शतशब्दकथा स्पर्धा २०१७: आवाहन.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
26 Jan 2017 - 2:07 pm

नमस्कार मिपाकरांनो,

सालाबादप्रमाणे यंदाही आपण शतशब्दकथा स्पर्धा आयोजित करतोय. दरवर्षी आपण शतशब्दकथांना विषय देत असतो आणि त्यावर कथा मागवत असतो. यंदा उपक्रमामधे थोडासा बदल करणार आहोत.

ह्या वर्षीच्या स्पर्धेचा विषय आहे "A picture speaks in 100 words" अर्थातचं "छायाचित्राची गोष्ट १०० शब्दांमध्ये". आवाहनाच्या धाग्यामधे तुम्हाला काही छायाचित्रं दिली जातील त्यापैकी एकावर तुम्हाला १०० शब्दांमधे एक कथा लिहायची आहे. स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत.

१. स्पर्धा २६ जानेवारी २०१७ ००:०० भाप्रवेला सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०१७ २३:५९ भाप्रवेला संपेल.
२. स्पर्धकांनी आपली शशक "साहित्य संपादक" या आयडीला व्यनिमार्फत पाठवायची आहे. कुठल्याही साहित्य संपादकांच्या वैयक्तिक मिपाखात्यावर अथवा साहित्य संपादकांच्या जीमेल पत्त्यावर कथा पाठवू नयेत हि विनंती.
३. प्रत्येक व्यक्ती (आयडी नव्हे!) एक शशक पाठवू शकते. एकापेक्षा जास्त शशक पाठवल्यास सर्वात प्रथम आलेल्या शशकनंतरच्या सगळ्या शशक रद्द समजल्या जातील.
४. २६ जानेवारी २०१७ ते २१ फेब्रुवारी २०१७ या काळात दर चोवीस तासांतून एकदा साहित्य संपादक आयडी आलेल्या कथा स्वतःच्या नावाने प्रकाशित करेल. मूळ लेखकाचं नाव जाहीर होणार नाही. ("कथा बघून मत देण्याऐवजी आयडी बघून मत देतात" हा आक्षेप घेतला जाऊ नये म्हणून हे करण्यात आलेलं आहे.). स्पर्धा संपल्यावर लेखकांची ओळख जाहिर करायचीचं आहे.
५. मूळ लेखकाने आपली ओळख जाहीर करू नये अशी अपेक्षा आहे. कथेच्या धाग्यावर, मिपावरच्या सार्वजनिक जागेत (अन्य धाग्यांवर किंवा खरडफळ्यावर), मिपाच्या फेसबुक पानावर किंवा ट्विटर अकाऊंटवर आपली ओळख कथालेखक म्हणून जाहीर केल्यास ती कथा रद्दबातल ठरवून स्पर्धेतून बाद केली जाईल.
६. साहित्य संपादक कथा प्रकाशित करताना मुळाबरहुकूम (म्हणजे जशी आली तशी) करतील. मुद्रितशोधन किंवा अन्य कोणतेही संपादकीय संस्कार केले जाणार नाहीत. स्पर्धेमधल्या शतशब्दकथेमध्ये व्याकरणाचे नियम, शुद्धलेखन, मुद्रितशोधनाची वगैरेची जबाबदारी संपूर्णपणे स्पर्धकाची असेल.
७. शशक ही (शीर्षक वगळता) बरोब्बर शंभर शब्दांत लिहिली जाणं अपेक्षित आहे. आलेली शशक जशीच्या तशी "मायक्रोसॉफ्ट वर्ड" मध्ये चिकटवून वर्डकाऊंट पाहिला जाईल. शंभरपेक्षा कमी अथवा जास्त असल्यास स्पर्धेतून बाद समजली जाईल आणि प्रकाशित होणार नाही.
८. तसंच, कथेत कोणतीही चित्रं, दृक्-श्राव्य दुवे, फॉरमॅटिंग वगैरे असल्यास ते वगळून कथा प्रकाशित केली जाईल.
९. जातिधर्माला दुखावणारं वा अश्लील लेखन आल्यास कथा स्पर्धेसाठी न घ्यायचा निर्णय संपादकीय अधिकारात घेतला जाईल. प्रवेशिका नाकारायचा अधिकार साहित्य संपादक राखून ठेवत आहेत. स्पर्धा संपल्यावर लेखक नियमबाह्य कथा स्वतःच्या जबाबदारीवर प्रकाशित करू शकतात.
१०. कथेला आपण देऊ इच्छित असणारं नावं व्यनिच्या विषयामधे लिहिलेलं असावं.

