बुद्धीमत्ता, सर्जनशीलता,latent inhibition आणि मानसिक रोग!!!

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in जनातलं, मनातलं
10 Jan 2017 - 6:49 pm

माणसाने केलेली प्रगती ही त्याच्या बुद्धीमत्तेमुळे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पण माणुस ही खुप मोठी टर्म आहे.माणसांचे अनेक प्रकार पडतात,कॉकेशीअन (युरोपियन्स), मंगोलॉईड (पौरात्य),ऑस्ट्रेलॉईड्स (भारतीय), निगरॉईड्स (आफ्रिकन) व इतर अनेक.यांच्यात जसे वर्णादी भेद आहेत , तसेच बुद्धीमत्तेतही भेद आहेत. बुद्धीमत्ता म्हणण्याऐवजी सर्जनशीलतेत (creativity) खूप फरक आहे.जगाच्या बुद्ध्यांकावर जर नजर टाकली तर पौरात्य लोकांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त आहे व त्यांचा मेंदू सर्वात मोठा आहे.त्या खालोखाल युरोपियनांचा बुद्ध्यांक व मेंदू व बाकीचे नंतर. जर पौरात्य लोकांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त असेल तर बहुतांश शोध ,सर्जनशीलता तिथे दिसायला हवी होती.पण आपण इतिहासात डोकावलो तर आपल्या लक्षात येईल की बहुतांश शोध ,सर्जनशिलता ,कला ,काव्य ह्यात आघाडीवर होते व आहेत ते म्हणजे कॉकेशीयन्स ( युरोपियन्स). बुद्ध्यांक व मेंदूच्या आकारमानात दुसर्या क्रमांकावर असलेले युरोपियन्स जगाच्या पुढे कसे ? हे कोडे पडल्याशिवाय रहात नाही. आकारमानात मोठा असलेला मेंदू व उच्च बुद्धीमत्ता असुनही पौरात्य(Oriental's) कुचकामी का ठरले?

इथे विचारवंतांनी एक सिद्धांत मांडला आहे.जो मानसशास्त्राला अनेक दशके ज्ञात आहे. हा सिद्धांत आहे latent inhibition चा.

काय आहे latent inhibition(अव्यक्त अवरोध)?
आपल्या मेंदूकडे येणारी माहीती ही कीती उपयुक्त आहे हे मेंदू ठरवत असतो,आपल्यावर सतत होणारा माहीतीचा मारा (constant stream of information) मेंदूला सहन करावा लागतो.यातील कीती व कोणती माहीती आत घ्यायची व कोणती बाहेर ठेवायची हे ठरवण्याची मेंदूची क्षमता म्हणजे latent inhibition.उदा- आपल्या दाराचे हॅन्डल (doorknob) कसे आहे ,कसे दिसते व ते कसे काम करते हे आपल्याला माहीती असते,प्रत्येकवेळी दार उघडताना आपण जर ह्या माहीतीला ' नवीन माहीती' (new stimulus)म्हणून पाहू लागलो तर आपल्या मेंदूवर माहीतीचा अतिरीक्त ताण येईल(sensory overload) ,म्हणून मेंदू ही नेहमीची माहीती ब्लॉक करत असतो,या ओळखीच्या माहीतीसाठी मेंदूचे गेट बंद असते.

सर्जनशीलता (creativity)कशी उगम पावते?
उच्च बुद्धीमत्ता व low latent inhibition असा योग जुळुण आल्यास व्यक्ती सर्जनशील बनते.युरोपियन बुद्धीमत्तेच्या बाबतीत जरी दुसर्या क्रमांकावर असले तरी त्यांच्यात Latent inhibition कमी आहे.low latent inhibition म्हणजेच मेंदूला जास्तीची माहीती ,तिचे अवलोकन करण्याइतपत बुद्धीमत्ता याचे उत्तम योग युरोपियनांमध्ये जुळुण आले आहेत.याचा अर्थ त्यांच्या बुद्धीमत्तेला नेहमी नवीन खाद्य मिळत असते.एखाद्या जटील गोष्टीतून अन्वयार्थ लावण्याची त्यांची क्षमता जास्त आहे कारण त्यांच्यात low latent inhibition हा गुण प्रकर्षाने आलेला आहे.आता हा गुणधर्म त्यांच्यात का आला हा अजुनही अभ्यासाचा विषय आहे.

low latent inhibition आणि कमी बुद्ध्यांक----
Psychosis ह्या माझ्या मानसिक आजाराचे जेव्हा मी अवलोकन करायला लागलो तेव्हा अनेक उपयुक्त माहीती मला मिळाली.जर बुद्धीमत्ता कमी असेल व latent inhibition ही कमी असेल तर अशा व्यक्तींचा मेंदू सतत माहीतीच्या ओघाखाली असतो,पण कमी बुद्धीमत्तेमुळे माहीती सर्जनशीलतेत रुपांतरीत होत नाही.परिणामतः अशा व्यक्तींना सायकोसीस पासून स्किझोफ्रेनियापर्यंत कोणतेही मानसिक आजार होऊ शकतात.मानसिक आजारांचे प्रमाण युरोपियनांत अधिक असण्याचे देखील हे एक कारण आहे.ह्यावरुन सरळ दोन समीकरणे बनतात.
High intelligence + low latent inhibition= creativity
Low intelligence + low latent inhibition= insanity

आरोग्य

प्रतिक्रिया

तुमच्याबद्दल नेमके कोणते मत बनववे अश्या संभ्रमात पडलोय.

