आई

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
21 Jan 2017 - 11:33 pm

जेव्हा ती सोबत असते
तिची किम्मत नसते
तिच्या instructions..
कामं सांगणे अगदी नको वाटते

'किती ग तेच तेच सांगशील?
आता मी मोठी झाले... थोडं थांबशील?'
शिकणार आहे ग घरातली कामं
थोड मला भटकू तर दे...
तुझं ऐकतेच आहे;
पण हव तस जगु तर दे...

ए मैत्रिणीचा वाढ दिवस आहे
गिफ्ट काय देऊ?
तू किती ग ओल्ड फॅशन्ड
मी थोडा शॉर्ट ड्रेस घेऊ?
ए बाबांना पटवशिल?
हो म्हणायला सांगशील?
रात्रि थोssडा उशीर होईल...
तू सांभाळून घेशील?

ऐक न... त्याने मला विचारलय
चिडवू नकोस ह... पण मला ते आवडलय
हो ग बाई... सांगते सगळं...
तू चौकशी कर मगच जाते पुढं...

ए एखादा स्पेशल पदार्थ शिकव न मला
त्याला आवडेल आणि मला जमेल असाच सांग ह जरा
अग.. साडी कशी नेसू?
प्लीज.. आज सगळ मीच आवरू?
तो येणारे... त्याच्या मनासारखं करू?

मी हौसेने सगळ करत असते...
ती मात्र लक्ष ठेउन असते;
हळूच गालात ती हसते..
अन मनात माझ्या कळी उमलते!

ए बाबांना सांगायचय... मदत कर न...
ते रागावतील त्यांना समजाव न...
तो आणि त्याच्या घरचे चांगले आहेत;
लग्न त्याच्याशिच करायचय.. हे मनात पक्के आहे;
बाबांकडून 'हो', म्हणून घ्यायचंय
अगोदरच सांगते तुला सगळं सांभाळून घ्यायचंय

माझ लग्न मी enjoy करते
ती हसताना हळुच डोळे पुसते....
माझा ही जीव तुटतोय ग....
'आहो आई' चांगल्याच असतात
पण 'ए आई' ची गोडी तुझ्या कुशीत शिरुनच ग

भावकविताकविता

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

24 Jan 2017 - 8:05 pm | यशोधरा

मस्त :)