एक अच्छा आदमी

रवि वाळेकर's picture
रवि वाळेकर in जनातलं, मनातलं
8 Feb 2017 - 9:53 pm

मुंबईतल्या 'टँक्सीवाले-रिक्षावाले' या आदरनीय जमातीचे आणि माझे छान जमते! खरं तर, त्यांच्या रितीरिवाजाला हे धरून नाही, पण माझे झकास जमते हे खऱं! मला माझ्या इप्सित स्थळी सोडण्यास क्वचितच एखाद्या महात्म्याने नकार दिला असावा! एकतरं माझ्या आणि त्यांच्या पर्सनँलिटीत त्यांना काही साम्य सापडत असावे, किंवा मी यांना हात करतो, तेव्हा माझा चेहरा भलताच दिनवाणा, केविलवाणा दिसत असावा!

मागच्याच आठवड्यात माझा एक मित्र भल्या संध्याकाळी पार्ल्यात ऊभा राहुन गोरेगावला जाण्यासाठी तासभर प्रत्येक रिक्षावाल्याच्या मिनतवा-या करत होता! नेमके त्याच दिवशी, ६८% रिक्षावाल्यांना उलट्या दिशेला जा़यचे होते, १७% रिक्षांमध्ये ' गँस' नव्हता, १२% रिक्षावाल्यांना याच्याकडे बघन्यातच रस नव्हता, ऊरलेले सगळे 'खाना खाने रुकेले' होते! पायी पायी गेला असता तरी लवकर पोहोचला असता!

मला तर सर्रास कुठुनही कुठेही जायला रिक्षा/ टँक्सी मिळते! एकदा तर मी माटुंग्याहुन दादर TT साठी टँक्सी मिळवली होती! (मला अजुनही वाटत की त्या ड्रायव्हरच्या सहिचे एक प्रमाणपत्र ठेवायला हवं होत!) माझ्या इगोला सुखावना-या ब-याच यात्रा मी सांगु शकतो (पण, कशाला, कशाला!) माझ्या सारखे, चकाला ते नेल्को रिक्षा मिळवना-याला तर मी 'गेट वे'च्या समोर पार्टी देईल!
मेरू, उबेर,ओला पण वापरतो... वापरतोच! पण, 'इथल्या' गप्पांची मजा 'तिकडे' नाही! हे ऊबेर, ओलावाले दिवसभर AC मध्ये फिरत असल्यामुळे, डोक्यात थोडी हवा गेलेली असते. बरं , अजुन हे उबेर/ओला वाले एक्झँक्टली कोण आहेत हे कळत नाही! निम्म्याहुन जास्त खरे जातिवंत 'डायवरच' नसतात! परवा, बंगलोरला माझा उबेरवाला वॉज टेलिंग मी दँट, हि हँज रिटर्नड फ्रॉम द युएस्स अँड ओन्स सम ईलेवन कार्स विथ उबेर!
आता मला सांगा, ह्याच्याबरोबर काय बोलावे? कप्पाळ?
इंग्रजी बोलनारा 'डायवर' आणि शिग्रेट पिणारी पोरगी काही केल्या माझ्या मनाला मान्य होत नाही!
रिक्षावाले/ टँक्सीवाले खरतरं मस्त माणसं असतात. आपण खरतरं त्याना 'माणुस' म्हणुन सुद्धा मान्य करत नाही. करून बघा.
माझ मत आहे की, मुंबईत रिक्षावाले मस्तीत जगतात, टँक्सीवाले जिंदगीवर थोडे नाराज असतात!

मुंबईतल्या रिक्षावाल्यांचा गप्पांचा फड ट्रँफिकच्या घनतेनुसार रंगतो! ट्रँफिक-जाम झाला की हे तोंड आणि मन मोकळ करतात! सुरळित रहदारीत हे फक्त 'ईस्ट या वेस्ट' एवढचं बोलायला तोंड ऊघडतात. क्वचित, एखाद्या ऊद्दाम दुचाकिस्वाराच्या मातोश्रींच्या उद्धारासाठी ऊघडले, तरचं!
सिग्नलवर शेंगदाणे विकायला मुलं दिसली तर फार तर फार 'आगे जाम रहेंगा' एवढचं पुटपुटनार!