तर स्पर्धेसाठीची छायाचित्रं आणि विषय असे आहेत.

०१. (छायाचित्रः आपले मिपाकर एस भाऊ).

aa

०२. (आंतरजालावरुन साभार):

a

०३. (सी.एन.एन. वरुन साभार):

aaa

०४. (आंतरजालावरुन साभार):

aaaaaaa

०५. नवा पैसा: (आंतरजाल, मोदी, रिझर्व बँक ऑफ इंडिया कडुन साभार ;) )

aaaaaa

स्पर्धेविषयी काही मदत हवी असल्यास कॅप्टन जॅक स्पॅरो, आदूबाळ, स्रुजा, स्नेहांकिता, वेल्लाभट किंवा साहित्य संपादक ह्यांच्याशी संपर्क साधावा.

कलाप्रकटन

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

26 Jan 2017 - 2:59 pm | संदीप डांगे

फोटो दिसत नाहियेत......

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Jan 2017 - 5:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जीमेल ला लॉगीन लागेल फोटो दिसायला. एकदा चेक करा आणि सांगा.

संदीप डांगे's picture

26 Jan 2017 - 6:00 pm | संदीप डांगे

लॅपटॉपवरुन दिसले नाहीत जिमेल लॉगिन असूनही... मोबाइलवर तपासले तेव्हा मोबाइलवर दिसलेत. लॅपटॉपवर फक्त हत्तीचा फोटो दिसतोय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Jan 2017 - 8:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझ्या स्वतःच्या पिकासा मधुन शेअर केलेत फोटोज. पब्लिक शेअर आहे. एकदा मिपावरुन लॉगाउट करुन लॉगीन करुन बघाल का?

रच्याकने अजुन कोणाला फोटो दिसत नाहीयेत असं होतं आहे का?

मराठी कथालेखक's picture

26 Jan 2017 - 11:44 pm | मराठी कथालेखक

हत्तीशिवाय बाकीचे फोटोज दिसत नाहीत (गुगलला लॉगिन असूनही)
बाकी एकंदरीतच मिपाचं फोटोसाठी स्वत:च स्टोरेज नसणं आणि दुसर्‍या साईट्सवरचं परावलंबित्व २०१७ मध्येही कायम आहे हे खेदजनक आहे

मलाही फक्त हत्तीचा दिसत आहे.

गूगलला लॉग-इन आहे, आणि सफारीमधून पाहत आहे.

(क्रोममध्ये गूगल लॉग-इन नसतानाही सर्व फोटो दिसत आहेत).

तुम्ही स्वतःच फोटोच्या लिंक दुसर्‍या ब्राउजरमध्ये टाकून दिसत आहेत का बघता का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Jan 2017 - 6:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मला फायरफॉक्स मधे आणि क्रोम दोन्ही मधे छायाचित्रं दिसतं आहेत. विथ ऑर विदाउट लॉगीन.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jan 2017 - 7:18 pm | अत्रुप्त आत्मा

@मोबाइलवर तपासले तेव्हा मोबाइलवर दिसलेत. लॅपटॉपवर फक्त हत्तीचा फोटो दिसतोय. >>> +++१११ सेम टू सेम हिअर.

मराठी कथालेखक's picture

28 Jan 2017 - 11:57 pm | मराठी कथालेखक

पण अजून ह्या समस्येवर उपाय केला गेलेला नाही.
मिपा आता फक्त मोबाईलसाठीच आहे का ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2017 - 9:39 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जरा थांबा. फोटोबकेटमधे शेअर करुन पहातोय.

आदूबाळ's picture

26 Jan 2017 - 3:04 pm | आदूबाळ

या बात!

फेदरवेट साहेब's picture

26 Jan 2017 - 3:20 pm | फेदरवेट साहेब

वर्ड काउन्ट मध्ये 'आणि' 'पण' 'तर' 'मग' सारखे शब्द सुद्धा मोजले जाणार का?

हो. शीर्षक वगळता सगळे शब्द मोजले जाणार.

