भारतीय चित्रपटांतील रागांवर आधारित/प्रेरित्/इतर भाषिक संगितातून ढापलेली गाणी

तुषार काळभोर's picture
तुषार काळभोर in काथ्याकूट
26 Jan 2017 - 11:49 am
गाभा: 

...तर, प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीच्या पूर्वदिनी खरडफळ्यावर रागांवर आधारित गाणी/एकसारखी वाटणारी गाणी/पाश्चात्य संगीतावरून ढापलेली गाणी इत्यादी चर्चा चालू होती.
माझ्या माहितीतील काही ढापलेली प्रेरित गाणी इथे देतोय. (अर्थात पुर्ण गाण्याचं संगीत तसंच्या तसं नाहिये, कधी कधी स्वत:चं पण थोडं इम्प्रोवायजेशन केलेलं आहे संगीतकारांनी!) मिपाकरांनी प्रतिसादात अशी काही गाणी देऊन परस्परज्ञानसंवर्धन करावे, ही ण्रम इनंती! :)
तसेच रागांवर आधारित सारखी वाटाणारी गाणीसुद्धा टाकवीत.
(मुद्दाम गाणी एम्बेड करत नाहिये, पान जड होऊ नये म्हणून)

१) हिंदी : संगीतकार - सलील चौधरी, चित्रपट- छाया, गाणे = इतना न मुझसे तू प्यार बढा
आधारितः मोझार्टची ४० क्रमांकाची सिम्फनी

२) स्वतंत्र विभाग : राजेश रोशन
अ) हिंदी : चित्रपट : क्रिश, गाणे : दिल ना दिया (हृतिक व प्रियांकाचं सर्कसमधलं गाणं)
आधारित : तुर्कीचं सैनिकी गीत (!!!!!!!)
आ) हिंदी : चित्रपट : लावारिस, गाणे : तुमने जो कहा
आधारित : अ‍ॅम अ बार्बी गर्ल (अ‍ॅक्वा)
इ) हिंदी : चित्रपट : जुर्म, गाणे = जब कोई बात बिगड जाये
आधारित : Five Hundred Miles
ई) हिंदी : चित्रपट : करण अर्जुन, गाणे = जय काली
आधारित : इट्स ऑल राईट (ईस्ट १७)
ए) हिंदी : चित्रपट - आरजू, गाणे = हसीना गोरी गोरी (ही चोरी नाहिये, दरोडा आहे !!)
आधारित - इन द समरटाईम (शॅगी)
ऐ) हिंदी :चित्रपट- बातों बातों में, गाणे = न बोले तुम न मैने कुछ कहा
आधारितः When Johnny Comes Marching Home Hurrah! (देवा, उठाले रे !! अमेरिकन गृह युद्धाचं गीत!!! )
राजेश रोशनची आणखी पण असतील, मला शोधयचा कंटाळा आलाय.

३) स्वतंत्र विभागः दि अन्नु मलिक
अ) हिंदी : चित्रपट -औजार , गाणे - दिल ले ले लेना
आधारितः (भौतेक स्पॅनिश) माकारेना
आ) हिंदी: चित्रपट - ढाल, गाणे = दिल माका दिना (अरे देवा, मेरे को परत उठाले रे!!!!)
आधारितः (भौतेक स्पॅनिश) माकारेना
इ) हिंदी : चित्रपट- बाजी (आशुतोष गोवारीकरचा), गाणे - डोले डोले दिल डोले (आमिर मुलगी म्हणून पण क्यूट दिसला होता!!)
आधारित : Come September
अवांतर : या गाण्याची परत कॉपी नदीम श्रवण ने माधुरीच्या राजा पिच्चरमध्ये केली; नजरे मिली दिल धडका
ई) हिंदी : चित्रपट-अकेले हम अकेले तुम, गाणे= ऐसा जख्म दिया है (यातला मधला स्लो पार्ट)
आधारित : स्वीट चाईल्ड इन टाईम
ए) हिंदी : चित्रपट-अकेले हम अकेले तुम, गाणे= बट यू लव मी डॅडी
आधारित : बट यू लव मी डॅडी
ऐ ) हिंदी : चित्रपट- सर , गाणे - सुन सुन सुन बरसात की धून (शब्दशः शब्दांसहित उचलेलंय!)
आधारित : Listen To The Sound Of The Rain (Jose Feliciano)
ओ ) हिंदी : चित्रपट - मर्डर (मल्लिका यारों!!) गाणे = कहो ना कहो
आधारित : अम्र दियाब चं तमल्लि मआक
(ही बहुतेक अधिकृत कॉपी असावी)

