जलीकट्टू आणि लीगल सोशलायझेशन

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
20 Jan 2017 - 6:11 pm
गाभा: 

जलीकट्टू या तामिळनाडूतील पारंपारीक खेळात सहभागी खेळाडू उधळलेल्या बैलांना सहभागी खेळाडू त्यांच्या शिंगाना धरुन थांबवतात.

मानवाधिकारांप्रमाणे प्राण्यांच्या आधिकारांसाठी सुद्धा कायदे वेळोवेळी केले गेले त्यातील एक कायदा पंशुंविरुद्ध अनावश्यक क्रुरता टाळावी असे सांगतो. आणि संबंधीत जलीकट्टू खेळावर केवळ अटी टाकून सुप्रीम कोर्टाने पाहीले त्या पाळल्या गेल्या नाहीत म्हणून खेळावर सरसकट बंदी घातली. अशीच बंदी वस्तुतः बैलगाड्यांच्या शर्यतींवरही घातली गेली पण महाराष्ट्रातील लोंकानी फारशी खळखळ न करता सुप्रीम कोर्टाचा निर्णय निमुट्पणे स्विकारला.

सुधारणा विषयक कायदे समाजास स्विकारण्यास बर्‍याचदा वेळ लागतो. बर्‍याचदा अमुक एक कायदा आला समाजाने तो स्विकारला समाजाचे वर्तन बदलल्या नंतर असा कायदा आला होता हे ही समाजाच्या स्मरणात रहात नाही तर कधी कायदा स्विकारण्यास समाज मन तयार होत नाही.

सुधारणा आणि लिगल सोशलायझेशनचा मुद्दा मी मागेही एका वेगळ्या धाग्यातून वेगळ्या परिप्रेक्ष्यात चर्चीला होता बर्‍याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या प्रदेशापुरता एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच प्रदेशातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग त्या प्रदेशातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने देशाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्‍या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग तामीळनाडू सारख्या विवीध राज्यातील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरते असे तुम्हाला वाटते ?

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

20 Jan 2017 - 7:17 pm | संदीप डांगे

जोवर लोकानुनय हे समाजधुरिणांकडून गोंजारला जात आहे तोवर समाजातून प्रथा हद्दपार होणे दुष्कर! कायदे झाले तरी पाळणारे हवेत...

महाराष्ट्राने द्रष्टेपण दाखवले असे वाटते पण बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात यासाठीची काही मोर्चे-आंदोलने जवळून पाहिली, भाषणे ऐकली त्यावरुन कायदे किती समंजसपणे स्विकारले ह्याबद्दल जरा शंका आहे.

समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या प्रदेशापुरता एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच प्रदेशातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग त्या प्रदेशातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने देशाने थांबले पाहीजे का ?

कुठले हो! एका जातीत शेकड्यांनी पोटजाती असतात. आता मोर्चे काढणारे मराठे बघितलेत तर त्यात पाचकुळी, शाण्णव कुळी, गोमंतक मराठा, आणि कसले कसले प्रकार असतात त्यांनाच माहीत. काहीतरी मलिदा मिळणार असेल तर हे तेवढ्यापुरते एकत्र येणार. ब्राह्मण समाज म्हणून किती तीन टक्के म्हणतात त्यात कोब्रा, देब्रा, कर्‍हाडे, सारस्वत, देवरुखे आणि असे डझनात प्रकार असतील. एक पोटजात दुसर्‍या पोटजातीबरोबर रोटीबेटी व्यवहार सुद्धा शक्यतो करणार नाहीत. एवढे विभागलेले लोक असताना भारत देश अखंड आहे आणि कसातरी चालतो म्हणजे देव आहे हेच सिद्ध होते. =)) आपले आपले स्वार्थ साधणारे क्षत्रप सगळीकडे भरलेले. समाज सुधारणेचं कोणाला काय पडलंय?

एक दोघे कोणीतरी सुधारायचा प्रयत्न करतात. की कोणीतरी आपल्या भावना दुखावतात असे म्हणून त्यांचे काम शंभर पावले मागे नेऊन ठेवतात. आगरकर असोत की हमीद दलवाई. भारतीय लोकांसाठी कोणी माणूस काही करू शकत नाही. आपल्या लोकांना कायद्याचा बडगा आणि जबर शिक्षेची भीती एवढ्याच गोष्टी कळतात. त्यातही हडेलहप्पी जर सरकारनेच केली तर लोक बोंबाबोंब करून बघतात आणि शेवट निमूटपणे ऐकतात. समाज सुधारणा ज्या काय होतात, होतील त्यांना सरकार आणि कायदे यापलिकडे काही काही कारण असू शकणार नाही असंच मला हळूहळू वाटायला लागलंय.