सासं "मायक्रोसॉफ्ट वर्ड"मध्ये आलेली कथा जशीच्या तशी (संपादकीय संस्करण न करता) चोप्यपस्ते करणार आणि वर्डकाऊंट पाहणार. (नियम ६ आणि ७ पहा.) शब्दयोगी अव्ययं तोडून लिहिली तर मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन शब्द पकडतं. (उदा० "मिपासाठी" हा एक शब्द आणि "मिपा साठी" हे दोन शब्द. मराठीत शब्दयोगी अव्ययं तोडून लिहीत नाहीत.)

लेखकाने व्यनिद्वारे प्रवेशिका पाठवायच्या आधी एकदा आपण नक्की शंभर शब्दच पाठवतो आहे ना हे पाहिल्यास सगळ्यांनाच सोपं पडेल.

असे अव्यय तोडून १०० शब्द झाले असतील तर काय?
(मी वाचलेल्या एका कथेत १०० शब्द आहेत, पण अव्यय तोडून लिहिल्यामुळे).

पिलीयन रायडर's picture

2 Feb 2017 - 7:58 pm | पिलीयन रायडर

तो लेखकाचा चॉईस झाला ना. सासं कोणतेही बदल / दुरुस्त्या करणार नसल्याने, नियमाप्रमाणे हे चुक असलं तरी १०० मध्ये बसतंय. वाचकांनी मतदान करताना हे पाहुन निर्णय घ्यावा. खरं तर सरसकट मतदान न होता शुद्धलेखन, मराठीचा वापर (एक कथा जवळपास हिंदीतच आहे), कथाबीज इ निकषांवर मतदान झालं तर चांगलं होईल. अर्थात ते खुप किचकट होईल हे ही खरं.

"शंभरपेक्षा कमी अथवा जास्त असल्यास स्पर्धेतून बाद समजली जाईल आणि प्रकाशित होणार नाही." असं नियमांत लिहिलंय.

एका कथेत दोन शब्द जोडून त्याचा एकच बनवलाय. पण एखाद्याने असं काही न करता चुकून एखादा शब्द कमी जास्त झाला तर ती कथा बाद होणार, पण १०० होण्यासाठी ट्रीक करुन लिहिलेली कथा फक्त नियमांत बसते म्हणून प्रकाशित होणार. (वर उल्लेखलेल्या कथा मुद्दाम ट्रीक करुन लिहिल्यात असं म्हणायचं नाही.) हे जरा अन्यायकारक वाटतं.

जिथे हे लक्ष्यात आलंय त्या कथांना प्रतिसाद म्हणून लिहिलं तर उगीच छिद्रांवेशीपणा वाटेल..

मराठीच्या वापराबद्दलही सहमत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Feb 2017 - 6:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अव्यय तोडणं ही मराठी व्याकरणामधे चुक समजली जाते का? करेक्ट मी इफ आय एम राँग.

खेडूत's picture

3 Feb 2017 - 11:35 am | खेडूत

नाही.
उलट तोडणे किंवा जोडणे यामुळे १०० शब्दांत बसवणे सोपे जाते. त्यामुळे अर्थ बदलू नये, किंवा रसभंग होऊ नये हे लिहीणार्‍याचे कौशल्य.

१०० होण्यासाठी ट्रीक करुन लिहिलेली कथा फक्त नियमांत बसते म्हणून प्रकाशित होणार.

प्रकाशित जरूर होईल पण नंबरात येणार का हे तुम्हीच ठरवणार ना !
मतदानाच्या धाग्यावर तुमचाच हक्क आहे :)

शब्दबम्बाळ's picture

3 Feb 2017 - 11:46 am | शब्दबम्बाळ

आणि मराठीचा वापर हा प्राथमिक निकष असावा असे वाटते.
काही चांगल्या गझल हिंदी मध्ये असल्या कारणाने मिपावरून काढून टाकल्या होत्या. अशा वेळी एखादी कथा हिंदीत असणे स्पर्धेसाठी कसे चालू शकते?

मला कथेशी काहीही प्रॉब्लेम नाही पण मग जो काही नियम असेल तो सार्वत्रिक असावा असे वाटते.
मराठी संकेत स्थळावर हिंदी/संस्कृत चालत असेल तर मग बाकी भाषांमध्ये देखील लेख येऊ शकतात पुढे...
परवानगी कोणाला द्यायची व कोणाला नाही हे अर्थातच संपादक ठरवतील!

