कॅरोलीन

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in जनातलं, मनातलं
1 Feb 2017 - 1:53 pm

८-एप्रिल-२००४ आयुष्यातल्या पहिल्या वहिल्या परदेश प्रवासाचे मोजून ८५ दिवस संपलेले. मी आणि कल्याण (माझा बॉस जो कधी बॉस सारखा वाग्लाच नाही) सगळे काम कष्टपूर्वक अतिशय निगुतीने संपवलेले त्यामुळे अतिशय समाधानाने आम्ही मोरेपा ह्या paris जवळच्या एका लहानश्या गावात कामाची आवरा आवर करत होतो .. आज आणि उद्या क्लायंट ऑफिस मध्ये बसून काही फुटकळ मिटींग्स आणि काय करावे असे बोलत असतांना अचानक गाणी ऐकायला लागलो, माझी आणि कल्याणची कुंडली पुल, लता, आशा, भीमसेन सगळ्याच बाबतीत जुळलेली .. एका मागोमाग एक गाणी ऐकत असतांना दुपारी ४ च्या सुमारास कॅरोलीन आमच्या खोलीत आली...

कॅरोलीन म्हणजे आमची क्लायंट ची प्रतिनिधी अतिशय आतिथ्यशील आणि मूर्तिमंत फ्रेंच सौंदर्यवती...तिचेही दिवसाचे काम झालेले आणि गप्पा मारायला म्हणून ती आली ... सो ? ऑल सेट टू गो होम ?..म्हणून बसली आणि आमच्या laptop वर एक गाणे सुरु झाले ... हनुवटी खाली मुठ ठेऊन कॅरोलीन गाणे ऐकू लागली ... स्वीट व्हौइस नो ?? मधेच म्हणाली ...yes ...आम्ही ..
कॅन यु प्लीज प्ले अगेन ? .. ती म्हणाली
शुअर ...

गाणे संपले ... तिला गाणे आवडले म्हणावे तर न भाषा ओळखीची ना सुरावट नेहेमीची ...तरीपण तिला आम्ही विचारले
आ : कसे वाटले गाणे
कॅ : चांगले वाटले, गोड आवाज
आ : तुला गाण्यात काही जाणवले का ?
कॅ : हो म्हणजे हे गाणे चांगले आहे पण जरा sad वाटते ..
आ : sad म्हणजे ? कशाबद्दल sad ?
कॅ : काहीतरी मिसिंग असल्याची फिलिंग वाटते .. कुणाची तरी आठवण येते
आ : कोणाची ?
कॅ : खर तर आठवण प्रियकराची, मित्र मैत्रिणी ह्यांची येते ते लांब गेल्यावर ...पण हे तसे नाही हि त्यांची आठवण नाही ..
आ : .....
कॅ : मला माझ्या आई ची आठवण येते आहे ...ती इथून खूप लांब राहते
अंतर्बाह्य फ्रेंच २५-२६ वर्षांची मुलगी आमच्याशी बोलतांना एकदम गहिवरली आणि डोळ्यात पाणी तरळले ...नाकाचा शेंडा लाल ...एक्स्क्यूज मी म्हणून मुसमुसत ती बाहेर गेली आणि २ मिनिटांनी चेहेरा धुवून परत आली ...
प्लीज हे गाणे पुन्हा लावा पण त्याआधी मला त्याचे शब्द आणि भाषांतर समजावून सांगा ...
मी सांगू लागलो
“घाल घाल पिंगा वाऱ्या”

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

स्मिता.'s picture

1 Feb 2017 - 2:04 pm | स्मिता.

१३ वर्षांपूर्वी तुम्ही कॅरोलीनला रडवले आणि आज मला... कदाचित माझ्यासारख्या अनेकांना!

मराठी_माणूस's picture

1 Feb 2017 - 2:48 pm | मराठी_माणूस

छान अनुभव.
ह्याचाच अर्थ गाण्याचे सगळे भाव प्रगट करणारी भाषातीत संगीत रचना.

आंबट गोड's picture

1 Feb 2017 - 2:56 pm | आंबट गोड

काही बोलायला शब्दच नाहीत!
(कॅरोलीन आहे का अजून टच मधे तुमच्या? इतकी संवेदनशील मुलगी!)

बापू नारू's picture

1 Feb 2017 - 6:06 pm | बापू नारू

vary emotional , थांबा तोन्ड धून आलो

मराठी कथालेखक's picture

1 Feb 2017 - 6:30 pm | मराठी कथालेखक

कॅरोलिनचा फोटो येवू द्या की :)

तिरकीट's picture

1 Feb 2017 - 7:59 pm | तिरकीट

सुंदर.........

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Feb 2017 - 8:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

हृद्य अनुभव !

(युट्यूबवरून साभार)

अत्रन्गि पाउस's picture

1 Feb 2017 - 9:20 pm | अत्रन्गि पाउस

__/\__

ज्योति अळवणी's picture

1 Feb 2017 - 10:03 pm | ज्योति अळवणी

खरच मन भरून आलं.

रुपी's picture

2 Feb 2017 - 3:24 am | रुपी

भावूक आठवण..

स्रुजा's picture

2 Feb 2017 - 4:35 am | स्रुजा

अरे वा ! किती छान अनुभव...

पैसा's picture

2 Feb 2017 - 9:22 am | पैसा

हृद्य आठवण. उत्तम संगीत असे सगळ्या सीमा पार करून थेट मनापर्यंत पोचते.

गवि's picture

2 Feb 2017 - 11:29 am | गवि

तुमच्या कॅरोलीनसाठी गाणं..

प्रान्जल केलकर's picture

2 Feb 2017 - 3:14 pm | प्रान्जल केलकर

एक सुंदर गाणं सांगितल्या बद्दल धन्यवाद. खरंच खूपच सुंदर गाणं आहे.

सानझरी's picture

2 Feb 2017 - 4:28 pm | सानझरी

हापिसात रडवलंत..

सुमीत भातखंडे's picture

2 Feb 2017 - 4:58 pm | सुमीत भातखंडे

.