वडील

वृंदा१'s picture
वृंदा१ in जे न देखे रवी...
14 Jan 2017 - 2:38 pm

प्रत्येक सणावाराला
तुमच्या स्पर्शाचं गोंदण आहे
मी केवळ एक क्षुल्लक खडा
पण मला तुमचं सोन्याचं कोंदण आहे ....

कविता

प्रतिक्रिया

वृंदा१'s picture

14 Jan 2017 - 2:41 pm | वृंदा१

थंडी आहे खूप
ढगांत घ्या गुरफटून
आम्हां सगळ्यांची माया
ऊब देईल आतून .....

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2017 - 5:05 pm | अत्रुप्त आत्मा

गरम आहे सूप
यमकात प्या फुंकून
अर्थ-यमक-व्हाया
आशय येइल कंथून!

कुणाच्या विचारांचा दर्जा कुणी ठरवू शकत नाही पण माझ्या वडिलांबद्दलच्या कवितांना घाणेरड्या प्रतिक्रिया आल्या. मला अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे असते हे माहीत आहे. मला खरेच त्यांची कीव...कीव येते.कुठलाही माणूस असे दुर्गंधीयुक्त विचार घेऊन मोठा होत नसतो.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2017 - 5:02 pm | अत्रुप्त आत्मा

प्रत्येक नवंकवीला
मिपा आंदण आहे
टाकावी जिल्बी किंवा पेढा
शेवटी आपलच स्वात्म कुंथन आहे

कुणाच्या विचारांचा दर्जा कुणी ठरवू शकत नाही पण माझ्या वडिलांबद्दलच्या कवितांना घाणेरड्या प्रतिक्रिया आल्या. मला अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे असते हे माहीत आहे. मला खरेच त्यांची कीव...कीव येते.कुठलाही माणूस असे दुर्गंधीयुक्त विचार घेऊन मोठा होत नसतो.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jan 2017 - 1:58 pm | अत्रुप्त आत्मा

हि विडंबने आहेत. यात घाण काय आहे?

संजय क्षीरसागर's picture

15 Jan 2017 - 5:14 pm | संजय क्षीरसागर

....असं चुकून वाचलं गेलं. पण सदस्यनाम बघून मग पुन्हा वाचलं. बाय द वे, हा उखाणाये का ?

शब्दबम्बाळ's picture

15 Jan 2017 - 7:14 pm | शब्दबम्बाळ

भारत आणि इंग्लंडच तसं
बरंच जुनं भांडण आहे,
भारताची राजधानी दिल्ली,
तर इंग्लंडची लंडण आहे! :P

पैसा's picture

18 Jan 2017 - 1:54 pm | पैसा

फक्त अशा छोट्या छोट्या कविता वेगळाल्या टाकण्यापेक्षा एकाच विषयावर लिहिलेले एकत्र टाका. जास्त परिणामकारक वाटेल.

कृपया विडंबन करताना मूळ कवितेत असलेल्या हळव्या भावनेची खिल्ली उडवू नये असं वाटतं.

चारोळी असं लिहीत जा, म्हणजे उघडून वाचणार्‍याचा हिरमोड होणार नाही.