पाकिस्तानचे खोटारडेपण पुन्हा एकदा... जागतीक मंचावर

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
10 Jan 2017 - 7:29 pm
गाभा: 

पाकिस्तान ने सबमरीन मधून बाबर ३ हे क्रूझ मिसाईल डागल्याचे व्रुत्त व्हिडिओ पोस्ट करत दिले गेले.
टाईम्स समुदायाने हे वृत्त आणि ती व्हिडीओ फेक असल्याची बातमी दिली आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/pakistans-nuclear-missile-...

पाकिस्तानच्या क्षमते बद्दल शंका नाही. पण तसा खोटा व्हिडीओ प्रसारीत करण्याची त्याना काय गरज होती?
भारताने त्यांचे मिसाईल डागले / सॅटेलाईट लाँचर डागले या बातमी नंतर पाकिस्तान सरकारला न्यून गंड आला असेल आणि त्यासाठी त्याने असे खोटे व्रुत्त दिले असेल?
की यामागे आणखी काही राजकारण असावे? सर्वात महत्वाचे म्हणजे ही बातमी पकिस्तान लश्कराने दिली होती.

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jan 2017 - 10:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

"मेकिंग युवर प्रेसेन्चे फेल्ट बाय न्युइसन्स" हा वाक्प्रचार पाकिस्तानच्या आस्तिवाचे मुख्य तत्व आहे. त्यामूळे जमले तर खरे डावपेच आणि नाही जमले तर खोटे आभास निर्माण करून आपली "न्युइसन्स व्हॅल्यु" जगावर सतत बिंबवत ठेवणे हे पाकिस्तानची अपरिहार्यता आहे. त्यात कमीपणा असणे/येणे पाकिस्तानी लष्कराला परवडणार नाही. सर्जिकल स्ट्राईक नाकारण्यामागेही (पक्षी : आम्ही कमकुवत आहोत हे मान्य करायला नकार देणे) हेच कारण होते.

lakhu risbud's picture

10 Jan 2017 - 10:46 pm | lakhu risbud

जरा थांबा,थोड्या वेळानंतर आत्ताचे मोदी सरकार सुद्धा पाकड्यांप्रमाणेच कसे वागत आहे हि थियरी मांडणारे मेगाबायटी प्रतिसाद येतील बघा.

फेदरवेट साहेब's picture

12 Jan 2017 - 2:49 pm | फेदरवेट साहेब

प्लिज बी सिटेड मिस्टर रिसबुड =))

लोकानला काय पोस्ट करायचा हाय ते लोकानला दिसाईड करू दे नी, तू कश्याला जंपिंग जॅक वानी बसल्या जागी कुदी मारते सन?

तुला काय फील होते ते पोस्ट कर नी तू .

संदीप डांगे's picture

12 Jan 2017 - 6:52 pm | संदीप डांगे

फेदरवेट सायेब! ते एक श्टाइल हय ते म्हायत का तुमाला, प्रतिवादी काय बोलला नसते तरी 'हा असाच बोलेल' असं म्हणायचं आनी "तो तसं बोलला" हे ' खरोखर वाटून घेऊन' टिका सुरु करायची...

आणखी एक ष्टाइल है बगा... त्याचा मीनिंग हिथं हाय हां लागट

एखाद्याच्या मनाला लागेल असे ; बोंचक ( बोलणे , लिहिणे ). लागट लिहिणाराने लिहिले तरी अब्रूनुकसानीचे बाबतीत इंग्रजी हद्दींतील वारंटाची बजावणी आपणांवर होऊं शकत नाही . - विक्षिप्त ३ . १२० .

फेदरवेट साहेब's picture

12 Jan 2017 - 7:15 pm | फेदरवेट साहेब

ए दिकरा संदीप, वाज ही टॉकिंग अबाउट यु डिअर बॉय?

१. इफ नो, व्हाय केयर अबाऊट इट , इग्नोर हिम

२. इफ येस, सन तू कश्याला तेच्या ऑन फायर हेड वरती पेट्रोल ओतते, व्हाय फ्युल इडिओक्रसी आय से, तवा वापस इग्नोर

तुमी समदे पोरे लोक बद्धे हॉट हेडेड हाय नी. चिलपील का काय म्हणते ते जेननेक्स्ट तुमची ते घे नी सन तू, आम्ही बुढा लोग बघते काय करायचा त्ये, तसंबी आपुनला इज्जत नाय इथं .. तू ते ब्रिदिंग योगा कर नी रामदेव बाबाचा, गॉड ब्लेस यु हा सन.

संदीप डांगे's picture

12 Jan 2017 - 7:23 pm | संदीप डांगे

ओल्ड मॅन... डिड माय कमेन्ट बॉदर यु? इफ नो -व्हाय केअर, इफ येस - देन व्हाय!

शांतीवटी इसरलासा?

फेदरवेट साहेब's picture

12 Jan 2017 - 7:39 pm | फेदरवेट साहेब

नाय नाय नॉट बोदरिंग ऐट ऑल सन, कवा तुझ्या पर्सनल मॅटर मंदी पडायचा म्हणून बी बोलला नाही आपुन, तू थोडा मॅच्युअर वाटला, तुला समजेल असा फील झाला म्हणून बोलला, येट तुला अँग्री वाटत असला तर आपुन अपोलोजी टेन्ड करते

ए तुमि फेदरवेट असून्बी बावावानी का बोल्ते?

सूड's picture

12 Jan 2017 - 8:03 pm | सूड

वशाडी येवो!! =))

संदीप डांगे's picture

12 Jan 2017 - 7:44 pm | संदीप डांगे

णो नीड ऑफ अपॉलॉजी स्सार... आय वाज नॉट अ‍ॅन्ग्री फॉर यू...! आप्ल्याला तुमचा वावर आवडते... तू बोलते र्‍हायच.. आमी आइकनार. प्रॉमिस!

पाकिस्तानी सैन्याची ती गरज आहे. स्वतःची ताकद कशी भारताच्या तोडीस तोड आहे हे दाखवण्याची. सामान्य जनतेला जर हे समजले कि आपले लष्कर भारताच्या तुलनेत दुबळे आहे त्या दिवसापासून लष्कराचा दबदबा कमी व्हायला सुरवात होणार आणि याचे अजून इतर landslide effects सुद्धा असणार. त्यामुळेच हि धडपड. .