वधूपरिक्षेच्या पारंपारिक पद्धतीत सुधारणा शक्य आहे का?

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in काथ्याकूट
13 Jan 2017 - 5:01 pm
गाभा: 

वधूपरिक्षेच्या पारंपारिक पद्धतीत सुधारणा शक्य आहे का?

मुली बघण्याच्या पारंपारिक पद्धतीमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत तसेच काही दोषसुद्धा आहेत
आपल्याला जर एखादी वस्तू विकायची असली तर आपण काय करतो? त्या वस्तूला सजवून मांडतो, त्यातले दोष झाकून असलेले अन नसलेले गुण वर्णन करून सांगतो. वधू वर परीक्षणाचही असंच आहे. ही निवडप्रक्रिया बऱ्याचअंशी दिखाव्यावर आधारीत असते. शिवाय पहायला गेल्यावर मुलगा अन मुलगी फक्त पाच ते दहा मिनीटं समोरासमोर असतात. अन तेवढ्या भेटीवरच लग्नाचे निर्णय घेतले जातात. एकमेकांचे स्वभाव कळण्याचा प्रश्नच नाही.

यावर एक उपाय असा सुचवला जातो की मुलीला एकदोन वेळा वैयक्तिकरित्या भेटावं आणि आपल्या अपेक्षा वगैरेंबाबत बोलावं. पण अशा भेटीतून खरा तो किंवा ती एकमेकांना कळतात का ही शंकाच आहे. कारण अर्थातच मुलीला(आई, वडील, बहीण, मैत्रीण इ.)घरून पढवून पाठवलेलं असतं की त्यांच्याशी असं असं बोल.चांगल स्थळ आहे जमलंच पाहिजे वगैरे वगैरे.

मला पडलेला गहन प्रश्न असा आहे की वरील परिस्थितीवर काही उपाय शक्य आहे का जेणेकरून ती त्याच्यासाठी योग्य आहे की नाही याची थोडी तरी चाचपणी करता येईल? मत,कल्पना, सल्ला, अनुभव ?

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

13 Jan 2017 - 10:11 pm | अत्रन्गि पाउस

कदाचित २००

अॅस्ट्रोनाट विनय's picture

13 Jan 2017 - 11:36 pm | अॅस्ट्रोनाट विनय

??

णरुअ's picture

13 Jan 2017 - 11:21 pm | णरुअ

लिव्ह इन रेलशनशिप

अॅस्ट्रोनाट विनय's picture

13 Jan 2017 - 11:35 pm | अॅस्ट्रोनाट विनय

लीव इन साठी आधी तुम्ही gf आणि bf असावे लागता. मी arrange marriage बद्दल बोलतोय. मुली बघण्याच्या पारंपारिक पद्धतीत सुधारणा

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jan 2017 - 11:24 pm | अत्रुप्त आत्मा

मुंडावळ..., आपलं...ते हे..जागा धरून बसतो. .

अनन्त अवधुत's picture

14 Jan 2017 - 1:02 am | अनन्त अवधुत

कारण अर्थातच मुलीला(आई, वडील, बहीण, मैत्रीण इ.)घरून पढवून पाठवलेलं असतं की त्यांच्याशी असं असं बोल.चांगल स्थळ आहे जमलंच पाहिजे वगैरे वगैरे.

फक्त मुलीला?
मुलाला नसते का घरून पढवून पाठवलेलं असतं की त्यांच्याशी असं असं बोल.चांगल स्थळ आहे जमलंच पाहिजे वगैरे वगैरे..

चला आता जागा धरून बसा..

अॅस्ट्रोनाट विनय's picture

14 Jan 2017 - 10:01 am | अॅस्ट्रोनाट विनय

हो पण असा दबाव मुलांवर कमी असतो. तुला आवडली मुलगी तरच कर, आमचा दबाव नाही असं बरचसे आईवडील म्हणतात. मुलींएवढा होकाराचा दबाव त्यांच्यावर नसतो

रेवती's picture

14 Jan 2017 - 1:25 am | रेवती

तुम्ही लग्नाळू आहात का?
असल्यास मुलगी बघण्याचे असे अनुभव आलेत का?
बदल हा नेहमी स्वत:पासून सुरु होतो.
इथं मिपावर काहीजणांनी अशा धाग्यांमध्ये आपले मत व्यक्त करताना मुलीला भेटणे, बोलणे, आपल्या हातात ठेवल्याचे सांगितले आहे. तुम्ही तुमच्याघरातील ज्येष्ठांना सांगून पहावे की जात, धर्म, पंथ, पारंपारीक भेटीगाठी, अतोनात खर्च वगैरे (जी तुमची मते आहेत ती) करणार नाही व माझे लग्न माझ्या मर्जीने होईल. अशावेळी आपल्या व आपल्याला आवडलेल्या मुलीच्या खिषात दम पाहिजे. एकदम "हो घराबाहेर!" अशी धमकी आली तर निस्तरता आलं पाहिजे ना!
तुम्हाला सध्याचा आट्याचा व डाळीचा भाव माहित असल्यास कळवा प्लीज.............. ;)

संदीप डांगे's picture

14 Jan 2017 - 8:55 am | संदीप डांगे

=))

बहुतेक असे धागे लग्नाळू लोक्स काढतात असा अंदाज आहे!

अॅस्ट्रोनाट विनय's picture

14 Jan 2017 - 10:22 am | अॅस्ट्रोनाट विनय

:)) बरोबर कारण लग्नाळू लोकच जास्त आशावादी असतात.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

14 Jan 2017 - 10:16 am | अॅस्ट्रोनाट विनय

सध्याच मी लग्नाळू नाही पण लवकरच योग येतील. मुली बघायला सुरुवात नाही केलीये पण बाकिच्यांचे अनुभव आहेत.
रेवती मॅडम, इतर मुद्द्यांच्या बाबतीत तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. माझे लग्न माझ्याच मर्जीने करायला घरच्यांचि हरकत नाही. दूसरी गोष्ट जात,धर्म वगैरे अडसर तेव्हाच उत्पन्न होतील जेव्हा मला प्रेमविवाह करण्याची इच्छा असेल. पण तसं नाहीये. मला घरच्यांनी आणि नातेवईकानी सुचवलेल्या मुलींना भेटून त्यातली जी आवडेल तिच्याशी लग्न करायच आहे. त्यामुळे हो घराबाहेर या धमकीची भीती नाही (तसंही नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्याने वेगळच घर थाटाव लागणार आहे) आणि डाळीचा भाव सध्याच माहीत करून घेण्याची गरज नाही. (आणि तो भाव कितीही असला तरी माझा एकट्याचा खिसा ते सहज पेलू शकतो :)
माझा प्रश्न फक्त पारंपारिक मुली बघण्याचा कार्यक्रम आणि त्यात काही सुधारणा शक्य आहे का या बाबतीत आहे.