यशोधरा's picture

26 Jan 2017 - 3:30 pm | यशोधरा

झकास!

ज्योति अळवणी's picture

26 Jan 2017 - 4:55 pm | ज्योति अळवणी

मस्त

प्रचेतस's picture

26 Jan 2017 - 6:22 pm | प्रचेतस

उत्तम.
नियमांची यादी पुणेरी वाटली थोडी.

सस्नेह's picture

27 Jan 2017 - 12:42 pm | सस्नेह

पुण्याच्या जवळ असल्याने आपल्याला पुणेकरांच्या डोळ्यातले कुसळ दिसते असं वाट्टं !

बोका-ए-आझम's picture

26 Jan 2017 - 6:24 pm | बोका-ए-आझम

स्पर्धकांना शुभेच्छा!

पिलीयन रायडर's picture

26 Jan 2017 - 7:44 pm | पिलीयन रायडर

उत्तम कल्पना!! आवडेश!

लेखकाचे नाव जाहिर होणार नाही हे तर अजुनच उत्तम!

दोन शंका:-

१. एक व्यक्ति एकाहून अधिक कथा पाठवत नाहीये हे कसं चेक करणार? डु आयडी आहेतच आणि ते घेऊन कुणीही कितीही कथा पाठवु शकेलच ना?
२. मतदान कसे करायचे आहे? पुन्हा एकदा वरचाच प्रश्न, डु आयडी घेऊन स्वतःच्या कथेला बरेच मतदान करता येईलच ना? अनेकांनी एक्सेल शीट ठेवली आहे डू आयडी मॅनेज करायला असे ऐकीवात आहे!!

पण एकंदरित कथा लगेच प्रकाशित होणार असल्याने जो लवकरात लवकर कथा टाकेल त्याला जास्त दिवस मिळणार मते घ्यायला. त्यामुळे लोकहो.. लवकरात लवकर टाका कथा!!

आनंदयात्री's picture

26 Jan 2017 - 8:05 pm | आनंदयात्री

छान, मतदान आणि लेखकाचे नाव जाहीर न करण्याची कल्पना उत्तम आहे.

>>"A picture speaks in 100 words" अर्थातचं "छायाचित्राची गोष्ट १०० शब्दांमध्ये"

हे "छायाचित्राने १०० शब्दात सांगितलेली गोष्ट" असे आहे का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Jan 2017 - 8:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

दोन्ही चालेल :)!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2017 - 8:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगले उपक्रम. शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

मराठी कथालेखक's picture

26 Jan 2017 - 11:42 pm | मराठी कथालेखक

शंभरपेक्षा कमी अथवा जास्त असल्यास स्पर्धेतून बाद समजली जाईल आणि प्रकाशित होणार नाही

मला वाटतंय शशककरिता शंभर ही कमाल मर्यादा आहे, शंभरपेक्षा कमी शब्दात कथा असू शकते. 'शतशब्द' चा अर्थ Under hundred असा घ्यायला हवा

जव्हेरगंज's picture

26 Jan 2017 - 11:50 pm | जव्हेरगंज

जय हो!!

जव्हेरगंज's picture

27 Jan 2017 - 12:02 am | जव्हेरगंज

चित्रांना शिर्षके का दिली आहेत! ते नको आहेत असे वाटते. प्रत्येकाचा चित्राकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.

बादवे, अजून काही चित्रे येणार आहेत का?

nanaba's picture

27 Jan 2017 - 1:25 am | nanaba

चित्रांना शिर्षके का दिली आहेत! ते नको आहेत असे वाटते. प्रत्येकाचा चित्राकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.
>> ++ 1

निकाल केव्हा जाहीर होणार?
मागच्या वर्षीप्रमाणे दोन फेर्‍या असणार की एकच?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Jan 2017 - 6:45 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

एकचं फेरी. निकाल २७ फेब्रुवारीला.

नि३सोलपुरकर's picture

27 Jan 2017 - 11:10 am | नि३सोलपुरकर

वाह वा.. एकदम मस्त मेजवानी मिळणार तर वाचकांना

छान उपक्रम . .

पुंबा's picture

27 Jan 2017 - 11:21 am | पुंबा

मस्त. नक्कीच लिहिणार.