एकदा ट्रँफिकमध्ये फसले कि यांना कंठ फुटतो! महत्वाचे किंवा आवडिचे ३ विषय. कोणा हिरोला कुठे बघितले, आमची रिक्षा युनियन कसली भंकस आहे आणि ट्रँफिक पोलिस कसे त्रास देतात! बिचारे! बाकी विश्वाशी त्यांना घेणदेण नसतं.
क्वचित एखादा मग एकदा एका एअर होस्टेसला मालाडहुन २३ मिनीटातं सांताक्रुझला कसे सोडले हे रंगवुन रंगवुन सांगतो. प्रत्येक रिक्षावाल्याच्या रिक्षात एकदा तरी ' आप नही मानोगे़...' अशी एक तरी परदेशी ललना कधीतरी बसलेली असते! मराठी रिक्षावाला असला तर 'काह्यची शिवसेना हो' हा हमखास विषय! मुंबईतल्या रस्त्यांना शिव्या देणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार... आणि रिक्षावाले तो बजावतातच!
काल, वरळित टँक्सी केली.
डायवरसाहेब बांद्र्याला यायला नाराज होते...
पण आले!
मला नाही राहवलं, विचारलच!
'भाय, नाराज है क्या? बांद्रा नही आनेका था क्या?'
मुंबईत मराठी मिश्रित हिंदी आणि हिंदी मिश्रित मराठी सर्रास चालते! ( किंबहुना तुम्ही शुद्ध हिंदी वा मराठी ईथे बोलुच शकतं नाही!)
'क्या बताऊ साब, सुब्बसे खाना नयी खायेला है,लेट निकला, बिवी कि तबीयत खराब है, सोयेली है घरपे. खाना ही नही लाया.जबसे निकला, भाडे पे भाडा मिल रेह्यला है! टाईमीच्च नही मिला'

मी काय करू शकतो? बहुधा कायच नाय!

' भाय, किधर तो रुक, छोटामोटा खा ले'
' नही साब, आपके ड्रॉप करकेे जुगाड कर लुंगा'

बांद्र्याला येण्यापुर्वी एक वडापावचा गाडा दिसला. मी गाडी थांबवली. चार वडापाव घेतले.दोन त्याला अन दोन मला!
नाही नाही म्हणत, त्याने तो अधाशासारखा खाल्ला! तृप्ततेचा एक छान भाव त्याच्या चेह-यावरं मी लख्ख वाचला.
सहज म्हणुन त्याला विचारलं...
'आपने तो वडापाव खाया,आपकी बिवी बिमार है.
बिवी के लिये पार्सल लेते है क्या?'

तो एवढचं म्हंटला,
' ऊसके लिये उसकी मा आयेली है घरपे! वो डायन के हाथ का मै नही खाता!'

त्यानंतरच्या बोलन्यात एवढचं कळलं कि महाशयांनी लव्हमँरेज केलेलं होत आणि लग्नानंतर, सासरकडच्यांचा खुप त्रास सहन केला होता. त्याने त्याची ' लवस्टोरी' मला ' डिटेलवार' सांगितली. 'ऊधरवालों'साठी काही शेलक्या शिव्या ही दिल्या. विषेशत: सौभाग्यवती 'डायन' ऊर्फ सासुविषयी त्याला भयंकर तिटकारा होता! (सगळ्यांना एवढं मोकळ नाही बोलता येत हो!)

बांद्र्याला घरी पोहोचलो...

गाडी थांबली. मी त्याला मीटरप्रमाणे झालेली रक्कम दिली.
वळलो, तर हा माझ्या मागे!
'क्या है भाई?'
'साब, ये मेरी तरफ से आपको!'

जिर्ण वर्तमानपत्रात गुंडाळलेले एक नवकोरं पुस्तक त्याने माझ्या हाती टेकवलं!

वर्षभरापासुन हे मराठी पुस्तक तो जवळ बाळगुन होता. कोणी तरी पँसेंजर दादरला त्याच्या टँक्सीत विसरून गेला होता. मराठी वाचता येत नाही आणि कोणी मागायलाही आले नाही म्हणुन त्याने ते तसेच गाडित जपुन ठेवले होते!