अन्नू मलिक प्रेरित संगितकारांचा बेताज बादशाह आहे, त्याची निम्मी गाणी तरी प्रेरित असतील.

४) क्रिमिनल : तुम मिले (हे गाणं अफाट रोमँटिक आहे, लै फेवरीट!!) याचा सुरुवातीचा भाग एनिग्मा - एज ऑफ लोनलीनेस

५) मेजरसाब या दरिद्री पिच्चरमधलं हे गाणं = हिंमत कभी ना तोडेंगे
ओरिजिनल : अमेरिकन (! ) सैन्याचं मार्चिंग साँग

६) चित्रपट : मैने प्यार किया, गाणे : मेरे रंग में रंगने वाली (गाणं अफाट सुंदर अन् रोमॅण्टिक आहे, पण म्युजिकचा पार्ट उचललाय)
द फायनल काउंटडाऊन

७) चित्रपट : मैने प्यार किया, गाणे= आते जाते (टायटल साँग - हम आपके है कौन च्या टायटल साँग सारखंच अतिशय आवडतं)
आधारित : I Just Called To Say I Love You (Stevie Wonder)

८) चित्रपटः आरपार , गाणे = बाबूजी धीरे चलना... (संगीतकार - ओ पी नय्यर)
आधारित : Perhaps Perhaps Perhaps

९) प्रितम (आदरणीय अन्नू मलिकजींचे शिष्य) : गँगस्टर , गाणे = तु ही मेरी शब है
आधारित : ऑलिवर शांती -निर्वाणा

१०) परत!!! प्रितम (आदरणीय अन्नू मलिकजींचे शिष्य) : गँगस्टर , गाणे = या अली
आधारित : या घाली (गिटारा)

इतरः
ब्लफमास्टर (अभिषेकचा) - बोरो बोरो (नेमका या पिच्चरच्या रिलीजच्या आधी कॉलेजच्या एक मित्राने 'भोसले शिंदे आर्केड' मधून एक सोनी पी९०० घेतलेला. त्यात आधीपासून बोरो बोरोचं ओरिजिनल होतं- अशरचं). (हे पण अधिकृत असावं, कारण ब्लफमास्टरच्या गाण्यात अरशसुद्धा आहे.
आधारितः अरश - बोरो बोरो
अवांतर : अरशचं अनीला मिर्जा बरोबर एक गाणं आहे, चोरी चोरी
हे नव्वदीतल्या एका कॅनेडियन गाण्याचं रुपांतर आहे. स्नो - इन्फॉर्मर
.
.
..
.
.
.
.
असो....
अजून चिक्कार आहेत. मला लै कट्टाळा आलाय.... आता तुमच्या कडनं येउंद्या. अन् मराठीत पण काय असंल तर ते पन टाका.
एखाद्या गाण्याला रागाचा संदर्भ असंल तर ते पन टाका.

प्रतिक्रिया

पैसा's picture

26 Jan 2017 - 12:05 pm | पैसा

भरपूर खणून काढलंत तुम्ही! येतेच इकडे पुन्हा.

वेल्लाभट's picture

26 Jan 2017 - 12:14 pm | वेल्लाभट

ही लिस्ट फार मोठी आहे. माझ्याकडे कलेक्शन आहे छोटेखानी. फोल्डरचं नावच बॉलिवूड चौर्यकर्म आहे. असो. जमेल तशी भर घालत जाईन.

