la thoda tras hoto
Pantchya khishat neet mavat nahi

Ghetla tar 4gb vala phone ghya 2.5 gb usable ram milto

Kuthun ghyal

Www.flipkart.com
Or
Www.mi.com

आशु जोग's picture

6 Mar 2017 - 3:40 pm | आशु जोग

कमी आकार वालं काही सांगा ना आणि संगणक आणि मोबाईल यामधे काही फरक असेल की नाही. आपण संगणकाच्याच सगळ्या अपेक्षा मोबाईलकडून ठेवतो.

स्वप्क००७'s picture

8 Mar 2017 - 12:58 am | स्वप्क००७

Mi redmi 3s prime
Meizu m3s