यावर एक उपाय असा सुचवला जातो की मुलीला एकदोन वेळा वैयक्तिकरित्या भेटावं आणि आपल्या अपेक्षा वगैरेंबाबत बोलावं. पण अशा भेटीतून खरा तो किंवा ती एकमेकांना कळतात का ही शंकाच आहे. कारण अर्थातच मुलीला(आई, वडील, बहीण, मैत्रीण इ.) घरून पढवून पाठवलेलं असतं की त्यांच्याशी असं असं बोल.चांगल स्थळ आहे जमलंच पाहिजे वगैरे वगैरे.

मुलं सुद्धा मुली पटवायला स्वतःची इमेज आदर्श पतीसारखीच दाखवतात. ते वाइसवर्सा आणि नॉर्मल आहे. कारण एकमेकांना इंप्रेस करु शकले नाहीत तर विषय तिथेच संपतो.

मला घरच्यांनी आणि नातेवईकानी सुचवलेल्या मुलींना भेटून त्यातली जी आवडेल तिच्याशी लग्न करायच आहे. माझा प्रश्न फक्त पारंपारिक मुली बघण्याचा कार्यक्रम आणि त्यात काही सुधारणा शक्य आहे का या बाबतीत आहे.

लग्न ठरवून करा की प्रेम करुन शेवटी तुम्हाला माणसाची पारख काय आहे यावर वैवाहिक यश अवलंबून आहे. आणि ते बव्हंशी केवळ तुमच्यावरच डिपेंडंट आहे. ती तशी आहे म्हणून आमचं जमत नाही ही पश्चात बुद्धी कायम निरुपयोगी आहे, मग तो विवाह पहिला असो की पाचवा. आणि ती कशीही असली तरी माझी आहे ही भावना जोपर्यंत मनात रुजत नाही तोपर्यंत विवाहाची मजा नाही मग तो एका आठवड्यापूर्वी झाला असो की काही दशकांपूर्वी.

एकच करा, भेटीमधे प्रश्नोत्तरांचा तास घेण्यापेक्षा तिच्या सहवासात आपण रमतो की नाही हे पाहा. जीचा सहवास हवाहवासा वाटेल तिला एकदाच आपली म्हणा आणि मग मागे वळून पाहू नका, कोणताही अ‍ॅनॅलिसिस करायच्या भानगडीत पडू नका. तुमचं वैवाहिक जीवन मजेचं होईल.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

14 Jan 2017 - 11:45 am | अॅस्ट्रोनाट विनय

धन्यवाद संजयजी, योग्य मार्गदर्शन केलंत. तुमचं म्हणणं पटण्यासारख आहे. कोणीही perfect नसतो आणि कोणतंही नातं टिकावणं हे आपल्यावरच अवलंबून असतं.

बरखा's picture

14 Jan 2017 - 12:46 pm | बरखा

+१ ,
" ती कशीही असली तरी माझी आहे ही भावना जोपर्यंत मनात रुजत नाही तोपर्यंत विवाहाची मजा नाही मग तो एका आठवड्यापूर्वी झाला असो की काही दशकांपूर्वी. "संजय क्षीरसागर यांच्याशी सहमत.

ती कशीही असली तरी माझी आहे ही भावना जोपर्यंत मनात रुजत नाही तोपर्यंत विवाहाची मजा नाही

हं. जुनी खोंडं हेच वाक्य "पदरी पडलं, पवित्र झालं" अशा भाषेत बोलायते तेव्हा त्यांच्यावर फार टीका व्हायची असे आठवते. एकंदरीत काय तर मनीचा हेतू काहीही असो, शब्दांचं रॅपर देखील सुंदर असावे लागते असा आजच्या जगाचा नियम आहे.

बाकी तुमच्या मुळ मुद्द्याशी सहमत आहे.

"पदरी पडलं, पवित्र झालं"

यात मागच्या पिढ्यांचा नाईलाज दिसतो. जे आहे ते ओढण्याची भावना (दोन्ही कडून) दिसते. त्यात मजा नाही.

ती कशीही असली तरी माझी आहे यात आपल्या सिलेक्शनचा गौरव आहे. तिच्यात काही तरी भावलं आहे जे शब्दांच्या पलिकडे आहे आणि ते शेवटापर्यंत वर्णन करता येणार नाही. मतभेद आहेत पण ते पदरी पडलं म्हणून अ‍ॅडजेस्ट केलेले नाहीत. त्यावरनं नेहमी वादंग होतील पण एकमेकांच्या सहवासाची खुमारी त्यांना पार करुन जाईल हा विश्वास आहे. आणि तो दोघांनाही एकमेकांबद्दल आहे.

पुंबा's picture

16 Jan 2017 - 4:16 pm | पुंबा

++++१११

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Jan 2017 - 3:17 pm | हतोळकरांचा प्रसाद

हे

ती कशीही असली तरी माझी आहे ही भावना जोपर्यंत मनात रुजत नाही तोपर्यंत विवाहाची मजा नाही

आणि

भेटीमधे प्रश्नोत्तरांचा तास घेण्यापेक्षा तिच्या सहवासात आपण रमतो की नाही हे पाहा

ह्या दोन वाक्यांशी प्रचंड सहमत!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jan 2017 - 8:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ते जौंद्या ओ. तुम्ही ते टिफनीचं काय झालं ते सांगा बरं =))

टिफनी असंय की सध्या ती भारतीय चालीरिती शिकतिये. कर्ण जोहरचे शिनेमे पाहून त्यांच्याकडे सर्व महिलांना ती कडवाचौथीचं व्रत समजावून सांगतिये व त्यामुळे डाएट कंट्रोलचे धडे गिरवतिये. प्रश्न असा आहे की तिच्या सर्व आया (आईचे अनेकवचन) आठ आठ तास उपास करून इंटरनेटवरील चंद्र व टीव्हीवरील नवरा बघून बफेलो विंग्ज व पिझ्झा हादडतात व टिफनीला तू एकलाच असल्यामुळे अख्खा दिवस तहान भुकेने तळमळत रहावे लागते. तुझी सध्या कोणी गफ्रे असेल तर कळव म्हणून माझ्याकडे निरोप दिलाय. तसे असल्यास (एकापेक्षा जास्त गफ्रे असल्यास आनंदच आहे) सगळ्याजणी मिळून दिवसाचे तास वाटून घेतील व कडवाचौथ पार पाडतील हा त्यामागील हेतू आहे. तसंही पाणी न पिता राहणं तिच्या स्किनटोनसाठी बरं नाही म्हणाली. आता काय ते बोल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2017 - 6:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्या ह्या ह्या.....!!! बेक्कार हसलोय अनेकवचन वगैरे ऐकुन. =))!!