अरेरे अनेक आवडती गाणी आहेत या लिस्टमध्ये :(

पद्मावति's picture

26 Jan 2017 - 12:23 pm | पद्मावति

मस्तच.

हिंदी : चित्रपट- बाजी (आशुतोष गोवारीकरचा), गाणे - डोले डोले दिल डोले (आमिर मुलगी म्हणून पण क्यूट दिसला होता!!)
आधारित : Come September
अवांतर : या गाण्याची परत कॉपी नदीम श्रवण ने माधुरीच्या राजा पिच्चरमध्ये केली; नजरे मिली दिल धडका

कम सप्टेंबरची जुनी कॉपी पहा- सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.....

.
.
.
.
या ट्यूनवर ७०-८० च्या दशकात रॉबिनहूड अंडरवेअर बनियनची जाहिरातसुद्धा होती !!

!!!!
अरे देवा, मेरे को फिर से उठा ले रे बाबा!!

फेदरवेट साहेब's picture

26 Jan 2017 - 1:00 pm | फेदरवेट साहेब

'जय जय महाराष्ट्र माझा'

चक्क समर ऑफ सिक्सटी नाईन नोट टू नोट उचललेलं.

रागावर आधारित गाणे (हल्ली हल्लीतले एक अत्यंत आवडते)

गाणे - मोरा पिया मोसे बोलत नाही
चित्रपट - राजनीती
संगीतकार/गायक - आदेश श्रीवास्तव
राग - दरबारी/वेस्टर्न फ्युजन

तुषार काळभोर's picture

26 Jan 2017 - 1:19 pm | तुषार काळभोर

मोरा पिया साठी +१

तुम्ही फार मेहनत घेतलीत!
http://itwofs.com ही पूर्ण वेबसाइट अश्या प्रेरीत ढापलेल्या गाण्यांना समर्पित आहे.

तिथल्या माहितीच्या आधारे करण थापरने अन्नु मलिक आणि प्रितमच्या घेतलेल्या मुलाखतीही आहेत. भाग १ इथे आहे. अजून २ भागही आहेत त्याचे.

संदीप डांगे's picture

27 Jan 2017 - 5:24 am | संदीप डांगे

+११११

मदनबाण's picture

27 Jan 2017 - 5:27 am | मदनबाण

+२२२२

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Puli Urumudhu... :- Vettaikaaran

पैसा's picture

27 Jan 2017 - 10:17 am | पैसा

मला वाटते की जेव्हा संगीतकार मूळ गाण्याचे मूळ संगीतकाराला सरळ क्रेडिट देतो तेव्हा ते ढापलेले म्हणता येणार नाही. त्यातही भारतीय रागदारी आणि लोकसंगीतावर आधारित गाण्याना तर फक्त 'प्रेरित' हे एकच लेबल लागू शकते. वर कम सप्टेंबरच्या कॉप्यांबद्दल लिहिलंय ती गाणी नक्कीच ढापलेली म्हणता येतील.

यशोधरा's picture

27 Jan 2017 - 10:18 am | यशोधरा

वाचतेय पैलवानभाऊ.

फेदरवेट साहेब's picture

27 Jan 2017 - 11:01 am | फेदरवेट साहेब

राग तर मला सांगता येणार नाही पण , गँग्स ऑफ वासेपुर मधले ओ वूमनीया गाणे ओरिजिनल मध्ये बसावे. झारखंडी लोकसंगीत आधारित गाणे आहे.

गामा पैलवान's picture

28 Jan 2017 - 11:57 pm | गामा पैलवान

तेरा मुझसे है पहलेका नाता कोई हे गाणं द यलो रोझ ऑफ टेक्ससवरून घेतलंय.

मूळ गीत अमेरिकी गृहकलहाच्या वेळचं आहे. तेव्हा सैनिकांत लोकप्रिय झालं होतं. त्याची ठेवणही एखाद्या समरगीतासारखी आहे.

-गा.पै.

पद्मावति's picture

29 Jan 2017 - 12:19 am | पद्मावति

खरंच की :)
पण तरीही एखाद्या समर गीतावरून तेरा मुझसें सारखं सॉफ्ट हळवं गीत बनविणे हेही मला वाटतं कौतुकास्पदच आहे.
धागा मस्तं आहे.

