गायक, कवि आणि किर्तनकारांची उल्लेखनीयता

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
14 Jan 2017 - 10:05 am
गाभा: 

ब्लॉग्सची उल्लेखनीयता संदर्भाने काही प्रश्न पहिल्या धाग्यात उपस्थित केले आहेतच. भारतीय जीवनाच्या परिप्रेक्ष्यात वस्तुनिष्ठ नोंदी/दखल घेण्याच्या प्रथांचा सांस्कृतीक आणि माध्यमस्तरांवर बर्‍याचदा अभाव जाणवतो. त्याशिवाय माहितीस्रोतांची कमतरता भासते. याचा फटका बसणारा अजून एक गट म्हणजे माध्यम प्रसिद्धीचा झोत प्राप्त न होणारे लेखक, गायक, कवि आणि किर्तनकार इत्यादींचा .

मराठीमधील आणि मिपावरील सर्वोत्कृष्ट कविता कोणत्या
अशा स्वरुपाची चर्चा मागे मी मिपावर लावली होती. अर्थात अशा धाग्यांच्या स्वरुपातून चर्चा न होणार्‍या साहित्यिक आणि कलावंताची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता कशी निश्चित करावी हा प्रश्न शिल्लक राहतो. तुमचे मत काय ?

हि धागा चर्चा मराठी विकि संदर्भाने असल्यामुळे आपले प्रतिसाद लेखन प्रताधिकारमुक्त समजले जाईल. अनुषंगिका व्यतरीक्त आवांतरे टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार.

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

17 Jan 2017 - 1:59 pm | Nitin Palkar

'परिपेक्षात'. सर्वात प्रथम हा शब्द वापरल्याबद्दल अभिनंदन. हा शब्द परिप्रेक्ष्यात असा हवा. मूळ शब्द 'परिप्रेक्ष्य'. काही जणांना याचा अर्थ माहित नसण्याची शक्यता असल्याने माझ्या परीने विशद करतो, परिप्रेक्ष्य म्हणजे इंग्रजी मध्ये ढोबळमानाने 'context' म्हणता येईल परंतू परिप्रेक्ष्यची अर्थव्याप्ती थोडी अधिक आहे.