नेमके तास वाटुन घेतील का मला वाटतील हे अंमळ स्पष्टं नं झाल्याने त्या प्रश्णाला टँजंट हाणतो आहे. =))

अॅस्ट्रोनाट विनय's picture

16 Jan 2017 - 12:45 pm | अॅस्ट्रोनाट विनय

या टिफनी पुरानावर एक कथाच होऊ शकते की

लाडू's picture

16 Jan 2017 - 4:14 pm | लाडू

लग्नाळू नाही ओ लग्नाऊ असतात...

प्रकाश घाटपांडे's picture

14 Jan 2017 - 9:49 am | प्रकाश घाटपांडे

व्यक्तिगत मूल्ये व कौटुंबिक मूल्ये यांची चर्चा अपेक्षा व अनुरुपता, तडजोडीच्या मर्यादा याबद्दल मुलामुलींनी तसेच त्यांच्या कुटुंबांनी चर्चा करावी त्यातून अंदाज येतो. त्याआधारे 'रिस्क' घ्यावी असा फंडा सध्या आहे.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

14 Jan 2017 - 10:20 am | अॅस्ट्रोनाट विनय

विषयांतर न करता तुम्ही योग्य उत्तर दिलंत याबद्दल आभारी आहे __/\__ दोन्ही कुटुंबांमध्ये मोकळेपणा हवाच

अॅस्ट्रोनाट विनय's picture

14 Jan 2017 - 10:20 am | अॅस्ट्रोनाट विनय

विषयांतर न करता तुम्ही योग्य उत्तर दिलंत याबद्दल आभारी आहे __/\__ दोन्ही कुटुंबांमध्ये मोकळेपणा हवाच

सामान्यनागरिक's picture

14 Jan 2017 - 11:34 am | सामान्यनागरिक

१. मुला मुलीने वेगळं भेटणं हा एक उत्तम पर्याय आहे.
कितीही पढवल तरी शेवटी त्या दोघानी एकमेकांना परखण्याची संधी मिळेल.

२.अजूनही काही वेगळे पर्याय काढता येतील. उदा. फक्त मुला-मुलींचे वेगळे मिलन समारंभ. यात पालक दूर बसतील. दिवसभर मुले मुली पालकांच्या नजरे समोर एकमेकांशी बोलतील. यात काही खेळ, गाणी वगैरे असू शकतात.

३. जर पसंती असेल तर पुढे भेटी होऊ शकतात. नाहीतर ....

आदूबाळ's picture

14 Jan 2017 - 11:40 am | आदूबाळ

यात पालक दूर बसतील. दिवसभर मुले मुली पालकांच्या नजरे समोर एकमेकांशी बोलतील. यात काही खेळ, गाणी वगैरे असू शकतात.

म्हंजे ज्युनियर केजीत होतं तसं?

अॅस्ट्रोनाट विनय's picture

14 Jan 2017 - 1:03 pm | अॅस्ट्रोनाट विनय

माझ्पायाबी डोळ्लयांसमोर हेच चित्थोतूर आलं पालक थोडावेळ निघून गेले तर बरं नाही का? त्यांना नेमकी कशाची भीती वाटते :D D

संदीप डांगे's picture

14 Jan 2017 - 1:32 pm | संदीप डांगे

असं वाटणार्‍या पालकांना मुलांवर आपले नियंत्रण हवं असतं,

नोकरी-शिक्षण स्वत:च्या मनानी करणार्‍या तीशीतल्या मुलाने मुलगी मात्र आपल्याला विचारुन आपल्या संमतीने केली पाहिजे हा हट्ट.
मुलीही आजकाल २४च्या पुढे लग्न करतात, त्यांनाही आपला जोडीदार निवडतांना आईवडिलांच्या कुबड्या लागाव्या हे गजब आहे.

संक्षिंनी एक चांगला मुद्दा सांगितलाय, माणसं ओळखता येणे, साधारण १६ व्या वर्षापासून पुढे आपली माणसं जोखायची बुद्धी जागृत होते... कारण आईवडिलांच्या छायेतून निघून वेगवेगळ्या लोकांशी आपण आपल्या मर्जीने भेट-व्यवहार करत असतो, कॉलेज-नोकरीत तर कित्येक अनोळखी माणसे भेटतात, त्यातून आपण माणसे शिकत जातो. तरी एक लग्न म्हटलं की हे सगळं विसरुन जणू काही आता बालवाडीत आहे अशा पद्धतीने पालक मुलांबाबत करतात तेव्हा हसायला येत नाही, कीव येते.

संदीप डांगे's picture

14 Jan 2017 - 1:34 pm | संदीप डांगे

जर माणसे ओळखण्याची समज पन्नाशीनंतरच येते असे आईवडिलांना वाटत असेल तर लग्न पन्नाशी झाल्यावरच करावी असा मी विचार मांडतो. =))

अॅस्ट्रोनाट विनय's picture

14 Jan 2017 - 4:01 pm | अॅस्ट्रोनाट विनय
अॅस्ट्रोनाट विनय's picture

14 Jan 2017 - 4:02 pm | अॅस्ट्रोनाट विनय

बरूबर. गांधर्व विवाहाचा ट्रेंड येईल मग परत :)

यशोधरा's picture

14 Jan 2017 - 2:15 pm | यशोधरा

त्यांना नेमकी कशाची भीती वाटते :D D

असले प्रश्न विचारुन खिदळणार्‍या मुलांची वाटत असावी.. भीती हो.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

14 Jan 2017 - 3:58 pm | अॅस्ट्रोनाट विनय

असले प्रश्न विचारुन खिदळणार्‍या मुलांची वाटत असावी.. भीती हो.

धन्यवाद हा तर आमचा गौरवच झाला की :))

अच्छा! म्हणजे तो गौरव तुमचा मुलगा आहे तर!

अॅस्ट्रोनाट विनय's picture

16 Jan 2017 - 12:31 pm | अॅस्ट्रोनाट विनय

हो, पण नाजायज

लग्नाच्या भानगडीत शहाण्यांनी पडू नये. ;-)

संदीप डांगे's picture

14 Jan 2017 - 4:37 pm | संदीप डांगे

मला वाटतं, लग्नाळू लोकांनी शाहाण्यांना सल्ला विचारण्याच्या भानगडीत पडू नय! =))

अॅस्ट्रोनाट विनय's picture

14 Jan 2017 - 5:09 pm | अॅस्ट्रोनाट विनय

थँक गॉड मी शहाणा नाही ;-)

संजय क्षीरसागर's picture

14 Jan 2017 - 5:52 pm | संजय क्षीरसागर

लग्न हा फंद नाही छंद आहे,
शहाण्यांचा तो खेळ नव्हे,
हा जुगार वेड्यांचा आहे |

अॅस्ट्रोनाट विनय's picture

14 Jan 2017 - 7:56 pm | अॅस्ट्रोनाट विनय

वेड्यांची जगात कमी नाही.