गामा पैलवान's picture

29 Jan 2017 - 2:04 am | गामा पैलवान

पद्मावति, मूळ गाणं समरगीत नसून त्याच्या वळणावर जाणारं आहे. मात्र तरीही तुमच्याशी सहमत आहे. रांगडं प्रेम असंच असतं.
आ.न.,
-गा.पै.

सपे-पुणे-३०'s picture

31 Jan 2017 - 3:01 pm | सपे-पुणे-३०

अन्नू मलिकने तर हिंदी गाण्यांच्या चालींची पण ढापाढापी केलीय. 'बाजीगर' मधलं ' ए मेरे हमसफ़र, ए मेरी जानेजाँ' हे किशोरकुमारच्या Mr. X in Bombay' मधल्या 'खूबसूरत हसीना जानेजाँ जानेमन ...' या गाण्याची हुबेहूब कॉपी आहे.
'राजा' चित्रपटातलं संजय कपूर आणि माधुरी दिक्षितचं 'नजरे मिली दिल धडका' हे 'Come September' ने प्रेरित अजून एक गाणं.
कल्याणजी- आनंदजी किंवा अगदी शंकर-जयकिशननी पण 'अरेबियन नाईट्स' वरून प्रेरणा घेऊन कितीतरी हिट गाणी आपल्याला दिली.अर्थात गाण्यांच्या चाली ढापलेल्या नसल्या तरी त्यांच्या गाण्यांमध्ये 'अरेबियन नाईट्स' मधल्या धून तशाच्या तशा वापरलेल्या आहेत.

कपिलमुनी's picture

31 Jan 2017 - 4:28 pm | कपिलमुनी

बराच शिळा विषय आहे तरीपण महाचौर्यकार प्रीतमचे नाव नसल्याअबद्दल टीव्र णिषेद व्यक्त करण्यात येत आहे.

आहे की!
९ आणि १० नंबरला या अनु मलिकच्या शिष्योत्तमाची गाणी आहेत: तू हि मेरी शब् है आणि या अली (गँगस्टर)

चौकटराजा's picture

1 Feb 2017 - 7:25 am | चौकटराजा

एक बीज म्हणून एखादा कोपरा भारतीय सिने संगीतकारानी अनेक वेळा घेतलेला आहे अगदी चोरला आहे असे म्हणा हवे तर . यातून कोणीही सुटलेला नाही. पण अशा प्रकाराचा बादशहा आर डी बर्मन आहे. व अशात सर्वात मागे नौशाद हे आहेत. पण भारतीय शास्त्रीय संगीतातील बंदिशी, लोकधुनी, मुशायर्‍याच्या पारंपारिक चाली असा अनेक प्रकारचा माल मसाला घेऊन आपले अजरामर गीत अनेकानी इथे तयार केले आहे. यात इतर अनेक प्रकारची गुणवत्ता या संगीतकारांमधे होती हे अमान्य करून कसे चालेल... ? तेंव्हा आपण आपले फायनल प्रोडक्ट ऐकावे हेच बरे !

वेल्लाभट's picture

1 Feb 2017 - 7:56 am | वेल्लाभट

काही निवडक
Ciao Ciao Bambina (Domenico Modugno) - (Aa Ab Laut Chale)
Kenny G - The Joy Of Life - Meri Jane Jana
Miami Sound Machine - Rhythm is gonna get you - Tirchi Topiwale
Sending you my love - Tolga - Neend churayi meri
The Yellow Rose Of Texas (Elvis Presley) - Tera Mujhse hai pehle ka
Five Hundred Miles - Peter Paul - Jab koi baat bigad jaye
Listen to the falling Rain - Jose Feliciano - Sun sun sun barsaat ki dhun (Sir)
Say You Love Me (Demis Roussos) - Mehbooba Mehbooba
Solitude Standing - Suzanne Vega - Pehli Baar Mile Hai
युरोप - फायनल काऊंटडाऊन - मेरे रंग में रंगने वाली

एनिग्मा आणि डीप फॉरेस्ट ची तर यादीही करत नाही. दोनही फार आवडते बँड आहेत आणि त्यांच्या गाण्यांवरून 'इनिस्पायर' झालेली गाणी फार ताप देतात.