पुंबा's picture

27 Jan 2017 - 11:21 am | पुंबा

मस्त. नक्कीच लिहिणार.

छायाचित्र बघून मला काय वाटतं ते लिहायचं की अशी शशक लिहायची की त्याला वरीलपैकी एक प्रचि चपखल बसेल?

वेल्लाभट's picture

27 Jan 2017 - 2:24 pm | वेल्लाभट

अशी शशक लिहायची की त्याला वरीलपैकी एक प्रचि चपखल बसेल?

हे अपेक्षित असावं.

किसन शिंदे's picture

27 Jan 2017 - 2:42 pm | किसन शिंदे

फोटोज फक्त क्रोमबर दिसत आहेत. फायर्फॉक्सवर दिसत नाहीत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2017 - 9:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटो फोटोबकेटवर टाकलेत आता पब्लिक शेअरिंग ला मला फायरफॉक्स आणि क्रोम दोन्हीवर विदाउट लॉगीन दिसत आहेत. एकदा दिसत आहेत का सांगा.

रुपी's picture

29 Jan 2017 - 12:18 pm | रुपी

दिसत आहेत. धन्यवाद!

संदीप डांगे's picture

29 Jan 2017 - 11:34 am | संदीप डांगे

हो. आता दिसत आहेत. लॅपटॉपवर. धन्यवाद!

स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा!

ज्योति अळवणी's picture

29 Jan 2017 - 7:16 pm | ज्योति अळवणी

कथा आवडली आणि मतदान करायच असेल तर कस करायच?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2017 - 7:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मतदानासाठी एक वेगळा धागा काढण्यात येणार आहे. तो कथा स्वीकारायची मुदत संपल्यानंतर येईल.

जव्हेरगंज's picture

29 Jan 2017 - 9:03 pm | जव्हेरगंज

""" २६ जानेवारी २०१७ ते २१ फेब्रुवारी २०१७ या काळात दर चोवीस तासांतून एकदा साहित्य संपादक आयडी आलेल्या कथा स्वतःच्या नावाने प्रकाशित करेल.""" >>> मग याचा अर्थ काय?

लोथार मथायस's picture

30 Jan 2017 - 4:01 am | लोथार मथायस

काल पासुन दोन चारदा सगळं मिपा धुंडाळून झालं ..... पहिल्या शशक lot साठी

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2017 - 8:37 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

येईल. आज संध्याकाळी किंवा रात्री पहिला लॉट येईल. काही कारणाने जमलं नाही पोस्ट करायला अजुन.

आता मला फोटो दिसत नाहीये.

एखादा नवीन टॅब बनवून त्यातून सगळ्या शशक वाचता येतील असे काही करता येईल का? नाहीतर बाकी लेखांमध्ये काही कथा वाचायच्या राहून जातील.

यशोधरा's picture

31 Jan 2017 - 8:05 am | यशोधरा

हेच लिहिणार होते. मुद्दाम शोधाव्या लागत आहेत शशक.

खेडूत's picture

31 Jan 2017 - 8:33 am | खेडूत

+१
असेच म्हणतो.

याशिवाय मतदानही गुप्त ठेवल्यास अजून बरे होईल!
बर्‍याचदा वाचकाला निर्णय न घेता आल्यास जास्त मतं कुणाला दिसतात, त्याला मत देऊन टाकण्याची शक्यता असते. किंवा कमी प्रतिसाद म्हणजे चांगली कथा नसावी असे काहीतरी...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2017 - 8:49 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

+१

@यशोधराताई हो प्रशांतला सांगीतलेलं आहे.

आणखी एक.. शक्य असल्यास कथा प्रकाशित केल्या जातील त्या क्रमात त्यांना अनुक्रम देता येईल का? म्हणजे वाचणार्‍यालाही कोणत्या वाचून झाल्यात, कोणत्या नाहीत ते लक्ष्यात ठेवायला सोपं पडेल.

वेल्लाभट's picture

1 Feb 2017 - 7:37 am | वेल्लाभट

+१

मृत्युन्जय's picture

31 Jan 2017 - 11:57 am | मृत्युन्जय

मतदानासंबंधी पटले एकदम.

कथेत संदर्भ चित्र असले पाहिजे असे देखील वाटते

जव्हेरगंज's picture

1 Feb 2017 - 10:46 am | जव्हेरगंज

सगळ्या कथा एकत्रित इथे वाचता येतील.