गामा पैलवान's picture

15 Jan 2017 - 3:33 pm | गामा पैलवान

अॅस्ट्रोनाट विनय,

सगळ्यांनी एव्हढे सल्ले दिलेत तर मीही हात धुवून घेतो. जेव्हा मुलगी पसंत करायला जाल, तेव्हा तुम्हां दोघांचं किती जुळतंय यापेक्षा जुळवून घ्यायची इच्छा प्रबळ आहे का हा प्रश्न विचारून पहा. उत्तर होकारार्थी आल्याच द्या उडवून बार. जुळवून घ्यायची इच्छा प्रबळ असणे म्हणजे संक्षींच्या भाषेत तिला आपले म्हणणे होय.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

15 Jan 2017 - 4:00 pm | संजय क्षीरसागर

जुळवून घ्यायची इच्छा प्रबळ असणे म्हणजे संक्षींच्या भाषेत तिला आपले म्हणणे होय.

एकमेकांच्या सहवासात मस्त वाटणं हा फॅक्टर आहे. त्याची कारणमिमांसा होऊ शकत नाही. तो एक फील आहे. एकदा तो फील आला की मग सगळं आपोआप जुळून येतं. एकमेकांशी `जुळवून घेतलं' असा भाव दोन्हीकडे राहात नाही.

ते अगदी असं आहे :

पार्टीतल्या मुली सुल्तानला म्हणतात, इतकी वर्ष झाली तुझ्या पत्नीनं तुला सोडून, हर एक चिज़का एक एक्सपायरी डेट होता है.

त्यावर सुल्तान म्हणतो, मॅडम, हमरे यहां लडाई झगडे होते है. लेकीन इष्कका कोई एक्सपायरी डेट नही होता !

त्यावर मुली विचारतात की तिच्यात अशी काय खास बात आहे जी आमच्यात नाही ?

आणि सुल्तान म्हणतो, तसं नाही. तुम्ही सगळ्या सुरेख आहात पण तिच्यात एक फिल आहे...आणि तो फक्त अनुभवता येतो!

जग घूमेया थारे जैसा ना कोई |

अॅस्ट्रोनाट विनय's picture

15 Jan 2017 - 5:20 pm | अॅस्ट्रोनाट विनय

संजयजी खूप आभारी आहे. आपला सल्ला मोलाचा. पैलवान साहेब धन्यवाद.
आयला पण पहिल्या भेटीत प्रत्येकच मुलगी छान वाटते (की हा फक्त माझाच problem आहे ?)

दूसरी गोष्ट,विवाहोत्सुक प्रत्येक मुलगी मी जुळवून घ्यायला तयार आहे असं म्हणेल न. मुळात तिचा स्वभाव आधीपासूनच समजुतदार आणि जुळवून घेणारा असलेला बरा. हे शोधणे कठीण

शब्दबम्बाळ's picture

15 Jan 2017 - 6:53 pm | शब्दबम्बाळ

हो!

गॅरी ट्रुमन's picture

15 Jan 2017 - 10:47 pm | गॅरी ट्रुमन

आयुष्यात कधीही कुठलेही इंटरॅक्शन नसलेल्या कुठल्यातरी मुलीबरोबर दहा मिनिटे "आतल्या खोलीत" एकांतात काही बोलायचे या कल्पनेनेच मला खरे तर पूर्वी शहारा यायचा. आता येत नाही कारण या जन्मी तरी तो प्रकार करायची गरज लागणार नाही :)

बरं झालं आमची बेस (आणि रोझ) म्हणजेच पूर्वाश्रमीची हिलरीला ऑनलाईन भेटलो आणि लग्न करायचे ठरवेपर्यंत चांगले तीन-साडेतीन वर्षे एकमेकांना ओळखत होतो. अन्यथा मलाही आज "मुली पाहण्यामधले फ्रस्ट्रेशन" अशा स्वरूपाचा एखादा लेख लिहावा लागला असता मिपावर :)

अॅस्ट्रोनाट विनय's picture

15 Jan 2017 - 11:15 pm | अॅस्ट्रोनाट विनय

गॅरीजी भाग्यवान आहात.
पण पारंपारिक पद्धतीतसुद्धा आजकाल आतल्या खोलीतच बोललं पाहिजे असं काही नसतं :)), तुम्ही निर्णय घेण्याआधी मुलीला एकदोन वेळा बाहेरही भेटू शकता आणि हवा तेवढा वेळ गप्पा मारू शकता.

अत्रन्गि पाउस's picture

16 Jan 2017 - 12:37 pm | अत्रन्गि पाउस

गॅरी ऐकून एकदम 'माझ्या नवऱ्याची बायको' मधली शनाया आठवली ...

अवांतर फाटा फोडण्याबद्दल क्षमस्व

चिनार's picture

16 Jan 2017 - 11:38 am | चिनार

काय सांगता ग्यारी भौ...
म्या तर बिलकुल घाबरत नव्हतो पोरींशी बोलाले. लय फकाल्या मारायचो मी. ची मायबीन कॉलेजमदी कोणतीच पोरगी बोलेना आमच्याशी मंग असा चान्स कोन सोडणार राव ? अन ऑनलाईन वगैरे आपल्याला कधी जमलंच नाही ना !!

अॅस्ट्रोनाट विनय's picture

16 Jan 2017 - 12:30 pm | अॅस्ट्रोनाट विनय

तुम्ही अकोल्याचे दिसता ; )

चिनार's picture

16 Jan 2017 - 12:39 pm | चिनार

अमरावतीचा हाओ भौ
बाकी विनय भौ तुम्ही ऍस्ट्रोनॉट आहात तर चंद्र,मंगळ,बुध,गुरु ग्रहांवर लग्न ठरवायच्या काय पद्धती हायेत ते बघून या की राव...चांगल्या असतीन तर त्याच मांडू पृथ्वीवर...काय म्हणता ?
बाकी ते मुलीला/मुलाला मंगळ आहे म्हणतात तसं मंगळावरच्या मुलीला 'पृथ्वी' आहे असं म्हणतात का ते पण बघून या..

अॅस्ट्रोनाट विनय's picture

16 Jan 2017 - 1:01 pm | अॅस्ट्रोनाट विनय

अॅस्ट्रोनाट आसल्यन पह्यले तिकडंच हिंडुन आल्तो. पण काय सांगू भाव, तिकडच्या पोरीयनं भावच देला नाय. कदाचित भाषा येगली असल्यानं भाव ना पोहचल्या नसतीन मह्या बरोबर. काहींयन त भाव म्हणून राखी बांधून पाठवून देलं.
मंगळावरच्या पोरीले पृथ्वी आहे म्हणणारे ज्योतिषी मागच्याच वर्षी इकडून आयात केले त्यह्यनं

चिनार's picture

16 Jan 2017 - 2:27 pm | चिनार

असं झालं नाई मंग ते...
मंगळाच्या पोरी बी नखरेल असतेत म्हनजे...मंग कायले ते नासा वाले मंगळाच्या मांग लागून टैम बरबाद करतेत काय मालूम ?मी म्हंतो पोरी जर ढूंकून पायनार नस्तीन त कायले येवढा तामझाम करावं ?