' अरे, काहे भैय्या!'
' साब, आपने वेटिंग चार्ज का भी पर्वा नही किया, उप्पर से वडापाव खिलाया! मै एक साल से सोच रहा था कि कोई अच्छा आदमी मिले तो ये किताब उसको दे दुंगा'

काल मला मस्त झोप आली!

दोन गोष्टिंसाठी.

एक म्हणजे मी 'अच्छा आदमी' आहे हे समजल्याने,
आणि
दुसरे म्हणजे, आख्ख्या मुंबईत भटकना-या या टँक्सीवाल्याला वर्षभरापासुन सापडत नव्हता एवढा भारी माझ्यासारखा 'अच्छा आदमी' त्याला मिळाल्याने!

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

ट्रेड मार्क's picture

8 Feb 2017 - 10:23 pm | ट्रेड मार्क

बाकी हे मात्र खरंय की बरेच लोक ड्रायव्हर, वेटर असे लो प्रोफाईल काम करणाऱ्यांना माणसासारखं वागवत नाहीत. पण तुम्ही जर का यांच्याशी जरा नीट बोललात तर हीच माणसं तुम्हाला उत्तम सर्विस देतात.

Rahul D's picture

9 Feb 2017 - 12:06 am | Rahul D

+100%

संजय पाटिल's picture

8 Feb 2017 - 10:38 pm | संजय पाटिल

मुंब्बैय्या लेख...

अत्रुप्त आत्मा's picture

9 Feb 2017 - 8:42 pm | अत्रुप्त आत्मा

+++ १११

जेपी's picture

8 Feb 2017 - 10:46 pm | जेपी

लेख आवडला.

वाळेकर साहेब, झकास लिहिले आहे. पुलेशु.

अनन्त अवधुत's picture

8 Feb 2017 - 11:54 pm | अनन्त अवधुत

पुलेशु

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Feb 2017 - 12:00 am | डॉ सुहास म्हात्रे

ब्येस्ट लिहिले आहे. लिहीत रहा.

अभिदेश's picture

9 Feb 2017 - 2:40 am | अभिदेश

मला सुद्धा टॅक्सी आणि रिक्षा वाल्यांशी बोलायला फार आवडते.

पर्णिका's picture

9 Feb 2017 - 3:43 am | पर्णिका

छान लिहिलंय...!

मस्त अनुभव वाळेकर.., अजून येऊद्या !

पैसा's picture

9 Feb 2017 - 9:53 am | पैसा

अच्छे आदमी दुर्मिळच असतात हो! त्याला सापडायला एक वर्ष लागलं यात काय आश्चर्य!!

चिनार's picture

9 Feb 2017 - 10:00 am | चिनार

मस्त लिहिलंय रवी भाऊ...
लिहीत राहा...

राजाभाउ's picture

9 Feb 2017 - 10:56 am | राजाभाउ

मस्त लिहलय हो, भारी.

अनन्त्_यात्री's picture

9 Feb 2017 - 11:04 am | अनन्त्_यात्री

मस्तच ! लिहिते रहा , था॓बू नका !!!

सतिश पाटील's picture

9 Feb 2017 - 11:40 am | सतिश पाटील

मागच्या महिन्यात एअरपोर्टला जाताना उबेरची टैक्सी केली होती, त्या ड्रायवर सोबत पुढच्या सीटवर बसून बर्याच गप्पा हानल्या. एअरपोर्ट ला पोहोचल्यावर मि त्याला २००० ची नविन नोट दिली , बिल झाले ३४५ रुपये. त्याच्याकडे सुट्टे न्हव्ते आणि माझ्याकडेही. गाडी अर्धातास तशीच उभी ठेवून मी खिशात पैसे असुनही सुट्ट्या पैशांसाठी अंतर्राष्ट्रीय विमानतलावर भिक मागत फिरत होतो, पर्किन्गवाले, दुसरे टैक्सीवले, रेस्टोरंट, शेवटी पोलिसाकडे सुद्धा मागितले, कोणीच दिले नाही.
नेमका त्याच दिवशी नविन मोबाईल घेतला होता त्यात कुठलेही app न्हव्ते. प्ले स्टोर वरून डाऊनलोड करुण पाहिले पण ३g हे 1g चे काम करत होते.
शेवटी न राहवून त्या ड्राईवर ला म्हटले बाबा उधार दे. मि नंतर तुला करतो ट्रांसफर करतो. आणि चक्क त्याने उधार दिले.
अर्थातच त्याला नंतर मि ट्रांसफर केले.
शमीम नाव होते त्याचे.