माहितगार's picture

21 Jan 2017 - 12:32 pm | माहितगार

राजन खान म्हणून एक स्पष्टवक्ते लेखक आहेत (त्यांचे एक अध्यक्षीय भाषण ऐकण्याचा एकदा योग आला होता). तुमचा प्रतिसाद वाचून राजन खानांची आठवण झाली. त्यांचे मत अगदी तुमच्या मताशी मिळते जुळते होते असे आठवले.

पैसा's picture

21 Jan 2017 - 1:08 pm | पैसा

ग्रेट पीपल थिंक अलाईक का काय ते! =)) मी त्यांचे फारसे वाचले नाही. आता शोधून वाचते.

माहितगार's picture

21 Jan 2017 - 2:07 pm | माहितगार

मला पण त्यांच्या बद्दल माहित नव्हते. पुण्यातल्या एका कार्यक्रमात योगायोगाने पोहोचलो तर हे वक्ते महोदय कार्यक्रमास उशीरा येऊन लौकर जाण्याबद्दल बिनधास्त हजेरी घेत सुरु झाले. राजकारण्यांनी आधीच्या भाषणात साहित्याचा समाजमना वर कसा परिणाम होतो या बद्दल बोलाचीच कढी बोलाचाच भात भाषण केले असणार त्यावर वक्ते महोदय उखडले आणि साहित्याचा समाजमनावर कसलाही परिणाम होत नसतो हे सिद्ध करण्यासाठी असो एकुण मस्त बोलले होते हे खरे.

लेखन मीही फारस वाचलेले नाही. पण आताशा साप्ताहीक पुरवणीत कुठे त्यांचे नाव दिसले की ओझरते तरी लक्ष जाते.

माहितगार's picture

23 Jan 2017 - 2:53 pm | माहितगार

DNA च्या एका स्तंभ लेखात Harini Calamur या लेखिकेने जलिकट्टूचीच अ‍ॅनॉलॉजी पूर्ण पटली नाहीतरी बर्‍यापैकी मार्मीकपणे मांडली आहे.

The question is what happens the next time a community decides it is going to use state/ cultural/ regional/ tribal/ caste pride to protest a law which it believes is against their culture. And protests to carry on their way of life? The best Jallikattu analogy here would be that individual sub-cultures can be like raging bulls, the one who wins would steer the bull his way, not one who gets steered by the bull. Because if you get steered by a raging bull, it is going to gore you sooner or later. It is a lesson India learned after Rajiv Gandhi yielded on Shah Bano. One can only hope that we don’t have to learn the same lesson all over again संदर्भ

माहितगार's picture

23 Jan 2017 - 2:59 pm | माहितगार

Harini Calamur च्या अ‍ॅनालॉजी आणि नंतरच्या कमेंट मध्ये सबकल्चर्सचे काही लेजिटीमेट इंटरेस्टही असू शकतात हे नीटसे लक्षात घेतले गेलेले नाही असे वाटते. बेसिकली सम्यक दृष्टीकोण कसा बाळगला जाईल हा तो महत्वाचा प्रश्न आहे. सांस्कृतिक अभिव्यक्ती स्वांतत्र्यासाठी बारडान्सला रेग्यूलेट करा पण बॅन करू नका म्हणणारी न्यायसंस्था जलीकट्टू किंवा बैलगाड्यांच्या शर्यतींना रेग्यूलेट करण्याचा आग्रह बाजूस ठेऊन बॅन करण्यावर भर देते यात अंशतः विरोधाभास वाटतो का ?

श्रीगुरुजी's picture

23 Jan 2017 - 9:06 pm | श्रीगुरुजी

सांस्कृतिक अभिव्यक्ती स्वांतत्र्यासाठी बारडान्सला रेग्यूलेट करा पण बॅन करू नका म्हणणारी न्यायसंस्था जलीकट्टू किंवा बैलगाड्यांच्या शर्यतींना रेग्यूलेट करण्याचा आग्रह बाजूस ठेऊन बॅन करण्यावर भर देते यात अंशतः विरोधाभास वाटतो का ?

विरोधाभास वाटत नाही. बारडान्स हा मर्यादित लोकांसाठी मर्यादित लोकांनी चालविलेला प्रकार आहे. यातील सर्व स्टेकहोल्डर्स माणसे आहेत ज्यांना आपले बरेवाईट समजण्याची निसर्गदत्त देणगी आहे. त्यामुळे त्यासाठी नियमावली करणे समजण्यासारखे आहे.