तुमची केस अगदी साधी आहे. ;)
आता व डाळ दोन्ही आणायला प्रश्न नाही, तुमचे लग्न तुमच्या मर्जीनेच होईल, प्रेमविवाह नसेल, वेगळा संसार थाटणे ही गरज आहे. मग प्रश्न येतोय कुठे? लग्न करायचे म्हटल्यावर बरे कपडे तर मुलगी काय मुलगाही परिधान करेलच. त्यात सजवून विकायला ठेवलेल्या वस्तूचा विचार मनात आणू नये. पाच दहा मिंटात काय एकमेकांबद्दल जाणून घेणार असं वाटतय तर जास्तवेळ बोला. घरात नको असेल तर गच्चीवर, उपहारगृहात, बागेत, स्काईपवर असं कुठेही कंफर्टेबल असेल तिथे. थोरामोठ्यांच्या सहवासात अवघडल्यासारखं वाटणार नसेल तर घरात बोला. एका भेटीत जाणून घेऊ शकणार नाही असं वाटत असेल तर दहावेळा भेटा. प्रत्येकवेळी कोणी मैत्रिण किंवा मामी, मावशी पढवून पाठवू शकणार नाही.
माझं लग्न लै वर्षांपूर्वी झाल्याने आजकालचे फार अनुभव माहित नाहीत पण एवढ्यात भाच्याचे लगीन ठरले तेंव्हा तो जवळजवळ सहा महिने मुलीशी फोन, स्काईप, चॅट असे बोलत होता. भारतवारीदरम्यान भेट झाली. सगळे पटल्यावरच साखरपुडा झाला. दोघांचेही शिक्षण, कामाचा अनुभव, घरची आर्थिक परिस्थिती यात जाणवेल असा फरक असताना त्या दोघांनी बराच पेशन्स दाखवून काम निभावून नेले असे म्हणता येईल. यामध्ये दोन्हीकडील आईवडिलांचा सहभाग एकमेकांची ओळख करून घेण्याइतपत आधी होता. आता लग्न ठरवताना मात्र जास्त आहे हे ओघाने आले कारण हे पारंपारिक अ‍ॅरेंज्ड म्यारेज नाही पण लव्ह म्यारेजही नाही. नवर्‍यामुलाने यात स्वयंपाक करणे, घरसफाई, ईतर घरगुती कामे यातील आपला सहभाग सांगितला व तसेच मुलीनेही केले असावे.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Jan 2017 - 10:34 am | प्रकाश घाटपांडे

व्यावहारिकदृष्ट्या सोयीचे स्थळ बघायचे की सोयीचे नसले तरी मनाच कौल याला महत्व द्यायचे हा प्रश्न अशा केसेस मधे पडतो खरा पण त्याला काही उत्तर नाही.

संदीप डांगे's picture

16 Jan 2017 - 12:15 pm | संदीप डांगे

माझ्या एका मित्राचे नुकतंच लग्न झालंय, गेल्या चार वर्षांपासून तो मुली बघत होता, आणि नेहमी याच गोंधळात अडकायचा. वय जास्त होत चाललंय म्हणून शेवटी उरकावे लागलेच फार विचार न करता.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

16 Jan 2017 - 12:28 pm | अॅस्ट्रोनाट विनय

चिंता करू नका, इतका वेळ लावणार नाही मी.:)

अप्पा जोगळेकर's picture

16 Jan 2017 - 10:58 am | अप्पा जोगळेकर

शेवटी जागाच भरायची ना ?

अॅस्ट्रोनाट विनय's picture

16 Jan 2017 - 12:37 pm | अॅस्ट्रोनाट विनय

रेवतीजी, चपखल बसणारं उदाहरण दिलंत. माझ्या डोक्यात आहे हा पर्याय. परंतु त्यातही एक अडचण आहे. आमच्या भागातली वधूपरीक्षणाची पद्धत सविस्तर सांगतो म्हणजे म्हणजे माझ्यासारख्या बऱ्याच मुलांची काय समस्या असते हे लक्षात येईल.

सर्वप्रथम तर अमूक एक मुलगा लग्नाचा आहे म्हटल्यावर मुलींचे पालक एखाद्या मध्यस्थ नातेवईकामार्फत त्यांचं स्थळ सुचवतात. मुलाची नोकरी आणि घरची परिस्थिती चांगली असेल तर त्याला बरीच स्थळं येतात. मुलाने पालकांना त्याच्या अपेक्षा सांगितलेल्या असतात (उदा: मुलगी इंजिनिअर पाहिजे, नोकरीवाली पाहिजेत, नोकरी करणारी नको, कुठलीही graduate चालेल वगैरे वगैरे) पालक मग आलेल्या स्थळांमधून चाळणी करून अशी स्थळं निवडतात. आता येतो कांद्यापोह्यांचा कार्यक्रम. मुलगी बघायला कोण कोणत्या क्रमाने जाणार याबाबतीत दोन पर्याय आहेत.

१. आधी दोनतिन जेष्ठ लोक पहायला जातात.(सोबत मुलगा त्याचे मामा, काका किंवा जे कोणी त्याच्या समविचारी असतील त्यांना पाठवू शकतो) मुलीपेक्षा तिच्या घरचे लोक कसे आहेत याकडे त्यांचं जास्त लक्ष राहतं. मुलगी त्यांना कशी वाटली हे मुलाला सांगतात आणि त्याआधारे काही मुली निवडल्या जातात. त्या मुलींना बघायला नंतर मुलगा सुट्टी टाकून येतो आणि त्याच्या एखाद्या मित्राला किंवा भावाला घेऊन जातो . (हा पर्याय यासाठी वापरला जातो कारण स्थळं खूप असतात. मुलाला बाहेरगावी नोकरी असल्याने तो प्रत्येक येऊ शकत नाही. कारण एक स्थळ आज येतं, एक आठ दिवसांनी, एक अजून एका महिन्यांने वगैरे)

२. दुसरा पर्याय म्हणजे मुलीला बघायला मुलगा सगळ्यात आधी जातो. त्याने होकार दिल्यास विषय संपला. घरचे लोक मग नंतर मुलीचं घर वगैरे बघायला जातात.(formality)

वरीलपैकी कोणता पर्याय निवडायचा हे मुलाच्या हातात असतं.