मराठी कथालेखक's picture

9 Feb 2017 - 11:56 am | मराठी कथालेखक

शिग्रेट पिणारी पोरगी काही केल्या माझ्या मनाला मान्य होत नाही!

सिगरेट पिणार्‍या पोरी तर तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिल्याच असतील अनेक..
पण बरेच दिवस झाले होते मनात ठेवून कुठेतरी लिहावेसे वाटत होते म्हणून लिहीत आहे. मी सिगरेट ओढणारा सरदारजी पाहिला आहे , ते पण दोन वेळा. माझ्या ऑफिसपासून जवळच एका टपरीवर ..कदाचित पुन्हाही कधी बघायला मिळेल..

IT hamal's picture

9 Feb 2017 - 12:58 pm | IT hamal

शिग्रेटी फुकणाऱ्या जीन्स वाल्या पोरी रोजच बघतो टपरीवर..आजकाल पंजाबीवाल्याही असतात त्यांच्या जोडीला.. मागच्या आठवड्यात "सारी डे " कि असाच कुठलातरी डे होता तेव्हा टपरीवर साडीतल्या फुकणाऱ्या ही पहिल्या !!!

गामा पैलवान's picture

9 Feb 2017 - 7:53 pm | गामा पैलवान

आयटी हमाल,

ठाणे आणि वसईच्या कोळीणी सर्रास बिड्या फुकतात. वेशभूषा पारंपारिक आणि तोंडात बिडी.

आ.न.,
-गा.पै.

सिरुसेरि's picture

9 Feb 2017 - 12:13 pm | सिरुसेरि

झकास अनुभव

पाटीलभाऊ's picture

9 Feb 2017 - 1:07 pm | पाटीलभाऊ

मस्त अनुभव आणि लिखाणही रोचक

अनुभव आवडला. कोणते पुस्तक? नाव काय पुस्तकाचे आणि वाचलेत का?

साधा मुलगा's picture

10 Feb 2017 - 5:45 pm | साधा मुलगा

मी सुद्धा हेच विचारतो, पुस्तकाचे नाव काय होते?
बाकी लेख सुरेख, पुलेशु!

चांदणे संदीप's picture

9 Feb 2017 - 5:46 pm | चांदणे संदीप

एक म्हणजे मी 'अच्छा आदमी' आहे हे समजल्याने,

हा मला खरा विनोदी पंच वाटला.... फिस्सकन फुटलो मी इथे! =)) =))

Sandy

उगा काहितरीच's picture

9 Feb 2017 - 7:23 pm | उगा काहितरीच

नुकतेच कर्नाटकला जाऊन आलो ३-४ दिवसांच्या प्रवासात एक ड्रायव्हर सोबत होता. एकदम मस्त माणूस ! व्यंकटेश ! हिंदी , कन्नड , मराठी , इंग्रजी अशा भेळपूरी भाषेत संवाद साधायला मज्जा आली.

कंजूस's picture

10 Feb 2017 - 5:42 am | कंजूस

वा वा वाळेकर! मजा आली.

जव्हेरगंज's picture

10 Feb 2017 - 9:23 am | जव्हेरगंज

झकास!!

अनुप ढेरे's picture

10 Feb 2017 - 10:56 am | अनुप ढेरे

किस्सा मस्तं! तुम्ही लिहिलंदेखील छान आहे.

अभिजीत अवलिया's picture

12 Feb 2017 - 11:44 am | अभिजीत अवलिया

मस्त...

रुपी's picture

12 Feb 2017 - 11:57 am | रुपी

मस्त लिहिलंय..आवडलं.