अभी ची तनु

अभी ची तनु's picture
अभी ची तनु in जनातलं, मनातलं
17 Jan 2017 - 6:58 am

भाग १ ( अभी गावाकडे )

आज सकाळ पासुनच जाधवांच्या घरी धावपळ सुरु होती
.
कारण जाधवांचा एकुलता एक मुलगा अभिमन्यु उर्फ (अभी) आज घरी येत होता.

तो मुंबईला इंजिनियरींग ला होता.
त्याची कालच परिक्षा संपली होती.
म्हनुन तो आज आपल्या गावी येणार होता.

दुपारचे बारा वाजले होते.
अभीच्या घरचे आतुरतेने त्याची वाट पहात होते.
अभीच्या घरी , त्याचे आई - बाबा , आजोबा आणि एक शेतात काम करणारा गडी ( रामु)
मोजुन चार माणसे रहात होती...
अभी ची आई अंगणातुन वाटेकडे नजर लावुन ऊभी होती.
एकदाचा तिला दुरुन अभी हातात बँग घेऊन येतांना दिसला.
ती पळतच अभी कडे आली .
आईला समोर बघताच अभी ला खुप आनंद झाला.
त्याने आई ला प्रेमाने मिठी मारली.
तिच्या पाया पडुन आशिर्वाद घेतला.
वाड्यावर येताच अभी ने आजोबांचा व वडिलांचा आशिर्वाद घेतला.

सर्वांनी मिळुन दुपारचे जेवण केले.
गावाकडील जेवण खुपच दिवसाने मिळाले होते.
ते पण आई च्या हातचे त्यामुळे अभी पोटभर जेवला.

संध्याकाळी वाड्यावर खुप गप्पा रंगल्या अभीने मुंबईचे अनेक किस्से सांगितले .
७ वाजता रामुला आजोबांनी शेतात ऊसाला पाणी भरायला पाठविले.रामु हातात काठी आणि कंदिल घेऊन शेतात पाणी भरायला निघुन गेला.

जाधवांचा वाडा गावापासुन थोडा दुर होता. आजुबाजुला झाडे- झुडपे
होती. त्यातल्या त्यात ऊसाचे शेत.त्यामुळे वातावरण आणखीनच भयानक वाटायचे.

अभी थोडा वेळ टिव्ही पहात बसला त्याची आवडती मालिका तुझ्यात जीव रंगला लागली होती.
एव्हाना साडेसात (७:३०) वाजुन गेले होते.बाहेर अंधार दाटुन आला होता.
क्रमश:

वावरकथाविचार

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

17 Jan 2017 - 1:40 pm | ज्योति अळवणी

सुरवात छान जमली आहे. पण भाग मोठे असले तर अजून मजा येईल.

संजय पाटिल's picture

17 Jan 2017 - 5:56 pm | संजय पाटिल

तुमची स्वताचीच गोष्ट आहे का?

अभी ची तनु's picture

18 Jan 2017 - 8:08 am | अभी ची तनु
अभी ची तनु's picture

18 Jan 2017 - 8:08 am | अभी ची तनु