नव्वद टक्के लग्न हे बघण्याच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दहा पंधरा मिनीट भेटीच्या आधारेच ठरवले जातात. काही अतिहुशार candidate मुलीशी एकट्यात बोलण्याची इच्छा व्यक्त करतात. दोघेजण एखाद्या दुसऱ्या खोलीत, टेरेसवर किंवा जवळपास कुठेतरी बसून बोलू शकतात. पण हा प्रकार मला हॉरिबल वाटतो. असं दडपणाखाली कुणाला बोलावसं वाटणार. म्हणून मग दुसरा पर्याय म्हणजे ते दोघे नंतर बाहेर भेटू शकतात (आमच्या इकडे सहसा असं कुणी करत नाही, बोलायचंच होतं याला तर घरी का नाही बोलला वगैरे बोल लावले जातात. पण आयुष्याचा प्रश्न असल्यामुळे हे पाप स्वीकारायला मी तयार आहे : ) )

पण गोची अशी आहे की मुलाने मुलगी पसंत आहे की नाही हे पुढच्या आठ किंवा पंधरा दिवसांत सांगणं अपेक्षित असतं. कारण मुलाचा नकार असल्यास पालक बाकी मुलं बघायला मोकळे होतात. (त्यांच्या दृष्टीने हे बरोबरही आहे)

समजा मुलगा मुली बघायला आला अन त्याने तिन वेगवेगळ्या गावांच्या तिन मुली बघितल्या. त्याला कमी वेळेत निर्णय द्यायचा असल्याने तो प्रत्येक मुलीला एकदा किंवा जास्तीत जास्त दोनदा भेटू शकेल. आपण तूर्तास एकच भेट पकडू. तीन मुलींना फक्त एकदा भेटून (अधिक शक्य झाल्यास काहीवेळ फोनवर बोलून) त्याला निर्णय द्यायचाय. तर या तिघींपैकी एक मुलगी कशी निवडावी? संक्षि नी म्हटल्याप्रमाणे जिचा सहवास आपल्याला चांगला वाटेल तिला निवडावं पण हे आकलन या वयात इतक्या कमी भेटींमध्ये होणं शक्य आहे का? तरुण मुलांचं मन फार विचित्र असतं. त्याचे विचार कितीही महान असले तरी तो या तिघींपैकी जी अधिक सुंदर असेल, जिचं बोलणं अधिक मधाळ असेल तिलाच निवडणार याची शक्यता अधिक. अर्थात ही सहजप्रव्रृत्ती आहे. सौंदर्याचा आपल्यावर नकळतपणे पडणारा परिणाम या मुद्द्याला ग्राह्य धरून या भेटींमध्ये असा काय संवाद साधावा जेणेकरून आपल्याला त्यातल्या त्यात योग्य मुलगी निवडता येईल?(हुश्श )

संदीप डांगे's picture

16 Jan 2017 - 12:53 pm | संदीप डांगे

सौंदर्याचा आपल्यावर नकळतपणे पडणारा परिणाम या मुद्द्याला ग्राह्य धरून या भेटींमध्ये असा काय संवाद साधावा जेणेकरून आपल्याला त्यातल्या त्यात योग्य मुलगी निवडता येईल?(हुश्श )

>>> ह्या एकाच प्रश्नात अनेक मुद्दे आहेत राव!!! :-)

अॅस्ट्रोनाट विनय's picture

16 Jan 2017 - 1:04 pm | अॅस्ट्रोनाट विनय

या पामराच्या डोक्यात थोडा उजेड पाडू शकाल काय

संजय क्षीरसागर's picture

16 Jan 2017 - 2:49 pm | संजय क्षीरसागर

संक्षि नी म्हटल्याप्रमाणे जिचा सहवास आपल्याला चांगला वाटेल तिला निवडावं पण हे आकलन या वयात इतक्या कमी भेटींमध्ये होणं शक्य आहे का?

एकदा वयात आल्यावर ते किती हा मुद्दा गौण आहे. लग्न करायचं म्हटल्यावर निवड अनिवार्य आहे, तिथे ज्येष्ठतेचा संबंध नाही. तुम्ही भेटी किती घेता यापेक्षा तुमची `फील कळण्याची' क्षमता काम करते. फीलच जर कळणार नसेल तर वय कितीही असो आणि भेटी कितीही घडोत संभ्रम कायम राहील.

तरुण मुलांचं मन फार विचित्र असतं. त्याचे विचार कितीही महान असले तरी तो या तिघींपैकी जी अधिक सुंदर असेल, जिचं बोलणं अधिक मधाळ असेल तिलाच निवडणार याची शक्यता अधिक. अर्थात ही सहजप्रव्रृत्ती आहे. सौंदर्याचा आपल्यावर नकळतपणे पडणारा परिणाम या मुद्द्याला ग्राह्य धरून या भेटींमध्ये असा काय संवाद साधावा जेणेकरून आपल्याला त्यातल्या त्यात योग्य मुलगी निवडता येईल?

आकर्षण हाच निर्विवाद प्राथमिक फॅक्टर आहे. उगीच गुण आवडले म्हणून लग्न केलं याला अर्थ नाही. त्यामुळे हिचे गुण चांगले आणि तीचं रुप भावतंय अशी दोन होड्यांवर एकावेळी सवारी होईल. मुलगी प्रथम दर्शनी लोभस वाटलीच पाहीजे. आणि हा फार व्यक्तिगत फॅक्टर आहे. उगीच इतरांना तुम्हाला कशी वाटते ? विचारण्याची ती गोष्ट नाही. नंतर मग साधारण तीनेक भेटीत सहवासाचा फील कळतो. खरं तर तो पहिल्या भेटीतच कळतो (म्हणजे आहे की नाही) पण केवळ दैहिक आकर्षणाचा इंपॅक्ट दूर व्ह्यायला आणि कंन्सीसटंसी वेरिफाय करायला पुढच्या तीनेक भेटी पुरेत,

चिनार's picture

16 Jan 2017 - 2:55 pm | चिनार

पूर्ण सहमत !!

मराठी कथालेखक's picture

16 Jan 2017 - 3:42 pm | मराठी कथालेखक

आकर्षण हाच निर्विवाद प्राथमिक फॅक्टर आहे. उगीच गुण आवडले म्हणून लग्न केलं याला अर्थ नाही.

बरोबर आहे. आकर्षणाचा अभाव असताना लौकिक अर्थाने लग्न कदाचित 'यशस्वी' होवू शकेल पण मानसिक पातळीवर पुर्णपणे समाधान कधीच लाभणार नाही आणि एक रितेपणाची भावना कायमच राहील.
अर्थात किती भेटीनंतर आकर्षण वाटू शकते हे सांगणे कठीण आहे..सुंदर मुलगी पहिल्याच भेटीत आकर्षक वाटेल हे नक्कीच. पण कधी कधी सामान्य भासणारी मुलगीही कधी काही काळाने 'त्या अर्थाने' आवडू लागते असा माझा अनुभव (२ मैत्रीणींच्या बाबतीत) आहे , अर्थात अ‍ॅरेंज्ड मॅरेजमध्ये असा वेळ देता येवू शकणार नाही, त्यामुळे एक दोन भेटीत जिच्याबद्दल आकर्षण वाटले नाही तिला नाकारणेच ठीक... उगाच 'कदाचित भविष्यात आवडू शकेल' असे म्हणत होकार देणे किंवा निर्णय लांबवत राहणे दोन्ही अयोग्य होईल.