:)

ज्योति अळवणी's picture

1 Feb 2017 - 10:10 am | ज्योति अळवणी

अजून फक्त सहाच शशक अपलोड झाल्या आहेत का?

विनीत संखे's picture

1 Feb 2017 - 2:53 pm | विनीत संखे

मी काल एक पाठवली होती पण अजून पब्लिश केली नाहीय :-/

सस्नेह's picture

3 Feb 2017 - 11:30 am | सस्नेह

कृपया धाग्यावर कथा पाठवले असल्याचे जाहीर करू नये तसेच आपल्या मित्र -आयडींना देखील उघड करू नये.
नाहीतर स्पर्धा योग्य रीतीने होणार नाही.
पाठवलेल्या लेखसंबंधीच्या शंका साहित्य संपादक या आयडीला व्यनी करून विचाराव्या.

शब्दबम्बाळ's picture

2 Feb 2017 - 10:31 am | शब्दबम्बाळ

मराठी कथा मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टाकून पहिली.
वर्ड कॉउंट साठी ती पद्धत योग्य होणार नाही असे वाटतंय.

कारण उद्गार वाचक चिन्हानंतर एक ब्लँक स्पेस जरी दिली तरी तो एक वर्ड असा काउन्ट येतोय खाली.
कथेमधले शब्द कृपया मोजून पाहावेत. तसदी पडेल पण सॉफ्टवेर च्या चुकीमुळे एखादी कथा स्पर्धेतून बाहेर जाऊन नये असे वाटते.

इथे पहा, हे मी नेहेमी वापरतो.

शब्दबम्बाळ's picture

2 Feb 2017 - 1:18 pm | शब्दबम्बाळ

धन्यवाद!

फोटो दिसत नाहीयेत, इथलेही आणि इतर धाग्यातलेही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Feb 2017 - 12:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अरे तुला आधी दिसत होते ना? आता फोटोबकेट ला टाकलेत मी. सगळ्यांना दिसत आहेत. हाय्ला हे काय नवं लफडं? थांब घरी गेलो की बघतो.

सूड's picture

2 Feb 2017 - 1:00 pm | सूड

हो आधी दिसत होते, चित्रबादलीला टाकल्यावर गंडले. हा हापिसचा ल्याटपॉट आहे आणि हापिस पक्कं यमेच बाराचं आहे. फिल्टर लावलेन असतील तर घरच्या शिश्टिमवरुन दिसतील मला कदाचित.

पैसा's picture

2 Feb 2017 - 5:06 pm | पैसा

मी काय एम एच १२ मधे नाय. पण मलाही आधी दिसत होते. आता दिसेनात.

मला सर्व प्रतिमा सदासर्वकाळ व्यवस्थित दिसत आहेत. णो प्राब्ळेम्.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Feb 2017 - 6:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अबे हापिसात वेगवेगळ्या डेस्कटॉपातुन पाहिलं सगळीकडे दिसतयं. चित्रबादली ब्लॉक केलयसं का?

मलाही. सेम हापिसमधून दिसत नाहीयेत. आधी दिसले होते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Feb 2017 - 8:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटोबकेट ब्लॉक आहे का?

कल्पना नाही. घरुन बघते म्हणजे कळेल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Feb 2017 - 9:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ठिक आहे. नक्की सांगा.

घरी दिसतात, कार्यालयातून नाही!

शब्दबम्बाळ's picture

6 Feb 2017 - 10:17 am | शब्दबम्बाळ

शशक स्पर्धेला वेगळा टॅब का बरे नाही यावेळी?
स्पर्धेतल्या कथा या नेहमीच्या लेखांप्रमाणेच इतरत्र विखुरलेल्या आहेत! मग त्यात फरक असा काही राहात नाही...
नवीन आलेल्या कथा मुद्दाम शोधून वाचायला लागत आहेत...

चांदणे संदीप's picture

9 Feb 2017 - 6:06 pm | चांदणे संदीप

डिट्टो!

Sandy

बबन ताम्बे's picture

13 Feb 2017 - 11:55 am | बबन ताम्बे

वेगळा टॅब हवा होता. ब-याच शशक आता मागे गेल्या आहेत.