भावांनो, भैनींनो द्या की परतीकीर्या, अंताक्षरी नोका खेळू. हैला हे टफि कायबी आनत्यात. टकूरं काम दियना.

मराठी_माणूस's picture

12 Jan 2017 - 2:54 pm | मराठी_माणूस

छान माहीती
न्युटनचे गुरुत्वाकर्षणाचे संशोधन हे low latent inhibition चे उदा. असु शकते का ?
वरुन खाली पडणारी वस्तु प्रत्येकाने पाहीलेली असते पण "नवीन माहीती" म्हणुन ह्या घटनेची नोंद होत नाही पण न्युटनच्या बाबतीत त्याने ही "नवीन माहीती" ह्या सदरात घातली आणि त्याच्यावर पुढे अभ्यास केला.

मराठी कथालेखक's picture

12 Jan 2017 - 4:20 pm | मराठी कथालेखक

या धाग्यावर प्रतिक्रिया न येणं हे High latent inhibition असू शकेल काय ? टफिंच्या जिलब्या येतच असतात म्हणून दखल घेणे बंद झाले असावे ?
अंताक्षरी करिता पण कुणी फिरकले नाही :)

संदीप डांगे's picture

12 Jan 2017 - 5:51 pm | संदीप डांगे

अचूक प्रतिसाद!

लेखाचा विषय चांगला आहे टफि! अभिनंदन!

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Jan 2017 - 5:27 pm | हतोळकरांचा प्रसाद

छान माहिती, टफि! लेख आवडला! "लो लॅटेन्ट इनहिबिशन" हि संकल्पना पहिल्यांदा "प्रिझन ब्रेक" या सिरीयल मध्ये बघायला/ऐकायला मिळाली! त्यातलं मुख्य पात्र "मायकेल स्कोफिल्ड" याला हाय आयक्यू + लो लॅटेन्ट इनहिबिशन असल्याने तो खूप क्रिएटिव्ह असल्याचे दाखवण्यात आले आहे. या संकल्पनेवर आधारित हि एक स्वतंत्र वेबसाईट देखील आहे - http://www.lowlatentinhibition.org/

निष्पक्ष सदस्य's picture

12 Jan 2017 - 8:26 pm | निष्पक्ष सदस्य

हा धागा खरचं चांगला आहे,छान लेख आहे टफि.
असं काहितरी लिहीत चला.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

13 Jan 2017 - 1:14 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

धन्यवाद मित्रांनो( अंताक्षरी न खेळल्याबद्दल)

पैसा's picture

13 Jan 2017 - 1:47 pm | पैसा

पण या विषयावर अजून माहिती मिळवून लिहा ना

लो लॅटण्ट इनहीबिशन चा संबंध पुढे जाऊन संस्कृतींच्या आक्रमकतेशी लावता येईल का? मध्ये आदित्य कोरडे यांच्या नरहर कुरुंदकरांवर आधारित लेखात भारतीय समाजाच्या परकीय आक्रमकांना सामावून घेण्याच्या अफाट क्षमतेबद्दल काही भाष्य होते. त्या गोष्टीचा आणि वरील गुणधर्मांचा काही संबंध असू शकेल का टफि?

संदीप डांगे's picture

13 Jan 2017 - 5:13 pm | संदीप डांगे

विचार करण्यसारखा मुद्दा आहे एसभौ.

अवांतरः
कधी कधी विचार करतो की परदेशातल्या शिस्तीचे गोडवे गायले जातात, तंत्रज्ञान कुशल, आक्रमक, बुद्धिमान लोक कशी सर्व देश व्यापून असतात असं ऐकतो तेव्हा असं वाटतं की त्यांच्या ह्या गुणांमागे सतत झालेली युद्धे कारणीभूत असतील काय? नैसर्गिक निवडीचा काही भाग असू शकतो काय? लाखोच्या संख्येने युद्धात उतरणे, कम-अस्सल लाखोंचं मारल्या जाणे, जगलेल्यांचं बुद्धिमान, तल्लख असल्याने जीवंत राहणे होत असावे काय, त्यातून पुढच्या पिढ्या शिस्तबद्ध, बुद्धिमान निपजत असाव्यात काय?

आपल्या भारतात परकियांसारखी सर्वसमावेशक युद्धे झाली नाहीत, जी काही युद्धे झालीत त्यात चांगली शूर लोकं मेलीत, पानिपतच्या लढाईत मराठ्यांची संपूर्ण पिढी नष्ट झाली म्हणे..... ह्या सर्वांचा देशाच्या बौद्धिक कोशंट वर काही परिणाम होत असेलच ना, जपान सतत युद्धखोर होता, फ्रेन्च, डच, इन्ग्लिश, सगळे युद्धखोर....

......................असेच रॅन्डम -स्वैर विचार.... माझ्या विधानांना कोणताही शास्त्रिय आधार नाही.