आदूबाळ's picture

16 Jan 2017 - 4:11 pm | आदूबाळ

धी कधी सामान्य भासणारी मुलगीही कधी काही काळाने 'त्या अर्थाने' आवडू लागते

The Mermaid Effect.

मराठी कथालेखक's picture

16 Jan 2017 - 5:58 pm | मराठी कथालेखक

याबद्दल माहीत नव्ह्तं हा effect खरा असेलही कदाचित, पण मला वाटतं माझे दोन मैत्रिणींबद्दलचे अनुभव म्हणजे 'दाट मैत्री आणि घनिष्ट भावनिक जवळीकिनंतर वाटू लागलेले शारिरिक आकर्षण' असे काही असावे. असो.. त्या गोष्टी खूप जून्या आणि पुढे न सरकलेल्या ...

मराठी कथालेखक's picture

16 Jan 2017 - 7:05 pm | मराठी कथालेखक

दाट मैत्री आणि घनिष्ट भावनिक जवळीकिनंतर वाटू लागलेले शारिरिक आकर्षण

याचं दुसरं एक उदाहरण देता येईल. 'पुकार' चित्रपटात माधूरी ही अनिलची खूप चांगली मैत्रीण असते. ती त्याच्यावर प्रेमही करत असते पण त्याला मात्र तिच्याबद्दल आकर्षण /प्रेम असं काही नसतं. तेच नम्रता मात्र त्याला पाहिल्याक्षणी आवडते, दोघांचं प्रेमही जमतं. पण पुढे संकटे येतात. नम्रता साथ सोडते. संघर्षाच्या, हतबलतेच्या परमोच्च क्षणी त्याला साथ देणारी माधूरी (खरं त्याला खड्ड्यात लोटणारी पण तीच असते पण ते विसरुन) त्याला आवडू लागते, तो प्रेमात पडतो. इथे mermaid effect नाही म्हणता येणार मला वाटतं..

रेवती's picture

16 Jan 2017 - 7:53 pm | रेवती

सहमत आहे. असे थोड्याफार फरकाने अजूनही समाजात असे चालते. तुम्ही या बाबतीत घरच्यांशी बोलू शकताय का?
मुलीशी दबावाखाली कुठेतरी बोलणे दोनेकवेळा होऊ शकेल जे आवडणार नाहीच पण नंतर नंतर मोकळेपणा येईल पण तोवर घरचे हरकत घ्यायला लागतील.
तुमचा इलाका सोडून दुसर्‍या ठिकाणच्या मुलीशी लग्न करायला तुमची हरकत आहे का? जिथे यापेक्षा जास्तवेळा भेटू देतील. लग्न तुमचं आहे, तुम्ही ठरवा की तसं आवडेल का.
मी सांगतिये तसं, संक्षी म्हणतायत तसं, किवा सगळ्यांचं सगळच खरं असतं. सगळ्यातलं थोडं थोडं लागू होतं. बरचसं एका मनुष्यासाठी गैरलागू होवू शकतं. यात चूक बरोबर असं नाही. कदाचित तुमचं लग्न अत्यंत वेगळ्या पद्धतीने ठरेल ज्याची तुम्ही कधी कल्पना केली नसेल. आमच्या शेजारचे जोडपे आहे त्यांच्या फ्यामिल्यांनी दोन चार वर्षे वधू, वर शोधकार्य जोमाने केलं पण मागच्याच गल्लीत राहणारे उशिराने भेटले व लग्न पाच मिनिटात ठरलं. एरवी आजूबाजूला राहणारे सगळे लोक्स आपल्याला माहीत असतात पण यांना नेमक्या यांच्याच दोन फ्यामिल्या माहीत नव्हत्या. आपल्या अपेक्षा, आपण राहत असलेला भाग, तेथील पद्धती, मर्यादा, मोकळेपणा यांचे गणित घालून साधारण आराखडा ठरवा. काहीजण मान्यता देतील, काहीजण देणार नाहीत.

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2017 - 2:48 pm | टवाळ कार्टा

पातेलं परत आलं?

मराठी कथालेखक's picture

16 Jan 2017 - 3:32 pm | मराठी कथालेखक

trial marriage चं बघा

आता हे काय नवीन ? (आमच्यावेळी नव्हती असली थेरं!!)

मराठी कथालेखक's picture

16 Jan 2017 - 3:46 pm | मराठी कथालेखक

अहो नवीन कुठे आहे हे ? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असही म्हणतात ना त्यालाच.
अनिल कपूर , काजोलचा हम आपके दिल मे रहते है १९९९ चा आहे.

संजय क्षीरसागर's picture

16 Jan 2017 - 6:42 pm | संजय क्षीरसागर

काँट्रॅक्ट तरी कशाला ?

मराठी कथालेखक's picture

16 Jan 2017 - 6:58 pm | मराठी कथालेखक

contract म्हणजे दोघांनी बघायचं की आपण एकमेकांना 'पती-पत्नी म्हणूनआवडतो की नाही' .. कुणा एकाचं उत्तर 'नाही' असलं की contract period नंतर लग्नाचा दी एन्ड, असं..

संजय क्षीरसागर's picture

16 Jan 2017 - 8:08 pm | संजय क्षीरसागर

पण एक स्टेप आणखी पुढे . नुसती कंपेटीबिलीटी ट्राय करायला काँट्रॅक्ट तरी कशाला ?

संजय क्षीरसागर's picture

16 Jan 2017 - 8:09 pm | संजय क्षीरसागर

इज इनफ .

शब्दबम्बाळ's picture

16 Jan 2017 - 6:36 pm | शब्दबम्बाळ

बऱ्याच लोकांनी चांगले सल्ले दिलेत, असेही मिपाकर मदतीला तयार असतातच!
या गोष्टीवर सल्ला वगैरे देण्याचं माझं वय नाही पण मग गोष्टच सांगतो! इथे बऱ्याच लोकांना माहित आहे, बघा तुम्हाला काही फायदा होतो का...

एकदा एक गुरु त्यांच्या शिष्याला एका बागेतून सगळ्यात सुंदर फूल आणायला सांगतो. बाग मोठ्ठी असते आणि त्यातून एक सरळ रस्ता जात असतो. पण हे काम करताना एक नियम देखील असतो की एकदा एखादे फुलझाडं ओलांडले कि पुन्हा मागे वळून त्याचे फूल घ्यायला यायचे नाही.

