कोकणातली खादाडी!

कबीरा's picture
कबीरा in काथ्याकूट
13 Jan 2017 - 4:33 pm
गाभा: 

मेहेरबान लोकहो साधारण अलिबाग पासून ते तारकर्ली पर्यंत कोकण पालथा घातला तर कुठे कुठे दर्जा खायला मिळू शकेल ह्याची यादी करून ठेवायचा विचार आहे. म्हणजे कस नंतर गाडीला किक मारून एकदाच १०-१२ दिवसाचा प्ल्यान आखून मस्तपैकी कोकणाची खास निवांत पणे खादाडी वारी करून यावी. बुलेट ची साथ, कोकणाचा प्रवास, खायचं प्यायचं आणि निवांत समुद्र काठी एखाद आवडीचं पुस्तक घेऊन पडून राहायचं. अजून सुख ते काय??
हातात डायरी, पेन घेऊन तयार आहे गड्यानो...सुचवा एक एक ठिकाण

प्रतिक्रिया

मालवणला 'अतिथी बांबू खानावळ' आहे. नॉन-व्हेज उत्तम. विशेषतः मासे स्वतः मालक बनवतात त्यामुळे चव भारी असते.

भावना कल्लोळ's picture

13 Jan 2017 - 6:50 pm | भावना कल्लोळ

+१

कपिलमुनी's picture

13 Jan 2017 - 5:34 pm | कपिलमुनी

तुम्ही पूर्वीपण बरेच धागे टाकून माहीती गोळा केली आहे , त्याचे पुढे कुठे लोणचे घातलेत ते आधी सांगा !
आणी मुख्य म्हणजे थंडरबर्ड घेउन आरई कळपात आलाय याची जाहीर कबुली द्या

फेदरवेट साहेब's picture

13 Jan 2017 - 5:35 pm | फेदरवेट साहेब

ए भावसाहेब, असा टेस्टी विषय काथ्याकूट मंदी का टाकते रे तुमी पोरेलोक, मस्त विषय हाय, पर अपुनचा पास, आपुनला नाय काय आयडिया.

आमचा तर घोळच होतो. निव्वळ शाकाहारी म्हटले की कुठून आले असं बघतात. कोकणात शाकाहारी कुठे मिळते ते सांगा मग निवांत कच्च्याबच्यासकट जातो कोकणात. गणपतीपुळे आणि एक दोन ठिकाणे सोडली तर माश्याच्या वासाने जेवण जात नाही पोरांना....

कोकणात शाकाहारी कुठे मिळते ते सांगा

केशवराजपासच्या दाबकेवाडीत अप्रतिम मिळतं.

पैसा's picture

14 Jan 2017 - 10:57 am | पैसा

रत्नागिरीत शाकाहारी सगळीकडे चांगले मिळते. आम्ही रत्नागिरीकर लोक मधे फेसबुकवर यादी करून लाळ गाळत बसलो होतो. उलट चांगले मासे शोधत फिरावे लागेल.

जानु's picture

13 Jan 2017 - 9:05 pm | जानु

दापोलीचे का?

उन्हाळ्यात गेलात तर शाही मोदक मिळतील, मग काय मासे आणि काय

बोका-ए-आझम's picture

14 Jan 2017 - 10:53 am | बोका-ए-आझम

श्रीवर्धनला काही घरगुती हाॅटेल्स आहेत. लक्ष्मीनारायण मंदिरासमोर एक मस्त हाॅटेल आहे. नाव विसरलो पण तिकडे प्राॅन्स आणि मासे सुंदर मिळतात.

मालवण, हॉटेल रुचिरा कणकवली, हॉटेल निखिल कुडाळ, हॉटेल भाऊंची खानावळ गणपतीपुळे, हॉटेल समीर वरील ठिकाणी उत्तम मांसाहारी जेवण मिळते .