नोटामाफिया का व कसे?

णरुअ's picture
णरुअ in काथ्याकूट
18 Jan 2017 - 6:35 pm
गाभा: 

आता नोटबंदी होऊन एक महिना उलटलाय
उपयोग जास्त झाला नाही हे पण कळून चुकलंय

मुख्य कारण कोण ? तर नोटामाफिया

पण हे एकदम कसे सुरु झाले ? मी स्वतः बघतलंय कि नोटबंदी ची घोषणा झाली तेव्हाच हा प्रकार सुरु झाला

तसेच जुन्या नोटांना बदलून द्याचे ते पण कायदेशीर रित्या ,हे ह्यांना कसे जमले ?

जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा

प्रतिक्रिया

आनंदी गोपाळ's picture

19 Jan 2017 - 9:19 am | आनंदी गोपाळ

मध्यंतरी एक लेख वाचनात आला.

नोटबंदी ही "ऑर्डिनन्स" काढून लागू केली. तसेच, जुन्या नोटा बाळगणे हा गुन्हा, असाही ऑर्डिनन्स काढला आहे.

आता जुन्या नोटा बाळगणे हा गुन्हा का असावा याचा विचार करूनही समजत नव्हते.

तर, त्या लेखात असे म्हटले होते, की दोन्ही ऑर्डिनन्स कायद्यात बदलण्यासाठी बजेट अधिवेशनात स्म्सदेसमोर ठेवावे लागतील. तिथे राज्यसभा मान्यता देणार नाहीच, व त्यामुळे जर ऑर्डिनन्स डिफीट झाले, तर पुन्हा एकदा जुन्या नोटा विना प्रश्न वापरता येऊ शकतील.

ही बाब जर बरोबर असेल, तर नोटा पांढर्‍या कशा होतात त्याचे हे एक उत्तर असू शकते.

संजय पाटिल's picture

19 Jan 2017 - 1:03 pm | संजय पाटिल

ऑर्डिनन्स डिफीट होत नाहि, लिहून घ्या..

मराठी कथालेखक's picture

19 Jan 2017 - 3:23 pm | मराठी कथालेखक

वित्तविधेयकास राज्यसभेची मंजूरी आवश्यक नसते.

सुबोध खरे's picture

20 Jan 2017 - 9:38 am | सुबोध खरे

हेल्मेट न घालणे हा गुन्हा कसा असू शकतो तसेच जुन्या नोटा बाळगणे आणि त्यात व्यवहार करणे हा गुन्हा आहे.
उद्या नक्षलवादी म्हणू लागले कि युआन ( चिनी चलन) हे चलन म्हणून आम्ही वापरणार तर ते चालेल काय?
किंवा काश्मिरी लोक म्हणाले कि पाकिस्तानी रुपया हेच आमचे चलन तर ते चालेल काय?
व्यवहारातील चलन हे प्रस्थापित सरकारने मान्य केलेलेच असावे लागते.
बाकी वित्त विधेयकाला राज्यसभेची मंजुरी आवश्यक नाही हे लिहिले आहेच
तेंव्हा या वटहुकूमाचे कायद्यात रूपांतर होईलच (रद्दबातल होण्याची शक्यता नाही.)

नितिन थत्ते's picture

20 Jan 2017 - 10:37 am | नितिन थत्ते

>>जुन्या नोटा बाळगणे आणि त्यात व्यवहार करणे हा गुन्हा आहे.

व्यवहार करणे गुन्हा आहे हे बरोबर. बाळगणे गुन्हा का असावा?

>>उद्या नक्षलवादी म्हणू लागले कि युआन ( चिनी चलन) हे चलन म्हणून आम्ही वापरणार तर ते चालेल काय?
किंवा काश्मिरी लोक म्हणाले कि पाकिस्तानी रुपया हेच आमचे चलन तर ते चालेल काय?
व्यवहारातील चलन हे प्रस्थापित सरकारने मान्य केलेलेच असावे लागते.

आपण पेटीएमने व्यवहार करतो तेव्हा "भारत सरकारने इश्यू केलेल्या रुपयांत" व्यवहार करत नाही.

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Jan 2017 - 11:26 pm | अनिरुद्ध.वैद्य

भारत सरकारने इश्यू केलेले पैसे पे टी एम मध्ये न टाकता व्यवहार करू शकता का पे टी एम वर?

उपयोग जास्त झाला नाही हे पण कळून चुकलंय

बापरे.