शिष्य बागेमध्ये जातो. बराच वेळ झाल्यानंतर तो रिकाम्या हाताने गुरुकडे परत येतो.
गुरु विचारतात,"रिकाम्या हाती परत का आलास?"
त्यावर शिष्य म्हणतो कि," मी बागेत चालायला सुरुवात केली तेव्हा सगळ्या झाडांना विविध प्रकारची फुले होती. कोणाचा आकार मोहक होता, कोणाचा रंग, कोणाचा सुगंध छान होता पण दरवेळी मला वाटायचं कि याहीपेक्षा सुंदर फूल मला पुढे मिळेल. मग मी पुढे चालत राहिलो आणि बराच वेळ चालल्यावर बागेच्या शेवटाला पोहोचलो! तेव्हा जाणवले तिथे असलेल्या फुलांपेक्षा आधीची फुले सुंदर वाटत होती. पण आता मागे जाऊ शकत नसल्याने मी रिकाम्या हाती आलो..."

गुरु हसले आणि म्हणाले,"आकर्षण असे असत. माणसाला कायम वाटत राहत कि अजून आकर्षक काहीतरी पुढे मिळू शकेल आणि त्याला शोधत राहतो... शेवटी कायम रिताच राहतो!
"आता तू असे कर, पुन्हा बागेत जा आणि तुला जे फूल सुंदर वाटेल ते घेऊन ये!"

शिष्य पुन्हा जातो. यावेळी परत येताना मात्र त्यांच्या हातात एक सुंदर फूल असते.
गुरु विचारतात,"हे सगळ्यात सुंदर आहे का?"
शिष्य म्हणतो,"माहित नाही गुरुजी, पण जेव्हा मी हे फूल पाहिलं तेव्हा ते मला आवडले! कदाचित याच्यापेक्षा सुंदर फुले बागे मध्ये असतीलही पण मग मला त्यांच्याकडे बघण्याची गरज वाटली नाही. माझ्यासाठी हेच फुल सुंदर आहे!"

गुरुजी हसले आणि म्हणाले "प्रेमाचं असे असते एकदा एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडले कि ती तुमची होऊन जाते. मग त्याला गुण किंवा दोष यामध्ये तोलण्याची गरज पडत नाही"

असच काहीस लग्नाबद्दल म्हणता येईल... जशी आठवली तशी लिहिलीये बर का! ;)

संजय क्षीरसागर's picture

16 Jan 2017 - 6:51 pm | संजय क्षीरसागर

फक्त अनुसरायला हवी. अर्थात, लग्नाच्या बागेत पुन्हा चान्सची शक्यता कमी.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

16 Jan 2017 - 9:54 pm | अॅस्ट्रोनाट विनय

खूप छान कथा शब्दबंबाळजी. मी ऐकलेली नव्हती. लग्नाच्या बागेत मात्र एकच चक्कर मारायला मिळते पण वरील कथेतला दृष्टीकोन वापरल्यास शोधाशोध सोपी होईल. धन्यवाद

त्यावर एकच सोल्यूशने.

एका वेळी एकच विंडो उघडायची, ती बंद केल्यावर पुन्हा मागे पाहाणे नाही. विंडो बंद केली की विषय संपला, नो कंपॅरीजन.

याचं कारण म्हणजे कंपॅरीजन अशक्य आहे. दोन व्यक्ती पूर्णतः वेगवेगळ्या आहेत.

आणि एकदा निर्णय झाला की पुढची विंडो उघडायची नाही! नाऊ इट इज ऑल डन.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

17 Jan 2017 - 11:35 am | अॅस्ट्रोनाट विनय

Yupp. हे गणित लय न्यारं

अॅस्ट्रोनाट विनय's picture

16 Jan 2017 - 10:15 pm | अॅस्ट्रोनाट विनय

रेवती मॅडम, बरूबर हाये तुमचं. सगळ्यांचे विचार आयकून माझ्या टकूळ्यात प्रकाश पडतोय. एक ठोस विचार तयार व्हायला मदत होतीये. तुम्ही म्हटल्याप्रमाणे ध्यानीमनीही नसतात अशा पद्धतीने लग्न ठरतात कधीकधी.

माझ्या आत्याभावाला एका मुलीचं स्थळ आलं होतं,ती बँकेत नोकरी करायची. पठ्ठ्या गेला बँकेत, दोन तिन तासांत काय observe केलं काय माहीत पण बाहेर येऊन सुमडित मला बोलला की पोरगी पसंद आहे. नंतर मुलगी बघण्याचा फक्त औपचारिक कार्यक्रम.
माझा चुलतभाऊ त्याच्या मामाच्या गावी गेला, तिथे त्याच्या लग्नाचा विषय निघाला. नेमकं तेव्हा समोरच्या घरातली मुलगी सडा टाकत होती. त्याची आजी बोलली की ही समोरची पोरगीपण आहे लग्नाची सांग कशी वाटते? गड्याला आवडली की एकाच नजरेत. कशाच बोलणं अन कशाच भेटणं. एकही पोरगी पाहली नाही त्यानं. आता मस्त चालू आहेत की दोघांचे संसार

थोडक्यात This is a game of chance :)

जयंत कुलकर्णी's picture

17 Jan 2017 - 1:06 pm | जयंत कुलकर्णी

त्याने आणि तिने थोडावेळ एकमेकांशी बोलून, समजवून घेऊन लग्न करण्याचा धोका पत्कारावा ..
किंवा
त्याने आणि तिने बरीच वर्षे एकमेकांना स्मजाऊन घेऊन मग लग्न करण्याचा धोका पत्करावा...
:-)

संजय क्षीरसागर's picture

17 Jan 2017 - 1:46 pm | संजय क्षीरसागर

विवाह ही मजा आहे. फुल एंटरटेनमंट आहे. तो सहवासाचा आनंद आहे. एकटा प्रवास करण्यापेक्षा सहप्रवासी असला की जगणं मजेचं होतं.

जयंत कुलकर्णी's picture

17 Jan 2017 - 1:52 pm | जयंत कुलकर्णी

हं....अहो संक्षि विनोद तरी समजावून घ्या ....
:-)

संजय क्षीरसागर's picture

17 Jan 2017 - 2:03 pm | संजय क्षीरसागर

पण प्रश्नकर्ता लग्नाच्या प्रतिक्षेत आहे त्याला धोक्याचा कंदील कशाला ? म्हणून प्रतिसाद दिला.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

17 Jan 2017 - 4:37 pm | अॅस्ट्रोनाट विनय

लग्न (मग ते arrange marriage असो की love marriage ) ही व्यक्तीसापेक्ष गोष्ट आहे. तुमची वृत्ती खिलाडू नसेल तर कुठल्याही मुलीसोबत लग्न केलं तरी ते फसेल, असेल तर ते टिकेल. अर्थात ऐकानेच समजूतदार असून भागत नाही.तिचीसुद्धा तशीच वृत्ती हवी. याअर्थाने हा धोका आहेच.
पण संक्षीजींचा दृष्टीकोन कामात पडणारा आहे. आणि तुम्हाला compromise करत जगायचं नसेल तर त्यांच्या theory ला आणि विवाच्या कथेला पर्याय नाही.