दुसरीकडे बैलगाडी शर्यत या प्रकारात खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला जातो. यातील मुख्य स्टेकहोल्डर (म्हणजे बैल) यांना मानवासारखी बुद्धीची देणगी नाही. त्यांना शर्यतीत भाग घेणे किंवा न घेणे हा पर्याय नसतो. तो पर्याय मालकाला असतो व मालकाने ठरविल्यास त्यांना शर्यतीत उर फुटेस्तोवर धावावेच लागते. अधिक वेगाने धावण्यासाठी शेपटी पिरगाळली जाणे किंवा पिनेसारख्या टोकदार वस्तूने टोचून घेणे किंवा आसुडाचे फटके सहन करावे लागतात. त्यामुळे त्यांच्यावरील अत्याचार थांबविण्यासाठी न्यायालयालाच पुढाकार घ्यावा लागतो. बैलगाडी शर्यत म्हणजे क्रिकेटसारख्या खेळाचा सामना नव्हे ज्यात पंच, रेफ्री, टीव्ही कॅमेरे अगदी डोळ्यात तेल घालून नियमभंग होत आहे का यावर लक्ष ठेवून असतात व असा नियमभंग झाल्यास त्याची योग्य ती शिक्षाही खेळाडूला मिळते. बैलगाडी शर्यतीसारख्या प्रकारात असे करणे शक्य नसल्याने बंदी घालणे हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे.

फेदरवेट साहेब's picture

23 Jan 2017 - 4:34 pm | फेदरवेट साहेब

ह्याच विषयावर असलेल्या एका विविक्षित धाग्यावर जलीकट्टू विरोधक असलेल्या धागा लेखक महाशयांनी अतिशय हिरीरीने जलीकट्टू मध्ये जखमी अथवा मृत व्यक्तींचे आकडे (?) दिले आहेत. पण जलीकट्टू मध्ये बैल किती मरतात/आजवर मेलेत ह्या आकड्यांना बगल दिलेली आहे. समजा १० वर्षात जलीकट्टू मध्ये १०० बैल मेले आहेत असे गृहीत धरूयात. ह्या १०० मुक्या जनावरांच्या मृत्यूमुळे धागालेखकाला अतोनात क्लेष झाले आहेत असे दिसते. मूळ मुद्दा 'मानवी मनोरंजनाचे साधन म्हणुन मुक्या जनावरांस भोगावे लागणारे क्रौर्य' हा ठेवायचा असताना त्यात 'जिव्हालौल्य' नाव असलेला शब्दच्छल का मांडला गेला हे ही स्पष्ट नाहीये. मानवी लोभापायी प्राणास मूकणारे जीव हा विषय केंद्रस्थानी मानला तर लेखक फक्त जलीकट्टू भवती का रुंजी घालत आहेत हे ही कळले नाही. ह्याहून जास्त बैल तर रोज मोटारगाड्या अन रेल्वेला धडकून मरत असतील. नेमके जलीकट्टू मध्ये दुर्वांची जुडी वाहायची उबळ का येत असावी हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.

उत्तरे द्यायची तिकडे तयारी नाही असे भासते, तुम्ही ह्यातल्या काही प्रश्नांना उत्तरे देऊ शकलात तर आनंद होईल.

माहितगार's picture

23 Jan 2017 - 9:27 pm | माहितगार

ह्या धाग्याचा विषय त्या धाग्यापेक्षा जरासा वेगळा आहे, समाज एखादा नियम अथवा कायदा कसा स्विकारतो (किंवा नाकारतो) त्याची प्रक्रीया काय असते याची थेअरॉटीकल चर्चा ह्या धाग्यास अभिप्रेत आहे.

बाकी इतरत्र अमुक एवढे मृत्यू अथवा क्रौर्य आहे म्हणून या विषयाकडे दुर्लक्ष करावे ही लॉजीकल फॉलसी आहे. हि लॉजीकल फॉलसी तर्कशास्त्रीय पद्धतीने उलगडून दाखवता येते.

पैसा's picture

24 Jan 2017 - 12:27 pm | पैसा

वेगळी चर्चा अभिप्रेत आहे.
फेदरवेट सनी, तुझी लँग्वेज जरा बिघडूनशानी गेली हाय काय! सुद्द कसा काय ल्हितोस रे भावसाहेब?