जखमात यौवनाच्या

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
19 Jan 2017 - 6:30 pm

जखमात यौवनाच्या झाले किती दिवाणे
असती कुणी विलासी कोणी उदासवाणे

असतात काळजाचे गुंते जुने-पुराणे
शून्यात जाई कोणी घेतो कुणी धीराने

लाखो तऱ्हा तयांच्या नि शेकडो ठिकाणे
बाजार काळजाचा लाखो इथे दुकाने

मदिरा कुणा सुखावी कोणास आर्त गाणे
भासे आयुष्य कोणा ती पेटली स्मशाने

ते दुःख झाकण्याला करती किती बहाणे
ओठात गोड हासु कोणा नटाप्रमाणे

ती आग अंतरीची जाळी कणाकणाने
ना सांगता कुणा ये हे मोकळेपणाने

होती अबोल का हो? ना बोलती कशाने
हळुवार त्या स्मृतींना कि त्यागती अशाने?

मजनू इथे फिरस्ते तुडवित माळराने
आयुष्य कंठती अन् घायाळ काळजाने

जखमात यौवनाच्या होती कुणी शहाणे
बदलुन पायवाटा तरती अनुभवाने

सुरुवात जीवनाची करती कुणी नव्याने
उजळुन जन्म सारा पुन्हा नव्या दिव्याने

- शार्दुल हातोळकर

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

एस's picture

19 Jan 2017 - 6:36 pm | एस

वा. कविता आवडली.

जयंत कुलकर्णी's picture

19 Jan 2017 - 9:55 pm | जयंत कुलकर्णी

अरे वा... मस्तच लिहिली आहे. काही ओळी जरा विसंगत वाटतात. भावनेने नाही-शब्दांने पण मस्तच...

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jan 2017 - 11:02 pm | अत्रुप्त आत्मा

अ प्र ति म! त्रिवार सलाम.

पैसा's picture

19 Jan 2017 - 11:07 pm | पैसा

सुरेख कविता!

खग्या's picture

20 Jan 2017 - 2:30 am | खग्या

सुन्दर

नीलमोहर's picture

20 Jan 2017 - 10:45 am | नीलमोहर

' उजळुन जन्म सारा पुन्हा नव्या दिव्याने '
सकारात्मक शेवट आवडला,

किरण कुमार's picture

20 Jan 2017 - 1:27 pm | किरण कुमार

शब्द आवडले , सूरेख

गौरी कुलकर्णी २३'s picture

20 Jan 2017 - 5:29 pm | गौरी कुलकर्णी २३

छान काव्यरचना ! काळजाला भिडली... शेवटच्या चार ओळी सकारात्मक विचारसरणी मांडतात !!

जव्हेरगंज's picture

20 Jan 2017 - 5:59 pm | जव्हेरगंज

जबरदस्त!

शार्दुल_हातोळकर's picture

20 Jan 2017 - 10:40 pm | शार्दुल_हातोळकर

एस, कुलकर्णी सर, आत्मबंध, पैसाताई, खग्या, नीलमोहर, किरण, गौरी, जव्हेरगंज भाऊ, सर्वांना मनापासुन धन्यवाद!!
__/\__

ज्योति अळवणी's picture

20 Jan 2017 - 11:59 pm | ज्योति अळवणी

आवडली

रातराणी's picture

21 Jan 2017 - 12:01 am | रातराणी

क्या बात!

शार्दुल_हातोळकर's picture

21 Jan 2017 - 9:09 pm | शार्दुल_हातोळकर

धन्यवाद ज्योती अलवनि आणि रातराणी !

समाधान राऊत's picture

23 Jan 2017 - 2:51 pm | समाधान राऊत

ते दुःख झाकण्याला करती किती बहाणे
ओठात गोड हासु कोणा नटाप्रमाणे

देशप्रेमी's picture

24 Jan 2017 - 2:26 pm | देशप्रेमी

खुप सुंदर काव्यरचना!!
सकारात्मक शेवट खुप उत्तम झाला आहे.
एका प्रतिभावंत कवीची झलक दिसत आहे!!

शार्दुल_हातोळकर's picture

26 Jan 2017 - 8:46 pm | शार्दुल_हातोळकर

देशप्रेमी, माझ्या साध्याच साहित्यसेवेचे तुम्ही मोठ्या मनाने कौतुक केले, त्याबद्दल तुमचे त्रिवार आभार !! __/\__

मदनबाण's picture

27 Jan 2017 - 6:06 am | मदनबाण

सुरेख...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Puli Urumudhu... :- Vettaikaaran

कवि मानव's picture

27 Jan 2017 - 4:25 pm | कवि मानव

खूप छान.. सुंदर शब्द.. यवनाच्या नाना स्थिती
आवडली !!

पराग देशमुख's picture

28 Jan 2017 - 11:13 am | पराग देशमुख

भावली... ओळी आठवल्या... कवी नाही...
खेळण्यास एक नवा, डाव पाहिजे |
सक्ले जुना, नवीन घाव पाहिजे ||