परदेशस्थ भारतीय आणि चायनीज पांडा

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
14 Feb 2017 - 10:38 pm
गाभा: 

chinese cartoon critic

तुम्ही परदेशस्थ भारतीय आहात का ? आणि चायनीज पांडावर अशी (कार्टून मध्ये दाखवल्यासारखी) दगडफेक करता का ? चिनी इंग्रजी मुखपत्रातील कुणा लिऊ रुईचे टुकार व्यंगचित्रा खालचे वाक्य म्हणते तुम्ही चायनीज पांडावर अशी दगडफेक करत असाल तर ती अपरिणामकारक कृती आहे !

काही समजल का कशा बद्दल आहे हे कार्टून ? नाही ना मग ग्लोबल टाईम्समधला हा २ फेब्रुवारीचा लेख वाचा. ग्लोबल टाइम्सच्या झू लिआंगचे मत विचाराल तर : "परदेशस्थ भारतीय इतर देशांच्या (चिनच्या असे वाचावे) सार्वभौमत्वात हस्तक्षेप करतील तर त्यांना राजकीय परिणामांना सामोरे जावे लागेल " अशा (पोकळ धमक्या आणि तेही परदेशस्थ भारतीयांना ?)

आता या पोकळ धमक्यांचे कारण आहेत कुणी प्रदीप खोसला जे सँडीदीएगोच्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी दलाईलामांना विद्यापीठात आमंत्रण दिले आहे, तर हे चिनी सर्व परदेशस्थ भारतीयांवर घसरत नाहीत तर राजकीय परीणामांच्या धमक्याही देऊ इच्छितात , नेमके कशाच्या जोरावर ? सर्व चीन एक असावा असे त्यांना वाटते तर सर्व भारतीय उपमहाद्वीप भारताचा भाग आहे समजून पाकीस्तानशी हे चिनी लोक संबंध का तोडत नाहीत ? त्याबाबतीत पाकीस्तानी नरेटीव्ह ला पाठबळ देण्यात चिनी नेतृत्वाला काय भूषण वाटते ते देव जाणे.

* कार्यक्रमा बद्दल म्हणे चिनी विद्यार्थ्यांचा रोष

* Is China scared of the Dalai Lama?

* Sino-Tibet dialogue: Interview with ex-envoy Kelsang Gyaltsen

*

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 Feb 2017 - 4:42 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

हम्म. "आम्ही बाहेर रहात असलो तरी आमचे मातृभूमीवर प्रेम आहे" हे दाखवण्याची अहमह्मिका हल्ली दिसते. चीनी वंशाचे लोकही त्याला अपवाद नसावेत.

पैसा's picture

15 Feb 2017 - 9:22 pm | पैसा

चांगलंय. तो बेटा पगारी नोकर असणार. चिनी कार्टुनिस्ट स्वतःचे डोके वापरून काही चित्रे काढत असतील असं वाटत नाही. ते चित्र कुठच्या तरी सरकारी खात्याच्या आदेशावरून काढले असणार.

माहितगार's picture

15 Feb 2017 - 10:33 pm | माहितगार

ते चित्र कुठच्या तरी सरकारी खात्याच्या आदेशावरून काढले असणार.

ते तर नक्कीच, दलाई लामांना आमंत्रित करण्याची दगड फेकण्याशी तुलना म्हणजे शुद्ध मठ्ठपणा आहे हे खरे पण कंट्रोल्ड मिडीयाला कंझ्युम करणार्‍या चिन मधल्या चिनी लोकांना खरेही वाटू शकते.

ह्या विषयावर वाचन करताना इंग्रजी विकिपीडियावर १९६०च्या दशकात सिआयए ने तिबेटात केलेले उद्योग वाचनात आले, आत्ता पर्यंत माहित नसलेली एक बाजू वाचनात आलीच पण बौद्ध धर्म = अंहीसा असा ठोकताळा बांधलाच पाहीजे असे नाही हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालेच त्या शिवाय नेहरुंच्या अनुमती अथवा जाणीवपुर्वक दुर्लक्षा शिवाय सिआयएलाही हे सहज शक्य नसावे. कि नेपाळच्या मदतीने नेहरुंना साईडलाईन करण्यात सिआयएला यश मिळाले हे देवच जाणे. पण त्या काळाचा रोष चिनी लोकांनी अंशतः बाळगला असेल तर त्यातही आश्चर्य आहे असे नाही. पण दलाई लामा अधिकृतपणे राजकारणातून बाहेर पडलेले असताना आणि गेल्या पन्नास वर्षात तरी तिबेटी लोक त्यांचे प्रयत्न अंहीसेने करत असताना चिनी लोक स्वतःच दलाई लामांबद्दलच्या बातमीचे महत्व वाढवत असावेत.