अव्यक्त भावना ही, शब्दांविनाच बोले

खग्या's picture
खग्या in जे न देखे रवी...
18 Jan 2017 - 6:56 pm

अव्यक्त भावना ही, शब्दांविनाच बोले,
अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले ..

डोळ्यांमधून स्वप्ने, आरास आज झाली..
स्वप्ने तुझीच मजला, माझ्यामध्ये मिळाली ..
ओठी फुलून आले, माझे अबोल गाणे..
अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले ..

कित्येक चांदण्यांचे नक्षत्र आज झाली ..
रात्रीस स्वप्न पडूनी, उषा तिथे मिळाली
जणू शिंपल्यात मजला मोती नवे मिळाले ..
अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले ..

डोळयात आसवांची दाटी घडून आली
कृत-अर्थ जीवनाची, त्रिज्या मिटून गेली ..
मृत्यूस अमृताचे, वरदान जे मिळाले ..
अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले ..

मुक्तक

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

18 Jan 2017 - 7:53 pm | संजय क्षीरसागर

पण कवितेत कल्पनांचे वैभव आणि अनुभवामुळे येणारी अर्थाची सघनता नसेल तर ती मनाचा ठाव घेऊ शकत नाही.

खग्या's picture

19 Jan 2017 - 7:08 pm | खग्या

अर्थात?

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jan 2017 - 11:31 am | अत्रुप्त आत्मा

अप्रतिम..

पैसा's picture

19 Jan 2017 - 11:35 am | पैसा

कविता आवडली!

शार्दुल_हातोळकर's picture

19 Jan 2017 - 1:33 pm | शार्दुल_हातोळकर

आवडली कविता.

हतोळकरांचा प्रसाद's picture

19 Jan 2017 - 3:09 pm | हतोळकरांचा प्रसाद

छान आहे, आवडली कविता!

किरण कुमार's picture

19 Jan 2017 - 3:11 pm | किरण कुमार

उत्तम शब्दरचना आणि अर्थही , आवडली