प्रितमला सगळे चोरटा म्हणतात, पण त्याची न चोरलेली गाणी देखील आहेतच की आणि तीदेखील खूप श्रवणीय आणी हिट्टदेखील. उदा. जब वी मेट मधील, दंगलमधील सगळी गाणी, लुटेरामधील सवार लू आदी(आता इतकीच आठवताहेत), पण नक्कीच खूप चांगली गाणी त्याने कन्सिस्टंटली दिलीयेत. स्वतः मध्ये बर्‍यापैकी सांगितीक प्रतिभा असताना ह्याला असा क्लेप्टोमेनियाचा अ‍ॅटॅक कसा काय येतो?

संदीप डांगे's picture

27 Feb 2017 - 12:04 am | संदीप डांगे

जब वी मेटमधली यच्चयावत गाणी चोरलेली आहेत.... यामुळे काय होतं की त्याने खरंच स्वतःच्या धून काढल्यात तरी त्या चोरीच्या नाहीत हे कोणी मानत नाही. फक्त सोर्स कळलेला नसतो इतकंच....

क्लेप्टोमॅनिया..? कमर्शियल कलाकारांच्या जगात ह्याला कमर्शियलपणा म्हणतात... उपलब्ध वेळ, क्लायंट देत असलेला पैसा आणि आपली गरज बघून अशा गोष्टी सर्वच कला-व्यवसायात चालतात. फाइन-आर्टवाले तर आमच्या कमर्शियल आर्टवाल्यांना कॉपि-पेस्ट आर्टीस्ट म्हणतात... सरतेशेवटी कमर्शियल आर्टमध्ये उरते ती त्या कलाकाराची इन्डिविजुअल टेस्ट. वैयक्तिक चव. ती उत्तम असेल तर तो बरोबर चीजा उचलून आणतो आणि आपल्या ढंगात सादर करतो. नकल को भी अकल लगती है!

वाल्मिकी's picture

25 Feb 2017 - 5:40 pm | वाल्मिकी

तू ला दे हरी चुडिया - आज का अर्जुन ह्याचे मूळ गाणे मिळू शकेल ?

तुषार काळभोर's picture

26 Feb 2017 - 8:14 am | तुषार काळभोर

Maar diya jay ki chhod diya jay...

( Hya Google Indic keyboard la kahi tari jhalay! Pahila akshar type kela ki dusra type kartana pahila over write hotay)

वाल्मिकी's picture

26 Feb 2017 - 10:00 am | वाल्मिकी

नाही
चाल वेगळी आहे

पैसा's picture

26 Feb 2017 - 12:42 pm | पैसा

Hya Google Indic keyboard la kahi tari jhalay! Pahila akshar type kela ki dusra type kartana pahila over write hotay

मिपाचे गमभन आणि अँड्रॉईड वरचा क्रोम ब्राउझर आणि गूगल इंडिक इनपुट यांचं पटत नाहीये. क्रोमचा मागच्या वेळचा अपडेट आल्यावर हा प्रॉब्लेम सुरू झालाय. यावर कायमचा उपाय नीलकांत आणि प्रशांत शोधतील. तोपर्यंत तात्पुरता उपाय म्हणून मी मोबाईलवर फायरफॉक्स डाऊनलोड केला आहे. त्यात हा प्रॉब्लेम येत नाही.

तुषार काळभोर's picture

26 Feb 2017 - 6:22 pm | तुषार काळभोर

Mi chrome ani Google Indic Keyboard, donhi reinstall kaeun pahile.
Aaj fone format karnar hoto :)

पैसा's picture

26 Feb 2017 - 7:50 pm | पैसा

अरे बापरे! नशीब फॉर्मॅट केला नाहीत!