मराठी कथालेखक's picture

10 Feb 2017 - 11:29 am | मराठी कथालेखक

३. प्रत्येक व्यक्ती (आयडी नव्हे!) एक शशक पाठवू शकते. एकापेक्षा जास्त शशक पाठवल्यास सर्वात प्रथम आलेल्या शशकनंतरच्या सगळ्या शशक रद्द समजल्या जातील.

याबद्दल पुनर्विचार व्हावा.
मला वाटतं काही लेखकांकडे बरंच कसब असू शकतं , शिवाय स्पर्धेमुळे लिहण्याचा उत्साहही वाढतो. झालंच तर त्या निमित्ताने जास्त कथा येणार असतील तर वाचकांनाही तितकीच मेजवानी नाही का ? शिवाय यावेळी 'साहित्या संपादक' आयडीनेच कथा प्रकाशित होत आहेत म्हणजे कुणी आयडी बघून मत देण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे मला वाटतं कुणालाही हव्या तितक्या कथा पाठवू द्याव्यात. फक्त एकच कथा दुरुस्ती/पुनर्लेखन करुन पुन्हा पाठवू नये (अर्थात तसं सहसा कुणी करणार नाहीच म्हणा) इतकीच अट असावी. यामुळे जास्त कथा येतील आणि एकूणातच स्पर्धेतली रंगत खूप वाढेल.

मिपाकर काय म्हणता यावर ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Feb 2017 - 3:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

स्पर्धा संपल्यानंतर कथा पाठवु शकताचं.

मराठी कथालेखक's picture

10 Feb 2017 - 7:05 pm | मराठी कथालेखक

तसं तर कधीही कथा लिहिता येतात आणि टाकता येतात.
पण माझं म्हणणं हे आहे की स्पर्धेमुळे लिहिण्याचा उत्साह दुणावतो, शिवाय जास्त कथा आल्याने स्पर्धेची रंगत वाढेल हे महत्वाचं.
झालंच तर 'साहित्य संपादक ' कथा प्रसिद्ध करणार असल्याने एखाद्या लेखकाला स्वतःला खर्‍या अर्थाने जोखता येईल.

शब्दबम्बाळ's picture

16 Feb 2017 - 11:08 am | शब्दबम्बाळ

यावेळीच्या शशक स्पर्धेमध्ये मजा नाही आली...
गडबडीत घेतल्यासारखी वाटली!

ज्योति अळवणी's picture

21 Feb 2017 - 8:37 pm | ज्योति अळवणी

आजपासून शशक साठीचे मतदान सुरु होणार आहे न? यासंदर्भात काही कळू शकेल का?

अॅस्ट्रोनाट विनय's picture

22 Feb 2017 - 10:27 am | अॅस्ट्रोनाट विनय

बहुतेक आजपासून सुरु होईल मतदान. कारण कालची शेवटची मुदत होती शशक पाठवायची.

नवीन धागा निघणार आहे का मतदानासाठी?

संजय क्षीरसागर's picture

22 Feb 2017 - 10:31 am | संजय क्षीरसागर

२० फेब्रुवारी २०१७ २३:५९ भाप्रवेला संपेल.

मराठी कथालेखक's picture

22 Feb 2017 - 1:45 pm | मराठी कथालेखक

निकाल कधी कळणार ?

ज्योति अळवणी's picture

22 Feb 2017 - 4:37 pm | ज्योति अळवणी

27th jan
एकचं फेरी. निकाल २७ फेब्रुवारीला.

29th jan
मतदानासाठी एक वेगळा धागा काढण्यात येणार आहे. तो कथा स्वीकारायची मुदत संपल्यानंतर येईल.

यासंदर्भात काहीच दिसत नाही. जरा नीट समजू शकेल का? स्पर्धा संपली म्हणजे कथा स्वीकारणे संपले. पण मतदानाचे काय?

मराठी कथालेखक's picture

27 Feb 2017 - 11:22 am | मराठी कथालेखक

आज निकाल ?

यशोधरा's picture

23 Feb 2017 - 9:02 pm | यशोधरा

एक सुचवणी: शशकसाठी अनुक्रमणिका का तयार करत नाही? गोष्टमध्ये वा भाषा दिनाला आहे तशी. कदाचित ती पटकन वर लावणं सोपं होईल?

बोलघेवडा's picture

26 Feb 2017 - 4:52 pm | बोलघेवडा

ह्या स्पर्धेचा निकाल कधी लागणार आहे?